' जगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल!

जगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपण अन्न कशासाठी खातो? साध उत्तर आहे- आपलं पोट भरण्यासाठी !

म्हणजे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि पोटातले कावळे शांत करण्यासाठी आपण अन्नपदार्थ विकत घेऊन खातो. आणि पैसा तरी किती जातो हो? ५०० ते १००० रुपये!!

शेवटी आपण कमावतो पोटासाठीच ना? त्यामुळे खाण्यावर पैसे खर्च करायला काहीही हरकत नाही. पण समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की जगात असे काही लोक आहेत जे खाण्यावर एकावेळेस लाखो रुपये उडवतात तर?

तुमचा साहजिकच विश्वास बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे.

जिथे आपण सामान्य माणसं ५००० मध्ये १० जणांना पार्टी देतो तेथे जगातील काही अतिश्रीमंत लोक ५०००० मध्ये केवळ एक पदार्थ विकत घेतात. पण येथे त्यांना श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं नसतं, अहो कारण ते पदार्थच एवढे महाग असतात.

अजूनही विश्वास बसत नाही? चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या खाद्यपदार्थांबद्दल!

१) इटालियाम व्हाईट अल्बा ट्राफल- १.६ करोड रुपये

 

mos-expensive-food-items-marathipizza01

स्रोत

ट्राफल मशरूम अतिशय दुर्मिळ असून जगातील फारच कमी ठिकाणी ते उपलब्ध आहेत. पण त्यांची चव सर्वोत्तम असल्याचे जाणकार सांगतात.

याच कारणांमुळे त्यांची किंमत अतिशय जास्त आहे. हॉंगकॉंग मधील एका व्यक्तीने अवघ्या १.५ किलो ट्राफल मशरूम साठी तब्बल १.६ करोड रुपये मोजले होते.

२) अल्मास केवियार- १६.६० लाख रुपये

 

mos-expensive-food-items-marathipizza02

स्रोत

केवियार म्हणजेच माशांची अंडी, जी बहुसंख्य देशांमध्ये लक्झरी फूड आयटम म्हणून ओळखली जातात.

परंतु अल्मास केवियार मात्र सर्वात महागड्या प्रकारची माश्यांची अंडी आहेत. ही अंडी केवळ लंडनच्या केवियार हाउस अँड प्रुनीयर मध्येच मिळतात. यांची पॅकेजिंग २४ कॅरेट सोन्याच्या डब्ब्यांमध्ये होते.

एका डब्ब्यामध्ये एक किलो अल्मास केवियार असतात. या एका डब्ब्याची किंमत १६.६० लाख रुपये इतकी आहे.

३) युबारी किंग मेलन- १५ लाख रुपये

 

mos-expensive-food-items-marathipizza03

स्रोत

खरबूजाची ही जात जपान मधील युबारी  नावाच्या एका छोट्याश्या प्रदेशामध्येच सापडते. जगात इतरत्र अन्य कुठेही याचे उत्पादन होत नाही. सामान्य खरबूजापेक्षा यांचा स्वाद अधिक गोड असतो.

नुकत्याच जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लिलावावेळी २ युबारी किंग मेलन १५ लाख रुपयांना विकले गेले होते.

४) डेन्सुक ब्लॅक वॉटरमेलन- ४ लाख रुपये

 

mos-expensive-food-items-marathipizza04

स्रोत

हे जपानी कलिंगड अतिशय दुर्लभ असून जगात केवळ जपानच्या होकाईडो आयलँडवरच त्यांचे उत्पादन घेतले जाते. एका हंगामात केवळ मर्यादित प्रमाणात यांचे उत्पादन घेतले जात असल्या कारणाने यांची किंमत अधिक आहे.

हे कलिंगड अतिशय गोड असतात. एक डेन्सुक ब्लॅक वॉटरमेलन खरेदी करायचा असेल तर ४ लाख रुपये मोजण्याची तयारी हवी.

५) पिझ्झा रॉयल 007- २.८० लाख रुपये

 

mos-expensive-food-items-marathipizza05

स्रोत

जगभरात पिझ्झाला प्रचंड मागणी आहे. त्यात इटालियन पिझ्झा तर सर्वांच्याच आवडीचे!

हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून डोमेनिको क्रोला या जगप्रसिद्ध शेफने जगातील सर्वात महागडा पिझ्झा बनवला होता. आजही या पिझ्झाला श्रीमंतांकडून मागणी आहे.

या पिझ्झामध्ये महागड्या केवियार पासून शॅम्पेन पर्यंत असंख्य पदार्थ घातले जातात. पण या पिझ्झाला सर्वात महाग बनवणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे सोनं.

या पिझ्झावर टोपिंग म्हणून ४ कॅरेट सोन्याची खाण्यायोग्य फ्लेक्स लावली जाते.

काय मग? यातील काही खरेदी करायचा विचार सुरु आहे का? पण लक्षात घ्या, पैसे नसतील तर घरदार काय स्वत:ला देखील विकायची तयारी ठेवावी लागेल !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?