' संतकवी तुलसीदास यांनी सांगितलेले हे गुण तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात – InMarathi

संतकवी तुलसीदास यांनी सांगितलेले हे गुण तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

माणसाच्या समस्या, अडचणी, संकटे अनादी काळापासून आहेत.

 

PROBLEMS inmarathi
slide share

 

मग ते सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापार असो की आत्ताचे कलीयुग असो!

समस्यांचे रूप काळानुरूप बदलले, माणसाला सामना करावी लागणारी संकटे बदलली पण नुसतीच बदलली ती, नष्ट झाली नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनुष्याला संकटांना तोंड द्यावे लागते.

 

raja shivaji inmarathi
maratha empire

 

संकटांना तोंड देणाराचं यशस्वी होतो हे इतिहासातून आपल्या लक्षात येते, तशी अनेक उदाहरणंही आपल्या इतिहासाने आपल्याला शिकवली आहेत.

पण, आज-काल लोकांना काय झालंय तेच कळत नाही. पेपर, न्युज चॅनल सगळीकडे रोज आत्महत्येच्या बातम्या असतात.

अपयश पचवू शकत नाहीत, संकटाला तोंड देऊ शकत नाहीत. मनुष्य इतका कमजोर आहे का? तर ह्याचे उत्तर नाही असेच येईल.

मग कसं द्यायचं संकटाला तोंड? तेच आज आपण बघुया.

tulsidas

 

तुलसीदास असे म्हणतात की,

विपत्ती मध्ये म्हणजेच संकटात विद्या, विनय, विवेक, साहस (धैर्य), सुकृती (सत्कृत्य), सत्यवचन आणि भगवंतावर विश्वास हे सात गुण साथी, मित्र ठरतात. म्हणजेच हे सात गुण आपल्याला संकटकाळी तारतात.

१) ज्ञान (विद्या)

ज्ञान म्हणजे आपले अभ्यास, शिक्षण आणि जीवन अनुभव. आपण काही अडचणीत असाल तर ज्ञानाद्वारे आपल्याला त्या समस्येचे निराकरण निश्चितच मिळेल.

 

books inmarathi
byjus blog

 

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी, करिअर इथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान अवगत असेल तर स्पर्धेला घाबरण्याच काहीच कारण नाही.

त्यामुळे केवळ उच्चशिक्षणचं नव्हे तर बालपणापासूनच चांगलं शिक्षण घेण्याचा आणि त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा.

जगात असा कोणताही प्रश्न नाही ज्याचं उत्तर शिक्षणक्षेत्रांत नाही.

२) विनय

विनय म्हणजे विनम्रता.

 

obidient inmarathi
babyterest

 

जर आपण नम्र असाल तर आपण प्रेम आणि प्रेमाने बोला. हे गुण आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात.

विनयात् याति पात्रता। म्हणजेच जर विनय असेल तरच पात्रता येते अंगी!

तुसडेपणाने बोलणाऱ्या माणसापासून सगळेच लांब पळतात. त्याला मदत तर दूरच पण लोकं अहंकारी व्यक्तीपासून लांबच राहणे पसंत करतात.

 

attitude inmarathi

 

अहंकारामुळे पराक्रमी, तेजस्वी, पंडित असणारा रावण नष्ट झाला.  मात्र स्वामी विवेकानंदांनी विनयशीलतेने आख्खं जग जिंकलं.

३) विवेक

विवेक म्हणजे बुद्धिमत्ता, जे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतं.

या गुणवत्तेसह, आपण येणाऱ्या अडचणी समजून घेऊ शकतो आणि त्यांचे निराकरण करू शकतो.

छत्रपती शिवरायांचे मूर्तिमंत उदाहरण आहे विवेकाचं!

 

shivray inmarathi
katha kids

 

 

आग्र्याहून सुटका हा प्रसंग तुम्हाला आठवत असलेचं. तेव्हा त्यांनी धैर्यासह विवेकानी आणि चातुर्याने आपली सुटका करून घेतली.

कबुतरांची गोष्ट सगळ्यांनाच माहितेय. एका पारध्याने जाळं टाकलं होतं आणि त्यात दाणे पसरले. वरून कबूतरांचा थवा उडत चालला होता. त्यांना दाणे दिसले पण जाळं नाही! ते सगळे दाणे वेचायला उतरले आणि जाळ्यात अडकले.

त्यातल्या एका कबुतराने “आपण सर्व एकत्र उडून गेलो तर जाळ्यासकट जाऊ पण शिकाऱ्याच्या हाती सापडणार नाही” असं म्हटल्यावर जाळ्यासकट सगळी कबुतरे उडून गेली.

 

birds inmarathi

 

संकटात त्या कबुतराने विवेकबुद्धी शाबूत ठेवून सगळ्याच कबुतरांना शिकाऱ्यापासून वाचवले

४) धैर्य

ही गुणवत्ता आपल्याला अडचणींशी लढण्यास मदत करते.

धैर्याच्या बळावर आपण सर्वात मोठ्या अडचणी अगदी सहजपणे सामोरे जाऊ शकतो.

आज-काल धैर्य या गुणाची खूपच आवश्यकता आहे.  संकट कसं, कुठुन येईल सांगता येत नाही.

 

26 11 attack inmarathi

 

२६/११ ला रेल्वे कर्मचाऱ्यापासून ताजच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांनी जे अतुलनीय धैर्य दाखवलं त्यामुळे खूप लोकांचे प्राण वाचले.

५) सत्कर्म

जर तुम्ही एक चांगली व्यक्ती असाल आणि तुम्ही कधीही कोणाचे वाईट केलं नाहीत, तर देवही तुमच्या सोबत असतो.

तुम्ही नेहमीच चांगली कामे केली असतील तर याचा परिणाम म्हणून तुम्हाला त्रासातून मुक्तता मिळेल.

 

help inmarathi

 

एका राजाने एकदा जंगल्यातल्या विहिरीत पडलेल्या नागाला वाचविले. तेव्हा सगळ्यांनी राजाला खूप समजाविले पण राजाने त्याचा स्वभाव सोडला नाही आणि नागाला वाचविले.

नागानेही राजाला मदतीचं वचन दिलं, त्यानंतर राजपुत्राला असाध्य रोगातून वाचविण्यासाठी गरजेचं असलेलं विष नाग शोधून देतो.

सत्कृत्य, परोपकार नेहेमीच सुफळ देणारी असतात.

६) सत्यवचन

सत्य सांगण्याची सवय आपल्याला फायदेशीर ठरते आणि वाईट परिस्थितीपासून आपले संरक्षण करते.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

बरे सत्य बोला यथातथ्य चालां। बहु मानिती लोक येणे तुम्हाला। 

 

true inmarathi

 

सगळ्या संतांनी सत्यवचनाचे महत्त्व सांगितले आहे. सत्याची कास कधी सोडू नये.

लाकुडतोड्याची गोष्ट सगळ्यांनाच माहितेय. त्याने खरं ते सांगितल्यामुळेच त्याची लोखंडी कु-हाडीसह सोन्या-चांदीच्या पण कुर्हाडी त्याला मिळाल्या.

७) देवावरील विश्वास

देव आहे की नाही याबद्दलचे वाद नेहमीच ऐकु येतात, मात्र आजही भारतातचं नव्हे तर संपुर्ण देशात आस्तिक लोकांची संख्या जास्त आहे.

 

ganesh inmarathi
fine arts america

 

जेव्हा आपण अशा संकटात अडकतो, जिथुन बाहेर पडणे कठीण होतं, तेव्हा देवावरील विश्वास आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करू शकतो.

काही जण देवाला मुर्तीत पुजतात, तर काही निसर्ग या शक्तीवर विश्वास ठेवतात.

कुणाचीही श्रद्धा बरोबर किंवा चुक नाही. कारण प्रत्येक धर्माला आपआपल्या देवतेची पुजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.

त्यामुळे केवळ दुःखातचं नव्हे तर सुखाच्या दिवसातही देवाची आराधना कायम ठेवणं तितकंच महत्वाचं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?