' श्रीमंत होण्यापासून रोखणाऱ्या ६ सवयी आजच सोडल्यात, तरच मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर पडाल – InMarathi

श्रीमंत होण्यापासून रोखणाऱ्या ६ सवयी आजच सोडल्यात, तरच मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर पडाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘श्रीमंत, यशस्वी व्हायचंय ? मग हे कराच!’ असं सांगणाऱ्या अनेक गोष्टी किंवा माणसं तुमच्या संपर्कात आलीच असतील. मात्र कधी कधी काय करावं ह्यापेक्षाही काय करू नये हे समजून घेणं फार गरजेचं असतं.

ते आपल्याला व्यवस्थित कळलं की आपोआपच काय करावं हे नीट उमगतं आणि त्यासाठी वेगळे कष्ट उपसावे लागत नाहीत. एकदा का ‘काय करू नये’ ह्याचं तंत्र समजलं की विजय तुमचाच आहे.

दीप पटेल ह्या तरुण आणि प्रसिद्ध नेटवर्करच्या ‘A Paperboy’s Fable’ ह्या पुस्तकात त्याने आपल्या कोणत्या चुकीच्या ६ गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत हे सांगितलं आहे.

गरीबीतून श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टी लांब कराव्यात व कोणत्या चांगल्या गोष्टी अंगीकृत कराव्यात हे त्याने त्यात मांडलं आहे.

 

be rich inmarathi

 

श्रीमंत व्हायला कोणाला आवडणार नाही ? बरं आणि ह्यात गंमत अशी की आपण फक्त पैश्यांनीच श्रीमंत व्हायला हे करावं असं नाही तर माझ्यामते अनुभवसंपन्न होण्यासाठीही ह्याचा वापर करून आपणं आपलं आयुष्य अधिक सुंदर करू शकतो.

आयुष्य सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर करायचं आहे. आणि म्हणूनच त्या सहा गोष्टी लगेचच जाणून घेऊ.

१. स्वतःवर शंका घेणं टाळा :

 

confused girl inmarathi

 

माणसाने इतरांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वपरीक्षण करावं असं म्हणतात. आत्मपरीक्षणाने आपल्याला आपले दोष दिसून येतात. आणि आपण आपल्यात सुधारणा करूच शकतो.

मात्र हा चिकित्सकपणा वाढला तर मात्र ह्याचा उपद्रव जाणवू शकतो. कधीकधी आपण आपल्याच क्षमतांवर अविश्वास दाखवतो. एखादी गोष्ट आपल्याला जमणारच नाही ही गोष्ट मनात पक्की करून घेतो आणि तिथेच चुकतो.

आता सतत ‘न ना’ चा पाढा वाचलात तर कसं काय बरं काही योग्य घडेल ? लक्षात ठेवा हा सगळा मनाचा खेळ असतो. त्यामुळे त्यात तरबेज व्हा. स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्व ठेवायला शिका.

अविश्वास मात्र नक्कीच बाळगू नका. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच आयुष्यातून घालवून लॉजिकल विचारांचा आधार घेत तसेच नकारात्मक भावनांकडे पाठ फिरवा.

यशमार्गक्रमण करण्यास सुरुवात करा आणि अशक्य ते शक्य करून दाखवावं.

 

२. योग्य वेळेची वाट बघत बसणं :

 

no time management inmarathi

 

‘प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते’ असं म्हटलेलं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हो ना ? मात्र मित्रांनो, त्याऐवजी आपल्याकडे असलेल्या वेळेला योग्य मानलं आणि त्याचा सदुपयोग करत योग्य कृती केली तर?

असं केल्यास नक्कीच तुम्हाला कोणीही प्रगतीपथावरून दूर लोटू शकणार नाही. ‘कल करे सो आज , आज करे सो अब’ हे मनात पक्कं करून घ्या. कारण ‘राईट टाइम’ असं काहीही नसतं.

सगळं आपल्या मनावर आहे. त्यामुळे असलेल्या वेळेला कसं राईट मानून तुम्ही पावलं उचलता ह्यावर सगळं अवलंबून आहे.

३. अभ्यास न करणं :

ज्ञानाने माणूस प्रगल्भ होतो. अधिक परिपूर्ण होतो. म्हणूनच माणूस हा आजन्म विध्यार्थी असतो असं म्हणतात कारण तो सदैव काही ना काही कोणा ना कोणाकडून शिकतच असतो.

शिक्षण हे यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. यशोमार्गावरील माणसांची अभ्यासाची प्रक्रिया निरंतर असते. अशी माणसं सदैव अभ्यास करत ज्ञान प्राप्त करून घेतात.

 

Dr_Babasaheb_Ambedkar_reading_a_book inmarathi

 

अनेक व्यक्तींना भेटून त्यातून ज्ञानप्राप्त करतात. अनेक गोष्टी आत्मसात करत जगभरात काय सुरु आहे ह्याची देखील माहिती ठेवतात. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही बरं का!

४. बोलाची कढी बोलाचा भात :

तोंडाची वाफ विनाकारण दवडणे आपण टाळलं पाहिजे. असं न केल्यास आपली श्रीमंतीसुद्धा शब्दांमध्येच अडकून पडेल आणि पूर्णत्वास कधीच येणार नाही.

‘गर्जेल तो पडेल काय’ ही उक्ती तुमच्या बाबतीत खरी होऊ देऊ नका. म्हणून एकवेळ बोलला नाहीत तरी बेहेत्तर, मात्र तुमच्या कृतीतून गोष्टी घडू द्या.

तुमची कृतीच बोलेल. जसं उमललं फुल ‘मी उमललोय ‘ असं ओरडून सांगत नाही तर त्याचा दरवळणारा सुगंधच ते आपल्यापर्यंत पोहोचवतो अगदी तसंच.

५. ध्येय नसणं :

मित्रांनो आयुष्यात एक दिशा असणं फार महत्वाचं असतं. क्रिकेट मध्ये चेंडू वाट्टेल तसा भिरकावून चालेल का? चेंडूला एका विशिष्ट दिशेने आणि विशिष्ट पद्धतीने फेकणं गरजेचं असतं; ह्याच ध्येयाने की तो चेंडू फलंदाजाला बाद करेल.

 

goals inmarathi

 

आयुष्य क्रिकेट सारखं नसलं तरीही आयुष्यात ध्येयाविना तुम्ही योग्य वाटचाल करू शकणार नाही. मित्रांनो साधा गूगल मॅप सुद्धा तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन म्हणजेच जाण्याचं ध्येय विचारतं तर मग हे तर आयुष्य आहे

आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय. त्यामुळे जरी आजवर ध्येय निश्चित केलं नसेल, तरी आता क्षणाचाही विलंब न लावता ध्येय निश्चित करत यशोमार्गाने वाटचाल करा.

६. जिद्द नसणं :

मित्रांनो कष्ट करून नक्कीच गोष्टी साध्य करता येतात. मात्र एखादी गोष्ट कदाचित त्याहूनही कठीण असल्यास आपण त्यापुढे हात टेकतो. खरंतर तीच वेळ असते कंबर कसून उभं राहायची.

 

women empowerment 3 inmarathi

 

खरा मार्ग तर तिकडे सुरु होतो. आणि म्ह्णूनच कठीण परिस्थिती आणि एकूणच आयुष्यात आपल्याकडे जिद्द असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळेच अशक्य ते शक्य करून दाखवता येतं.

अपंगत्व असूनही एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. म्हणूच आयुष्यात कधीच फोकस हळू ना देता जिद्दीने सगळ्याला सामोरं जा.

ह्या सहा गोष्टी करणं तुम्ही टाळलंत तर तुमच्या आणि यशाच्या, श्रीमंतीच्या मध्ये कोणी ठरवूही फिरकू शकणार नाही. मंजिल आपकी ही है , बस उसे हासील करना है ! काय मग करणार ना आजपासून नवी सुरुवात?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?