''दिल दोस्ती दोबारा' : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल

‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

झी मराठी नेहमीच मराठी रसिकांच्या मनातील आवड ओळखून मालिका सादर करत असते. लहानांपासून-थोरांपर्यंत प्रत्येक गटातील रसिक आनंद घेऊ शकतो अश्या मालिकांची निर्मिती करण्यात झी मराठीचा हातखंडा आहे. गेल्यावर्षी अशीच एक तरुण मालिका झी मराठीने प्रेक्षकांसमोर आणली होती. ती मालिका म्हणजे- ‘दिल दोस्ती दुनियादारी’! खास तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या या मालिकेने तरुणांची मने तर जिंकलीच सोबतच इतर गटातील प्रेक्षकांना देखील आपलेसे केले होते.

dil-dosti-dobara-marathipizza00

स्रोत

अल्पावधीतच समस्त मराठी रसिकांवर या मालिकेने मोहिनी घातली. रात्री १०:३० वाजता न चुकता प्रत्येक चाहत्याच्या घरात या मालिकेचे सुरु घुमू लागले होते.

dil-dosti-dobara-marathipizza03

स्रोत

आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना ही मालिकेतील सर्वच पात्रे प्रत्येकाच्या ओळखीची झाली होती, जणू कुटुंबातील सदस्यचं झाली होती म्हणा ना! करियरची स्वप्ने मनात घेऊन घरापासून दूर येत स्वतंत्रपणे राहणाऱ्या या मित्रांची कहाणी प्रत्येक प्रेक्षकाला भावली.

dil-dosti-dobara-marathipizza02

स्रोत

त्यांचे खोडकर किस्से, लहान सहान प्रसंगातून निर्माण होणारे हास्याचे फवारे आणि कधी कधी अंतर्मुख करायला लावणारे विचार या सर्वांची एक अविस्मरणीय मेजवानी या मालिकेने दिली होती. ही मालिका अशीच अविरत सुरु राहावी असे चाहत्यांना वाटत असताना लिमिटेड एपिसोडसमुळे अचानक मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला, पण निरोप घेताना देखील आम्ही पुन्हा परत येऊ अशी ग्वाही देखील या मालिकेने दिली होती.

dil-dosti-dobara-marathipizza04

स्रोत

तेव्हापासून या मालिकेचा सिक्वेल कधी येणार याची उत्सुकता दिली दोस्ती दुनियादारी मालिकेच्या समस्त चाहत्यावर्गाला लागून होती. पण आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे कारण नुकताच या मालिकेच्या सिक्वेलचा प्रोमो झी मराठीने प्रदर्शित केला आहे. या नव्या सिक्वेलचे नाव असणारं आहे- ‘दिल दोस्ती दोबारा’!

dil-dosti-dobara-marathipizza05

स्रोत

१८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार असे आठवड्याच्या सहा दिवस पूर्वीच्याच वेळेला म्हणजे रात्रो १०:३० वाजता मोस्ट अवेटेड अशी ही मालिका सुरु होणार आहे.

dil-dosti-dobara-marathipizza06

स्रोत

या नव्या प्रोमोमध्ये आशु आणि सुजयची जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. तसेच प्रोमोवरून ही मालिका नव्या रुपात आणि नव्या ढंगात काहीतरी सरप्राईज पॅकेज घेऊन आपल्यासमोर येणार हे मात्र नक्की! चला तर मग तयार राहा १८ फेब्रुवारीला रात्री १०:३० वाजता! तोवर प्रोमोवर समाधान मानून घेऊया!

या नव्या सिक्वेलचा भन्नाट प्रोमो तुम्ही येथे पाहू शकता

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?