' "शोले"बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील १५ गोष्टी ठाउक आहेत का?

“शोले”बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील १५ गोष्टी ठाउक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवूडचा विषय आहे आणि त्यात शोले नाही असं होणार नाही. बॉलिवूडची लायब्ररी ही शोलेशिवाय अर्धवट आहे.

 

sholay inmarathi

शोले म्हणजे सगळ्या बाबतीत अव्वल.!

स्क्रीनप्ले, डायलॉग, संगीत, कलाकार आणि त्यांची ऍक्टिग.सगळ्याच बाबतीत अतुलनीय.! कल्ट क्लासिक सिनेमा म्हटलं की पहिलं नाव शोले.

सिनेमा जेवढा भव्य आणि दिव्य तेवढेच त्याच्या पडद्यामागची कथा पण सुरस आहेत, ज्या अचंबित केल्याशिवाय राहणार नाही.

 

sholay film inmarathi

 

तर पाहूया अशाच काही सुरस गोष्टी ज्याच्यामुळे शोले अजून आयकॉनिक बनतो.

रमेश सिप्पी यांनी हा चित्रपट तयार करायला घ्यायच्या आधी अनेक चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट घेण्यास नकार दिलेला.

===

हे ही वाचा या १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय!

===

ramesh sippy inmarathi

 

सुरुवातीला सलीम-जावेद यांनी फक्त चार ओळींची कथा लिहिलेली, त्यामुळे जवळपास सगळ्यांनी हा चित्रपट घेण्यास नकार दिलेला. शोलेच्या घवघवीत यशानंतरचं पटकथा लेखकांना योग्य मानधन मिळायला लागलं.

पूर्ण चित्रपट तयार व्हायला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागला आणि ओव्हर बजेट सुद्धा जात होता.

 

saleem javed inmarathi

 

पण जेव्हा शोले रिलीज झाला तेव्हा सगळ्या मेहनतीचं चीज झालेलं दिसून यायला लागलं. २५ आठवडे सलग हा सिनेमा थिएटर मध्ये होता. मुंबईच्या ग्रांट रोड स्थित मिनेरवा टॉकीज मध्ये तर शोले पाच वर्षे चालला.

चित्रपटात असलेले काही कॅरेक्टर हे सलीम-जावेद यांच्या खऱ्या आयुष्यातील मित्रांवर आधारित आहेत. उदाहरण म्हणजे सुरमा भोपाली.!

 

surma bhopali inmarathi

 

हा सुरमा भोपाली खऱ्या आयुष्यात भोपाळमध्ये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करायचा आणि त्यावरच शोलेमध्ये हे पात्र आलं. जय आणि विरु ही नाव सुद्धा सलीम खानच्या विरेंदरसिंग आणि जयसिंग यांच्या नावावरूनच घेण्यात आलेल.

===

हे ही वाचा ४०० सिनेमांचा अनुभव गाठीशी असूनही सुरमा भोपाली लोकांसमोर यायला २५ वर्षे लागली

===

ye dosti inmarathi

 

‘ये दोस्ती,हम नही तोंडेंगे’ या गाण्याच्या चित्रकरणासाठी २१ दिवस लागलेले. तसेच जया बच्चनच्या कंदील घेऊन असलेल्या सिनच्या चित्रीकरणासाठी २० दिवस लागलेले.

कितने आदमी थे.?’ या जगप्रसिद्ध डायलॉग साठी अमजद खान ला ४० रिटेक घ्यावे लागले होते.

 

gabbar inmarathi

 

या एक डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन ने २७ वेळा मुंबई-बंगळूर प्रवास केलेला आणि त्यानंतरच हा अजरामर डायलॉग आपल्यापर्यंत पोहोचला.

ठाकूर, जो एक पोलीस अधिकारी दाखवला आहे तो आधी सेना अधिकारी दाखवायचा असा मानस होता.

 

thakur inmarathi

 

पण आवश्यक परवानग्या घ्यायला जास्त वेळ आणि गुंतलेली प्रोसिजर असल्या कारणांमुळे तो निर्णय बदलण्यात आला.

१९५० च्या दरम्यान ग्वाल्हेरच्या जंगलात गब्बर सिंग नावाचा डाकू होता. जो पोलिसांचं नाक आणि कान कापायचा. त्यावरूनच अमजद खानच गब्बर पात्र तयार करण्यात आलं.

डॅनी डेंझोनगपा हा गब्बरच्या भुमिकेसाठी, शत्रुघ्न सिन्हा जयसाठी आणि धर्मेंद्र ठाकूर साठी निर्मात्यांची पहिली पसंद होती. मात्र काही कारणास्तव ही यादी बदलली गेली.

शोलेच्या क्लायमॅक्स शूट करायला खऱ्या बंदुकीच्या गोळ्या वापरल्या गेलेल्या.अमिताभ शूट दरम्यान जखमी होता होता बचावले.

 

big b inmarathi

 

शूटिंगच्या दरम्यान हेमा मालिनीला पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावा लागला म्हणून सतवण्यासाठी धर्मेद्र लाईट बॉयला पैसे घ्यायचे.

 

basanti inmarathi

 

यावरून अनेकदा वादही झाले, मात्र शोले च्या ५ वर्षानंतर हेमा मालिनी आणि धर्मेद्र लग्नाच्या बंधनात अडकले.

===

हे ही वाचा ‘शोले’ चित्रपटातील थरारक सीन्स करणाऱ्या या धाडसी स्टंटवूमनचा चित्रपट नक्की पहा!

===

शोले जाहीर व्हायच्या चार महिन्याआधी अमिताभ आणि जया लग्नाच्या बेडीत अडकले होते. चित्रीकरणाच्या दरम्यान तर जया गरोदर होती. त्यामुळे कधी कधी शूटिंग मध्ये उशीर व्हायला लागला.

 

jaya inmarathi

 

मॅक मोहन ज्याचं पूर्ण चित्रपट मध्ये फक्त एकचं डायलॉग आहे ‘सिर्फ दो सरकार’ तो देशभरात सांबा म्हणून अजरामर झाला. फक्त एका डायलॉग च्या बळावर.!

सचिनला अहमदच्या रोलसाठी फी म्हणून फ्रीज देण्यात आलेला. आपल्या करियर च्या बॅड पॅच मधून जाणाऱ्या हेलनला सलीम खान मुळे मेहेबुबा-मेहेबुबा गाण्यात काम मिळालेलं.

 

mehbooba inmarathi

 

रामनगर, बंगळूर पासून ५० किमी लांब असलेले ठिकाण सिप्पीनगर म्हणून ओळखल जात. कारण तिथे शोले चित्रित झाला होता.  तिथले मोठे मोठे दगड ‘शोले मधले दगड’ म्हणून रेफर केले जातात.

 

village inmarathi

 

एक टुरिस्ट स्पॉट म्हणून हे ठिकाण आता प्रसिद्ध झालेलं आहे. शोले हा पहिला सिनेमा आहे जो ७० एमएम आणि स्टेरियोफोनीक साऊंडच्या वापराने चित्रित करण्यात आलेला.

सेन्सर बोर्डाने शोलेचा अंतिम शॉट पुन्हा शूट करायला सांगितला. जास्त हिंसा त्या सिनमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ज्यात ठाकूर गब्बरला ठार मारतो.

१९९० मध्ये म्हणजेच तब्बल १५ वर्षांनी शोलेचा ओरिजिन अखेरचा सीन रिलीज करण्यात आलेला. जेवढे स्पुफ आणि स्टँड अप कॉमेडी शोलेनी दिली, तेवढे क्वचित कोणत्या सिनेमानी दिले असतील.

आजच्या मीम मटेरीयल मध्ये पण शोले आवर्जून दिसतो.

 

memes inmarathi

 

बीबीसी इंडिया ने १९९९ मध्ये शोले ले ‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ म्हणून संबोधले तर ब्रिटिश इन्स्टिट्यूटच्या ऑल टाईम बेस्ट इंडियन फिल्म च्या पोल मध्ये सुद्धा शोले ने टॉप केलं होतं.

अनुपमा चोप्रा शोलेला सुवर्ण मानक म्हणून आपल्या पुस्तकात ‘शोले-द मेकिंग ऑफ क्लासिक’ मध्ये करते. तर च्याच पुस्तकात शेखर कपूर म्हणतो, भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये शोले सारखा वेल डिफायनिंग चित्रपट नाही.

बॉलिवूडचा इतिहास हा दोन भागात डिव्हाईड होईल, एक म्हणजे शोले पूर्वी आणि दुसरा म्हणजे शोले नंतर.! (शोले BC आणि शोले AD)

शोले ला फक्त एकच फिल्म फेअर अवार्ड मिळाला, तो देखील बेस्ट एडिटिंग साठी.

मूळ शोलेचा चित्रीकरण करण्यासाठी जिथे ३ करोड खर्च आला होता, तेच त्याच्या थ्रीडी व्हर्जन साठी २५ करोड एवढा खर्च आला. थ्रीडी शोले २०१४ मध्ये रिलीज करण्यात आलेला.

 

film inmarathi

 

शोलेच्या फेसबुक पेजला सर्वाधिक लाईक मिळाले. पडद्यावर गाजलेल्या या शोलेच्या पडद्यामागील गमतीजमती चित्रपटाइतक्याच इंटरेस्टिंग आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?