' `ती'ची गगनभरारी भारतीयांसाठी आजही अभिमानास्पद आहे

`ती’ची गगनभरारी भारतीयांसाठी आजही अभिमानास्पद आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

” आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे ” या ओळी ज्या व्यक्तिमत्त्वांना लागू होतात, त्यापैकी एक म्हणजे ‘ कल्पना चावला ‘.

 

kalpana inmarathi
firstpost

 

अंतराळात जायचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय व्यक्ती.

कारण अंतराळात जाणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणजे राकेश शर्मा. कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली.

एकदा नव्हे तर दोनदा अंतराळात जाणारी ती पहिली व्यक्ती आणि पाहिली भारतीय महिला बनली.

जेव्हा ती नासासाठी काम करत होती तेव्हा कदाचित तिला वाटलंही नसेल की, तिचा हा प्रवास एक प्रेरणादायी कहाणी असणार आहे.

येणाऱ्या पिढीतील मुलींसाठी ती एक आदर्श बनेल.

तिला जाऊन आता जवळजवळ सतरा वर्ष होत आली आहेत, तरीही कल्पना चावला म्हटल्यावर अंतराळवीरांच्या भगव्या पोशाखातील, निरागस हसणारी कल्पना चावला आपल्या डोळ्यासमोर येते.

 

kalpana childhood inmarathi
pintrest

 

कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी पंजाब मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात करनाल येथे झाला.

तिचं शालेय शिक्षण ‘टागोर बालनिकेतन सीनियर सेकंडरी स्कूल’ येथे झालं. तर तिचं महाविद्यालयीन शिक्षण,’ बी. टेक एरोनॉटिकल इंजीनियरिंग ‘,  हे पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज चंदिगड येथून 1882 साली झालं.

लहान गावात तिचं सगळं लहानपण गेलं पण शिक्षणातील चिकाटी तिने सोडली नाही.

करनालच्या घरी लहान असताना अंगणात झोपल्यावर तिला आकाशातील तारे, चांदण्या दिसायच्या.

 

starts inmarathi

 

ज्यांनी असे लहानपण अनुभवलं त्यांना नक्कीच हे कळेल,की तसं झोपण्यात किती मजा असायची!

माणसाचं आकाशाचं आकर्षण हे तेव्हापासूनच सुरू होतं. कल्पनादेखील याला अपवाद नव्हती. तिलाही ते आकाश खुणावू लागलं होतं.

आकाशगंगा पाहताना निरनिराळ्या कल्पना मनात येत होत्या. पडणाऱ्या उल्का तिचे लक्ष वेधून घेत होत्या.

यात स्वर्ग कुठे असेल?, असाही प्रश्न तिला पडत होता. तिची अंतराळवीर व्हायची बीजं ही तिथेच रोवली गेली असं म्हटलं तरी वावंग ठरणार नाही.

अंतराळवीर व्हायच्या ओढीने तिने एरोनॉटिकल इंजिनीअरिंग केलं. नासा मध्ये गेलं तर अंतराळवीर होता येईल म्हणून पदवी नंतर तिने थेट अमेरिका गाठली.

1982 मध्ये ती अमेरिकेत गेली. टेक्सास मधल्या अर्लिंगटन युनिव्हर्सिटीतून 1984 मध्ये तिने मास्टर्स डिग्री ‘ एरोस्पेस इंजिनियरिंग ‘ मधून मिळवली.

 

kalpana chawala inmarathi
the economics times

 

त्यानंतर 1986 मध्ये तिने दुसरी एक मास्टर्स डिग्री मिळवली. त्यानंतर तिने बोल्डर मध्यल्या, ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो’ मधून PHD केली.

एकीकडे करिअरचं स्वप्न फुलत असताना दुसरीकडे प्रेमही उमलु लागलं होतं.

लव इज इ द एअर ही म्हण प्रेमी युगुलांबाबत वापरली जात असली, तरी इथे मात्र प्रेम खरोखरचं हवेत फुलत होतं.

 

kalpana chawala love story inmarathi
hindi panda

 

1983 मध्ये शिकत असतानाच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला, आणि विशेष म्हणजे जिन पियर हॅरिसन या flying instructor आणि विमानविषयक लेखक यांच्याबरोबर तिचं लग्न झालं.

कल्पना ही अत्यंत क्रिएटिव्ह मुलगी होती. तिला स्वतः ला निरनिराळे छंद होते. कविता करणे, डान्सिंग, सायकलिंग आणि रनिंग याची तिला आवड होती.

कल्पना ही प्रचंड हुशार, अभ्यासू, मेहनती मुलगी होती. तिने सादर केलेले प्रबंधही गाजले होते.

नासा जॉईन करणं आणि अंतराळ प्रवास करणं हे तिचं ध्येय पक्कं ठरलेलं होतं.

शेवटी 1988 मध्ये ‘ याचसाठी केला होता अट्टाहास ‘ ते तिचं स्वप्न साकार झालं. ती नासाच्या रिसर्च सेंटर मध्ये रुजू झाली.

 

kalpana

 

तिथे तिने computational fluid dynamics या विषयात कमी जागेत, उभं Takeof आणि Landing कसं करायचं या संकल्पनेवर संशोधन केलं.

कल्पना चावला ही सर्टिफाइड कमर्शियल पायलट होती. Sea planes, glider आणि मल्टीइंजिन एअरक्राफ्ट ती उडवायची. तसंच ती वैमानिक प्रशिक्षकही होती.

1991 साली तिला अमेरिकन सिटिझनशिप मिळाली. त्यानंतर लगेचच तिने ‘ नासा एस्ट्रोनॉट कॉर्पस ‘ यासाठी एप्लीकेशन केलं.

(NASA Astronaut Corps म्हणजे ज्यामध्ये नासाच्या स्पेस मिशन साठी क्रू मेंबर्सची निवड केली जाते. ज्यामध्ये या क्रू मेंबरची अवघड परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाते, निवड झाल्यावर त्यांना स्पेस मध्ये कसं रहायचं याच प्रशिक्षण दिलं जातं.)

1995 मध्ये तिची नासा एस्ट्रोनॉट कॉर्पस साठी निवड करण्यात आली. 1996 मध्ये ती अंतराळात जाण्यासाठी निवडली गेली.

 

kalpana nasa inmarathi
hindustan times

 

19 नोव्हेंबर 1997 या दिवशी कल्पनाचा अंतराळातील प्रवास सुरू झाला. कल्पनाच्या आयुष्यातलं स्वप्न खरं होतं होते. Shuttle Colombia Flight STS – 87 मधून अंतराळात झेप घेताना तिच्याबरोबर आणखी पाच अंतराळवीर होते.

ही अशी गगन भरारी घेणारी कल्पना ही पहिलीच भारतीय महिला होती आणि अंतराळात जाणारी दुसरी भारतीय व्यक्ती.

तिच्या अंतराळातील प्रवासात तिने 10.4 दशलक्ष मैल अंतर कापले. पृथ्वीभोवती 252 प्रदक्षिणा घातल्या आणि अंतराळात 372 तास घालवले. अंतराळातील अनेक गोष्टींचा अभ्यास केला.

 

nasa

 

1997 ला जेव्हा ती अंतराळात होती तेव्हा भारतातल्या तेव्हाचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी तिच्याशी संवाद साधला होता. कल्पनाने त्यांच्या प्रश्नांना अंतराळातून उत्तरे दिली होती.

पंतप्रधान गुजराल यांनी तिला तिच्या पुर्ण फॅमिलीसह आणि अंतराळातल्या क्रू मेंबर सोबत भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. ती देखील म्हणाली होती की

,”भारतात येणे हा सगळ्या क्रू मेंबर्सना सन्मान वाटेल”. तेव्हा तिने अंतराळातून हिमालय कसा दिसतो याचं वर्णन केलं होतं, ‘हिमालय बघून आम्ही भारावलो’ असं तिने सांगितले होते .

2000 मध्ये तिची दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी निवड करण्यात आली. कलंबिया स्पेस शटल STS – 107 ची ती क्रू मेंबर झाली.

पण या मिशन साठी वारंवार अडचणी येत होत्या. कधी शेड्युलमध्ये प्रॉब्लेम यायचे तर कधी तांत्रिक अडचणी उभ्या राहायच्या.

 

space shuttle inmarathi
wikipidia

 

जुलै 2002 मध्ये शटल इंजिनच्या flow liner च्या पाईपमध्ये भेगा पडल्यात हे दिसून आलं. हे जे पाईप्स असतात त्यातून लिक्विड ऑक्सीजन किंवा लिक्विड हायड्रोजन यांचा प्रवाह सुरळीत करण्याची क्षमता असते.

कारण हे द्रव्य अत्यंत थंड असतं, त्यामुळे ते व्यवस्थित वाहून नेणं गरजेचं असतं. या सगळ्या अडचणी दूर करण्यात आल्या.

अखेर 16 जानेवारी 2003 या दिवशी परत कल्पना चावलाने अंतराळात उड्डाण केलं. यावेळेस क्रूचं नेतृत्व तिच्याकडे होतं.

 

nasa space inmarathi
pintrest

या मिशनमध्ये मायक्रोग्रेव्हिटी वरती जवळपास 80 प्रयोग करण्यात आले, ज्यामध्ये पृथ्वीचा आणि अंतराळाचा अभ्यास करण्यात आला.

ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कशी निर्माण करायची तसंच अंतराळवीरांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य यावर देखील या मिशनमध्ये अभ्यास करण्यात आला.

१ फेब्रुवारी 2003 या दिवशी कोलंबिया स्पेस शटल STS – 107 पृथ्वीकडे परतत असताना एक भयानक दुर्घटना घडली.

 

space inmarathi
scoonews

 

जेव्हा स्पेस शटल टेक्सास वर होतं आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरत होतं त्याचवेळेस अचानक स्पेस शटलने आपल्या सात क्रू मेंबर्स सहित पेट घेतला. आणि यात सातही अंतराळवीर मृत्यू पावले.

यात आपल्या कल्पना चावलाचाही मृत्यू झाला. टीव्हीवर त्या पेटलेल्या स्पेस शटलचे तुकडे तुकडे होताना साऱ्या जगाने पाहीले.

संपूर्णपणे मानवी चुकीमुळे घडलेली ही दुर्घटना होती. अनेक प्रॉब्लेम्स असलेलं स्पेस शटल अंतराळात का धाडण्यात आलं? असे प्रश्न नंतर उपस्थित केले गेले.

 

nasa team inmarathi
cnn.in

 

पण जगभरातील नागरिकांनी अनमोल असे सात शास्त्रज्ञ, अंतराळवीर गमावले.

कल्पनाला तिच्या करिअरमध्ये अनेक मेडल्स मिळाले ज्यात, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा distinguihed सर्विस मेडल यांचा समावेश आहे.

तिच्या मृत्युपश्चात तिच्या सन्मानार्थ भारतातल्या पंतप्रधानांनी अंतराळ कार्यक्रमातील मेट- सॅट 1 या सॅटॅलाइटचं नाव बदलून ते कल्पना-1 असं ठेवलं.

कर्नाटक सरकारने तिच्या स्मरणार्थ स्त्री शास्त्रज्ञांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी, कल्पना चावला पुरस्कार चालू केला. नासाने त्यांचा सुपर कम्प्यूटर कल्पना चावलाला अर्पण केला.

 

kalpana c inmarathi

 

आज सतरा वर्ष होत आली कल्पना चावलाला जाऊन पण ती अजूनही लोकांच्या मनात तशीच आहे.

तिची गोष्ट भारतातल्या प्रत्येक मुलीला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी आहे, आणि पंखात बळ देणारीही आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?