' मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं? – InMarathi

मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे. पूर्वी दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ किंवा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अश्या उत्कृष्ट मालिका बनायच्या.

पण एकता कपूरच्या कृपेमुळे आज हिंदी आणि मराठी टीव्ही सिरीयल्समध्ये फार तोच – तोचपणा आलेला जाणवतो आहे.

ह्यामध्ये मराठी सिरियल्स सुद्धा मागे नाहीत! नुकतच गिरीश ओक ह्यांच्या अगंबाई सासूबाई ह्या सिरियल वर झालेली टीका आणि त्यावर गिरीश ओक ह्यांनी दिलेलं उत्तर आजही सोशल मीडियावर तुम्हाला सापडेल!

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या निमित्ताने ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना चांगलेच दिवस आले आहेत. लोकं आजकाल सर्रास नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्म वर इतर भाषांमधल्या वेब सिरिज बघत आहेत, आणि त्यांना त्या आवडतायत देखील!

ott platforms inmarathi
socialsamosa.com

 

ह्या प्लॅटफॉर्म आपल्या भारतीय सिरिज सुद्धा येऊ घातल्या आहेत, पण इंग्लिश स्पॅनिश जर्मन ह्या इतर भाषेतल्या काही वेब सिरिजचा प्रेक्षकवर्ग हाभारतात सुद्धा खूप मोठा आहे!

तर आज आम्ही तुमच्यासाठी टॉप क्वालिटी इंग्रजी टीव्ही सिरीयल्सची (वेब सिरिजची) माहिती देणार आहोत ज्यामुळे इंटरनॅशनल कंटेंटशी तुमची ओळख होईल!

1) Friends

Friends नाही बघितली तर काहीच नाही बघितलं! (थोडी अतिशयोक्ती आहे, पण तुम्हाला फक्त ३ – ४ एपिसोड्स नंतरच आमचं म्हणणं पटू शकतं!)

tv.com

 

६ friends…३ मित्र आणि ३ मैत्रिणी…आणि त्यांची जगण्याच्या धडपडीत चाललेली गम्मत. (No – ही सिरीयल दिल दोस्ती दुनियादारी सारखी नाही. Trust us!)

सोपी भाषा, smart one-liners, उत्कृष्ट टायमिंग आणि पाश्चिमात्य जीवनाचं खरं खुरं चित्रण. इंग्लिश स्पिकींग सुधारत मनोरंजन करून घेण्याचा उत्कृष्ट फॉर्म्युला म्हणजे ही सिरियल.

सध्या नेटफ्लिक्स वर तुम्ही ही सिरिज बघू शकता!

2) Quantico

प्रियांका चोप्रा माहितीये ना? हो आपलीच. ती ह्या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. Awesome, no?!!!

FBI agent असलेल्या पिग्गी चॉप्सवर एका ९/११ सारख्याच एका भीषण हल्ल्याच्या आरोपात अडकवलं जातं, ती पळ काढते अणि आपल्याला अडकवणाऱ्याचा शोध सुरु करते.

quantico inmarathi
primevideo.com

 

तुफान गती असलेली मालिका आहे…बघायलाच हवी, ही सुद्धा सिरिज नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे!

3) Fauda

खरंतर वेब जगतात आतंकवादावर बनलेली ही आजवरची सर्वात उत्तम वेब सिरिज आहे. इस्रायचा इतिहास, तिथली सुरक्षा यंत्रणा, आतंकवादाशी २ हात करणारे स्पाय एजेंट आणि त्यातून निर्माण होणारं थरारनाट्य अनुभवायचं असल्यास ही सिरिज अजिबात चुकवू नका!

fauda inmarathi
jns.org

 

इस्राइल मध्ये प्रत्येक नागरिक हा त्याच्या आयुष्यातली काही वर्ष सैन्यात सेवा करतो त्याप्रमाणेच ह्या फौदा सिरिज मधल्या बऱ्याचशा इस्राईली कलाकारांनी तिथल्या सैन्यात त्यांचं योगदान दिलं आहे

त्यामुळे ही सिरिज आणखीनच रियलिस्टिक वाटते. ही सिरिज सुद्धा तुम्हाला नेटफ्लिक्स वर बघायला मिळेल!

4) Money Heist

ही एक स्पॅनिश वेब सिरिज आहे जी तुम्हाला नेटफ्लिक्स वर बघायला मिळेल. ह्या सिरीजचे ४ पार्ट्स आले आहेत आणि नुकतंच त्यांनी ५ व्या आणि शेवटच्या पार्टची घोषणा केली आहे!

नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही एक हाइस्ट म्हणजेच चोरीची कथा आहे.

 

money heist inmarathi
thebuzzpaper.com

 

पण ह्यातली पात्र, त्यांची विशिष्ट ओळख, ह्या सगळ्यामध्ये साल्वादोर दाली ह्या फेमस पेंटर चं वापरलं गेलेलं मास्क, भ्रष्ट सिस्टिम विरुद्धचा Resistance  म्हणजेच क्रांति, त्यामागची आयडियोलॉजी, सामाजिक व्यथा हे सगळं ह्या सिरिज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल!

ह्यात प्रोफेसर हे हुशार पात्र वेगवेगळ्या लोकांना घेऊन कशाप्रकारे सर्वात मोठया रॉबरी घडवून आणतं हे तर पाहायला मिळेलच ह्याशिवाय ही सिरिज आणि त्यातली पात्र तुमच्या मनात कायमचं घर करतील!

5) The Big Bang Theory

तुम्हाला गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय कसे वाटतात? आणि ह्या विषयात बुडून गेलेले आपले शाळकरी मित्र? Geeks…? Too बोअरिंग, right?

अश्याच ४ अति अभ्यासू तरुणांच्या जीवनात १ hot n sexy तरुणी येते. आणि इथून सुरु होते “हसून हसून पोट दुखवणारी” Big Bang Theory ही सिरीयल!

georgespigot.wordpress.com

कल्पकता असेल तर जड विषयांभोवती उत्कृष्ट मनोरंजन कसं तयार करतं ह्याचा उत्तम नमूना म्हणजे ही मालिका.

खबरदार – तुम्हाला व्हिडिओ pause करून क्लिष्ट जोक्स, समजून घेण्याचं व्यसन ‘नसेल’, तर ही मालिका तुम्हाला आवडणार नाही! ही सिरिज तुम्ही हॉटस्टार ह्या प्लॅटफॉर्म वर बघू शकता! 

6) Mr. Robot

Amazon Prime Video ह्या प्लॅटफॉर्म वरची मिस्टर रोबोट ही सिरिज ही त्या प्लॅटफॉर्मची आजवरची उत्कृष्ट सिरिज मानली जाते. सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलीजन्स ह्याबद्दल विस्तृत माहिती ह्या सिरिज मधून मिळते!

 

mr.robot inmarathi
wall.alphacoders.com

 

इंटरनेट हे जसं वरदान आहे तसाच शाप सुद्धा आहे. इंटरनेट आलं आणि सायबर गुन्हे आणि डेटा चोरी हा प्रकार फोफावला.

आजच्या युगात तुमच्याकडचा डेटा हा सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि जर तो चोरी झाला तर तुमचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं हेच ह्या सिरिजमधून मांडलं आहे!

थोडी टेक्निकल भाष्य जरी करणारी सिरिज असली तरी ही सिरिज तुम्हाला खिळवून ठेवेल हे मात्र नक्की!

 

7) Dark

टाईम मशीन किंवा टाईम ट्रॅवल हे काय सध्याच्या काळात नवीन नाही. क्रिस्तोफर नोलनचा इनसेप्शन, किंवा त्याच धाटणीचा प्रिडेस्टीनेशन हे सिनेमे आपण पाहिले आहेत!

पण तरीही नेटफ्लिक्स ओरोजिनल “डार्क” ही सिरिज खूपच वेगळी आहे! ह्यातलं कथानक साय फाय किंवा टाईम ट्रॅव्हल इतकंच मर्यादित नसून त्यात पात्रांमध्ये असलेली सिक्रेट, नात्यातली गुंतागुंत, Law of 33 years असं बरंच काही बघायला मिळतं!

 

dark series inmarathi
dnaindia.com

 

ह्या सिरिज बद्दल जितकं बोलाल तितकं कमी आहे. जर तुम्हाला टाईम ट्रॅव्हल किंवा साय फाय कथानक आवडत असेल तर तुम्ही अजिबात ही सिरिज चुकवू नका!

३ सीझन ची असलेली ही जर्मन सिरिज बघताना तुमच्याकडे प्रचंड संयम पाहिजे, तरच ही सिरिज तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल! 

 

8) House Of Cards

पोलिटीक्स काय चीज आहे हे खरंच जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका बघा. ही सिरीयल म्हणजे एका “इच्छुक” अमेरिकन राजकारण्याला हवं ते पद नं मिळाल्याने सुरु झालेला सत्तेचा खेळ आहे.

house of cards inmarathi
upsocl.com

 

White house भोवती अमेरिका फिरते…आणि आपल्या हिरो भोवती white house! पहिल्या सीझनच्या शेवटी शेवटी मालिकेचा हिरो – हिरो आहे की व्हिलन असं वाटल्याशिवाय रहात नाही.

9) Game Of Thrones

एका वाक्यात – गेम ऑफ थ्रोन्स नाही बघितली, तर काहीच नाही बघितलं – आणि ही अतिशयोक्ती अजिबात नाही.

George R.R. Martin ह्या लेखकाने लिहिलेल्या A Song of Ice and Fire ह्या पुस्तकांवर आधारित ही सिरीज आहे. एका काल्पनिक पृथ्वीवर ७ छोटी छोटी राज्य मिळून एक मोठी realm म्हणजेच साम्राज्य उभं आहे.

गेम ऑफ थ्रोन्स ही त्या साम्राज्याच्या सिंहासनासाठी चालणाऱ्या राजकारण आणि युद्धांची कथा आहे.

आपल्या मोठ्या चित्रपटांचा canvas जेवढा मोठा असतो, त्याहून मोठा ह्या सिरीजच्या एका-एका एपीसोडचा आहे. ह्यात कुणी १००% चांगलं, कुणी १००% वाईट नाही. प्रत्येक क्रूरकर्म्याचं पात्र उत्तमरित्या चितारलं आहे.

 

game of thrones inmarathi
hotstar.com

 

ही सिरीज तुमच्या जीवनावर, तुमच्याही नकळत प्रभाव टाकेल. तुम्ही कुठल्यातरी पात्रापासून प्रभावित व्हाल, ह्या सिरीजमधली वाक्यं, quotes वापरायला लागाल – तुमच्याही नकळत!

हॉटस्टार ह्या प्लॅटफॉर्म वर ह्या सिरीजचे ८ सीझन पाहायला मिळतील. 

 

10) Breaking Bad

परदेशात मेक्सिको जवळच्या एका शहरात नॉर्मल लाईफ जगणारा केमिस्ट्री प्रोफेसर कशाप्रकारे तिथला एकमेव उत्तम ड्रग्स विकणारा ड्रग लॉर्ड होतो ही कहाणी आहे नेटफ्लिक्स वरच्या ब्रेकिंग बॅड ह्या सिरिजची!

 

breaking bad inmarathi
indianexpress.com

 

पण त्या प्रोफेसरचं ह्या वाटेवर जाण्यामागचं त्याचं पर्सनल तसेच वैद्यकीय कारण सुद्धा असतं.आणि एकदा का गुन्हेगारी मार्ग अवलंबला की त्याचा शेवट सुद्धा तसाच होतो हेच ह्या सिरिज मध्ये मांडलं आहे!

आजही आयएमडीबी ह्या साईट वर जाऊन चेक केलं तर समजेल की आजवर सर्वात जास्त पसंत केलेली आणि सर्वात जास्त रेटिंग असलेली सिरिज ही दुसरी तिसरी कुठली नसून ब्रेकिंग बॅड आहे!

ही सिरिज म्हणजे मनोरंजनाचा धमाका आहे. कुणीही चुकवू नये अशी ही सिरियल आहे!

Caution:

१ – जर इंग्लिश चित्रपट, सिरीज फारशा बघत नसाल तर बघण्याची सुरुवात गेम ऑफ थ्रोन्सवरून करू नका. Friendsनी सुरुवात करा. ती इंग्रजी आणि कथानक सोपं, सहज आहे.

२ – ह्या सिरीज subtitles सोबतच बघा. अनेक dialogues आपल्याला subtitles शिवाय कळत नाहीत आणि त्यामुळे कथानकाची सगळी गंमत निघून जाते.

So, ह्या टीव्ही सिरीज एन्जॉय करा आणि आम्हाला तुमचे अनुभव कळवा !

आणि हो – तुमच्या आवडत्या टीव्ही सिरीज असतील ज्या “नाही बघितल्या, तर काहीच नाही बघितलं!” ह्या सदरात येऊ शकत असतील – तर आम्हाला नक्की कळवा ! आम्हीसुद्धा त्या बघू आणि वाचकांसोबत तुमची लिस्ट शेअर करू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?