' वजनवाढीच्या भितीने तूप नको म्हणताय? वाचा 'सुपरफूड' तुपाचे फायदे...

वजनवाढीच्या भितीने तूप नको म्हणताय? वाचा ‘सुपरफूड’ तुपाचे फायदे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुपाला भारतीय आणि भारतीयांच्या किचन मध्ये मानाचं असं स्थान आहे.

का ते वेगळं सांगायला नको!

 

ghee inmarathi

 

पंचामृतपासून ते पुलाव असो,सगळ्यात तूप इज मस्ट.

आयुर्वेदात तर तुपाला सर्वोच्च असं स्थान आहे.तूप हे एवढं आरोग्यवर्धक आहे की नवजात बाळाला स्तनपानाच्या आधी तुपाचा एक लहान डोस देण्याची आयुर्वेदात तरतूद आहे.

मेंदूच्या नर्व्हस सिस्टीम पासून पायाच्या घोट्या पर्यंत मानवी शरीराला तुपाचे असंख्य फायदे आहेत.

म्हणून तुपाला इंग्रजी जगतामध्ये ‘सुपरफूड’ म्हटलं जातं.

 

ghee on paratha inmarathi

काही वर्षांपुर्वीपर्यंत प्रत्येक पदार्थावर तुपाचा गोळा ठेवून तो खाण्याची पद्धत होती, धर्म कोणताही असो, नैसर्गिक पोषण मिळण्यासाठी ताटातील किमान एका पदार्थावर तरी तुप हवेच हा घरातील मोठ्यांचा नियम पाळला जायचा.

पण दुधाचा पदार्थ, त्यात तूप म्हटलं की हेल्थ कॉन्शस असणारे वजन वाढण्याच्या भीतीने नाक मुरडतात.

रिच लेव्हल फॅट असल्यामुळे वजन वाढीच्या भितीने हल्ली तुप पुर्णपणे वर्ज करणा-यांचं प्रमाण वाढलं आहे. नाक मुरडत जात ते खास करून तरुण वर्गात!

हे ही वाचा – बटर, चीज म्हणजे शरीरासाठी अपायकारक असं म्हणत असाल तर हे वाचा म्हणजे गैरसमज दूर होतील!

fitness inmarathi

 

तुप हे हेल्दी फूड प्रॉडक्ट असल्यामुळे वजन वाढत हे जेवढं खरं आहे तेवढेच त्याचे असंख्य फायदे सुद्धा आहेत!

मात्र आपण त्याचे फायदे न पाहता, केवळ त्यामुळे वजन वाढतं हा एकच मुद्दा लक्षात घेतो.

चला तर बघूया नेमके काय आहेत ते.

मेंदूची पोषण,वाढ आणि संरक्षण

विज्ञानात आपण शिकलोच आहोत की हृदय आणि मेंदूची बिल्डिंग/रचना ही अतिशय गुंतागुंतीची आहे.त्यामुळे सात्विक आहार हा त्यांच्या पोषणासाठी आवश्यक असतो.

मेंदूच्या विकासासाठी/वाढीसाठी सॅच्युरेटेड फॅट हे अत्यावश्यक असते.आणि तुपात त्याची विशेष भरणा आहे.सॅच्युरेटेड फॅट मुळे मेंदूचे नर्व्ह सेल्स एनर्जाइज होतात आणि संपूर्ण शरीराशी संपर्क ठेवण्याचं काम ते उत्तमरीत्या करत असतात.

 

brain inmarathi

 

तुपात कोलीन आणि ओमेगा ३ फॅट सुद्धा अतिरिक्त प्रमाणात असतात.

कोलीन हे एसीटील्कोलिन या न्यूरोट्रान्समिशन साठी अत्यावश्यक आहे.मेमरी आणि लर्निंग या दोन्ही गोष्टी या एसीटील्कोलिनच्या डेव्हलपमेंट वर अवलंबून असतं.

कोलीनच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, मनस्थिती बदलणे यासारखे आजार उद्भवू शकतात.

ओमेगा ३ ऍसिड तर मूलभूत इलेमेंट आहे जे मेंदू मधील नको असलेले सूक्ष्म पदार्थ कमी करण्यास उपयोगी पडतात. यामुळे न्यूरोट्रान्समिशनच्या प्रक्रिये साठी लागणारे इलेमेंट लवकर वाढविण्यासाठी होण्यास मदत होते.

मेंदूच्या मांसपेशी या उत्तमरित्या तयार होऊन काम करण्यासाठी तूप हे अत्यावश्यक आहेच.

पाचनसंस्थेचा मेंटेनन्स

 

pure ghee inmarathi

 

जेव्हा एखादी जखम बरी करायची असेल तर तुपासारख औषध या भूतलावर कमीच सापडतील.

प्रथम म्हणजे तूप हे ब्युटरिक च्या सर्वात रिच सोर्स पैकी एक आहे. फॅटी ऍसिडची लहान लहान चेन जी आतड्यांच्या अस्तर वॉलवर झालेल्या लहान लहान जखमा दुरुस्त करण्याचं काम करत.

कोलनच्या अभावामुळे होणाऱ्या कर्करोगापासून बचाव होण्यापासून ते आतड्यांच्या सिंड्रोम, आयबीएस, अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस यापासून बचवापर्यंत याचे बरेच फायदे आहेत.

विष, ग्लूटेन, अँटीबायोटिक्स आणि इतर प्रदूषक अन्न आणि औषधांद्वारे आपल्या पाचक मार्गात प्रवेश करतात आणि कालांतराने आतड्यांना त्रास होतो ज्यामुळे आतड्यांच्या वॉलवर डाग आणि छिद्र निर्माण होते.

तूपातील बुटेरिक ऍसिड हे नुकसान भरून काढण्यास मदत करते आणि पोटात आणि आतड्यांच्या अस्तरांमधील सूज कमी करून, पाचक मार्गाची जळजळ कमी करते आणि निरोगी कोलन पुनर्संचयित करते.

 

child with ghee inmarathi

 

तुप म्हणजे व्हिटॅमिन,मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स यांचा समृद्ध सोर्स.

डोळ्यांसाठी,त्वचेसाठी महत्वपूर्ण असलेलं व्हिटॅमिन ए शरीराला मिळण्यासाठी बीटा-कॅरोटीन पदार्थांच डीकंपोझिशन व्हावं लागतं. पण तुपात असलेलं व्हिटॅमिन ए शरीराला उपयुक्त ठरतं. त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.

अँटीऑक्सिडंट म्हटलं की व्हिटॅमिन इ आठवतं. तुपात जबरदस्त प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन.

हेल्दी हृदय आणि मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन हे अत्यावश्यक आहे. पण सहजासहजी अन्नपदार्थांमध्ये उपलब्ध न होणारे व्हिटॅमिन्स तुपात मात्र पुरेशा प्रमाणात असतात.

हे व्हिटॅमिन्स दातांचे विकार आणि आरटेरियसचं कॅलसीफिकेशन पासून बचाव करण्यास मदत करतं.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करून योग्य कोलेस्टेरॉलच्या वृद्धीसाठी सुद्धा तूप उपयोगी आहे.

 

ghee heart inmarathi

हे ही वाचा – सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही

ओजसने समृद्ध.

तूपातील सर्व फायद्यांपैकी एक म्हणजे शरीरातील जीवन-शक्ती (ओजस) वाढविण्याची क्षमता सर्वात महत्त्वाची आहे.

आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणालीनुसार, तूप शरीर आणि मनाला ओज देतात, जे हळूवारपणे “चैतन्य” किंवा “जीवन शक्ती” मध्ये कन्व्हर्ट करतात.

आयुर्वेदिक तत्त्वज्ञानामध्ये ओजस ही आपल्या जीवनाची प्राथमिक ऊर्जा आहे जी आपल्याला जागृत आणि निरोगी ठेवते परंतु वय, तणाव, खराब आहार-पोषण, विषारी पदार्थ आणि बरेच काही गोष्टी यामुळे ते कमी होऊ शकतात.

 

ghee pure inmarathi

 

आयुर्वेदिक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की काही तुपात तयार केलेले पदार्थ किंवा औषधी वनस्पतीयुक्त तूप खाल्ले गेले असेल तर शरीरात आमूलाग्र बदल घडू शकतात.

उत्तम चव आणि पाककलेचा दागिना

व्हेज असो ना नॉनव्हेज सर्वत्र तेलाला ऑप्शन म्हणजे तूप. तूप परवडत नाही म्हणून तेल वापरात ती वेगळी गोष्ट.

तूप कोणत्याही पद्धतीने जवळजवळ कोणत्याही प्रकारच्या अन्नासाठी एक उत्तम स्वयंपाक साधन आहे. तुप २३२° सेल्सिअस पर्यंत उष्णता हाताळू शकते आणि समृद्ध अशी बटरी चव देते.

 

butter chicken inmarathi

 

सॅच्युरेटेड फॅट म्हणून, इतर चरबी-तेलांपेक्षा तूप अतिशय स्थिर आहे, म्हणून ते स्वयंपाक करताना ऑक्सिडेशन कमी करण्यास मदत करते.

सर्वांत उत्तम म्हणजे तूप थेट दुधाचा पदार्थ नाहीत. तूप जवळजवळ अनिश्चित काळासाठी चांगले राहते. ते खुल्या वातावरणात किंवा फ्रिजमध्ये स्टोअर केले जाऊ शकते. फक्त मॉइश्चराइझ जागेत तूप स्टोअर करण्याचे टाळावे.

डीटॉक्सिफाईंग एजंट

फॅट सोल्युबल टॉक्सिन काढण्यास तूप मदत करते.

तसं बघायला गेलं तर अन्नपदार्थांमार्फत किंवा इतर मार्गाने आपल्या शरीरात बरेच घातक पदार्थ जात असतात. शरीराला त्यांचा थेट अपाय नसला तरी ते चरबीच्या रूपाने स्टोअर होऊन जातं.

असे टॉक्सिन काढून टाकण्यासाठी तूप हे अत्यावश्यक आहे. तूप शरीर आणि आतड्यांना ल्युब्रिकेशनसाठी मदत करते.

तूप निरोगी व्यक्तींमध्ये नियमितपणे आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास मदत करते, जे निर्मूलन आणि डिटोक्सिफिकेशनला मदत करते.

पारंपारिकरित्या पंचकर्म उपचारांमध्ये खोलवर रुजलेली शारिरीक आणि मानसिक विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) दूर करण्यासाठी तुपाचा भरपूर वापर होतो.

 

shirodhara inmarathi

 

पण या सगळ्यासाठी नैसर्गिकरित्या वाढलेल्या आणि पाळलेल्या गाईंच्या दुधापासून तूप बनलेलं असणे आवश्यक आहे.ऑरगॅनिक आणि बायोडायनामीक असले तर उत्तम!

तुप वजन वाढायला जरी कारणीभूत असलं तरी योग्य प्रमाणात त्याच सेवन केल्यास हेल्दी आणि सर्वतोपरी फिट राहण्यासाठी मदत करतं हे नक्की. 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?