' सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? वाचा

सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका: डॉ अश्विनी तारे, नाशिक

===

सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला म्हणतात न्याहारी. ही प्रत्येकासाठी खूप गरजेची आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळून तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते.

स्वयंपाकघरात जेवण बनविण्यासाठी अग्नीची गरज असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या अग्नीचा संस्कार भाज्यांवर इतर पदार्थांवर होऊन ते आपल्याला खाण्यायोग्य बनते.

जर हा अग्नी मंद असेल किंवा प्रखर असेल तर पोळ्या कच्च्या राहतील किंवा करपून जातील.

हेच तत्व शरीरातही लागू पडते.

असाच अग्नी आपल्या शरीरात असतो जो आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन करून शरीरासाठी आवश्यक घटक बनवितो.

 

eating-healthy-inmarathi01

 

आपण रात्रीचे जेवण करून झोपलो की साधारण सहा ते सात तासांनी उठतो. ही वेळ सर्वात जास्त अन्न पचनासाठी असते. तीन तासात प्राकृत माणसाचे अन्न पचन होते, मग उरलेला वेळ पोट रिकामे असते. सकाळी मलविसर्जन नीट झाले की पोटातील अग्नी प्रदीप्त होतो. अशा वेळी त्याला योग्य आहाराची आहुती देणे गरजेचे व आरोग्यदायी असते.

सकाळची न्याहारी ही भरपेट करावी. दुपारचे जेवण मध्यम करावे व रात्रीचे जेवण हलके करावे. हा नियम स्वीकारावा.

 

morning-breakfast-marathipizza01

स्रोत

(सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ बिलकुल खाऊ नका)

सकाळची न्याहारी करताना खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.

१ ) रात्रीची झोप होऊन सकाळी नीट मलविसर्जन होऊन कडकडीत भूक लागली असेल तर भरपेट आहार घ्यावा. परंतु जर उशिरा जेवण झाले असेल, सकाळी मलविसर्जन नीट नसेल झाले तर हलका आहार घ्यावा. परंतु शरीराला चांगल्या सवयी लावाव्यात.

२)  ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करावा.

३) सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये.

 

junk-food-inmarathi

 

हे ही वाचा –

===

 

४) न्याहारीत प्रथिने (proteins), कर्बोदके(carbohydrates), व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. आजकाल खुपजण मधुमेह होईल या भीतीने मधुमेह नसताना साखर खाणे बंद करतात. हे अतिशय घातक आहे कारण मेंदूला कार्यरत राहण्यासाठी साखरेची गरज असते.

५) आपण ज्या देशात राहतो त्या देशात पिकणारी फळे, भाज्या, यांचाच शक्यतो आहार घटकात समावेश करावा.

६) आहारात कोणतेही रासायनिक घटक, अथवा कृत्रिमरंग यांचा वापर न करता नैसर्गिक भाजीपाला, धान्ये, फळे यांचा वापर करावा.

७) मनुष्य कोणत्याही प्रकृतीचा असला तरी त्याने सकाळी एक चमचा गाईचे तूप व एक कप गाईचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकून घ्यावे.

वरील गोष्टींना अनुसरून न्याहारीत घेता येतील असे पदार्थ :

धपाटे

हा महाराष्ट्रीयन पारंपारीक पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, हरभरे डाळीचे पीठ, ज्वारी पीठ, नागली पीठ, तांदूळ पीठ सर्व एकत्र करावीत.

 

morning-breakfast-marathipizza

स्रोत

त्यात हींग, जिरे पूड, तिखट, मीठ, कोथिंबीर, थोडा लसूण घालून पाणी टाकून पोळी सारखी कणिक मळावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून तव्यावर भाजावेत. हे धपाटे, चांगले तूप, लिंबू लोणचे, खोबऱ्याची ओली चटणी, याबरोबर खावेत.

मेतकूट भात

ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना हलका आहार घ्यावयाचा आहे त्यांनी तांदळाचा गरम गरम आसट भात, त्यावर साजूक तूप, वर खमंग मेतकूट टाकून खावे.

 

metkut inmarathi

 

खिचडी

मोड आलेली धान्ये, शेंगदाणे, सर्व डाळी ( मूग, हरभरा, तूर, मसूर) एकत्र करून केलेली खिचडी व त्यावर तूप घालून लिंबू लोणचं सोबत खावी. सर्व डाळी असल्याने यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.

 

khichadi inmarathi
indianrecipieinfo

 

उपमा

बाजरीचे पीठ, रवा, नागलीचे पिठ यांचा पारंपारीक पद्धतीने उपमा बनवावा. यात कढीपत्ता, आले टाकावे म्हणजे पचण्यास सोपे जाते.

 

upma inmarathi

 

धिरडे

सर्व डाळींची पिठ, तांदूळ पीठ, गव्हाचे पीठ यात हिंग, जिरे, मीठ, तिखट, कोथिंबीर, पाणी घालून पातळ मिश्रण करावे व nonstick pan वर डोसा सारखे घालावे.

dhirde inmarathi

 

हे ही वाचा –

===

 

पचडी

कोबी, टोमॅटो, गाजर, मोडाचे मूग, जिरे, मीठ, लिंबूरस आवडीनुसार घालून एकत्र करावे व खावे. याच्या जोडीला निरनिराळे लाडू देखील खाऊ शकता, कारण सकाळची न्याहारी भरपेट पाहिजे.

 

kobi inmarathi

 

म्हणतात ना,

घी शक्कर रवा । तो झक् मारती दवा !!!! 😀

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?