' डॉक्टरांशिवाय, घरच्या घरी ‘५’ मिनिटात होणारा हेल्थ चेकअप, नक्की करा! – InMarathi

डॉक्टरांशिवाय, घरच्या घरी ‘५’ मिनिटात होणारा हेल्थ चेकअप, नक्की करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

काही काही वेळेस आपल्याला थोडासा अशक्तपणा जाणवतो. कोणतंही काम करण्यात उत्साह रहात नाही. डॉक्टरांकडे जायलाही वेळ नसतो.

त्यावेळेस आपलं आपणच घरी स्वतःकडे अगदी ५ मिनिटे वेळ देऊन पाहिलं तर आपलं आरोग्य कसे आहे हे कळून येईल, आणि त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपलं हेल्थचेक आपणच कसं करायचं ते पाहू….

१) हात बघून आरोग्यतपासणी

 

health checkup inmarathi 2

 

आपल्या दोन्ही हातांचे index finger किंवा अंगठ्या शेजारील दोन्ही बोटं वाकवायची. म्हणजे दोन्ही बोटांच्या नखांचा भाग एकमेकांवर आला पाहिजे.

त्यात तुम्हाला दोन्ही नखांच्या भागात थोडीशी फट दिसून तिथे डायमंड(हिरा) सारखा आकार दिसत असेल तर, तुम्ही निरोगी आहात.

पण समजा दोन्ही नखं एकमेकांवर बसली आणि कुठलीही फट तिकडे नसेल तर समजायचं की आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय.

त्यामुळे बोटांना सूज आलीय. हा हृदयाशी संबंधित आणि फुफ्फुसांशी निगडीत प्रॉब्लेम असू शकतो.

२) पायांच्या स्थितीवरून आरोग्य तपासणी

 

health checkup inmarathi 5

 

आपल्याला एका पायावर उभं राहता येतं का हे पाहायचं.

दोन्ही पाय जवळ घेऊन उभ राहायचं. म्हणजे सावधान पोझिशन मध्ये. आणि एक पाय उचलायचा, हात सरळ ठेवायचे, हाताने पाय नाही पकडायचा.

आपल्या पायाची मांडी जमिनीला समांतर असली पाहिजे. अशा स्थितीत किमान २० सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळ स्थिर उभं राहता आलं पाहिजे. असं उभं राहता येत असेल तर तुम्ही निरोगी आहात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण तुमचा जर तोल जात असेल, उभे राहता येत नसेल तुम्हाला कशाच्या तरी आधाराची गरज वाटत असेल, तर तुमच्या मेंदुंच्या नसांमधील रक्तपुरवठा कमी होतोय.

आणि त्याचा परिणाम म्हणजे brain stroke आणि dimentia होण्याचा धोका संभवतो. त्यासाठीही धोक्याची घंटी आहे असे समजून डॉक्टरांकडे लवकर गेले पाहिजे.

३) डोळ्यांवरून आरोग्यतपासणी 

 

health checkup inmarathi 1

तुमच्या डोळ्याची खालची पापणी थोडीशी ओढून बघायची. जर तिचा रंग छान गुलाबी असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही.

परंतु पापणी खाली ओढल्यावर जर पापणीचा रंग फिकट गुलाबी आणि पिवळसर असेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या नसांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतोय, जे ॲनिमियाचे लक्षण आहे.

त्यामुळे डोळ्यातल्या छोट्या-छोट्या नसा शंभर टक्के काम करत नाहीत. त्यासाठी डोळ्यांचे काही व्यायाम करणे आणि डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

४) हातांच्या बोटांवरून आरोग्य तपासणी

आणखीन एका पद्धतीनेही आपले आरोग्य चेक करता येते ते म्हणजे आपले हात. दोन्ही हात आपल्या चेहऱ्याच्या रेषेत चेहऱ्याला समांतर आणायचे. आणि हातांची बोटं तळव्यावरती टेकवायची.

त्यात ही बोटांच्या नखां कडचा भाग जोरात दाबायचा, अंगठा मात्र बाद बाजूला काढून खालच्या दिशेने वळवायचा या स्थितीत तुम्ही जर ते एक ते दोन मिनिटं व्यवस्थित राहायला राहिला तर तुम्ही निरोगी आहात.

परंतु असं केल्याने तुमच्या तळहाताजवळ किंवा मनगटाजवळ मुंग्या आल्यासारखे वाटणे किंवा तो भाग बधिर होतो असं वाटणं किंवा वेदना जाणवत असतील तर ते म्हणजे ‘carpal tunnel syndrome’.

म्हणजे मनगटातील मध्यस्थ मज्जातंतूवर दाब पडल्यामुळे बोटांना बधिरता येणे याचं लक्षण असू शकते, त्यासाठी डॉक्टरांकडे लवकर जाणं गरजेचं आहे.

५) केसांवरून आरोग्यतपासणी

 

healthcheck up inmarathi

 

आपले धुतलेले स्वच्छ आणि वाळलेले केस हे आपल्या दोन बोटांच्या चिमटीत बसतील इतके घेऊन जोरात ओढायचे जर तुमच्या हातात दोन-तीन केसा आले तर तुमचे आरोग्य चांगले आहे.

परंतु केस ओढल्यानंतर जर तुमच्या हातात केसांचा पुंजका आला तर मात्र परिस्थिती गंभीर आहे. तुमचे केस पातळ होत आहेत आणि शरीरात हार्मोनल इंबॅलेन्स वाढलेला आहे.

पोषणमूल्य कमी होत आहेत. आणि तुम्हाला कशाचा तरी स्ट्रेस आहे. त्यासाठी पौष्टिक आहार चालू करायचा. सात ते आठ तास व्यवस्थित झोप घ्यायची.

६) पावलावरून आरोग्य तपासणी

जमिनीवर आडवे झोपून दोन्ही पाय उचलून 45° अंशात काही मिनिटं ठेवता येत असतील आणि आपल्या पावलांचा रंग आहे तसाच असेल तर काही प्रॉब्लेम नाही.

मात्र जर तुमची पावलं फिकट पिवळी किंवा पांढरी होत असतील तर मात्र तुमच्या पावलांना रक्तपुरवठा कमी होतोय. तुमच्या पावलांच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यात.

त्यामुळे अगदी काही मिनिटे देखील तुम्हाला पाय उभे ठेवणे अशक्य होते आहे, आणि तिकडे वेदना सुरू होतात, बधीरपणा जाणवतो. यासाठी चे व्यायाम तज्ज्ञ व्यक्ती किंवा डॉक्टरांना विचारून करणे गरजेचे आहे.

७) कानावरून आरोग्य तपासणी

 

health checkup inmarathi 3

 

तुम्ही तुमचा हात कानाच्या वरती थोडासा नेऊन तिकडे बोटांनी लहान आवाज केलात आणि तो आवाज तुम्हाला ऐकू येत असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही.

दुसऱ्या कानाच्या बाबतीतही हा प्रयोग करून पाहायचा, तिकडेही जरा आवाज येत असेल तर सगळं ठीक आहे.

परंतु आवाज येत नसेल तर तुमची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

 

८) जिने चढणे

 

health checkup inmarathi 4

 

कुठलाही जिना चढताना तुम्ही जर गाणं म्हणत जिना चढत असाल, त्याच्या पंधरा-सोळा पायऱ्या चढल्यावर देखील जर तुम्हाला दम लागत नसेल, धाप लागत नसेल तर तुमचं हृदय व्यवस्थित काम करत आहे.

परंतु जर जिना चढताना सहा-सात पायऱ्यांमध्ये जर दमछाक होत असेल, धाप लागत असेल, श्वासोश्वासाला त्रास होत असेल, तोंडाने श्वास घेतला जात असेल तर तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली आहे.

त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे.

या काही सोप्या ट्रिक्स करून आपली आरोग्य तपासणी आपल्याला घरच्या घरी करता येते. तरीही कधी कधी खूपच अस्वस्थ वाटत असेल आणि त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

====

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?