' पडीक जमिनीवर फळांचं जंगल उभारणारं ‘हे’ कुटुंब फक्त फळं खाऊन जगतंय… – InMarathi

पडीक जमिनीवर फळांचं जंगल उभारणारं ‘हे’ कुटुंब फक्त फळं खाऊन जगतंय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फळं कोणाला आवडत नाहीत?  प्रत्येकालाच कुठलं ना कुठलं तरी फळ आवडत असतं पण जर कोणी सांगितलं की, फक्त फळं खाऊन राहायचं आहे तर शक्य होईल का?

आपल्याला एक दोन-चार दिवसातच त्या फळं खाण्याचा वीट येईल. पण ही किमया साधली आहे केरळमधील  तिरुवनंतपुरम येथील एल्डो पचिलाकद्दन यांनी.

मूळचे आर्किटेक्ट असलेले एल्डो हे आता फक्त फळं खाऊन राहतात, म्हणजे त्यांच्या जेवणातील ९० टक्के भाग हा फळांचा असतो. आणि त्यांचं हेच डायट त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी फॉलो करतात.

 

eldo pachilakkadan inmarathi

 

एल्डो यांच्या म्हणण्यानुसार, उकडून खाल्लेलं अन्न फारसे उपयोगाचं नसतं. त्यातील जीवनसत्त्व संपतं. त्यापेक्षा फळं खाणं केव्हाही चांगले, त्यांचं फळांवरचं हे प्रेमच त्यांना एका उदात्त ध्येयाकडे घेऊन गेलं.

 

fruits inmarathi 1

 

पण एल्डो तिकडे वळले कसे?

भारतात गाई-म्हशींची मुभा असल्यामुळे आपल्याला वाटत होतं की, परदेशातल्या मुलांना दूध कसं येतं हे माहीत नसतं, पण आता भारतातील पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरांनी देखील इथल्या मुलांना दूध कसं येतं, असं विचारलं तर ते पिशवीतून येतं असे उत्तर देतात.

तंत्रज्ञान, शिक्षण- आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या साधनांची इतकी रेलचेल झाली की, आपल्याला या गोष्टींनी निसर्गापासून दूर नेलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पाचिलक्कदन यांना हीच चिंतेची बाब वाटली. आपण निसर्गापासून दूर जावून जमिनीशी असलेली आपली नाळ तोडतोय या भावनेतून त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली.

 

eldo pachlikaddan inmarathi 3

 

२००८ मध्ये त्यांच्या एका मित्राने एनजीओ चालू केला होता. त्याअंतर्गत दरवर्षी एका जंगलाला पक्षीनिरीक्षणासाठी आणि फुलपाखरांच्या निरीक्षणासाठी भेट द्यायची असं ठरलेलं होतं.

एल्डोने त्यात सहभाग घेतला आणि २००९ मध्ये त्यांनी त्यांचा एका कलाकार मित्र विवेक विलासिनी यांच्याबरोबर मुन्नार जवळील इडुक्कू येथे स्वर्गम मेडू या टेकडीवर दहा एकर पडीक आणि नापिक जमीन विकत घेतली.

eldo pachilakkadan inmarathi 1

 

आणि त्या बंजर जमिनीला फुलवायचं काम हाती घेतलं. ते स्वतः तिकडे राहायला गेले आणि निरनिराळी फळं, फुलं यांची लावणी तिकडे केली. आणि ते उजाड माळरान रंगीबेरंगी फळाफुलांनी बहरून टाकलं.

एल्डो यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही निसर्गाचं निरीक्षण करता त्यावेळेस तुम्हाला त्यात एक समान पॅटर्न दिसून येतो. ते म्हणतात, मी अन्न किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेण्यास सुरुवात केली.

प्रत्येक प्राणी काय खातो आणि त्याचा अन्नसाखळी वर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करू लागलो. याबरोबर याचा परिणाम आसपासच्या इतर प्राणिमात्रांवर कसा होतो हे पाहू लागलो.

त्यांच्य मते, अन्न साखळीतील प्रत्येक प्राणी तो जे अन्न खातो त्याने अन्नसाखळी कायम ठेवायला मदत होते आणि मग हेच निसर्गाचं चक्र सतत चालूच राहतं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, निसर्गाने आपल्या सगळ्यांना अन्न देऊन आरोग्यदायी बनवले आहे. निसर्गातही विष आहे, आजार आहेत पण औषधसुद्धा आहे.

आपण त्याच्या विरोधात जातो म्हणून आपल्याला अनारोग्याचा सामना करावा लागतो. निसर्गातील गोष्टी किती खऱ्या आहेत आणि तो किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी एल्डो इडुक्कु येथे स्वर्ग मेडू येथे निसर्गाच्या सानिध्यात आपल्या कुटुंबासहित राहायला गेले.

eldo pachilakkdan inmarathi 2

 

आणि फलहारी झाले.. आणि हळूहळू त्यांच्या शरीरातले चांगले बदल त्यांना जाणवायला लागले. गेली दहा वर्ष त्यांचं हेच डायट आहे. त्यांचा लठ्ठपणा हा कोणत्याही औषधाविना कमी झाला आहे.

पूर्वी त्यांचे वजन ९० किलो होतं ते आता ६३ किलो झालं आहे. त्यांचा डायबिटीज कमी झाला आहे.

स्वर्गम मेडू हे आता फळांनी बहरलेलं जंगल झालं आहे. आता तिथे पानं-फुलं झुडूप आणि फळांचे रेलचेल आहे. त्यांना जर विचारलं की, इथे कोणत्या प्रकारची झाडे आहेत? तर ते हसतात आणि म्हणतात,

“कोणत्या प्रकारची नाहीत हे विचारा. मी जे खातो ते सर्व याठिकाणी आहे. मी जी फळं खातो ते सगळ इथं आहे. अगदी आंबा, सफरचंद, ब्लॅकबेरीज, टोमॅटो आदी.

स्वर्गम् मेडू हे फळांनी बहरलेलं जंगल असून हे माझ्यासाठी एक पुस्तकंच आहे. ज्यात मी निसर्गाला वाचायला शिकलो हे मी शिकलो आहे. निसर्गात बऱ्याच गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात, आणि आता मीही याच पद्धतीचा अवलंब करत आहे.”

एल्डो आणि त्याची टीमने आता एर्नाकुलम आणि कोट्टायम येथील घराजवळ देखील अशी स्वावलंबी शेती करायला सुरुवात केली आहे. स्वावलंबन पर्यावरणात तुमच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकी फळे आणि भाजीपाला तयार होतो.

 

eldo pachlikaddan inmarathi 2

 

आणि त्यासाठी तुम्हाला दररोज येऊन दिवसातले काही तास शेतीत काम करावे लागते असही नाही. ते याला युट्युपिया असे म्हणतात.  ही खेड्यातले संकल्पना असून एकदम परफेक्ट आहे असंही मानतात.

एल्डोची लाईफस्टाईल आणि त्याचं डायट हे त्यांची त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे. परंतु दहा एकर नापीक, पडीक जमीन घेऊन तिच्यावर नंदनवन वसवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे.

आणि त्यातही महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचा विचार करून त्याची अंमबजावणी करणं अजूनच कठीण. पण एल्डोनी हे सगळं केलं म्हणूनच त्यांना या कामाबद्दल दाद दिली पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?