' ‘तिला’ प्रपोज करायचा विचार करताय? तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी! – InMarathi

‘तिला’ प्रपोज करायचा विचार करताय? तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम व्यक्त करायला कुठला दिवस, मुहूर्त आवश्यक नसतो. हवं तेव्हा, हव्या त्या दिवशी ते व्यक्त करता येतं. पण – असंस्कृत वर्तन न करता, हळुवार प्रेमाची मोकळी अभिव्यक्ती वाईट नाही, बरोबर ना?!

तुमच्या क्रशला प्रपोज करून तिच्याकडून होकार मिळवण्याची तयारी तुम्ही करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. इतरही सिंगल जमातीतील लोक, आम्ही पुढे सांगणार आहोत त्या गोष्टींचा वापर करून फॉरएव्हर सिंगलचा कलंक पुसून टाकू शकता.

तर  टिप्स अश्या आहेत –

तिला देखील तुम्ही आवडता याची तुम्हाला खात्री नसेल तर तिला थेट काहीही विचारू नका

propose-tips-marathipizza00

हे ही वाचा – प्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत

जेव्हा तुम्ही तुमच्या क्रश सोबत मेसेंजिंगवर गप्पा मारत असता तेव्हा तिला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असता.

 

 

तिच्याकडून तुम्हाला काही ‘सिग्नल’ मिळतो आहे का याची तुम्ही वाट पाहत असता.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा एखादी मुलगी स्वत:हून तुम्हाला होकार देते तेव्हा ती खरोखर तुम्हाला लाईक करत असते, पण जर तिने ‘नाही’ म्हटले तर ती तुम्हाला भविष्यात ‘हा’ म्हणेल अश्या भ्रमात राहू नये.

तिला तुमच्यात इंटरेस्ट आहे का हे कसे जाणून घ्यावे?

जर ती तुमच्या मेसेजेसला न चुकता सारखा रिप्लाय करते

जर बोलताना एखादा विषय संपत असेल आणि ती मुद्दाम दुसराच विषय सुरु करत असेल,

जर ती लहानातली लहान गोष्ट देखील तुमच्यासोबत शेअर करत असेल

तर या सर्व गोष्टी शुभसंकेत मानाव्यात, कारण या गोष्टी दर्शवतात की तिला खरंच तुमच्यात इंटरेस्ट आहे. इतकं  असूनही जरी काही शंका असेल तर ती सुद्धा दूर करून घ्या आणि तिला बिनधास्त प्रपोज करा. होकार तुमचाच आहे.

 

“योग्य वेळ आल्यावर विचारेन”

 

propose-tips-marathipizza01

 

अनेकदा आपल्या मनात भीती असते की तिला प्रपोज केला आणि तिने नकार दिला तर आपल्यातलं नात तुटायला नको.

या भीतीने आपण आपल्या मनाला नेहमी समजावत असतो की योग्य वेळ आली की तिच्या समोर आपलं मन व्यक्त करेन. पण खरं सांगायचं तर योग्य वेळ वगैरे गोष्टी थोतांड आहेत.

तुमची योग्य वेळ येईपर्यंत तिच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी येऊन जायचा, मग तुम्हाला बोंबलत बसावं लागेल. तुमचं तिच्यावर प्रेम आहे असा काही साक्षात्कार तिला होईल अश्या भ्रमात बिलकुल राहू नका. तुम्हाला तुमच्या तोंडानेच तिला हे सारं सांगायचंय, त्यामुळे योग्य वेळेची वाट वगैरे न बघता तुमच्या भावनांना मोकळी वाट करून द्या.

तिच्या नजरेला नजर देऊन बोला

vi inmarathi

 

बऱ्याचदा जी गोष्ट मुखावाटे बाहेर पडत नाही ती नजरेतून व्यक्त होते. तुमच्या क्रश सोबत समोरा समोर बोलताना नेहमी तिच्या डोळ्यात पाहून बोला.

तिने या गोष्टीस हरकत घेतली नाही आणि ती देखील तुमच्या नजरेला नजर देऊ लागली तर समजून जा अर्धी लढाई तुम्ही जिंकली आहे.

तिला प्रपोज करताना देखील तुमची नजर स्थिर ठेऊन तिच्याकडे पाहत तिला प्रपोज करा, यामुळे तुम्ही तिच्याबद्दल खरोखर सिरीयस आहात याबद्दल तिची खात्री पटेल.

हे ही वाचा – प्रेमासाठी स्वतःच्या या ८ गोष्टी बदलल्या तर नात्यात तुमचं अस्तित्व हरवून बसाल

प्रत्येक मुलगी सारखी नसते

 

propose-tips-marathipizza03

 

तुमच्या एखाद्या मित्राला त्याच्या मजेदार स्वभावामुळे किंवा त्याने मुलीला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं म्हणून एखादी मुलगी पटली असेल तर तुम्ही त्याच्यासारखा विचार करू नका.

प्रत्येक मुलीचा स्वभाव आणि आवड निवड वेगळी असते. तुमचा फिल्मी स्टाईल प्रपोज तिला आवडेलच असं नाही.

तुम्हाला तिचा स्वभाव माहीत असणारच, तेव्हा तिचा स्वभाव ओळखून तिला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करा. कदाचित तिला तुमचा साधा स्वभाव आवडेल आणि ती तुमच्यावर अधिकच भाळेल. तेव्हा उगाच इतरांची नक्कल करणे टाळावे.

मनावर दडपण येऊ देऊ नका

 

propose inmarathi

 

प्रपोज करण्यापूर्वी किंवा करताना तिच्या होकार-नकाराचा विचार अजिबात करू नका. प्रपोज करताना आपल्याला होकार मिळेलच या सकारात्मक भावनेसह पुढे व्हा.

तुम्ही जसे आहात तसेच तिच्यासमोर जा. ज्यामुळे तिला तुमच्यातील सच्चेपणा दिसेल.

मनावर दडपण असल्यास प्रपोज करताना तुमच्या हातून एखादी चूक होऊ शकते किंवा तोंडातून चुकीचा शब्द बाहेर येऊ शकतो किंवा असे काहीतरी घडू शकते ज्यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल वाईट प्रतिमा निर्माण होईल.

So Guys, Best Of Luck! या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि द्या दणका उडवून!

===

हे ही वाचा – “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?