' ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ - प्रत्येकाने फॉलो कराच!

ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ – प्रत्येकाने फॉलो कराच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या वेगवेगळ्या ‘ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म’ नी सगळीकडे धुमाकूळ घातला आहे, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर, अशा विविध प्लॅटफॉर्म वर वेगवेगळया प्रकारचा कंटेंट रिलीज होत असतो!

त्यापैकी सगळाच कंटेंट हा अव्वल दर्जाचा असतोच असं नाही, काही काही गोष्टी ह्या फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा केल्या जातात!

यात काहीच वाद नाही की या सगळ्या प्लॅटफॉर्म वर एकाहून एक दर्जेदार सिनेमे, वेब सिरिज, कॉमेडी शो पाहायला मिळतात, पण तरीही यावर अशाही काही गोष्टी आहेत ज्या निव्वळ लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या असतात!

 

ott platforms inmarathi
social samosa

 

त्यामध्ये शिवीगाळ, रक्तपात, गरजेपेक्षा जास्त बोल्ड सीन्स, किंवा राजकीय भाष्य करून जास्तीत जास्त लोकांना हे सगळं बघायला प्रवृत्त करायला सुद्धा काही प्रकारचा कंटेंट टाकला जातो!

पण जर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम असे प्लॅटफॉर्म सोडून इतरही बरेच पर्याय उपलब्ध आहेत ज्याचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकता!

हे सगळे प्लॅटफॉर्म येण्याआधी एकच प्लॅटफॉर्म हा जगभर बघितला जायचा आणि तो म्हणजे ‘युट्यूब’! पण या सगळ्या मनोरंजनाच्या गर्दीत देखील युट्यूब ची लोकप्रियता कणभर देखील कमी झालेली नाही!

 

youtube inmarathi

 

युट्यूब म्हणजे एकतर विनामूल्य आहे आणि त्यावर तुम्हाला हवी ती गोष्ट हव्या त्या वेळेला बघायला मिळते तीही अगदी फुकट! त्यामुळे आजही कित्येक लोकं युट्यूब हा फूल टाइम बिझनेस करून त्यातून कमाई करत आहेत!

आज आपण अशाच काही युट्यूब चॅनल्स विषयी जाणून घेणार आहोत जी चॅनल्स तुमचं मनोरंजन तर  करतातच पण त्याचबरोबर तुम्हाला कित्येक नव्या गोष्टी शिकवतात सुद्धा!

तर बघूया नेमकी कोणती चॅनल्स आहेत ही जी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अगदी मोफत पुरवतात!

 

1. The Infographics show :

 

the infographics show inmarathi
kodi

 

हे युट्यूब वरचं लोकप्रिय चॅनल्स पैकी एक आहे! ह्या चॅनल ला ७ लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत!

हे चॅनल ‘एज्युकेशन’ या कॅटेगरी मध्ये प्रामुख्याने मोडले जाते, यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती खूप मजेशीर आणि रंजक ग्राफीक्स च्या माध्यमातून लोकांसमोर मांडली जाते!

त्याला एका कथेचे वळण देऊन १० ते १२ मिनिटांचा व्हिडीओ केला जातो त्याच्यातून इतिहास, विज्ञान, सामान्य ज्ञान, फॅक्टस अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांपुढे मांडल्या जातात!

यामुळे लोकांना ते व्हीडियो बघितल्याचा आनंद देखील मिळतो आणि बरीच नवीन माहिती सुद्धा लोकांना मिळते!

 

2. Wendover Productions :

 

wendover production inmarthi
redditt

 

अमेरिकेतल्या सॅम डेनबी या तरुणाने हे युट्यूब चॅनल सुरू केले, या चॅनेलला सुद्धा अडीच लाखाहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत

या चॅनल वर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरचे माहितीपर व्हीडियोज पाहायला मिळतील! फक्त यावरचे व्हीडियोचे विषय हटके असतात!

म्हणजे चीन मधील अर्थव्यवस्था किंवा तिकडचा भूगोल, तसेच विमानाच्या वेगामागची शास्त्रीय कारणे, अशा एकदम आऊट ऑफ द बॉक्स विषयावर तुम्हाला इथे व्हीडीयो पाहायला मिळतील!

 

3. Real engineering :

 

real engineering inmarathi
nebula

 

हे चॅनल काही इंजिनियर्सच चालवतात! या चॅनल चा हेतू इतकाच की जगात विविध ठिकाणी चालणाऱ्या इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स बद्दल लोकांना सोप्या शब्दात आणि कमी वेळात माहिती पुरवणे!

तुम्ही जर इंजिनियरिंग करत असाल किंवा जगातल्या मोठमोठ्या देशात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं कशाप्रकारे चालतात याबद्दल कुतूहल असेल तर तुम्हाला नक्कीच या चॅनल वरचे व्हीडियो पसंत पडतील!

या चॅनलला देखील २ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत!

 

4.Real Life Lore :

 

real life lore inmarathi
nebula

 

इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, अंतराळ अशा विविध विषयातले तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चॅनल वर मिळू शकतील!

प्रकाशाचा वेग, वेगवेगळ्या आकाशगंगा इथपासून अगदी डायनॉसॉरचा शेवट इथपर्यंत प्रत्येक विषयावर या चॅनल मध्ये तुम्हाला माहिती मिळेल! तसेच जगात घडून गेलेल्या वेगवेगळ्या अद्भुत गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील!

या चॅनलला तर तब्बल ३ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत!

 

5. Sci show :

 

sci show inmarathi
YouTube

 

पृथ्वीच्या उत्पत्तीमागचं रहस्य अगदी इथपासून सध्या साऱ्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरस पर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती आणि त्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला या चॅनल वर मिळेल!

फक्त विज्ञान आणि त्याबाबतीत बरीचशी माहिती फार रंजक पद्धतीने या चॅनल वर मांडली जाते!

आणि तुमच्या आमच्या सारखे कित्येक उत्सुक लोकं ती माहिती आवडीने बघतात सुद्धा! या चॅनलला तर ६ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत!

 

6. VisualPolitik :

 

visualpoltik inmarathi
visualpolitik

 

ज्यांना जागतिक राजकारणात प्रचंड उत्सुकता आहे, किंवा आजवर झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींचा आढावा घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे चॅनल अत्यंत उपयुक्त आहे!

या चॅनल वर विविध देशांचे भाग आहेत ज्यात त्या त्या देशातल्या राजकीय घडामोडी आणि माहिती व्हीडियो स्वरूपात उपलब्ध आहे!

नुसतं राजकीयच नव्हे तर त्यामुळे जगावर होणारे सामाजिक आर्थिक परिणाम याचा सुद्धा या व्हीडीयो मध्ये आढावा घेतला जातो!

एकंदरच ज्याला राजकारण किंवा जागतिक राजकारणात रस आहे त्यांच्यासाठी हे चॅनल म्हणजे पर्वणी आहे!

 

7. Free Documentary :

 

freedocumentary inmarathi
YouTube

 

आता या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की हे चॅनल नक्की कशासंदर्भात आहे ते! 

जगातल्या वेगवेगळ्या विषयावर बनवल्या गेलेल्या डॉक्युमेंटरीज तुम्हाला या चॅनल वर मोफत बघायला मिळतील! उत्तम कॅमेरा आणि डायरेक्शन च्या मदतीने या डॉक्युमेंटरीज बघताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही!

तर ही काही लोकप्रिय युट्यूब चॅनल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन तर होतंच, शिवाय वेगवेगळ्या विषयाची माहिती सुद्धा त्यांना मिळते! ज्यामुळे लोकांच्या जनरल नॉलेज मध्ये सुद्धा वाढ होते!

तर तुम्हाला या टीव्ही सिरीयल्स आणि सिनेमाचा कंटाळा आला असेल तर या चॅनल्सना नक्कीच सबस्क्राइब करा!

आणि तुम्हालाही आणखीन अशा चॅनल्स ची नावं माहीत असतील तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?