' विल स्मिथची बायको ते समीरा रेड्डी, नेमका काय आहे Alopecia आजार? – InMarathi

विल स्मिथची बायको ते समीरा रेड्डी, नेमका काय आहे Alopecia आजार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथच्या बायकोच्या आजारावर विनोद केला गेल्यामुळे त्याने त्या कॉमेडीयंच्या कानाखाली दिली त्यामुळे सोहळ्याला गालबोट लागले. काहींनी विल स्मिथ यांच्या वर्तनाला समर्थन दिलं तर काहींनी यावर टीका केली. हा गहजब ज्यावरून माजला तो आजार नेमका आहे तरी काय ते या लेखात जाणून घेऊया.

 

will smith im

 

सुंदर दिसायला सगळ्याच महिलांना आवडतं. हो ना? पूर्वीच्या स्त्रीया सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय करायच्या. आत्ताच्या स्त्रीया घरगुती उपाय कमी करतात आणि ब्यूटी पार्लरच्या पर्यायाला जास्त पसंती देताना दिसतात.

चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच महिला केसांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. त्याकरिता शांपू, कंडिशनर, हेअर स्पा असे अनेकानेक उपाय आहेत. केस जितके दाट, मुलायम तितके चेहऱ्याचेही सौंदर्य आपोआप वाढते.

 

alia bhatt 1 inmarathi

 

 

पण आताशा महिलांना टक्कल पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येतंय. जो सगळ्यांच्या चेष्टेचा विषय ठरतो. पुरुषाला टक्कल पडलं तरी त्यांना किंवा इतर कोणाला जास्त फरक पडत नाही पण, महिलांना शारीरिक आणि मानसिक संघर्ष करावा लागतो.

सामान्यतः महिलांना काही झालं की, त्याकडे दुर्लक्ष करण्याचं किंवा “होईल आपोआप बरं” अशीच महिलांची प्रवृत्ती असते, पण केसगळतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आज-काल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करतायत.

पण ह्यामुळे, जीवनशैली बदलली. वेळी-अवेळी खाणे-पिणे, झोप पूर्ण न होणे-झोपेच्याही वेळा बदलणे, मानसिक-शारीरिक ताण वाढणे ह्याचा परिणाम शरीरावर होतो. तसाच, तो केसांवरही होतो.

 

indian girl hair fall inmarathi
iswarya siddha hospital

 

बऱ्याच स्त्रीयांना प्रसूतीनंतर केसगळतीला सामोरे जावे लागते. स्त्रियांमध्ये केस गळणे सामान्य आहे, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर दोन-तृतियांश स्त्रियामध्ये केस गळतात.

अर्ध्यापेक्षा कमी स्त्रियांना ६५ वर्षांपर्यंत टक्कल पडत नाही. पण ही समस्या एका ठराविक काळानंतर उद्भवते आणि काही उपायांमुळे बऱ्यापैकी ह्या समस्येला आळा घालता येतो.

काही महिलांना अनुवंशिकतेने टक्कल पडते. रजोनिवृत्तीनंतर हे अधिक सामान्य आहे, ज्यासाठी संप्रेरक जबाबदार असतात.

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वेळा, तसेच शरीराला हानीकारक पदार्थांचे सेवन करणे इत्यादी गोष्टी केसगळतीला जबाबदार असतात.

 

hair-loss-men03

 

पण, आता शाळकरी मुलींना, खूपच कमी वय असणाऱ्या मुलींना केसगळती होते. ह्याला कारणीभूत ‘अॅलोपेशिया’ हा रोग कारणीभूत असल्याचं सिद्ध झालंय.

आपण आपले केस गमावत असल्याचे आपल्यास लक्षात आल्यास आपले डॉक्टर किंवा त्वचारोगतज्ज्ञ पहा. जेणेकरून टक्कल पडण्याचे नेमके कारण आपल्याला समजू शकेल.

तर काय आहे हा अॅलोपेशिया रोग? आणि तो कोणाला होऊ शकतो?

डॉक्टरांच्या मते, अॅलोपेशिया ह्या रोगामधे पुंजक्या पुंजक्याने केस गळतात. हा रोग कुठल्याही वयातल्या स्त्रीला होऊ शकतो पण, बहुतेककरून हा आजार ३० वर्षांखालील महिलांना होण्याची शक्यता जास्त असते.

संशोधना अंती असं सिद्ध झालंय की, ५ मधील एका कुटुंबातील स्त्रीला हा आजार असतो. अचानक उद्भवलेल्या ह्या आजाराने काही दिवसातच टक्कल पडते.

मार्च २०१९ मध्ये ‘गॉन केश’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये एका १६ वर्षांच्या मुलीला अॅलोपेशिया हा रोग होतो असं दाखविण्यात आलंय.

 

alopecia inmarathi 1
amazon.com

 

ही मुलगी ह्यामध्ये एक नर्तिका असते आणि तिला हे समजल्यावर तिची प्रतिक्रिया, टक्कल पडण्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात, परिस्थितीला ती कसं तोंड देते ह्याचं चित्रण ह्या चित्रपटात आहे.

पूर्ण चित्रपटात ती ह्या विचित्र रोगाशी लढते आणि शेवटी संपूर्ण समाजाला ती स्वतःला स्वीकारण्यास भाग पाडते. अतिशय वेगळा विषय असणारा हा चित्रपट पोझिटिव्ह अॅप्रोच देण्यात यशस्वी होतो.

का होतो हा रोग?

 

hair loss inmarathi

 

आपल्या शरीरात इम्युनिटी सिस्टिम असते जी आपले रोगांपासून संरक्षण करते. ही इम्युनिटी सिस्टिम कमजोर झाली तर लगेचच आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

जर तुमच्या इम्युन सिस्टिम मधे गडबड झाली तर शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, हेल्दी सेल्स नष्ट होऊ लागतात आणि त्याचा केसांच्या मूळांवर परिणाम होतो.

आणि हा अॅलोपेशिया रोग होतो. ज्यामधे मोठ्या प्रमाणावर केसगळती होते आणि नवीन केस येत नाहीत. ह्यात टक्कल पडण्याचा वेग जास्त असतो आणि केसांची वाढणारी अवस्था मंदावते.

 

alopecia inmarathi

 

केस वाढण्यास देखील अधिक वेळ लागतो. केसांची घनता कमी होते आणि केस अधिकाधिक पातळ होतात.

सामान्य स्त्रीयांच्या केसगळतीच्या तुलनेत अॅलोपेशिया हा रोग झालेल्या स्त्रीयांचे केस दुप्पट, तिप्पट जलद गतीने गळतात. ह्यात स्त्रीयांना पूर्णपणे टक्कल होण्याची शक्यता कमी आहे.

परंतु ह्या स्त्रीयांचे केस इतके विरळ असतात की टक्कल पडल्यासारखेच दिसते!

पुरुषांमध्ये केस गळणे डोकाच्या पुढच्या भागापासून सुरू होते आणि टक्कल होईपर्यंत मागच्या बाजूला सरकते. परंतु स्त्रिया त्यांच्या भांगाच्या रेषेतून डोक्यावरुन केस गमावतात.

ह्यावर काही इलाज आहे का?

तसं पाहिलं तर अॅलोपेशिया ह्या रोगावर कोणताही इलाज नाही. म्हणजे हा रोग मूळापासून नष्ट होत नाही पण, केसांची गळती कमी करता येते.

केसांची वाढ जलद गतीने होते. इम्यून सिस्टीम ठीक होऊ शकते. काही गोळ्या, इंजेक्शन्स् आहेत ज्यामुळे इम्युन सिस्टीम ची क्षमता वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचे सेवन होऊ शकते.

 

medicines taking inmarathi 2
naturally savvy

 

आपल्या टाळूवर केस पातळ झाल्याचे आपल्याला आढळल्यास आपल्या डॉक्टर किंवा त्वचारोग तज्ज्ञांकडे जा. केस गळण्याची पद्धत पाहण्यासाठी आपला डॉक्टर आपल्या टाळूची तपासणी करेल.

महिलांमध्ये टक्कल पडण्याचे निदान करण्यासाठी सामान्यतः चाचणी घेण्याची आवश्यकता नसते.

आपल्या आहारात गाजर, बीटरूट, मेथी, मेथीचे दाणे, हिरव्या पालेभाज्या, फळे, फळांचे रस (ज्युस) इत्यादी गोष्टींचे सेवन योग्य प्रमाणात करावे.

मिनोऑक्सिडिल

मिनोऑक्सिडिल (रोगाइन) हे यू.एस. फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने केवळ स्त्रीयांमधे टक्कल पडण्यावर उपचार करण्यासाठी मंजूर केलेले औषध आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या औषधाचा वापर करावा. दररोज आपल्या टाळूला (स्काल्प) मिनोऑक्सिडिल लावा.

अशाप्रकारे महिलांमध्ये केसगळतीचे प्रमाण कमी होऊ शकते. फक्त त्यांनी आपल्या जीवशैलीत आणि खाण्या-पिण्यात थोडे बदल केले पाहिजेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?