' डायनासॉरच्या विश्वाची सफर घडविणाऱ्या ‘ज्यूरासीक पार्क’ सिनेमाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित नसतील! – InMarathi

डायनासॉरच्या विश्वाची सफर घडविणाऱ्या ‘ज्यूरासीक पार्क’ सिनेमाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित नसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगातील नष्ट झालेली प्रजाती म्हणून आपण डायनासॉरकडे पाहतो.

 

dinosaur inmarathi
wallpaperplay

 

आज डायनासोर हा प्राणी फक्त चित्र आणि चित्रपट या माध्यमातूनच पाहायला मिळतो.

आत्ता आढळणारी पाल ही त्यावरूनच झालेली उत्क्रांती आहे असे काहींचं म्हणणं आहे.

प्रत्येकाने डायनासॉर हा प्राणी किमान एकदा तरी चित्रात पहिला असेलच. खूप भयानक दिसणारा हा अजस्त्र प्राणी खरंच पृथ्वीवर अस्तित्वात होता का? हा प्रश्न पडतो.

 

dinosaur danger inmarathi
wallpapers13.com

 

त्याकाळी त्या प्राण्याची काय दहशत असेल आणि त्याचा बाकीच्या प्राण्यांवर त्याचा काय परिणाम झाला असेल ही एक थक्क करणारी गोष्ट आहे.

या गोष्टींबद्दल अनेक लोकांना आकर्षण होतं आणि म्हणूनच स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी ज्युरसिक पार्क नावाचा मोठा चित्रपट दिग्दर्शित केला.

 

dinosaur book inmarathi
camino travel

 

खरं तर हा चित्रपट येण्यापूर्वीच या नावाची एक कादंबरी १९९० साली लिहिली गेली होती.

त्यानंतर १९९२ मध्ये या कादंबरीवर आधारित ज्युरासिक पार्क नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.

कॅलिफोर्निया आणि हवाई येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.

वॉशिंग्टन डी सी येथे या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन झाले आणि त्यानंतर अमेरिकेत ११ ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

डायनासॉर हा भयंकर प्राणी असल्याने चित्रपटात तसेच भयानक आवाज आणि तांत्रिक परिणाम दाखवणं गरजेचं होतं.

 

jurassic park poster inmarathi

 

ज्यूरासिक पार्क हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सुद्धा चित्रपट विश्वातला मैलाचा दगड ठरला आहे.

ज्यूरासिक पार्क हा चित्रपट खरोखरच डायनासॉरच्या कालखंडाची सफर आपल्याला घडवून आणतो.

प्रत्येक चित्रपट म्हटला की, त्या मध्ये काही अशा वेगळ्या गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात.

आज आपण ज्युरासिक पार्क या चित्रपटाबाबत काही न माहीत असलेल्या गोष्टी पाहूया.

१. या चित्रपटाचं आकर्षण म्हणजे डायनासॉर. कारण यात दिसणारा डायनासोर हा खरा वाटतो.

 

jurassic park making inmarathi
pintrest

 

मात्र हा डायनासॉर तयार होण्यासाठी खूप दिवसांची मेहनत लागली आणि चित्रपटाचा वेळ लक्षात घेता त्याला फक्त १५ मिनिटांचे काम मिळाले जेव्हा चित्रपट १२७ मिनिटे कालावधीचा होता.

२. या चित्रपटाने ९१४ मिलियन डॉलर एवढा मोठा धंदा केला आणि ते ही १९९३ सालात.

ही कमाई जागतिक पातळीवरचा विक्रम होऊ शकत होती मात्र टायटॅनिक नावाच्या चित्रपटाने हे सगळे विक्रम मोडीत काढले.

३. या चित्रपटाचं शूटिंग युनिव्हर्सल स्टुडिओ या जगविख्यात वास्तूत केलं गेलं आणि हा चित्रपट चित्रित होण्याच्या आधीपासूनच या स्टुडिओ मधील इंजिनीअर्सनी जुरासिक पार्क तयार करण्यास सुरूवात केली होती.

 

jurassic inmarathi
fandango

 

४. १९९३ मध्ये हा चित्रपट २डी स्वरूपात होता. मात्र जेव्हा याला ३ डी स्वरूप देण्यात आलं तेव्हा त्या तांत्रिक गोष्टींना १० मिलियन डॉलर एवढा मोठा खर्च आला मात्र या चित्रपटाने फक्त अमेरिकेत ४५ मिलियन डॉलर एवढा बिझनेस केला.

५. या चित्रपटाच्या मूळ कादंबरीचे लेखक क्रिकटोन यांना त्या कादंबरीच्या कॉपीराइटचे ५ लाख डॉलर्स देऊन त्याचे हक्क विकत घेण्यात आले.

 

cricethon inmarathi
buzznick

 

त्यानंतर ती कादंबरी डेव्हिड कोप व इतर लोकांनी पुन्हा लिहून त्यात गरजेप्रमाणे बदल केले.

६. या चित्रपटातील अनेक दृश्य खूप कलात्मकतने तयार केलेली आहेत, त्यातील एक म्हणजे पाण्यावरील तरंगांचे दृश्य.

 

हे दृश्य स्पिल्बर्ग यांना आरशावरील पाणी पाहून सुचलं होते.

७. जेव्हा हा चित्रपट NBC चॅनेल वर प्रदर्शित झाला, तेव्हा तो ६५ मिलियन वेळा पाहिला गेला, हा सुद्धा एक जागतिक विक्रम होता.

 

jurassic park
walmart.com

 

८. या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना, तिथे हरिकेन नावाचं वादळ आलं आणि त्यामुळे सर्व नट – नट्यांना काही काळ उपाशी राहाव लागलं.

९. स्पिल्बर्गं हे जेव्हा ज्युरासिक पार्क दिग्दर्शित करत होते, त्याच वेळी ते स्किंडलर लिस्ट या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे निर्मितीचे काम सुद्धा सांभाळत होते.

 

spilsurg inmarathi

 

एकाच वेळी दोन पेक्षा जास्त उत्कृष्ट दर्जाच्या चित्रपटांचे काम सांभाळणे खरच कठीण गोष्ट होती.

१०. जेव्हा चित्रपट पाहताना डायनासॉर लोकांच्या समोर येईल तेव्हा त्यांची भयानकता वाढवण्यासाठी त्याला तसेच अनुरूप आवाज देणं गरजेचे होते.आणि हे काम त्या इंजिनीअर्सनी चोख केले.

डायनासॉरचा आवाज उपलब्ध नसतानाही त्यांनी यासाठी सर्व जमातीतील सर्व प्राण्यांचा आवाज यात वापरला.

 

sound inmarathi

 

अगदी हत्तीच्या छोट्या पिल्लाचा सुद्धा आवाज यामध्ये समाविष्ट होता.

११. या चित्रपटाचे चित्रीकरण होताना डायनासॉरचे जे साचे किंवा सापळे केले जात होते ते, अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीचे होते. ज्यामध्ये एकदा माणूस अडकला की त्याला बाहेर काढणं कठीण जात असे.

 

jurassic park shotting inmarathi

 

असंच एकदा यासाठी टी रेक्सचं काम करताना एक इंजिनिअर त्या सापळ्यात गेला आणि त्यात तो अडकून मारायचीच शक्यता होती मात्र कसबसं त्याला त्यातून बाहेर काढलं गेलं.

तर या होत्या या लोकप्रिय चित्रपटाच्या पडद्या मागच्या काही गोष्टी…

चित्रपटाची कथा जितकी गमतीशीर असते, तितकची रंजक कथा त्या चित्रपटाच्या पडद्यामागेही घडत असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?