' दुसऱ्या महायुद्धात एका महत्त्वाच्या कारणासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे वापरले गेले होते!

दुसऱ्या महायुद्धात एका महत्त्वाच्या कारणासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे वापरले गेले होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

आजकाल आपण कोठेही गेलो तरीही सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी लावलेले असतातच. सीसीटीव्ही पासून हल्ली कोणतीच गोष्ट लपवता येत नाही.

आपल्यापैकी अनेकांचा असा समज असतो की, हे सीसीटीव्ही आठदहा वर्षांपासून वापरले जात आहेत म्हणजे हा शोध फार जुना नसणार पण तसं नाहीये.

आत्तासारखे अद्ययावत नसले तरी हे खूप पूर्वीपासून वापरले  जाणारे कॅमेरे आहेत. मात्र तेव्हा त्यांचा वापर अगदी मर्यादित क्षेत्रांमध्ये केला जात असे.

 

cctv inmarathi
security alarm companys

 

१९४२ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ. तेव्हा तंत्रज्ञान वेगाने विकसित होऊ लागलं होतं. ज्ञात असलेला पहिला सीसीटीव्ही कॅमेरा जर्मनीमधील सीमेंस ए.जी. याने विकसित केला होता.

हे कॅमेरे युद्धात रॉकेटच्या प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यासाठी बनवले होते. यासाठी ब्रेक थ्रू सिस्टम इंस्टॉल आणि डिझाइन केलेल्या वॉल्टर ब्रूचला आपण धन्यवाद द्यायला हवेत.

 

cctv inmarathi 1

 

१९४२ मध्ये दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने शस्त्रास्त्रांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला. सुरुवातीला लोकांऐवजी शस्त्रांबद्दल माहिती मिळवण्याच्या उद्देशाने वॉल्टर ब्रश नावाच्या व्यक्तीने सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला.

प्रत्यक्षात सीसीटीव्हीच्या पहिल्या दस्तऐवजांनुसार जर्मन सैन्य एका बंकरच्या आतून रॉकेट प्रक्षेपणांचे निरीक्षण करू शकत होते मात्र त्यांचे रेकॉर्डिंग होत नसे.

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग अणुबॉम्बच्या परिणामांच्या चाचण्या घेण्यासाठी केला. इजा होणार नाही इतक्या लांबून याचे निरीक्षण करणे सीसीटीव्ही कमेऱ्यांमुळे शक्य झाले.

 

nuclear weapon test inmarathi
wikipedia

 

१९४९ मधे अमेरिकेच्या एका कंपनीने प्रथम व्यावसायिक सीसीटीव्ही दूरदर्शन प्रणाली सुरू केली. यात वापरल्या गेलेल्या तंत्रज्ञानाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकत नव्हते.

ते फक्त लाईव्ह निरीक्षण प्रणाली म्हणून वापरले जात होते.

१९४९ पर्यंत, वेरिकॉन नावाच्या अमेरिकेच्या कंत्राटदाराने व्यावसायिक जागेत या तंत्रज्ञानाची विक्री करण्यास सुरुवात केली.

१९५९…म्हणजे दहा वर्षांनंतर सार्वजनिक सुरक्षा आणि गृह सुरक्षा यासाठी याचा वापर वेगाने होऊ लागला होता. यानंतर लंडन ट्रान्सपोर्टने लोकल सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली.

 

london cctv inmarathi
cctv installers

 

पुढच्या काही वर्षांत लिव्हरपूलने त्याच कल्पनेवर प्रयोग करण्यास सुरुवात केली.

जसा सुरक्षा कॅमेरा सार्वजनिक सुरक्षेचा मुख्य आधार बनला तसाच तो घराच्या सुरक्षेसाठीही एक आदर्श बनू  लागला. मेरी व्हॅन ब्रिटन ब्राउन यांनी गृहसुरक्षा यंत्रणेची सुरूवात केली.

१९६८ मध्ये सुप्रसिद्ध आधुनिक व्हीसीआर सीसीटीव्हीच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला. न्यूयॉर्कमधील ओलीन हे मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे जगातील पहिले शहर होते.

 

cctv new york inmarathi
blometric update

 

१९५१ मध्ये व्हिडीओ कॅसेट टेपचा शोध लागला असला तरी १९६९ पर्यंत व्यावसायिक उत्पादन बाजारात पोहोचू शकले नाही. यामुळे इमारतींसाठी सुरक्षायंत्रणा उभारता येऊ लागली.

मात्र कॅसेट टेप्स ही सर्वात प्रगत व्हिडिओ फीड रेकॉर्डिंग पद्धत विकसित झाली नव्हती.

७० च्या दशकात, व्हीसीआरने व्हिडिओ बनवून पाळत ठेवणे, फुटेज रेकॉर्ड करणे आणि पहाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून व्हिडिओ कॅसेटची जागा घेतली.

न्यूयॉर्क शहरात या गुन्ह्यांची नोंद नोंदवण्यासाठी आणि रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची योजना आखली गेली.

७० च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी शहरभरातील समस्याग्रस्त ठिकाणी सुरक्षा कॅमेरे लावले.

यामुळे व्हिडिओ फुटेजद्वारे ब्राउझ करून आवश्यक असलेल्या क्लिप्स जलद शोधता येऊ लागल्या पण डिजिटल सुधारणा तिथेच संपल्या नाहीत.

१९७३ मध्ये न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे लावले गेले.

 

cctv new york inmarathi 1
world cams

 

१९८० मधे गुन्ह्यांच्या संख्येत फार घट झाली नाही पण यू.एस मध्ये व्हिडिओचा उपयोग पाळत ठेवण्यासाठी होऊ लागला.

१९७० च्या दशकात झालेल्या बर्‍याच अयशस्वी चाचण्यांनंतर १९८५ मध्ये यूकेने मोठी झेप घेतली आणि बॉर्नमाउथ या सुंदर समुद्र किनाऱ्यावरील शहरात पहिली मैदानी सीसीटीव्ही सिस्टम विकसित केली.

१९८७ मधे किंग्ज लिन, नॉरफोक येथे प्रथम स्थानिक सरकारी पाळत ठेवणारी यंत्रणा बसवण्यात आली. गुन्हे रोखण्यात कॅमेरे यशस्वी होऊ लागले. यामुळे सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात प्रचंड वाढ झाली.

९० च्या दशकाच्या सुरूवातीस उत्पादकांनी डिजिटल मल्टिप्लेक्सिंग नावाचे तंत्र वापरण्यास सुरवात केली. या क्रांतिकारक प्रणालीने बर्‍याच व्हिडिओ फीड्स एकत्रित केल्या.

सामान्यत: त्याच भागात किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये आणि एकाच मॉनिटर किंवा टीव्हीवर फीड्स ठेवल्या.

 

cctv new york inmarathi 3

 

जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी दरोडे, प्राणघातक हल्ला, कार क्रॅश याचा शोध व्हिडिओ पाळत ठेवणारे कॅमेरे वापरून घ्यायला सुरुवात केली तेव्हा तो एक महत्त्वाचा स्त्रोत बनला.

डीव्हीआर एक सोयीस्कर, सोपा रेकॉर्डिंग सोल्यूशन उपलब्ध करून देतात. डीव्हीआर रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाने बर्‍याच पायर्‍या ओलांडून रेकॉर्डिंग प्रक्रिया आणखी सोयीस्कर केली.

बर्‍याच व्हिडिओ फीड्सचे संकलन करण्यासाठी मल्टीप्लेक्सर युनिट वापरण्याऐवजी डीव्हीआरने हे स्वयंचलितपणे केले. भरपूर रेकॉर्डिंग स्पेसने सतत टेप बदलण्याचे त्रास दूर झाले.

९० च्या दशकापासून आणि आधुनिक काळादरम्यान व्हिडिओ कॅमेरे संपूर्ण देशात पसरले. कौटुंबिक मालकीच्या स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, ऑफिसेस आणि अगदी ग्रामीण भागातही सीसीटीव्ही तंत्रज्ञान लोकांना दूरवर लक्ष ठेवण्यास मदत करत आहे.

 

cctv inmarathi 2
urbanclap

 

आणि आता face recognition कॅमेरे ही प्रक्रिया आणखी सुलभ करीत आहेत.

१९९८ मधे न्यूयॉर्क आणि खाजगीमध्ये आता ३००० हून अधिक सीसीटीव्ही वापरात होते आणि खासगी व्यवसाय आणि सरकारी संस्था तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत होते.

२००० च्या दशकात facial detection तंत्रज्ञान विकसित झाले आणि द्याची अंमलबजावणी करण्यासाठी फॉरेन्सिक डेटाबेस उपलब्ध झाला.

२००१ मधे न्यूयॉर्कमधील ९/११ च्या हल्ल्यानंतर, सीसीटीव्हीला दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि जगभरात कॅमेऱ्यांच्या वापराचे प्रमुख साधन म्हणून पाहिले गेले.

 

cctv new york 9-11 inmarathi 3

 

आत्ता हे वाचत असताना जर तुम्ही तुमच्या घरात बसला नसाल तर तुम्ही एखाद्या सीसीटीव्हीच्या दृष्टिपथात असण्याची दाट शक्यता आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?