' राजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला 'भानगड किल्ला'!

राजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रपट, कथा-कादंबऱ्या ह्यांनी जुन्या ‘हवेली’, ‘गढी’, भग्न किल्ले ह्यांना फार गूढ वलय प्राप्त करून दिलंय. असाच एक गूढ किल्ला आहे – “भानगड” नावाचा!

भारतातील सर्वात भीतीदायक जागा म्हणून हा राजस्थानमधील भानगड किल्ला ओळखला जातो. राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्याच्या सीमेवर हा किल्ला अनेक गूढ रहस्य आपल्या पोटात साठवून उभा आहे.

या किल्ल्याचा इतिहास अनेक चमत्कारिक सुरस कथांनी भरलेला आहे. असे म्हटले जाते की, या परिसराला पूर्वी ‘भानगड प्रदेश’ म्हणून ओळखले जायचे.

 

 

Haunted_fort_of_Bhangarh-marathipizza01

स्रोत

 

या भानगड शहरात सिंधू सेवडा नामक जादुगार राहत असे. त्याला काळ्या जादूची सिद्धी प्राप्त होती. हा जादुगार भानगडची राजकुमारी रत्नावतीच्या प्रेमात पडला. ती अतिशय सुंदर होती.

संपूर्ण भारतवर्षातील राजकुमार तिच्या सौंदर्याची स्तुती एकूण होते आणि तिच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती.

एकदा राजकुमारी आपल्या सख्यांसोबत सुगंधी अत्तरे खरेदी करायला म्हणून बाजारात गेली. त्याचवेळी जादुगाराची नजर तिच्यावर पडली.

जादुगाराने पाहिले की राजकुमारी अत्तर खरेदी करत आहे. तेव्हा त्याने स्वत:च्या जादूने अत्तराचे रुपांतर प्रेमद्रव्यात केले. जेणेकरून त्या प्रेमद्रव्याच्या प्रभावाने राजकुमारी देखील त्याच्या प्रेमात पडावी.

पण राजकुमारी रत्नावतीने जादुगाराची ही चाल ओळखली आणि राजकुमारीने त्याचे प्रेमद्रव्य जवळच्या एका दगडावर फेकून दिले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दगडावर त्या प्रेमद्रव्याचा परिणाम झाला. तो दगड जादूगाराच्या दिशेने घरंगळत गेला आणि त्या भल्यामोठ्या दगडाखाली येऊन जादुगाराचा मृत्यू झाला.

परंतु मृत्यूपूर्वी जादूगाराने संपूर्ण भानगड राज्य बेचिराख होईल आणि भानगडच्या किल्ल्यात मनुष्य प्राणी टिकणार नाही, त्यांच्या आत्मा सदैव या ठिकाणी भटकत राहतील असा शाप दिला.

 

Haunted_fort_of_Bhangarh-marathipizza02

स्रोत

 

जादूगाराची शापवाणी महिन्याभरात खरी ठरली. शेजारील राज्य अजबगडासोबतच्या लढाईममध्ये संपूर्ण राज्य उध्वस्त झाले. राजवंशासमवेत संपूर्ण प्रजा मृत्यू पावली.

राणी रत्नावतीची सुद्धा तिच्या महालात हत्या झाली आणि तेव्हापासून संपूर्ण भानगड राज्य आणि तो किल्ला विराण झाला.

त्या क्षणापासून भानगड किल्ल्याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आणि  प्रेतात्म्यांनी झपाटलेला किल्ला असे आजचे स्वरूप त्याला प्राप्त झाले.

आजही येथील स्थानिक असे मानतात की किल्ल्यामध्ये राणी रत्नावती आणि जादुगार सिंधू सेवडा यांच्या आत्मा भटकतात.

किल्ल्यामध्ये रात्रीच्या वेळी अनके चित्र विचित्र घटना पाहिल्याचे छातीठोकपणे सांगणारे देखील अनेक जण सापडतात. तंत्र-मंत्रामुळे किल्ल्यावर काही मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे, पण त्याबाबत ठोस पुरावे मात्र हाती लागले नाहीत.

मृत पावलेले भानगडवासी रात्रीच्या वेळी या किल्ल्याचे आणि आतील राजकुमारी रत्नावतीचे रक्षण करतात असा जावई शोधही कोणीतरी लावला आहे.

या सर्व कारणांमुळे सूर्यास्तानंतर किल्ल्यावर राहण्यास मनाई करण्यात येते.

 

Haunted_fort_of_Bhangarh-marathipizza03

स्रोत

 

भारतीय पुरातत्व विभागाने देखील या जागेचा अभ्यास करून हा किल्ला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केला आहे. परंतु किल्ल्याशी संबंधित कोणत्याही भूता-खेतांच्या गोष्टींना त्यांचा दुजोरा नाही.

तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने देखील पर्यटकांना सुर्यास्तानंतर किल्ल्यावर जाण्यास प्रतिबंध करणे फलक लावले आहेत.

भानगड किल्ल्याला जोडलेला असा हा भूताटकीचा धागा वगळता पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण सर्वोत्कृष्ट आहे. कधी राजस्थानला वा जयपूरला भेट दिलीत तर भानगडची नेमकी ‘भानगड’ जाणून घ्यायला विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?