' कुटुंबव्यवस्थेला निर्माण झालाय धोका; कारण आहे कोरोनाचा “भलताच” परिणाम! – InMarathi

कुटुंबव्यवस्थेला निर्माण झालाय धोका; कारण आहे कोरोनाचा “भलताच” परिणाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संकट येतात ती एकटे येत नाहीत, ती बरोबर आणखीन संकट घेऊन येतात. अशीच परिस्थितीत काही महिन्यांपुर्वीपासून जग अनुभवत आहेत. कोरोनाने जगाचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था त्यामुळे कोलमडली, सगळे व्यवहार ठप्प झाले.

मात्र या दरम्यान एक नवं संकट जगापुढे उभं ठाकलं होतं. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबव्यवस्थेला पर्यायाने समाजव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. म्हणजे तिकडे आता घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहेत.

 

corona inmarathi

अतिसहवासात अवज्ञा या उक्तीप्रमाणे दोन व्यक्तींचा अपेक्षेपेक्षा सहवास वाढला तर त्यांच्यात खटके उडतात. कधी एकमेकांच्या सवयी खटकतात तर कधी स्वभावातील दोष अधिक दिसतात.

मग घरातील पालक, मुले असो वा पती-पत्नी, कोणतंही नातं याला अपवाद नाही.

त्यामुळे चीन, भारत, युरोप यासांरख्या अनेक देशांना कोरोनाचा आर्थिक फटका जितका बसला तितकाच फटका बसला तो इथल्या कुटुंब व्यवस्थेला.

सुरवातीला लॉकडाऊनमध्ये वेळ सत्कारणी लावत ‘फॅमिली टाईम’ घालवणारी कुटुंबं नंतर एकमेकांशी वाद घालताना दिसत होती.

आता असा प्रश्न पडू शकतो की कोरोनाचा आणि घटस्फोटाचा काय संबंध? हां म्हणजे मान्य आहे की कोरोनामध्ये तुमची टेस्ट जर पॉझिटिव आले तर तुम्हाला वेगळं ठेवलं जातं.

पूर्ण बरे झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवता येतो, राहता येतं. म्हणजे ह्या काळात तर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची जास्त आठवण येतच राहते.

आणि याच काळात खरं तर नवरा बायको यांच्यातलं प्रेम अधिक दृढ होत. फोनवरच्या बोलण्याने मेसेजेसनी त्यांच्याशी संपर्क ठेवून एकमेकांना धीर दिला जातो.

यावरून असं वाटू शकतं की, उलट आतातरी प्रेम दृढ व्हायला हवं!! घटस्फोट आले कुठून? 

चीनमध्ये जेव्हा कोरोना व्हायरसने उच्चांक गाठला, त्यावेळेस तिथल्या सगळ्या सुविधा ठप्प करण्यात आल्या. बसेस, रेल्वे, कार, विमान अशा सगळ्या वाहतूक व्यवस्था बंद झाल्या.

 

corona virus 6 inmarathi

 

सगळे सुपरमार्केट्स बंद झाले, सगळी उद्यान बंद झाली. रस्त्यावरती कुणालाही फिरू दिले जात नव्हते. अगदी सामान आणायला देखील जाता येत नव्हतं.

सोसायटीच्या खाली सरकारने ठरवलेली एखादी गाडी सामान घेऊन यायची आणि ठरलेल्या वेळेत प्रत्येक कुटुंबाने, कुटुंबातील एका व्यक्तीने जाऊन लागणारे सामान आणायचं. आणि घरातच बसायचं.

सोसायटीच्या गेटला देखील कुलूप लावलेलं असायचं आणि तिकडे सरकारची नजर असायची.

 

corona virus 2 inmarathi

 

म्हणजे दिवसभर एखाद्या कुटुंबात घरातच नवरा, बायको आणि मुलं २४ तास राहू लागले. त्याच्या आधीची परिस्थिती वेगळी होती. सकाळी उठल्यावर घरातलं आवरून नवरा-बायको दोघेही कामावर जायचे.

मुलं शाळेत जायची. आणि त्यांची भेट संध्याकाळी घरी व्हायची. अगदी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. त्यामुळे कमी वेळ मिळायचा.

नात्यात गोडवा राहायचा. पण म्हणतात ना, ‘अति तिथे माती’ तशी परिस्थिती सध्या चीनमध्ये झाली.

कधीही सवय नसलेले नवरा बायको २४ तास एकत्र घरात राहू लागले आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्यात जास्त भांडणं होऊ लागली.

लग्नाच्या आधी आणाभाका घेतलेले, एकमेकांशिवाय राहणे अशक्य असणारे आता २४ तास देखील एकत्र घालवायला कंटाळू लागले. कदाचित एकत्र राहिल्यामुळेच एकमेकांचे स्वभाव समजले असतील.

आपली आवड निवड चुकली आहे याची जाणीव होऊ लागली असेल. त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, मग एकमेकांचे तोंड देखील आता पाहायचं नाही, ही वेळ आली.

 

china corona virus inmarathi 1

 

मग घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज करण्यात आले. त्यातली कारणे पाहिली तर अगदीच क्षुल्लक. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे होऊ लागली, वाद घातले जाऊ लागले.

छोट्या गोष्टींसाठी देखील घटस्फोट मागण्यात येऊ लागले आहेत आणि जगासाठी ही एक परत बातमी झाली. म्हणजे आता कोरोना व्हायरसचे रुग्ण कमी सापडत आहेत. घटस्फोटांच्या केसेस जास्त होत आहेत.

२४ फेब्रुवारी पासून १४ मार्चपर्यंत जवळजवळ ३०० अर्ज केवळ एका सेंटर मधून घटस्फोटात करिता आले. झियान मध्ये एका दिवसामध्ये १४ अर्ज एका काउंसिल मध्ये आले.

फुजियन प्रांतात सध्या एका दिवसामध्ये दहा घटस्फोटांचे अर्ज निकाली काढावे लागत आहेत. हा रेट इतर वेळी येणाऱ्या घटस्फोटांच्या अर्जांपेक्षा नक्कीच जास्त आहे.

या परिस्थितीमुळे शास्त्रज्ञ देखील चक्रावले आहेत. एकत्र राहण्यामुळे एकमेकांमध्ये प्रेम न वाढता भांडण का होत आहे, यावरून आता शास्त्रज्ञांमध्ये दुमत होत आहे.

 

divorce-in-india InMarathi

 

तिथल्या ऑफिसरच्या म्हणण्यानुसार,

हे घटस्फोटाचे इतके अर्ज निघण्याचे कारण म्हणजे कोरोना आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बरेच काळ सर्व सरकारी ऑफिसेस, कौन्सिल्स बंद होते.

त्याकाळात ही सर्व कामे राहिलेली आहेत. कित्येक केसेस पेंडींग पडल्या आहेत. आणि आता कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले नाहीत, किंवा त्यांचं प्रमाण कमी झालं आहे.

हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आधीच्या घटस्फोटांच्या केसेस आणि आणि आता नवीन घटस्फोटांच्या केसेस यांच्यावर एकत्रच निर्णय घेण्यात येत आहे.

त्यामुळे घटस्फोटांच्या केसेसची संख्या जास्त आहे.

२०१८ मध्ये चीनमध्ये एक सर्वे करण्यात आला होता. ज्यानुसार लग्न करायच्या आधी जे कपल एकत्रित राहायचे त्यांच्यात लग्नानंतर एक वर्षापर्यंत होणाऱ्या घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे.

पण हीच लोक पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकत्र राहिले तर मात्र घटस्फोटासाठी जास्त प्रमाणात अर्ज करतात. परंतु सध्याच्या घटस्फोटामुळे देखील चीन चर्चेत आला आहे.

आता सध्या भारतात कोरोना आल्यामुळे सरकारने कोरोना संदर्भात काही नियमावली तयार केली आहे.

 

corona in kerla inmarathi

 

त्यात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्र शासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून सगळे  शाळा-कॉलेज, मॉल्स, दुकान, बागा ग्राउंड, बंद केली.

‘घरून काम करा, बाहेर जाऊ नका, गरज असेल तरच प्रवास करा, शक्यतो घरातच रहा ‘ असा सल्ला सरकार देत आहे.

त्यावरून व्हाट्सअप वर एक जोक आला होता की, जर नवरा आणि मुलं २४ तास घरीच राहणार असतील तर घरातल्या बायका शास्त्रज्ञांना बाजूला करून स्वतःच कोरोनावर लस शोधतील.

यातला विनोदाचा भाग सोडला तर एकंदरित एका संकटातून निर्माण झालेलं हे दुसरं संकट नात्यांबाबत विचार करायला भाग पाडतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?