दैनंदिन जीवनातील ह्या सवयींमुळे तुमचं वीर्य दररोज नष्ट होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारत हा देखील इतर जगाबरोबर २१ व्या शतकात वावरत असला तरी आजही या आधुनिक युगात आपल्या समाजात सेक्स विषयी गोष्टींवर उघडपणे चर्चा करायला कोणीही धजावत नाही. एकीकडे प्रशासन लैंगिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. दुसरीकडे आपण स्वत:ला निव्वळ पुरोगामी समजतो खरं – पण –
लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत आपलं पुरोगामीत्व कोठे जातं देव जाणे.
लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे.

आज त्याच दृष्टीने एक पाऊल टाकत आम्ही ‘वीर्य’ या विषयावर भाष्य करत आहोत. मनुष्याचा जन्म ज्यातून होतो ते हे वीर्य, त्यामुळे ते किती मौल्यवान आहे हे तुम्हाला वेगळ्याने पटवून द्यायची गरज नाही.
आज आपण काही अश्या गोष्टी जाणून घेऊ ज्यामुळे पुरुष आपलं वीर्य वाया घालवत आहेत आणि ही खरंच चिंतेची बाब आहे, कारण त्याचे परिणाम पुरुषांना लग्नानंतर भोगावे लागतात.
नुकत्याच Harvard School of Public Health यांच्यामार्फत करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की या समस्येला आपल्या दैनंदिन जीवनातीलच काही गोष्टी कारणीभूत असतात.
मित्रांनो, कृपया ह्या विषयाकडे “अश्लील” म्हणून दुर्लक्ष करू नका. सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे हा.
पॅन्ट्सच्या पॉकेटमध्ये सेलफोन ठेवणे :

सेलफोन मधून निघणारे व्हायब्रेशन आणि रेडीयेशन वीर्याची मात्रा ९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. त्यामुळे आपला सेलफोन हा सहसा पॅन्ट्सच्या मागच्या पॉकेटमध्ये किंवा काहीच पर्याय नसेल तर बॅगेममध्ये ठेवावा, अन्यथा तुम्ही हातात मावेल एवढी केस घेऊन त्यातही सेलफोन घेऊन फिरू शकता.
उच्च तापमानामध्ये खूप जास्त वेळ घालवणे :

उच्च तापमान म्हणजे येथे आपण एखाद्या गाडीचं उदाहरण घेऊ, समजा तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसला आहात आणि त्या सीट खालून उष्ण हवा येत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वीर्यावर होऊ शकतो. उच्च तापमानामुळे वीर्य गरम पडते, जे मुळीच चांगले नाही.
वाढते वजन :

या संशोधांतून हे देखील सिद्ध झाले आहे की, सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त वजन असलेल्या व्यक्तीमध्ये वीर्याची अतिशय कमी प्रमाणात निर्मिती होते.
काही प्रकरणांमध्ये तर व्यक्तीच्या शरीरात बिलकुल वीर्य तयार होत नसल्याचे आढळून आले आहे.
असे होऊ द्यायचे नसेल तर दरोरोज व्यायाम करून वजन शाबूत ठेवण्यासारखा दुसरा प्रभावी मार्ग नाही.
अति धुम्रपान :

अति धुम्रपान हे आपल्या शरीरासाठी किती धोकादायक आहे आणि त्याचे आरोग्यावर कसे घातक परिणाम होतात हे तुम्हाला देखील माहित आहेतच. त्यापैकीच एक परिणाम म्हणजे शरीरात कमी प्रमाणात वीर्य निर्माण होणे.
एवढेच नाही तर अति धुम्रपानाचा वीर्याची पत आणि गुणवत्तेवर देखील परिणाम होतो.
सतत तणावाखाली वावरणे :

नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीच्या वीर्याच्या तुलनेमध्ये सतत तणावाखाली असणाऱ्या व्यक्तीचे वीर्य निरुपयोगी असल्याचे म्हटले जाते.
जास्त तणाव असल्यास वीर्यामध्ये उत्पादकता निर्माण करणारे हार्मोन्स निष्क्रिय होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
अति मद्यपान :

आठवड्याला २५ किंवा त्यापेक्षा जास्त पेग पिल्यास वीर्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, हे उपरोक्त संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जो व्यक्ती ४० च्या आसपास पेग दर आठवड्याला सेवन करतो, त्याच्या शरीरातील वीर्य निर्मिती तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होते आणि जे काही वीर्य निर्माण होते ते ५१ टक्के इतके दुषित असते.
प्लास्टिकचा वापर :

सध्याच्या युगामध्ये प्लास्टिकचा वापर आपल्याकडून होतोच होतो, त्याबद्दल आपला नाईलाज आहे.
परंतु अश्याचप्रकारे प्लास्टीकशी सबंध आलेले अन्नपदार्थ वा पेय पिल्याने प्लास्टिकमधील केमिकल्समुळे वीर्य निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.
प्रक्रिया केलेले मांस खाणे :

मध्यंतरी अशी ही बातमी होती की प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो. या प्रक्रिया केलेल्या मांस पदार्थांचे शरीरावर कोणतेही चांगले परिणाम होत नाहीत.
हे मांस खाण्यास सुरुवात केल्यानंतर वीर्याच्या मात्रेमध्ये फरक पडल्याचे स्वत: अनेकांनी कबुल केले आहे.
तर मंडळी अश्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, उगाच नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आताच योग्य पाऊल उचललेले केव्हाही चांगले नाही का?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Good job
Why our sperms are getting destroyed
Answered by u is very helpful
Points like these should be published
Rather not sex education
Just let everyone know the ill effects of the habits which hampers sex life
Mating to concieve is a natural process
Which everyone pocess by default
No one needs a education for that
Just let every one know do’s & dont’s
Mala 3 varshapasun hastamethun chi savay lagali aahe Yar tyacyamule majhya pudhachya jivnavar parinam hou shakato ka