' अवघ्या ८ वर्षांच्या या भारतीय मुलीने अख्ख्या दुबईकरांची मने जिंकलीत! – InMarathi

अवघ्या ८ वर्षांच्या या भारतीय मुलीने अख्ख्या दुबईकरांची मने जिंकलीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रोज आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा रस्त्यावर इकडे तिकडे ओसंडून वाहणारा कचरा आपण पाहतच असतो. प्लास्टिक पिशव्या, कागदाचे कपटे, चिंध्या, बाटल्या हर एक प्रकारचा कचरा साचलेला असतोच भोवताली.

कुणी कुठेही काहीही कचरा फेकून देत असतो. रस्तेच नव्हे तर अगदी नद्या, नाले, समुद्र, डोंगर देखील या कचऱ्यांनी व्यापलेत. जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा याच कचऱ्यामुळे गटारी तुंबतात.

 

waste inmarathi

 

रस्त्यावर घाण पाणी साचतं. अशा साचलेल्या पाण्यामुळे मग कधी वाहतूक ठप्प होते, कधी हेच पाणी घरात शिरतं मग आपण सरकारी उदासीनतेच्या नावाने खडे फोडतो बसतो.

परंतु, हा कचरा निर्माण होण्यास आपणच कारणीभूत ठरतो हे मात्र आपण ठार विसरून जातो. सरकारी उदासीनतेचा प्रश्न असला तरी, आपण कधी जागे होणार हा देखील प्रश्न आहेच!

एखादा कागदाचा कपटा किंवा चॉकलेटचा कागद टाकल्याने काय फरक पडतो असा आपला समज असतो. इतका छोटासा कपटा टाकल्याने काय होतं, कुणी ना कुणी तो उचलेल असे आपण गृहीत धरून चालतो.

पण अशाच छोट्या छोट्या फेकून दिलेल्या गोष्टी नंतर अक्षरशः ढीग बनून कधी समोर उभ्या राहतात ते कळत देखील नाही. परंतु, शाळेत आपण स्वच्छतेचे जे धडे शिकलो ते सर्व पुन्हा आठवण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

garabage 2 inmarathi
Hindustan Times

 

आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता कशी करावी? लोकं काय म्हणतील? आपल्याला हे जमणार आहे का? असे प्रश्न जर तुम्हाला सतावत असतील तर या चिमुरडीची गोष्ट तुम्हाला नक्कीच मोठी प्रेरणा देईल.

अमिरात पर्यावरण गटाच्या राष्ट्रभर सुरु असलेल्या पुनर्वापर मोहिमेत या चिमुरडीने सहभाग नोंदवून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.

इवलुश्या वयात पर्यावरणाच्या रक्षणासाठी अक्षरशः एखाद्या योद्ध्याप्रमाणे सर्व पातळ्यांवर लढणाऱ्या या चिमूरडीचे नाव आहे, निया टोनी आणि अभिमानाची बाब म्हणजे ती भारतीय वंशाची आहे.

दुबई येथे अमिरातीच्या २२व्या पुनर्वापर मोहिमेत तिला वैयक्तिक गटात पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तिथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये तिला इको चॅम्पियन ऑफ रीसायकलिंग या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकं जो कागद कचऱ्यात टाकत किंवा जे त्यांना नको असत असे कागद ही जमा करत असे. तिने एकटीने १५ हजार किलो इतके कागदाचा कचरा जमा केला.

 

NIA TONY 2 INMARATHI

 

ही मोहीम अमिरात एन्व्हायर्नमेंट ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नागरी विमानचालन विभागाचे अध्यक्ष आणि इईजी चे सन्माननीय सदस्य शेख सालेम उर्फ सुलतान उर्फ साक्र अल कुरेशी उपस्थित होते.

देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत एक मोहीम सुरु केली होती ज्यामध्ये ७३, ३९३ मेट्रिक तन इतक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सर्वांना यश आले आहे.

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची अमिरातची ही पद्धत अत्यंत स्त्युत वाटते. जो कोणी जास्तीत जास्त कचरा गोळा करेल त्याला या मोहिमेत विशेष पुरस्काराने गौरवण्यात येते. या मोहिमेत कचऱ्याचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात आले होते.

 

niya toni InMarathi

 

जसे की, पेपर, प्लास्टिक, ग्लास, कॅन्स, मोबाईल्स इत्यादी. प्रत्येकांनी कचऱ्याचा एक प्रकार निवडायचा आणि त्या त्या प्रकारचा कचरा गोळा करायचा. नुसता गोळा करून थांबायचं नाही तर या कचऱ्याचा पुनर्वापर कसा होईल याबाबत जागृती देखील करायची आहे.

कित्येकांनी असा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा गोळा केला पण, एकट्या नियाने जितका कचरा गोळा केला तितका कुणीही केलेला नाही.

“माझ्या आजूबाजूच्या परिसरातील कागद गोळा करण्याची मोहीम मी सुरु केली ज्यामुळे हा कचरा पुन्हा वापरता येईल. मी वर्तमानपत्र, मासिके आणि लोकं जे काही कचरा म्हणून फेकून देतात ते सगळ्या प्रकारचे कागदाचे कपटे गोळा केले.

माझ्या वयातील मुलांनी लवकरच प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करायला शिकण अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करणे आणि त्याबाबत जागृती करणे किती आवश्यक आहे तेही माझ्या लक्षात आले.

म्हणूनच याची सुरुवात मी स्वतःपासून केली,” असे ती म्हणते.  या छोट्याशा मुलीने एकटीने जवळपास १५,००० किलो इतका वैयक्तिक कागदी कचरा गोळा केला आहे.

 

niya toni 1 InMarathi

 

या चिमुरडीचे वय आहे अवघे आठ वर्षे. इतक्या लहान वयात तिला असलेली समज आणि झपाटून काम करण्याची तिची वृत्ती भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.

तरुण पिढी या मोहिमेत भाग घेते आहे आणि त्यांच्या मध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत आहे ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. असेच आणखी एक प्रेरणादायी उदाहरण आहे मुंबईच्या मल्हार कांबळे या तरुणाचे.

२१ वर्षाच्या मुंबईच्या या तरुणाने आपल्या कृतीतून अनेक तरुणासमोर आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. मल्हारने देखील मुंबईच्या दादर किनाऱ्यावरील सारा कचरा गोळा करून तो किनारा स्वच्छ बनवला आहे.

 

malhar-kamble InMarathi

 

त्याने आणि त्याच्या मित्रांनी घेतलेल्या कष्टामुळे दादर किनार्याच रूपच बदलून गेलं. इतकं की, त्यांच्या या कामगिरीची दाखल संयुक्त राष्ट्राकडून देखील घेतली गेली.

मल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.

फक्त मोठमोठी भाषणे देऊन सुधारणा होत नाही त्यासाठी स्वतःच कष्ट उपसावे लागतात हे या तरुण पिढीने ओळखल आहे. फक्त वाटसपवर सुविचार फिरवल्याने आणि मोठाल्या पोस्ट शेअर केल्याने बदल होत नाहीत.

 

ENVIRONMENT INMARATHI

 

म्हणूनच निया असो की मल्हार यांची उदाहरणे आपल्या डोळ्यात अंजन घालतात. अर्थातच पर्यावरणाच्या समस्येशी लढणारे अशा अनेक योद्ध्यांची आज गरज निर्माण झाली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?