' ….आणि ही ६ शहरं पाण्याखाली गेली, यामागे कोणतं रहस्य दडलंय? – InMarathi

….आणि ही ६ शहरं पाण्याखाली गेली, यामागे कोणतं रहस्य दडलंय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासामध्ये आपण ज्या प्राचीन शहरांबद्दल वाचतो त्यापकी बऱ्याचश्या शहरांना जलसमाधी मिळाली होती आणि ती शहरे आजही पाण्याच्या पोटात त्या जुन्या स्मृती घेऊन जिवंत आहेत.

या शहरांनी स्वत:च्या अस्तित्वासह काही गूढ प्रश्नांना देखील जन्म दिला. ज्यांची उत्तरे आपण आजही शोधतो आहोत. हा शोध आजही अविरत सुरु आहे हे विशेष. जो कोणी माणूस पाण्यात उडी घेऊन या शहरांच्या भेटीसाठी जातो तो प्रत्येक वेळी एखादा नवीन अनुभव घेऊनच परततो.

चला तर आपणही आज जगातील काही महत्त्वाच्या प्राचीन शहरांची शब्दांच्या महासागरातून सफर करूया. अर्थातच पाण्यात उडी न घेता!

क्लियोपेट्राचे अलेक्झांड्रीया शहर, इजिप्त

 

underwater-ancient-cities-marathipizza01

 

क्लियोपेट्रा राणीचे नाव बऱ्याच जणांना माहित असेल. प्राचीन इजिप्तच्या इतिहासावर या राणीचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. तिच्या बद्दलच्या अनेक कहाण्या आजही दंतकथेच्या रुपात ऐकायला मिळतात.

१९९८ साली काही संशोधकांनी अथक मेहनत घेऊन समुद्राच्या पोटातून १६०० वर्षे जुने राणी क्लियोपेट्राचे अलेक्झांड्रीया शहर शोधून काढले.

इतिहासकार म्हणतात की प्रचंड मोठ्या भुकंपामुळे या शहराला जलसमाधी मिळाली. या पाण्याखालील शहरातून संशोधकांना अतिशय महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. सोबतच राणी क्लियोपेट्राच्या मुर्त्या देखील मिळाल्या आणि तिच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्याकाळची भरपूर धनसंपत्ती देखील संशोधकांच्या हाती लागली आहे.

पेवलोपेत्री शहर, ग्रीस

 

underwater-ancient-cities-marathipizza02

 

या शहराला जलसमाधी मिळण्याचे मुख्य कारण भूकंपच होते हे याधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

इसवी सन पूर्व १००० मधील हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या शहराची रचना इतकी सुंदर आणि नियोजित होती की त्या काळच्या लोकांच्या प्रगत तंत्रज्ञानाला दाद द्यावी लागेल.

१९६७ साली कॅम्ब्रीज आणि नॉटिंगहम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे शहर शोधून काढले होते. हे जगातील इतर जलसमाधी मिळालेल्या शहरांपेक्षा अतिशय चांगल्या स्थितीत आहे.

पोर्ट रॉयल, जमैका

 

underwater-ancient-cities-marathipizza03

 

पोर्ट रॉयल हे शहर पूर्वीच्या काळी मद्य आणि वेश्या या दोन गोष्टींमुळे अतिशय प्रसिद्ध होते.

जाणकार सांगतात की १६९२ मध्ये आलेल्या एका भुकंपामुळे हे शहर पाण्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत तब्बल २००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला पाण्याखाली असलेल्या या शहराचा काही भाग समुद्राच्या पाण्यावर आला आणि डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागला.

तेव्हा या शहराचा शोध घेण्यात आला. आता मात्र पुन्हा हे शहर समुद्राच्या लाटांनी झाकले गेले आहे. येथील भयावय वातावरणामुळे संशोधकांची ही सर्वात आवडती जागा आहे.

द्वारका, भारत

 

underwater-ancient-cities-marathipizza04

 

आपल्या पुराणात लिहून ठेवले आहे की द्वारका हे कृष्णाचे शहर. महाभारत आणी अन्य महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये या शहराचा वारंवार उल्लेख येतो.

द्वारका हे शहर सोने आणि चांदीने अक्षरश: नटलेले होते. श्रीकृष्ण अवताराचा समारोप झाल्यानंतर द्वारका शहराला जलसमाधी मिळाली. आजही जगभरातील संशोधक द्वारकेचे, महाभारताचे किंबहुना श्रीकृष्णाचे सत्य जाणून घेण्यासाठी पाण्याखाली असणाऱ्या या शहराला आवर्जून भेट देतात.

योनागुनी-जिमा, जपान

 

underwater-ancient-cities-marathipizza05

 

संशोधक आणि इतिहासकार आजही या निष्कर्षापर्यंत पोचू शकलेले नाहीत की हे शहर मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित! कारण या शहराची रचना इतकी अद्भुत आहे की जर आपण मान्य केलं की हे शहर त्या काळाच्या लोकांनी वसवलं तर आपल्याला हे देखील मान्य करावं लागेल की आजच्या जगापेक्षा ते कैकपटींनी प्रगत होते.

जलसमाधी मिळाल्या नंतरही या शहराचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही.

लॉयन सिटी, चीन

 

underwater-ancient-cities-marathipizza06

 

जगातील सर्वात सुंदर प्राचीन शहरांमध्ये या शहराचा क्रमांक लागतो. हे शहर सुमारे १३५ फुट खोल पाण्यामध्ये स्थिरावलेलं आहे.

हन राजवंश मार्फत हे शहर वसवण्यात आले होते. तब्बल ६२ फुटबॉल मैदाने मावतील एवढे मोठे या शहराचे क्षेत्रफळ आहे. या शहराबद्दल आजही अनेक रहस्ये गुलदस्त्यात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांची इथे मांदियाळी जमते असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?