'जगातील अतिशय अद्भुत जागा जेथे सर्वसामान्यांना जाण्यास मनाई आहे!

जगातील अतिशय अद्भुत जागा जेथे सर्वसामान्यांना जाण्यास मनाई आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अनेकांचं स्वप्न असतं की संपूर्ण जगभर फिरायला मिळावं, जगातील कानाकोपरा पाहायला मिळावा. पैसे खिशात असले की हे संपूर्ण जग सहज हिंडता येतं असं देखील अनेकांचं म्हणणं!

तुमचा देखील असाच समज असेल तर मित्रांनो तुमचा हाच समज म्हणजे एक गैरसमज आहे, कारण तुमच्याजवळ कितीही पैसा असला आणि संपूर्ण जग हिंडायची कितीही प्रबळ इच्छाशक्ती असली तरी तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण जगात काही अश्या अद्भुत जागा आहेत जेथे जाण्याची परवानगी कोणालाही नाही…

 

 पोवेगलीया बेट, इटली

 

haunted poveglia island italy InMarathi

स्रोत

पूर्वी या बेटाला क्वारेन्टाइन कॉलनीचे स्वरूप होते. सध्या या बेटावर मनुष्य प्राण्याचे अस्तित्व नाही. आसपासच्या प्रदेशातील स्थानिकांचे म्हणणे आहे की पूर्वीच्या काळी या बेटावर प्लेगची साथ पसरली होती, ज्यामध्ये बेटावरील सर्वच लोकांचा मृत्यू झाला आणि त्या लोकांच्या आत्मांचा आजही या बेटावर वास आहे.

या गोष्टीचा कोणताही पुरावा अद्यापही समोर आलेला नाही तरी सुरक्षिततेच्या कारणामुळे या बेटावर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

 

 लेडी मेरी चर्च, इथियोपिया

ledy mary church ethiopia InMarathi

स्रोत

हे चर्च म्हणजे जगातील सर्वात पवित्र बाईबल चे संग्रहस्थळ आहे. या चर्च मध्ये एक संदूक आहे ज्यात एका दगडावर परमेश्वराचे दहा धर्म आदेश कोरलेले आहेत. या चर्च मध्ये जेथे ही संदूक ठेवली आहे तेथे केवळ ख्रिश्चन धर्मातील पूज्यनीय पादरीच दाखल होऊ शकतो.

 

वेटिकन मधील गुप्त महल, वेटिकन सिटी

Vatican City 1 InMarathi

स्रोत

या छोट्याश्या महालामध्ये पोप आणि जगातील अतिशय हुशार अभ्यासकांशिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नाही. या छोटेखानी महालामध्ये काही वादग्रस्त कागदपत्रे आणि पुराव्यांचा भरणा असल्याचे बोलले जाते, म्हणूनच आजही ही जागा अतिशय गुप्त ठेवण्यात आली आहे.

===

(आणि हो, भारतात अश्या काही जागा आहेत जिथे “भारतीयांना प्रवेश मनाई” आहे!
इथे वाचा: भारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही! )

===

निहाऊ बेट, हवाई

niihau-marathipizza

स्रोत

या बेटावर वास्तव करणाऱ्या जमाती आणि वन्यजीव संपत्ती अतिशय दुर्मिळ असून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने पर्यटकांना येथे येण्यास मनाई आहे. या बेटावर केवळ अमेरिका नेव्हीचे अधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी आणि आमंत्रित अतिथी जाऊ शकतात.

 

लासकॉक्स गुहा, फ्रान्स

Lascaux-Cave-Paintings-marathipizza

स्रोत

अश्मयुगात या गुहांमधील भिंतींवर चितारण्यात आलेली चित्रे ही जवळपास १७,३०० वर्षे जुनी आहेत. १९६३ सालापासून सर्वसामान्य लोकांना येथे येण्यास मनाई केली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते येथील रहदारी वाढल्यास या अतिप्राचीन आणि मौल्यवान चित्रांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

 

आयीसे ग्रँड तीर्थक्षेत्र, जपान

ice-grand-shirine-marathipiza

स्रोत

जगातील अतिमहत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असे जपानमधील आयीसे ग्रँड तीर्थक्षेत्र हे केवळ महिला आणी पुरुष पादरींसाठीच खुले आहे. बाकी इतर लोक केवळ दुरूनच या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊ शकतात.

 

जियांग्सू नॅशनल सिक्युरिटी एज्युकेशन म्युजियम, चीन

jiangsu-national-security-education-museum-marathipizza

स्रोत

चीन मधील लोक आपल्या काही अतिमहत्त्वाच्या वस्तूंबाबत इतके असुरक्षित आहेत की त्यांना या वस्तू जगासमोर आणायच्या नाहीत. अश्याच काही वस्तू म्हणजे पूर्वीच्या काळी चीनी गुप्तचर सेनेने वापरलेली शस्त्रे येथे ठेवण्यात आली आहेत, परंतु ही शस्त्रे पाहण्याची परवानगी कोणालाही नाही.

 

पाईन गॅप, ऑस्ट्रेलिया

pine-gap-marathipizza

स्रोत

पाईन गॅप ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमार्फत संयुक्तरित्या चालवले जाते. पाईन गॅप एक सॅटेलाईट ट्रॅकिंग स्टेशन आहे जेथून रशिया, चीन आणि अखाती देशातील महत्त्वाच्या तेल खाणींवर नजर ठेवली जाते. ही जागा जगातील अतिसुरक्षित जागांपैकी एक आहे.

 

नेगेव न्युक्लीयर रिसर्च सेंटर, इज्राईल

negev-nuclear-research-center-marathipizza

स्रोत

या अतिसुरक्षित ठिकाणी शिरण्याचा काय तर याच्या आसपास भटकण्याचा विचार देखील तुम्ही मनात अणु शकत नाही. एका किल्ल्यासारख्या भासणाऱ्या या ठिकाणी चुकूनही गेलात तर चौकशी होते आणि त्याचे भयंकर परिणाम देखील भोगावे लागू शकतात.

.
मेट्रो-२, रशिया

Moscow-Metro-2-Russia-marathipizza

स्रोत

असं म्हणतात की रशियाकडे अतिशय गुप्त आणि नियंत्रित अंडरग्राउंड मेट्रो सिस्टम आहे ज्याला मेट्रो-२ म्हटले जाते. ही मेट्रो सिस्टम रशियाच्या सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय केंद्रांना जोडते आणि येथे जाण्याची कोणालाही परवानगी नाही. परंतु रशियन सरकारने अजूनही मेट्रो-२ अस्तित्वात असल्याच्या दाव्याला ना ही दुजोरा दिला आहे ना ही या गोष्टीला नकार दिला आहे.

.
उत्तर सेंटीनेल बेट, अंदमान

Island-North-Sentinel-marathipizza

स्रोत

या बेटावर राहणारी आदिवासी जमत अतिशय दुर्मिळ असून या २१ व्या शतकातही त्यांचा बाहेरच्या जगाशी अद्याप संपर्क आलेला नाही, किंबहुना ते स्वत: बाहेरच्या जगाशी संपर्क करू इच्छित नाही. अजूनही ही जमात अश्मयुगातील मनुष्यप्रमाणे जीवन जगते. सुरक्षितेच्या कारणामुळे या बेटावर जाण्यास मनाई करण्यात येते.

.
वूमेरा प्रतिबंधित क्षेत्र, ऑस्ट्रेलिया

woomera-prohibited-area-marathipizza

स्रोत

एखाद्या देशाच्या क्षेत्रफळापेक्षाही मोठ्या जागेत विस्तारलेले हे ठिकाण जगातील सर्वात मोठे शस्त्रास्त्र प्रक्षेपण केंद्र म्हणून ओळखले जाते. जगातील अतिमहत्वाचा व्यक्ती देखील या प्रदेशात हिंडू शकत नाही.

.
एरिया 51, अमेरिका

area-51-marathipizza

स्रोत

हे अमेरिकेचे एक मिलिटरी बेस आहे जेथे अमेरिका स्वत:हून विकसित केलेल्या एयरक्राफ्टची चाचणी घेते. हे ठिकाण इतके गुप्त ठेवण्यात आले आहे की स्वत: अमेरिकन सरकार देखील या ठिकाणाचे अस्तित्व नाकारते.

अश्या गोष्टी वाचल्या की आपलं अज्ञान आणि जगातील अतर्क्य गोष्टींचं अस्तित्व…दोन्ही अचंभित करून टाकतं, नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?