'जमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा???

जमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा???

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही देखील बुचकळ्यात पडला असेल. तुमच्या मनात देखील असंख्य प्रश्नांच वादळ उठलं असेल. या गोष्टीवर  विश्वास बसणं देखील कठीण, पण Times Of  India आणि देशातील, इतर महत्त्वाच्या अन्य वृत्तपत्रांमधून मात्र याच शीर्षकाखाली बातम्यांचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील जागेसाठी खरंच भाडं भरलं होतं ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण शरमेची गोष्ट म्हणजे ही कोणती चूक नसून भारतीय सैन्याला सरला सरळ गंडा घातला गेलाय.

भारतातील काही स्थानिक अधिकारी, लष्करी अधिकारी आणि खाजगी लोकांनी मिळून हा बनव रचला आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एका जागेसाठी भारतीय सैन्याला ५ लाख रुपये भाडे भरायला लावून भारतीय सैन्याला हातोहात फसवले.

pok-land-marathipizza

स्रोत

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरामधील सरकारी अधिकारी (पटवारी) दर्शन कुमार आणि sub-divisional defense estate officer आर.एस. चंदरवंशी यांनी काही खाजगी लोकांना हाताला धरून एक जमीन भारतीय सैन्याने भाड्याने घेतल्याचे भासविले, जी जमीन मुळात पाकव्याप्त काश्मीरमधील आहे. हा सर्व प्रकार सीबीआय चौकशीमध्ये उघड झाला आहे.

सीबीआयच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की,

१९६९-७० च्या जमाबंदी नोंदीनुसार खसरा क्रमांक ३०००, ३०३५, ३०४१ आणि ३०४५ ची सदर जमीन पाकिस्तानच्या हदीत आहे. परंतु जमिनीचे भाडे भारतीय लष्करामार्फत भरले जात होते.

pok-marathipizza01

स्रोत

या महाठगांनी खोटी कागदपत्रे तयार करून भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसमोर सादर केली होती. सोबतच एका खोट्या व्यक्तीची ओळख तयार केली ज्याच्या नावावर जमीन असल्याचे त्यांनी भासविले. ही सगळी योजना इतकी चपलख आखण्यात आली होती की समिती ज्यामार्फत भाड्याची रक्कम भरली जात होती त्यांच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही.

pok-marathipizza02

स्रोत

या समितीमध्ये भारतीय लष्करातील अधिकारी, मालमत्ता अधिकारी आणि महसूल खात्याच्या प्रतिनिधीचा समावेश होता. परंतु इथे अजून एक प्रश्न असा उभा राहतो की या समितीने जमिनीची स्वत: जाऊन पाहणी करणे बंधनकारक होते. जर त्यांना या पाकव्याप्त जमिनीबद्दल माहिती नव्हती तर त्यांनी ही पाहणी केली नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे ही समिती देखील आरोपींशी मिळालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

pok-marathipizza03

स्रोत

आजवर भारतीय लष्कराने जागेसाठी तब्बल ४.९९ लाख किंमतीचे भाडे रक्कम भरली आहे. हे पैसे थेट सरकारी तिजोरीतून जात असल्याने सर्व खर्च पकडता जवळपास ६ लाखांचे नुकसान सरकारला सहन करावे लागणार आहे. हे सर्व पैसे राजेश कुमार नामक माणसाच्या आणि नौशेरा तालुक्यातील खंबा गावाच्या काही रहिवाश्यांच्या नावावर देण्यात आले होते.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?