' नोकरी/व्यवसायात हवा तो रिझल्ट मिळत नाहीये? हा परिणामकारक उपाय तुमचा दिवस बदलून टाकेल! – InMarathi

नोकरी/व्यवसायात हवा तो रिझल्ट मिळत नाहीये? हा परिणामकारक उपाय तुमचा दिवस बदलून टाकेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : आशिष देवडे

===

कधी कधी प्रसन्न वाटण्यासाठी unconventional गोष्टी सुद्धा ट्राय कराव्यात असं फार जाणवतंय कालपासून.

एखादा दिवस हा तुमची परीक्षा घेणारा असतो. कालचा दिवस तसाच होता.

 

एका गृहस्थाने फोन करून बोलावलं होतं. एक प्रलंबित प्रोजेक्ट ऑर्डर फायनल करू आणि आधीचा चेक पण घेऊन जा.

सकाळ पासूनच माझ्या हलचालींमध्ये एक वेग होता. एका ठिकाणी लांबचा रस्ता टाळण्यासाठी एक लेफ्टचा शॉर्टकटने जाऊया असा विचार केला. जवळपास पाच किलोमीटर अंतर वाचेल.

हा लेफ्टचा रस्ता सिंगल लेन होता आणि सकाळच्या वेळी मोकळा असतो असा माझा अंदाज होता.

 

traffic inmarathi

अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि दिसलं की तिथून पुढे जाम आहे. एक मोठा ट्रक टर्न घेताना एका भिंतीला खेटलाय. तोपर्यंत मागे बघावं तर पार शेवटपर्यंत लाईन लागली होती.

बसलो तिथेच जाम सुटण्याची वाट पाहत. मिटिंगची घटिका समीप येत होती.

उशीर होईल असं फोन करून सांगितलं.  ‘हो, हो या. मी ऑफिसलाच आहे.’ असं उत्तर मिळालं.

मी पोहोचलो आणि ते सद्गृहस्थ नुकतेच कुठे तरी बाहेर गेले होते.

रिसेप्शन वरची व्यक्तीकडून जेव्हा जेव्हा हे वाक्य कानावर पडतं तेव्हा तेव्हा मला त्या गोविंदाच्या डायलॉग ची आठवण येते: ‘अभी अभी चले गये, कुछ बोलना था क्या ?’

ठिक आहे, म्हणून बसलो वाट पाहत.

आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग त्यांनी मला मीटिंग रूम मध्ये बसवलं आणि स्वतः आत निघून गेले.

 

meeting inmarathi

 

थोडया वेळाने त्यांची एन्ट्री झाली. दोन निरोप घेऊन आले:

‘आमच्या युजरने काही specifications बदलल्या आहेत. म्हणून आज ऑर्डर फायनल होऊ शकत नाही. नेमका तो user आज आला नाही. आणि हो, तुमचा चेक रेडी आहे. मी काल सिस्टीम ला बघूनच तुम्हाला फोन केला होता.

पण, नेमकं त्यावर साईन झालेली नाहिये. (इथे अजूनही NEFT, RTGS वगैरे प्रकार खर्चिक असल्याने लोकप्रिय नाहीत) आमचे सिग्नेचर authority काल साईन न करताच निघून गेले हेड ऑफिस मधून एक फोन आल्याने. (सिस्टीम generated चेक वर सुद्धा सही लागते इथे. )’

मी काय बोलणार ह्यावर! स्माईल दिलं आणि बॅग उचलली निघायलो.

दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथे कंपनी चे MD भेटले. त्यांनी सांगितलं:
‘अरे हा, वो आपके प्रोजेक्ट के drawings, offer मैने हमारे owner को दिये थे. वो ऑर्डर उनके एक दोस्त को दे दिया उन्होने.’

रिऍक्ट करून काहीच फायदा नव्हता. तसंही मार्केटिंग मधल्या प्रत्येक व्यक्तीला एक गाणं डिग्री घेतांनाच शिकावं लागतं:

‘जो तुम को हो पसंद, वही बात करेंगे… तुम चाहो तो; हम दिन को भी हम रात कहेंगे…'(फिरोज खान चं गाणं आहे जुनं)

पुढे कुठेही जायच्या आधी पाच मिनिटं थांबलो. मनात म्हंटलं की, हा दिवस काय सुचवतोय आपल्याला ?

उत्तर सरळ होतं: ‘Its not your day.’

आता ते accept करावं किंवा resist करावं हे आपल्यावर आहे.

असतो असा एखादा दिवस. ते मान्य करण्यात मला तरी काही अंधश्रद्धा वगैरे वाटत नाही. तुम्ही जर का असा एक ही दिवस जगला नसाल तर नशीबवान आहात.

आपल्या लहानपणी हिंदी सिनेमात एक डायलॉग ऐकलाय खूपदा.  ‘अगर घी सिधी उंगली से ना निकले तो उंगली टेढी करनी चाहीये.’

पण एखादा दिवस असा असतो की ती बरणी असत जी की उचलून पालथी जरी केली तरी त्यात काहीच नसतं.

एक तर आपली दिशा चुकलेली असते किंवा आपलं त्या दिवसासाठी ठेवलेलं टार्गेट.

अशा दिवसासाठी काही उपाययोजना काल पासून आमलात आणल्या त्या तुम्हालाही सांगावंसं वाटल्या.

एक तर, स्वतःला विचारायचं, ‘अशी परिस्थिती येण्याची ही पहिलीच वेळ आहे का ?’ उत्तर नाहीच असतं. मग पॅनिक कशाला व्हायचं ?

दुसरं, घराबाहेर पडताना असं ठरवायचं की, ‘काहीही होऊ दे तिकडं, घरी चेहरा पाडून नाही जायचं.’

हेच वाक्य इंग्रजीत वाचलं की अजून भारी वाटतं.

‘In any case, you should promise yourself & go home with a smiling face, as you are hero of your family.’

हे साध्य करण्यासाठी एक confident attitude सुद्धा असायला हवा. तो डेव्हल्प करणं ही एक मोठी प्रोसेस आहे.

त्याचा एक इन्स्टंट नमुना अनुभवायचा असेल तर ‘फास्ट बिट्स’ चे गाणे ऐकावेत माणसाने.

 

girl listning song

 

आपल्याला असं वाटतं फक्त आपल्या क्षेत्रातच प्रगती झाली आहे. पण, ह्या क्षेत्रात सुद्धा बादशाह, हनी सिंग ह्यांनी कमाल गाणी करून ठेवली आहेत जे की तुम्हाला क्षणात एका दुसऱ्या विश्वात नेऊ शकतात आणि रिफ्रेश करू शकतात.

यो यो हनी सिंग च्या एका गाण्यातल्या ह्या ओळी आहेत:

‘जिंदगी सारे दिन जी रखे है…
मै तो कभी ना रुकता,
किसी के आगे ना झुकता,
मेरा गाया हुआ गाना, लाखो मे बिकता,
Coz I am Honey Sing (3)’

काय कॉन्फिडन्स आहे यार!

या कॉन्फिडन्सने आपण कधी स्वतःचं नाव घेतो का ? तितक्या प्राईड ने कधी स्वतःला address करतो का एकटयात किंवा कोणासमोर?

काहींना हसू येईल हे वाचताना. हसून झाल्यावर परत स्वतःला seriously विचारा. कारण व्यक्ती म्हणून structurally त्या गायकात आणि आपल्यात काय फरक आहे? काहीच नाही.

ही गाणी गुणगुणत मी अगदी आनंदात घरी पोहोचलो. मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं होतं. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता.

 

 

तसंही स्पर्धा वाढलीये, किती तरी मार्केटिंग events cancel होत आहेत. थेट नाही तर indirectly तरी फरक हा पडणारच आहे. ही फेज निघून जाईपर्यंत स्वतःला strong ठेवण्या साठी शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?