' आपल्या आवडत्या ‘कॅडबरी- डेअरी मिल्क’ विषयीच्या या खास गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल – InMarathi

आपल्या आवडत्या ‘कॅडबरी- डेअरी मिल्क’ विषयीच्या या खास गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

व्यक्ती म्हणून आपण सगळेच वेगवेगळे असतो. प्रत्येकात काही ना काही खास बात असतेच.

पण चॉकलेट खात क्रिकेटच्या मॅचमध्ये आपल्या मित्राची बॅटिंग पाहणारी ती, त्याने उंच चेंडू टोलावणं, बाद का सिक्सर? या विवंचनेत हातात चॉकलेट धरून तिने प्रार्थना म्हणणं, त्याचं नॉटआउट राहणं आणि त्यानंतरचा तिचा हात फैलावत केलेला नाच.

हे सगळं पाहताना आपल्यालाही जाणवत राहतं. कुछ खास है हम सभी में, कुछ बात है हम सभी मे!

 

dairymilk inmarathi 3

 

या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गवसतं तिच्या हातातल्या त्या जांभळ्या रॅपरमधल्या चॉकलेटमध्ये! आपलं तर खास नातं आहे डेअरी मिल्कशी!

कॅडबरीचा इतिहास

इ.स. १८२६ मध्ये जॉन कॅडबरी यांनी एक किराणा मालाचं दुकान उघडलं. त्याकाळी ड्रिंकिग चॉकलेटचं खूप आकर्षण होतं लोकांना. त्यामुळे जॉन यांनी दुकानात ड्रिंकिंग चॉकलेट सुद्धा ठेवण्यास सुरुवात केली.

नंतर दुकानाचा ताबा त्यांनी आपल्या मुलांकडे दिला. ड्रिकिंग चॉकलेटबरोबरच इतर अनेक उत्पादनं तिथे मिळतं. पण ज्यामुळे कॅडबरी हे नाव सर्वदूर पसरलं तो क्षण खास आहे.

 

drinking chocolate inmarathi

 

त्याकाळी स्विस चॉकलेटस् ना खूप मागणी होती, पण त्यातल्या कोकोच्या अधिक्याने त्यात कडवटपणा बऱ्यापैकी होता. ज्युनियर जॉर्जला हा कडवटपणा नसणारं काहीतरी तयार करायचं होतं.

मग जन्माला आला भरपूर दूध, साखर आणि कोकोचं योग्य प्रमाण असणारा विलक्षण पदार्थ!

आता इथे महत्त्वाचा प्रश्न आला की उत्पादनाचं नाव काय ठेवावं? जॉर्जच्या डोक्यात हायलँड मिल्क, जर्सी अँड डेअरी मिल्क अशी काही नावं घोळत होती.

कॅडबरीच्या विविध उत्पादनांचे नियमित ग्राहक असणाऱ्या एका गृहस्थांच्या मुलीने एक नाव सुचवले – डेअरी मिल्क. काही गोष्टी ‘क्लिक’ व्हाव्या लागतात.

 

milk and chocolate inmarathi

 

जॉर्जला डेअरी मिल्क हे नाव क्लिक झाले. 

चॉकलेटचे हे मिल्कफुल कॉम्बिनेशन लोकांना खूपच आवडले आणि कॅडबरी हा ब्रॅंड इंग्ल्डमध्ये लोकप्रिय झाला.

इ.स. १९२० पर्यंत कॅडबरी च्या वेष्टनाचा (Rapper) रंग फिका गुलाबी आणि लाल होता.

हा जांभळा रंग राणी व्हिक्टोरियाला आदरांजली म्हणून वापरला होता. डेअरी मिल्कच्या पॅकेजिंगवर वापरलेला रंग पॅंटोन 2685 सी – कोणतीही अन्य चॉकलेट कंपनी वापरु शकली नाही.

पण नेस्ले कंपनीने त्यांना कोर्टात खेचले, चार वर्षांची लढाई ते हरले, परंतु नंतर पुन्हा अपील करून नेस्ले जिंकली. म्हणून आता जांभळा रंग कोणीही वापरू शकतं.

म्हणजेच दिवसाला सुमारे दहा लक्ष चॉकलेटस् ची विक्री होते. हा एक विक्रमी आकडाच आहे. नाही का?

 

dairymilk inmarathi 6

 

इ.स. १९९८ मधे कॅडबरी कंपनीने आपल्या पुनरूत्पादन सोहोळ्यासाठी सगळ्यात मोठा चॉकलेटचा बार बनविला होता. ज्याचे वजन सुमारे १.१ टन आणि तो ९ फूट ऊंच, ४ फूट रूंद होता.

जो खाण्यास एका सामान्य व्यक्तीला सरासरी १२० वर्षे लागतील. ह्या बारची विक्रमी बार म्हणून नोंद करण्यात आली आहे.

कॅडबरी डेअरी मिल्कचा आकार सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना खाता येईल असा आहे. झटपट खाल्ला जाणारा पदार्थ , एक छोटीशी पार्टी, कुटुंब-मित्र ह्यांच्यासोबत खाणं, एक चांगली भेटवस्तू अशा अनेक रूपात कॅडबरी डेअरी मिल्क वापरली जाते.

कॅडबरी सदैव नवनवीन प्रयोग करत असते. इ.स. २००९ मध्ये कॅडबरीने “फ्रूट ऍंड नट’ नावाचे नवीन उत्पादन बाजारात आणले जे प्रचंड लोकप्रिय ठरले.

dairymilk inmarathi 7
a review a day

 

आताही डेअरी मिल्क सिल्क हे उत्पादन लोकप्रिय झाले अहे, ह्याला जाहिरात हेही एक कारण आहे. कॅडबरीच्या जाहिराती खूपच आकर्षक असतात.

कॅडबरी मूलतः ब्रिटिशमधील उत्पादन असलं तरी यू.के. च्या बाहेर सुद्धा त्याचा खूपच विस्तार आहे. त्यांची चॉकलेटस् थायलं, इजिप्त, सौदी अरेबिया यासारख्या ४० देशांमध्ये विक्री केली जाते.

कॅडबरी डेअरी मिल्कची सगळ्यात जास्त विक्री भारतात होते. त्याच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांमधे कॅनडात विक्री होणारे ओरिओ एग्ज् (Oreo Eggs) आणि भारतात दिवाळीत भेट म्हणून दिले जाणारे कॅडबरी ग्लो (Cadbury Glow) ह्यांचा समावेश होतो.

भारतात डेअरी मिल्क ह्या कॅडबरीचा फारच मोठा चाहता वर्ग आहे.

इ.स. २००४ मध्ये अमिताभ बच्चन ह्यांना कॅडबरीचा ब्रॅंड ऍंबेसिडर म्हणून नियुक्त केले गेले आणि त्यांच्या लोकप्रियतेचा खूपच चांगला फायदा ह्या कंपनीला झाला.

 

dairymilk inmarathi 8

 

तथापि लवकरच हा कंपनीला भारतात एका संकटाला तोंड द्यावे लागलं. ते म्हणजे काही ठिकाणी कॅडबरीमध्ये अळ्या सापडल्या.

ह्या गोष्टीमुळे कॅडबरी कंपनीला खूपच आर्थिक तोटा झाला, केवळ विक्री कमी झाली असं नाही तर प्रचंड मानहानी झाली. पण, ह्या सगळ्या परिस्थितीतून कॅडबरी कंपनी लवकरच सावरली.

योग्य ते सोपस्कार पार पाडून कंपनीने पुन्हा आपला विक्रमी विक्रीचा आकडा गाठला.

कंपनीने आपल्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या अवलंबल्या. जसे, भारतातील सणा-सुदीला गोड खाण्याची पद्धत आहे हे लक्षात घेऊन कंपनीनं भारतात “शुभारंभ” मोहिम सुरू केली.

“काही चांगलं करायला सुरूवात करताना गोड खावं” ही कॅप्शन घेऊन दिवाळी, दसरा ह्यांसारख्या सणांना कॅडबरीची जाहिरात हमखास दाखवली जाते आणि कॅडबरीची विक्री त्या दिवसात जास्त होते.

 

dairymilk inmarathi

भारतात कॅडबरीची सगळ्यात मोठी विक्री म्हणजेच ७०% विक्री होते.

उत्तम चवच नाही तर ह्या चॉकलेटचे रॅपर हाही सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय आहे.

अर्थात ह्यातही काळानुसार अधिकाधिक आकर्षकपणा आला. पण, हे वेष्टन कायमस्वरूपी आकर्षित करणारं आहे.

इ.स. १९९० मध्ये कॅडबरीच्या चाहत्यांसाठी यु.के. मधील बर्मिंगहॅम येथे कॅडबरी वर्ल्ड तयार करण्यात आलं जिथे सुमारे डझनापेक्षा जास्त इंटरॅक्टिव्ह झोन्स् आहेत, ज्यामध्ये 4D chocolate adventure, चॉकलेट बनविणं, चॉकलेटचं प्रदर्शन इत्यादी गोष्टी आहेत.

 

dairymilk inmarathi 9
staycity

 

त्याचबरोबर जॉन कॅडबरीने इ.स. १८५४ मध्ये जिथे दुकान सुरू केले त्या रस्त्याची प्रतिकृती देखील येथे आहे आणि आपल्याला पोहोचण्यास सहजासहजी शक्य नसेल तर न्यूझीलॅंड मधे a sister attraction म्हणून जागा आहे जे कॅडबरी कंपनी चालवते.

आकर्षक जाहिराती, आकर्षक वेष्टन आणि अफलातून चव ह्यामुळे डेअरी मिल्क लहानांनाच नाही तर मोठ्यांना देखील तितकेच आवडते. इतकेच नाही तर संशोधकांनादेखील ह्याने भुरळ घातली आहे.

डेअरी मिल्क वर अनेकानेक संशोधने झाली अजूनही होत आहेत. एका संशोधनात असे निष्पन्न झालं आहं की डेअरी मिल्क खाल्ल्याने नैराश्य दूर होते.

एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की डेअरी मिल्कमुळे उत्साह वाढतो.

 

dairymilk inmarathi 2

 

अजून एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की डेअरी मिल्क खाल्ल्याने नकारात्मकता दूर होते. याशिवाय अनेक संशोधने सुरुच आहेत.

एकूण काय तर कॅडबरी डेअरी मिल्क अफलातून चॉकलेट आहे. जे लहान थोर सगळ्यांनाच आवडतं आणि जो संशोधनाचा विषय बनले.

“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” ह्या गाण्याप्रमाणे जर खरोखरच चॉकलेटचा बंगला बांधायचा ठरवला तर तो डेअरी मिल्कचाच असावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?