' आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं

आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

भारतातले सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. जरी ते सार्वजनिक क्षेत्रात वावरत असले तरी त्यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नाहीत.

आज त्याच जाणून घेऊयात.

 

ratan tata inmarathi 2
the hindu

 

रतन टाटा यांचा जन्म समृद्ध घरात जरी झाला असला तरी, रतन टाटा यांचे बालपण तसं थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. कारण ते जेव्हा सात वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते.

त्यांच्या आजीनेच त्यांचं आणि त्यांच्या भावाचं संगोपन केलं.

 

ratan tata inmarathi 1
india today

रतन टाटा हे प्रशिक्षित पायलट आहेत आणि त्यांच्याकडे त्याचं लायसन देखील आहे, हे बर्‍याच जणांना माहीत नाही. टाटा ग्रुपच्या अखत्यारीत असलेले विमान उडवताना त्यांना बऱ्याच वेळेस पाहिलं जातं.

२००७ मध्ये फाल्कन F-16 हे विमान उडवणारे ते पहिले भारतीय होते.

 

ratan tata 7 inmarathi
quora

 

रतन टाटा हे एका मोठ्या भारतीय उद्योग कंपनीतील व्यक्ती आहेत, परंतु टाटा ग्रुप्स मध्येही ते लगेचच टाटा ग्रुपचे चेअरमन या पदावर पोहोचले नाहीत.

कंपनी समजून घेत हळूहळू यशाची एक एक पायरी ते चढत गेले, आणि शेवटी टाटा ग्रुपचे चेअरमन झाले.

 

ratan tata inmarathi 4

 

रतन टाटा, टाटा ग्रुपचे चेअरमन झाले त्यानंतर टाटा ग्रुपचा बिझनेस आणखीन वाढला. अगदी युरोपातही त्यांनी स्टील कंपनी काढली जिचं नाव आहे कोरस ग्रुप.

टेटली ही इंग्लंड आणि कॅनडा मध्ये चहा बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे, तर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

 

tetley tea inmarathi
the grocer

१९९९ मध्ये जेव्हा रतन टाटा आपल्या नवीन कारच्या विक्रीच्या संदर्भात फोर्ड कंपनीच्या बिल फोर्ड यांना भेटले त्यावेळेस बिल फोर्डनी त्यांचा अपमान केला ते त्यांना म्हणाले,

“तुला काहीच कळत नाही, प्रवासी कार विभाग कशाला सुरू केला?”

नंतर नऊ वर्षाच्या आत रतन टाटांनी फोर्ड कंपनीचे Ace ब्रांड विभाग जग्वार आणि लँड रोव्हर टाटा ग्रुप साठी अर्ध्या किमतीत खरेदी केले, आणि आपल्या अपमानाचा वचपा काढला.

रतन टाटा यांचा समावेश जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होत नाही, कारण त्यांचे बरेचसे शेअर्स हे टाटा ट्रस्टच्या आणि फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्याकडे आले आहेत.

 

ratan-tata-marathipizza
livemint.com

 

जर ते शेअर्स मोजले तर त्याची एकूण रक्कम ७२ अब्ज डॉलर्स इतकी येईल.

रतन टाटांचे लग्न झाले नाही, त्यांच्या आयुष्यात चार वेळा असे प्रसंग आले की आता लग्न होईल असे वाटत होतं. मात्र प्रत्येक वेळेस काही ना काही कारण येऊन लग्न होऊ शकलं नाही.

रतन टाटा नेहमी दिलेला शब्द खरा करतात. जेव्हा त्यांनी पावसात भिजणाऱ्या एका कुटुंबाला पाहिलं त्यावेळेस ते म्हणाले होते, की ह्या कुटुंबाला परवडेल अशा किमतीत मी कार आणेन.

आणि म्हटल्याप्रमाणे टाटा ग्रुपने नॅनोची निर्मिती केली. तिची किंमत केवळ एक लाख रुपये ठेवली होती.

 

nano inmarathi

 

रतन टाटांना त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणानंतर आयबीएम कंपनीने जॉब देऊ केला होता. मात्र त्यांनी तो नाकारला आणि आपल्या फॅमिली बिझनेस मध्येच लक्ष घातलं. भारतीय मोटार उद्योगाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिलं.

रतन टाटा हे प्राणीप्रेमी आहेत अनेक भटक्या कुत्र्यांसाठी टाटा सन्स बॉम्बे हाऊस याठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी घर बांधले आहे. त्यांच्या स्वतःकडे देखील काही पाळीव कुत्री आहेत.

 

ratan tata 6 inmarathi
cocktail zindagi

 

रतन टाटा यांच्या घरी पन्नास-साठ इंचाचा कोणताही टीव्ही नाही तर बत्तीस इंचाचा सोनी ब्रेव्हिया टीव्ही आहे. घरातही ते अत्यंत साधेपणाने राहतात.

रतन टाटांचा हा साधेपणा हा केवळ घरातच नसून बाहेरही सगळ्यांना कळून येतो. ते बऱ्याचदा इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास करतात.

कधी रस्त्यावरून जाताना गाडीचं टायर पंक्चर झालं तर टायर बदलायला ड्रायव्हरला मदतही करतात.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर टाटा ग्रुपचे ताज हॉटेल्स बंद होते. जरी हॉटेल्स बंद असली तरी रतन टाटांनी आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना त्या काळातल्या संपूर्ण पगार दिला आहे.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सगळ्या ताज कर्मचाऱ्यांची हॉस्पिटलची बिलं भरली आहेत.

 

26-11 attack mumbai
the wire

 

त्यानंतर काही दिवसांनी टाटा ग्रुपचे सगळे हॉटेल चालू करण्यासाठी टाटांनी काही टेंडर काढले. ज्याला जगभरातून लोकांनी निविदा भरल्या, पाकिस्तानचे दोन मोठे उद्योगपतीही होते.

हे टेंडर्स आपल्याला मिळावे म्हणून ते टाटांची अपॉइंटमेंट न घेता मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये त्यांना भेटायला आले. तिकडे रिसेप्शन वरच त्यांना थांबवून ठेवण्यात आलं.

त्यानंतर काही तासानंतर त्यांना निरोप देण्यात आला की रतन टाटा सध्या बिझी आहेत आणि अपॉइंटमेंट शिवाय कुणालाही भेटत नाहीत. मग ते पाकिस्तानी उद्योगपती निराश होऊन दिल्लीला गेले आणि तिथे मंत्र्यांना भेटले.

त्यावेळेसचे काँग्रेसचे मंत्री आनंद शर्मा यांनी लगेच टाटांना फोन केला आणि त्या पाकिस्तानी उद्योगपतींची निविदा स्वीकारायला सांगितले. रतन टाटांनी त्यांना फोनवरच सुनावले,

“तुम्ही निर्लज्ज असाल पण मी नाही” आणि रतन टाटांनी फोन ठेवून दिला.

रतन टाटांनी आपलं देशप्रेम नेहमी कृतीतूनच व्यक्त केलं आहे. त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी गव्हर्मेंटने टाटा ग्रुप कडे टाटा सुमोची ऑर्डर दिली. काही गाड्या मागवल्या.

परंतु रतन टाटांनी ती ऑर्डरही स्वीकारली नाही आणि कोणतीही गाडी पाकिस्तानला पाठवली नाही. टाटा ग्रुप ने अनेक सामाजिक कामासाठी कायमच आपला निधी दिला आहे.

रतन टाटा आज अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या सल्लागार समितीवर आहेत. त्यामध्ये जेपी मॉर्गन, अमेरिकन इंटरनॅशनल, मॉनेटरी अथोरिटी ऑफ सिंगापूर, आलोका कॉर्पोरेशन इ. समावेश आहे.

 

ratan tata inmarathi 5
rvcj media

 

रतन टाटांना पद्मभूषण, पद्मविभूषण देऊन भारत सरकारने त्यांचां गौरव केला आहे. त्यांना जगातल्या अनेक युनिव्हर्सिटीच्या मानद डॉक्टरेट मिळाल्या आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

One thought on “आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं

  • March 11, 2020 at 10:11 am
    Permalink

    It is a very good article about Ratan Tata

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?