' करोनाबद्दल WHO ने दिलेली अधिकृत माहिती, चुकीच्या गोष्टी वाचून घाबरण्यापेक्षा हे वाचा – InMarathi

करोनाबद्दल WHO ने दिलेली अधिकृत माहिती, चुकीच्या गोष्टी वाचून घाबरण्यापेक्षा हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

करोना व्हायरस सध्या पसरत आहे त्यामुळे सगळीकडेच थोडीशी भीतीसुद्धा पसरलेली दिसत आहे.

 

corona mask inmarathi
telangana today

 

आता तर जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

करोना बद्दल अनेक अफवा सध्या पसरताना दिसत आहेत. डास चावल्याने कोरोना होतो असा काहींचा समज आहे.

नॉनव्हेज खाल्ल्याने कोरोना होत असल्याचं सांगत अनेकांनी चिकन, मटण अशा आवडत्या पदार्थांना नकार दिला.

 

corona inmarathi
forbes

 

तर सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळल्याने, कडुलिंबाचा पाला जाळल्याने, गोमूत्र सेवन केल्याने, लसूण खाल्ल्याने करोना होत नाही असे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

व्हाट्सअप, फेसबुक वर करोना कशा कशामुळे होतो आणि काय केल्याने होत नाही, हे सांगितले जात आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे हे पाहणे गरजेचे आहे.

 

who inarathi
mladiinfo

 

कारण जागतिक आरोग्य संघटनेकडेच याविषयीचा संपूर्ण डेटा आहे. अशा सगळ्या अफवांवर जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ते पाहू.

गरम हवेत करोना व्हायरस तग धरू शकणार नाही.

लोकांचा हा एक गैरसमज आहे की, गरम आणि दमट हवेला करोना व्हायरस तग धरू शकणार नाही. परंतु हा व्हायरस कुठल्याही हवेत कुठल्या एरियात, कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो.

त्यामुळे केवळ उष्ण वा थंड हवामानावर अवलंबून राहणं योग्य नाही.

 

hand wash inmarathi
herzindagi

 

जर तुम्ही करोना प्रभावित एरियामध्ये रहात असाल किंवा तिकडे जाणार असाल तर, आपले हात वारंवार साबणाने धुवायची सवय ठेवा. कोरोना व्हायरसला थोपवण्याचा सध्या हा एकमेव मार्ग आहे.

थंड हवेत आणि बर्फाळ प्रदेशात करोना होत नाही.

लोकांचा आणखीन एक गैरसमज असा आहे की, थंड हवेत किंवा बर्फाळ प्रदेशात कोरोना होऊ शकणार नाही. परंतु हे देखील अजिबात सत्य नाही.

कारण वुहान मध्ये ज्यावेळेस कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळेस तिथले तापमान खूप कमी होतं.

 

wuhan china inmarathi
the new york times

 

खरंतर तुमच्या अवतीभवतीचं तापमान किती आहे यांने काहीही फरक पडत नाही, कारण तुमच्या शरीराचं तापमान हे 36 डिग्री सेल्सियस ते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत कायमच असतं.

म्हणून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी केवळ वारंवार हात धुणे हाच सध्यातरी एकमेव मार्ग आहे.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना होत नाही.

असाही एक गैरसमज पसरला आहे की खूप गरम पाण्याने आंघोळ केली तर कोरोना होत नाही.परंतु ह्यातही काही तथ्य नाही.

 

hot water bath inmarathi
donus natural online store skin care products

 

उलट खूप गरम पाण्यामुळे आपल्याला जळजळ होऊ शकते. आणि पाणी गरम जरी घेतलं तरी शरीराचं आतील तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त जात नाही.

त्यामुळे केवळ हात, तोंड यांची स्वच्छता ठेवणं आणि कोणतेही विषाणू तुमच्या शरीरात जाऊ नयेत म्हणून डोळ्यांना, चेहऱ्यावर ,नाकावर कुठेही हात न लावणे हेच पर्याय सध्या आहेत.

करोना व्हायरस डास चावल्याने होतो

आतापर्यंत कोरोना व्हायरसचे जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी कोणालाही डास चावल्यामुळे कोरोना झालेला नाही.

 

mosquto inmarathi
abc news

 

करोना हा श्वास नलिकेतून तुमच्या शरीरात जाऊ शकतो. कोरोना हा व्हायरस, करोना झालेल्या माणसाच्या खोकल्यातून, शिंकण्यातून उडणाऱ्या द्रवरूप पदार्थांमुळ, तोंडातील लाळेमुळे होतो.

 

cold inmarathi
healthflex.com

 

श्वास किंवा हवेतील जंतु यांव्दारे हा व्हायर तुमच्या शरीरात गेला तरच कोरोना होतो.

म्हणूनच वारंवार अल्कोहोल बेस्ड हँडवॉशने हात धुवावेत. आणि जर कोणी खोकत किंवा शिंकत असेल तर त्यांच्यापासून लांब राहावं.

हँड ड्रायर्स वापरल्याने करोना विषाणू मरतात, ही पण एक चुकीची समजूत आहे.

हँड ड्रायरमुळे कोरोना विषाणू मरत नाहीत. बऱ्याच स्वच्छतागृहांमध्ये हँड ड्रायर्स असतात, त्यातून येणाऱ्या गरम हवेमुळे लोकांचा असा समज झाला आहे की त्यात कोरोनाचे विषाणू मरतात.

 

hand dryer inmarathi
best life

 

परंतु खरंतर आपण हँडवॉशने हात धुतल्यानंतर फक्त हात वाळवण्याकरिता हँड ड्रायरचा उपयोग होऊ शकतो.

अल्ट्राव्हायोलेट यंत्रणा असलेला दिवा कोरोना व्हायरसला नष्ट करेल.

ही गोष्ट तर अजिबात शक्य नाही कारण अल्ट्राव्हायोलेट दिवे तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी किंवा शरीराच्या कुठल्याही त्वचेसाठी वापरू शकत नाही. कारण असं केल्याने तुमची त्वचेला जळजळ होईल.

थर्मल स्कॅनर कोरोना ग्रस्त रुग्ण ओळखतो.

हेदेखील अजिबात खरं नाही. कारण थर्मल स्कॅनर फक्त ज्या व्यक्तीला ताप आला आहे ते ओळखू शकतो. म्हणजे शरीराच्या तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या व्यक्तीला बाहेर काढता येतं.

 

tharmal scanner inmarathi
nbc news

 

परंतु एखादा कोरोना बाधित रुग्ण जर थर्मल स्कॅनर खाली आला आणि जर त्याला ताप नसेल तर थर्मल स्कॅनर अशा रुग्णाला ओळखू शकत नाही.

कारण करोना झाला आहे हे दोन ते दहा दिवसापर्यंत कधीकधी कळू शकत नाही.

अल्कोहोल, क्लोरीन जर शरीरावर स्प्रे करून घेतलं तर कोरोना होत नाही.

 

corona virus in lab feature InMarathi

 

जर तुमच्या शरीरात आधीच करोना व्हायरसने प्रवेश केला असेल तर अल्कोहोल आणि क्लोरीन शरीरावर फवारून काही होणार नाही.

अल्कोहोल आणि क्लोरीन तुमच्या शरीरातील व्हायरसला मारू शकत नाहीत. उलट अल्कोहोल आणि क्लोरीन मुळे कपड्यांवर डाग पडतील आणि डोळ्यांची आग होवु शकतो आणि तोंडाजवळ जळजळ होईल.

पाळीव प्राण्यांमुळे करोना व्हायरस होतो

आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार एकही केस पाळीव प्राण्यांमुळे कोरोना झालाय, अशी आलेली नाही.

 

pet lover inmarathi
moneycontrol

 

परंतु तरीही प्राण्यांना हात लावल्यावर आपले हात अल्कोहल बेस्ड हँडवॉश धुतले पाहिजेत. कारण पाळीव प्राण्यांकडून माणसाकडे येणारे ई कोलाय आणि सेमोलीना असे बॅक्टेरिया येणार नाहीत.

न्युमोनियाची लस कोरोना व्हायरसला लागु पडते.

न्युमोनिया साठी असलेले ‘ निमोकोकल व्हॅक्सीन’ कोरोना व्हायरस साठी उपयुक्त नाहीत. कारण COVID 19 हा करोना व्हायरस हा खूपच नवीन व्हायरस आहे. आणि त्याच्यासाठी त्याची स्वतंत्र लस तयार करावी लागेल.

 

corona virus 8 inmarathi
daily express

 

सध्या युद्धपातळीवर त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक शास्त्रज्ञ यावरची लस शोधताहेत आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना त्यांना मदत करत आहे.

मीठाच्या पाण्याने गुळण्या करून करोना व्हायरसला प्रतिबंध करता येतो. आत्तापर्यंत असा कोणताही पुरावा मिळालेला नाही की मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे व्हायरस झाला नाही.

असं केल्याने फक्त तुमची नॉर्मल सर्दी झाली असेल तर ती कमी होते. परंतु श्वसन संक्रमण त्यामुळे रोखता येत नाही.

लसूण खाल्ल्याने कोरोना होत नाही

निरोगी आरोग्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त आहे. लसणामध्ये प्रतिजैविक आहेत, परंतु केवळ लसूण खाल्ल्यामुळे कोरोना होण्याला प्रतिबंध होतो हेही खरे नाही.

 

corona garlic
navodaya times

 

करोना व्हायरस हा वृद्धांना होतो

खरंतर करोना व्हायरस हा कोणालाही होऊ शकतो. तो तुमचं वय पाहून येत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही ह्या व्हायरसचा त्रास होऊ शकतो.

 

corona virus 10 inmarathi

 

मात्र ज्याला आधीचे काही आजार आहेत म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयविकार असे आजार असलेल्या लोकांना करोनाची लागण झाली तर मात्र परिस्थिती गंभीर बनते.

म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना सगळ्यांना सांगत आहे की स्वतःची काळजी नीट घ्या. हात वारंवार धुवा.

अँटिबायोटिक्सचा कोरोना व्हायरस वर काय परिणाम होतो

अँटिबायोटिक्स कुठल्याही व्हायरस वर चालत नाहीत. त्याने फक्त बॅक्टेरियावर उपचार करता येतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi04
movenoticias.com

 

परंतु जर तुम्ही करोना व्हायरसमुळे आजारी आहात आणि तरी तुम्हाला अँटिबायोटिक्‍स दिले जातात, कारण त्यात आणखीन अजून कोणते बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ नयेत हाच त्यामागचा उद्देश असतो.

नवीन कोरोना व्हायरस वर सध्या कोणतं औषध आहे.

कोरोना व्हायरसबद्दल लोकांना माहीत झाल्यापासून अजूनपर्यंत तरी यावर कुठलंही औषध उपलब्ध नाही.

ज्यांना या व्हायरसची बाधा झाली, त्यांना काही औषध उपचार करून थोडे दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवून त्यांची तब्येत सुधारल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

 

corona virus 9 inmarathi
business magzine

 

जे रुग्ण गंभीर आजारी आहेत त्यांच्यावरती हॉस्पिटल्समध्ये सर्व उपचार केले जात आहेत.

जागतिक आरोग्य संघटना या व्हायरस वरती काहीतरी उपाय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे.

तोपर्यंत जगातल्या सगळ्याच नागरिकांनी वारंवार अल्कोहल बेस्ड हॅन्ड वॉश आणि साबणाने हात धुतले पाहिजेत आणि आजारी असल्यास कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असं सांगण्यात आलं आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?