'शेअर मार्केट कोसळत असताना प्रत्येक मध्यमवर्गीयाने अमलात आणावी "ही" स्ट्रॅटेजी

शेअर मार्केट कोसळत असताना प्रत्येक मध्यमवर्गीयाने अमलात आणावी “ही” स्ट्रॅटेजी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगातल्या जवळपास सगळ्या शेअर मार्केट ला भूकंपाएवढे जोरात झटके बसत आहेत.कारण तुम्हाला माहीत आहेच कोरोना व्हायरस.

हजाराच्या घरात सेन्सेक्स गडगडताना दिसत आहे. ओरिएंटल बँकचा मागच्या कित्येक वर्षे कधी न पडलेला शेअर या महिन्याच्या सुरवाती पासून अर्ध्या वर आला. स्टेट बँक आणि इतर बँकांच्या बाबतीत सुद्धा तेच!

पेट्रोलियम कंपनीची तर बोलायला सोय नाही अशी अवस्था झाली आहे.

कोरोना आणि त्यामुळे आखातात उदभवलेली सद्यस्थिती, रशिया आणि अमेरिकेने ओपन केलेले आपले ऑइल डोपॉझिट यामुळे तेल क्षेत्रात दादा असलेले कंपन्या देखील झटक्यात कोसळले.

 

share market down inmarathi
policenama

 

आयटी सेक्टर, प्रोडक्शन फर्म्स यांची सुद्धा सारखीच परिस्थिति आहे!  नाही म्हटलं तरी शेअर मार्केट मध्ये हाहाकार माजलेला आहे.

हे सगळं ठीक आहे.

पण आमचा पैसा गुंतलेला आहे. शेअर तर पत्त्यासारखा कोसळत आहे. सेफ राहायचं तरी कसं.?

अशा परिस्थितीत ज्यांचं उत्पन्नच मूळ शेअर मार्केट मधून आहे आणि जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांना मोठा फटका बसतो. पण एक लक्षात ठेवा,

ही परिस्थिती काय पहिल्यांदाच नाही आलेली. आणि ती काय कायम राहणारी देखील नाही. फक्त या परिस्थितीत सरव्हाईव्ह करता आलं पाहिजे.

मग आता नेमकं करायचं तरी काय.?

 

share market crash inmarathi
jagran.com

 

आता अशा परिस्थितीत पैसा परत आणण्या साठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आपण ठेवू शकतो.

क्रमशः जा आणि गुंतवणुकीत विविधता आणा. घाबरून शेअर विकण्यापेक्षा एक्स्पोजर साठी संधी शोधा.

शेअर मार्केट पडले याचा अर्थ ज्यांचा पैसा गुंतलेला आहे त्यांना तोटा आणि जे संधी शोधत असतात त्यांना फायदा असं आपण म्हणून शकतो.

नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि गुंतवलेला आपला पैसा वाचवण्यासाठी आपण पुढील पद्धतीचा अवलंब करू शकतो.

 

१.लॉंग टर्म गुंतवणूक

 

long term investment inmarathi
smartasset.com

 

शेअर मार्केट मध्ये खेळत असाल तर हा बेसिक रुल आहे.शेअर मार्केट पडले काय आणि वधारले काय,ज्यांची ही स्ट्रॅटेजी असते त्यांना काही एक फरक पडतो नसतो.

१९९५ ला ५००० गुंतवून २०१५ पर्यंत ३ करोड कमावले,अशा अनेक शेअर मार्केट मधल्या कथा आपण ऐकल्या असतीलच. पेशन्स नावाची गोष्ट इथे कामी येते.

मार्केट जरी पडलं असेल तरी घाबरण्याचे काही कारण नाही. पैसा गुंतलेला असेल तर मार्केट वरती जाण्याची वाट बघा.

आणि जर नवीन गुंतवणूकदार असाल तर कवडी मोल भावात पण शेअर आता मिळत आहेत.

येस बॅंकचंच उदाहरण घ्या.!

 

२.हळूहळू गुंतवणूक करत जा

 

slow investing inmarathi
inc.com

 

एक फिक्स ठराविक रक्कम ही एका ठराविक शेअर मध्ये गुंतवत जा.

याचा फायदा असा की, समजा त्या ठराविक शेअर चा भाव पडला तर जास्तीचे शेअर खरेदी करता येतात किंवा भाव वाढला तर कमी शेअर घेता येतात!

पण त्याची बॉण्ड व्हॅल्यू ही जास्त असते.आणि या गुंतवणूक लॉंग टर्म असतील याची विशेष काळजी घ्या.

कारण पॉलिसी,म्युचल फंड्स आणि शेअर मार्केट यात गुंतवलेला पैसा लॉंग टर्म जेवढा असेल तेवढी त्याची रिटर्न व्हॅल्यू जास्त असते.

 

३.चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्या

 

compound interest inmarathi
medium

 

बाजारात येणाऱ्या योग्य वेळे पेक्षा जास्तीचा दिलेला वेळ हा महत्वाचा असतो. तुम्ही केलेल्या शिस्तबद्ध गुंतवणूकीच्या व्याजावर व्याज घेणे हे सध्याच्या पडझडीच्या काळात असलेलं शहाणपण आहे.

 

४.विविधता,विविधता आणि विविधता.

काही शेअर मार्केट चे खिलाडी हे एका ठराविक शेअर ब्रँड साठी प्रसिद्ध असतात. स्टील,फार्मा,ऑइल आणि पेट्रोलियम,आयटी असे बरेच.

पडतीच्या काळात गुंतवणूक करताना कमी किंमतीच्या, निष्क्रिय व्यवस्थापन असलेले किंवा एक्स्चेंज ट्रेंड फंड्स मध्ये गुंतवणूकीचा विचार करा.

जे तुम्हाला मल्टिपल आणि वाईड रेंज शेअर्स उपलब्ध करून देतील.

शेअर मार्केट चे अनुभवी गुंतवणूकदार म्हणतात,

ही वेळ काय कायम राहणारी नाही. मार्केट मध्ये तणाव आहेच पण त्यामुळे स्वतःवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका.

 

diversify inmarathi

 

जास्तच पैशाची गरज असेल तर आपले स्टेक विकून पैसा तुम्ही जमवू शकता. पण विनाकारण पॅनिक होऊन स्टेक विकायच्या भानगडीत पडू नका.

दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठी योग्य स्टॉक कसा ओळखायचा हे गुंतवणूकदारासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे.

कंपनीची मूलतत्त्वे मजबूत असली पाहिजेत परंतु भविष्यातील वाढ त्याच्या परताव्याच्या संभाव्यतेबाबत निर्णय घेण्यास अधिक गंभीर होईल.

ज्या कंपन्या कच्च्या तेलाचा वापर कमी क्रूड दराचा फायदा होण्यासाठी कच्च्या मालाच्या रुपात करतात, त्यांना मार्जिन सुधारण्यास लवकर मदत होईल.

जागतिक पातळीवरील सुलभता आणि कमी कच्च्या तेलाच्या किंमती रिझर्व्ह बँकेला क्षणिक चलनवाढ पाहण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑइल आणि पेट्रोल मध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

अशा प्रकारे संधी शोधून आणि थोडा अभ्यास करून शेअर निवडून त्यात गुंतवणूक करून चांगला परतावा आपण मिळवू शकतो.

 

५.दीर्घकालीन दृष्टिकोन

 

infosys inmarathi
the economic times

 

मार्केट पडलं आहे मान्य पण ते पुढील महिना-दोन महिन्यात वरती जाण्याची शक्यता पण तेवढीच आहे. शेअर मार्केटच्या इतिहासात सुद्धा असे अनेक चढउतार आलेले आहेत.

इन्फोसिस उत्तम उदाहरण आहे याचे. त्यामुळे गुंतवलेला पैसा दुर्लक्षित करायची ही वेळ आहे.

आणि जर नवीन गुंतवणूकदार असाल तर गुंतवणूकी साठी आता उत्तम वेळ आलेली आहे.

 

६.योग्य वेळ कशी ओळखाल?

आताचंच नवीन उदाहरण घेऊया, टाटा कम्युनिकेशनचे शेअर गडगडले. टाटा सन्स चे चेयरमन नटराजन चंद्रशेखर यांनी टाटा कम्युनिकेशनचे तब्बल एक लाख शेअर खरेदी केले.

आता विचार करा जेव्हा मार्केट वधारेल तर त्यांना किती पटीने रिटर्न्स मिळेल.?

अशी योग्य वेळ ओळखता आली पाहिजे.

आपण जर नॉर्मल गुंतवणूकदार असल्यास आपण उच्च जोखीम गुंतवणूकीत येऊ नये.

 

timing inmarathi
NH websites

 

अशा घसरण झालेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करणे केवळ अशा गुंतवणूकदारांनाच अनुकूल ठरेल ज्यांना जास्त रिस्क घ्यायची कपॅसिटी आहे आणि काही अल्प ते मध्यम मुदतीची हानी सहन करण्यास तयार आहेत.

“दीर्घकाळ घसरलेल्या मार्केटचा फायदा घेण हे लॉंग टर्म गुंतवणूकदारांना नेहमीच बक्षीस असते. बाजारात जवळपास पडीक घसरण सुरू असू शकते आणि हीच स्वार्थी होण्याची वेळ आता आली आहे,” मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे खेमका म्हणतात.

नाही म्हटलं तरी शेअर मार्केट मध्ये सध्या तरी टायमिंग महत्वाचे आहे.

योग्य वेळेची वाट पहा त्यानुसार गुंतवणूक करा आणि योग्य ते रिटर्न्स मिळवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?