' सध्या ट्रेंडिंग असणा-या ऑरगॅनिक फुडचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

सध्या ट्रेंडिंग असणा-या ऑरगॅनिक फुडचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

सध्याच्या काळात बरेच लोक सेंद्रिय खाण्याची निवड करतात.

सर्वसाधारण याचं कारण म्हणजे सेंद्रिय पिकांची अस्सल चव! त्या समोर असेंद्रिय उत्पादनं बेचव वाटतात.

 

organic inmarathi
proffesion solutions

 

त्याचप्रमाणे असा समज आहे की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न हे तुलनात्मक दृष्टया सुरक्षित आणि पोषकतत्त्वांनी भरपूर असतात.तसचं ही उत्पादने पर्यावरण आणि प्राण्यांसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात.

मात्र ,सेंद्रिय अन्नाच्या वापराविषयी लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती सुद्धा पसरल्या आहेत.

सेंद्रिय भाज्या आणि उत्पादनांच्या दर वर्षी वाढणाऱ्या मागणीमागे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे, बेसुमार रासायनिक खतांच्या वापराबद्दल लोकांमध्ये आलेली जागरूकता!

 

organic food inmarathi

 

पण तरी सेंद्रिय अन्नपदार्थ इतर पदार्थांपेक्षा चांगलीच असतात ही काही प्रमाणात चुकीची समजूत सुद्धा आहे.

सेंद्रिय बाजारपेठ वाढण्या मागे अजून एक कारण म्हणजे असेंद्रिय पदार्थांचं प्रत्यक्ष उत्पादन आणि बाजारपेठ यांच्यातील असलेलं भरमसाठ मोठं अंतर!

सेंद्रिय अन्न म्हणजे नक्की काय?

सेंद्रिय अन्न म्हणजे अशी पिकं जी कुठल्याही रासायनिक जंतुनाशकं,खते किंवा कृत्रिम पदार्थांच्या वापराविना पिकवण्यात आली आहेत.

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्राण्यांनासुद्धा प्रतिजैविकं आणि कृत्रिम वापराविना खाणं उपलब्ध करून देणं शक्य झालं आहे.

 

mall inmarathi
tripadvaisor

 

आजकाल अगदी मोठ्या मॉल मध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थ आणि कडधान्ये विक्रीकरिता ठेवलेले पाहू शकता.

पण, खरोखर सेंद्रिय अन्न आपल्याकरता संपूर्णपणे हितकारक आहे का? चला तर मग सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या अन्नपदार्थांच्या गुण-दोषांवर एक नजर टाकु.

सेंद्रिय पदार्थाचे फायदे

१)पर्यावरण पूरक

उपलब्ध माहितीनुसार सेंद्रिय शेती पर्यावरणास पूरक आहे. याचं कारण म्हणजे झाडांचे असंख्य प्रकार आणि प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रजाती.

Organic Trade Association नुसार सेंद्रिय शेती मुळे मृदेची धूप कमी होण्यास मदत होते कारण,सेंद्रिय शेती च्या माध्यमातून पिकांची वाढ होतानाच उत्तम प्रतीची माती राखली जाते.

 

farming inmarathi
paleo leap

 

कृत्रिम खते आणि जंतुनाशक टाळल्याने जमिनीखालील पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

२) हायड्रेजनोटेड फॅट पासून मुक्त अन्न

असेंद्रिय अन्नपदार्थांशी तुलना केली असता सेंद्रिय खाण्यात हायड्रेजनोटेड फॅट आढळून आलेले नाही.

हायड्रेजनोटेड फॅटमुळे हृदयाच्या विकारांचा धोका वाढू शकतो. सेंद्रिय अन्न सेवन केल्याने या धोक्यापासून मुक्तता मिळते.

३) गुरांसाठी उपयुक्त

गुरांच्या पालनपोषण संबंधी जे चिंतीत आहेत त्यांना सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जनावरांना उत्तम पशुखाद्य उपलब्ध करून घ्यावं.

 

progressive dairy

 

संपूर्ण सेंद्रिय माध्यमातून उगवलेल्या खाद्यामुळे गुरांना आवश्यक पोषक घटक मिळतील आणि त्यांची वाढ सुद्धा उत्तमप्रकारे होईल.

४) जंतूंनाशकांचा किमान वापर

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेल्या अन्नधान्यात जंतुनाशकं अत्यंत कमी प्रमाणात असतात कारण, सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतांना रसायन आणि कृत्रिम खतांचा कमीतकमी वापर केल्या जातो.

 

fresh food inmarathi
culture trip

 

या पद्धतीने केलेल्या शेतमालात काही प्रमाणात जंतूंनाशकांचा अंश असू शकतो मात्र काही अभ्यासानुसार, जवळपास ७०% सेंद्रिय अन्न पदार्थात जंतूंनाशकांचा अंश आढळत नाही!

५) पोषकतत्व भरपूर असलेले अन्नपदार्थ

संशोधक म्हणतात की, सेंद्रिय पदार्थांमध्ये असेंद्रिय घटकांपेक्षा अधिक पोषणमूल्य असतात.

 

eating-healthy-inmarathi01
foodmatters.com

 

सेंद्रिय शेती करताना रासायनिक द्रव्य आणि कीटकनाशकांचा वापर सहसा टाळला जातो त्यामुळे वनस्पतींत नैसर्गिकरित्या कीड आणि जंतू पासून बचाव करण्याची प्रतिकारशक्ती वाढीस लागते.

६) अस्सल चव

तुम्ही कधी देशी टोमॅटो खाल्लाय?

अर्धा टोमॅटो खाताच तुमचे दात आंबतील इतका आंबटपणा त्यात असतो.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गाजर, वांगी, पालेभाज्यांना त्यांचा नैसर्गिक पोत,चव आणि गंध कायम राहते.

 

food inmarathi
BT.com

 

या उलट भरमसाठ उत्पादन काढण्यासाठी गुणसूत्रात बदल करून घेतलेले उत्पादन बराच काळ टिकवण्यासाठी सुद्धा रसायनांचा वापर करावा लागतो.

या सगळ्याचा परिणाम वनस्पती-पदार्थांच्या चवीवर मोठ्या प्रमाणात होतो. सेंद्रिय अन्नघटकात मात्र त्याची अस्सल चव अबाधित राखली जाते.

७)पूर्णतः सेंद्रिय अन्न – गर्भासाठी उपयुक्त

संशोधनात अस सिद्ध झालंय की, कीटकनाशक युक्त अन्न खाल्याने गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसून येतो कारण, गर्भवती च्या अन्नातून हे घटक गर्भवेष्टनात सुद्धा प्रवेश करतात.

 

pregnanat Indian 3 Inmarathi
Pintrest

 

या विषारी पदार्थाचा बाळाच्या आरोग्यावर जन्मापूर्वीच विपरीत परिणाम करू शकतो. पुर्णतः सेंद्रिय अन्न खाऊन आपण येणारी नवीन पिढी सुदृढ बनवू शकू.

तर हे होते सेंद्रिय शेतीचे काही प्रमुख फायदे. आता नजर टाकूया सेंद्रिय शेती उत्पादनांच्या तोट्यांवर

१) चटकन नाशवंत

असेंद्रिय अन्नपदार्थांच्या तुलनेत सेंद्रिय अन्न लवकर खराब होतं.

 

organic food
medium

 

याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न टिकवण्यासाठी ह्यात कुठल्याही रासायनिक घटकांचा(प्रिजरव्हॅटिव )वापर केलेला नसतो तसेच कुठल्याही कृत्रिम प्रकशाविना ते पदार्थ पिकवले जात असतात.

२) महाग पदार्थ

सेंद्रिय पद्धतीद्वारा आलेले पदार्थ हे प्रचंड महाग असतात. तुलनात्मक दृष्ट्या असेंद्रिय पदार्थ खूपच स्वस्त भासतात.

 

shopping inmarathi
us news money

 

प्रमुख कारण म्हणजे सेंद्रिय पद्धतीने लागवड करताना सर्वच आघाड्यांवर खर्चाच प्रमाण प्रचंड असतं. रासायनिक खते न वापरल्याने चांगला शेतमाल बराच कमी हातात पडतो.

अजूनही असेंद्रिय पद्धतीने घेतलेली पिकं किंवा अन्नपदार्थ लोकप्रिय असण्याचं हे एक मुख्य कारण होय.

३) किमान रासायनिक वापर

असं म्हटलं जातं की १००% सेंद्रिय असं काही नसतं. कुठल्या तरी माध्यमातून रासायनिक पदार्थांचा अल्प क होईना वापर होतो आणि त्याचे अंश सेंद्रिय पदार्थांमध्ये येतात.

 

pestricide inmarathi

 

बऱ्याच अभ्यासकांच मत आहे की, लागवडीपैकी किमान उत्पादन तरी येण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना रसायनांचा वापर होतोच.

त्यामुळे आपण सेंद्रिय च्या नावावर खरंच सेंद्रिय अन्नपदार्थ खातोय का याची निश्चिती करणं कठीण आहे.

४) अधिकच्या पोषणमूल्यां संबंधी असलेला वाद

बऱ्याच अभ्यासकांच असं म्हणणं आहे की, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नपदार्थात जास्तीची पोषकमुल्य असतात ह्या संबंधी काही ठोस पुरावा देता येत नाही.

केवळ त्यांची प्रतिकारशक्ती अधिक म्हणजे त्यात सर्वच पोषणमूल्य असतील असं नाही. त्यामुळे ह्या बाबतीत असं म्हणावं लागेल की असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थ पोषकतत्वांच्या बाबतीत एकाच पातळीवर येतात.

५)आरोग्यासाठी खरच फायदेशीर?

सहसा असं म्हटलं जातं की, सेंद्रिय पद्धतीने उगवलेले अन्नपदार्थ शरीरासाठी अधिक उपयोगी असतात.

 

organic veg inmarathi
medlife

 

मात्र ह्या तथाकथित फायद्याविषयी कुठलेही संशोधन अथवा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ हे इतरांपेक्षा चांगलेच असतील असंही ठामपणे म्हणता येणार नाही.

६) जंतुनाशक शरीराला अपायकारकच

सेंद्रिय अन्नपदार्थांमध्ये कीटकनाशकांचा अंश असण्याची शक्यता असते.  जरी हे प्रमाण असेंद्रिय पदार्थांच्या तुलनेने कमी असलं तरी सुद्धा ते शरीराला अपायकारक ठरतंच!

७) पिण्याच्या पाण्यातून कीटकनाशकांचा वाढता वापर

सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून जरी अन्नपदार्थात कीटकनाशकांचा प्रसार रोखला किंवा कमी केला तरी पिण्याच्या पाण्यात त्याच प्रमाण आहेच.

 

pain inmarathi

 

कीटकनाशक युक्त पाणी सेवन केल्यास काही आठवड्यात ते अपायकारक ठरू शकते.

८) जिवाणूंचा मोठ्याप्रमाणात वावर

सेंद्रिय अन्नपदार्थात जिवाणू चटकन तयार होतात. बऱ्याचदा सेंद्रिय अन्नघटकांच सेवन हे आपल्या पचनसंस्थेत ई-कोली सारख्या जिवाणूंचा प्रवेश होण्यास कारणीभूत ठरतं.

लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला यांच्या पचन प्रक्रियेसाठी हे जीवाणू घातक ठरतात.

तसेच सेंद्रिय अन्नघटक चटकन नाशवंत होतात. काहीवेळा तर बाजारपेठेत आणेपर्यंत ते खराब सुद्धा होऊन जातात.

सेंद्रिय अथवा असेंद्रिय अशी निवड करण्यापूर्वी आपला आहार हा समतोल राखण्यावर भर देणे जरुरी आहे.

त्या त्या ऋतु मध्ये उपलब्ध असणारे फळे आणि भाज्या तसेच स्टार्च युक्त कर्बोदके आहारात जास्त प्रमाणात समावेश केला पाहिजे.

 

food eating inmarathi
medical news today

 

तसेच दिवसातून दोनदा तरी प्रथिनयुक्त पदार्थ आणि कमी मेद असलेले दुधाचे पदार्थ घेणे उपयुक्त ठरते. या पद्धतीने कमी शर्करा आणि कमी मेद असलेला योग्य आहार घेऊ शकता.

एकदा तुमचा आहार योग्य झाला की मग तुम्ही त्याला सेंद्रिय अन्नपदार्थांची जोड द्यायला काहीच हरकत नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?