' जपानी लोक सर्वाधिक आनंदी आणि दीर्घायुषी आहेत; ते “रहस्य”आत्मसात करा! – InMarathi

जपानी लोक सर्वाधिक आनंदी आणि दीर्घायुषी आहेत; ते “रहस्य”आत्मसात करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपलं आयुष्य हे नितांत सुंदर आहे आणि आपल्याला ते आणखीन सुंदर करायचंय. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय हे खरंच आपलं भाग्यच म्हणावं लागेल.

आयुष्य जगताना आपण अनेक विविध अनुभव घेत समृद्ध होत असतो. अनुभवातून शिकण्याची आणि प्रयोगशीलतेतून नवीन गोष्टींचा शोध घेत आपलं आयुष्य सुखकर करण्याचीही शक्ती आपल्याकडे असते.

थोडक्यात काय तर मनुष्य हा प्राणी बऱ्याच बाबतीत नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याला विचार करण्याचं जे वरदान मिळालंय ते खूपच उपयुक्त आहे. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही मात्र आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर होतच असतो.

 

change the way of thinking Inmarathi

 

अहो इतकंच काय तर मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा असेल तर ती गोष्टही आपण मिळवू शकतो. थोडक्यात आपल्या विचारांच्या सामर्थ्याने आपण ती गोष्ट attract करून घेतो.

ह्याला वैज्ञानिक भाषेत ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ असं म्हटलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे तर आपण जाणतोच आणि अगदी तसंच आपल्या देशांचा विचार केल्यास प्रत्येक देश, त्याची संस्कृती, विचारसरणी ह्यात आपल्याला वैविध्य दिसून येतं.

प्रत्येक देशातील तत्वज्ञान हे तेथील रहिवाश्यांच्या विचारसरणीवर प्रभाव टाकत असते. ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमधेही ‘इचिगो इचिये’ हे प्रसिद्ध आहे.

 

ichigo ichie inmarathi

 

इचिगो इचिये चा शब्दशः अर्थ ‘आता, त्याच घटकेला’ असाही होतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात येणारा क्षण, घडणारी प्रत्येक गोष्ट आणि येणारी सर्व माणसं ही स्पेशल असतात.

कारण तीच गोष्ट, व्यक्ती किंवा क्षण पुन्हा तशाच प्रकारे आपण अनुभवू शकत नाही. एकदा का तो क्षण आपल्या हातून निसटला की, आपण त्याला कायमचे मुकतो.

Héctor García & Francesc Miralles ह्या इचिगो इचिये पुस्तकाच्या लेखकांनी ” Ikigai: The Japanese Secret To A Long And Happy Life” हे सुप्रसिद्ध पुस्तकही लिहिलंय.

 

ichigo ichie inmarathi 1

 

इचिगो इचिये ह्या पुस्तकातून त्यांनी आपल्याला ‘सुखी राहण्याची १० जपानी तंत्रे’ सांगितली आहेत. चला तर बघूया आपल्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करता येईल.

१. एखादी घटना पुढे ढकलू नका :

 

now or never inmarathi

 

आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही महत्वाची आणि विशेष असते. आपण जर असे क्षण दवडले किंवा वाया जाऊ दिले तर आपण आपल्याच हाताने जणू आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होईल.

त्यामुळे एखादी गोष्ट करायची तर ती आत्ता किंवा कधीच नाही हे कायम लक्षात ठेऊनच निर्णय घ्यायला हवा.

 

२. एखादी गोष्ट एकदाच घडणार आहे हे डोक्यात असूद्या :

 

rang de basanti inmarathi

 

रोजच आपल्या आयुष्यात काहीना काही घडत असतं, अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. कधी विचार केलाय का की, जर ही शेवटची भेट असेल तर? किंवा पुन्हा एखाद्या अनुभवाची संधीच मिळाली नाही तर? हे अगदीच होऊ शकतं

आणि म्हणूनच प्रत्येक क्षण हा पहिला आणि शेवटचा म्हणूनच जगायला आणि अनुभवायला हवा.

 

३. वर्तमानात जगा :

 

happy girl inmarathi

 

आपल्या भूतकाळातील चुकांमधून नक्कीच बोध घ्यावा मात्र त्या भूतकाळात अडकून पडू नये कारण ती गोष्ट एकदा घडून गेल्यावर आपण त्यात तिळमात्र बदल करू शकत नाही.

तसेच भविष्यात काय घडेल ह्या विचारानेही तत्काळ वर्तमानातील गोष्टी गमावून आपण भूतकाळात जमा करू. म्हणूनच फक्त ‘आत्ता’ काय घडतंय आणि काय करायला हवं ह्याकडे लक्ष्य केंद्रित करायला हवं.

 

४. अपूर्वानुभव घ्या :

 

yjhd inmarathi

 

सतत तेच करून नवीन काही घडण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणूनच अभूतपूर्व गोष्टी करण्याला प्राधान्य देत आपल्या आयुष्यात कधीही न अनुभवलेले क्षण मिळवा. हा नाविन्याचा अनुभव नक्कीच आल्हाददायक असेल.

असे अनुभव कायमस्वरूपी जपून ठेवावेत असेच असतात.

 

५. बैठकावस्थेतील ध्यानधारणा :

 

meditation inmarathi

 

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला शांत असा वेळ क्वचितच मिळतो. परंतु स्वतःसाठी आपण दिवसातली काही मिनिटं काढून बैठ्या अवस्थेत ध्यानधारणा करू शकतो.

त्यामुळे आंतरिक शांतता मिळते, मन प्रसन्न होत शीण दूर पळून जातो व हे आपल्याकरिता हितकारक असतं.

६. पंचेंद्रियांचा योग्य वापर :

 

flower inmarathi

 

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ह्या इंद्रियांचा योग्य वापर करून त्याद्वारे मिळणाऱ्या संकेतांचा, अनुभवांचा पुरेपूर वापर करून घ्या.

ह्यांचा नीट वापर केल्यास आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबाबत आपण अधिक जाणून घेऊ शकतो व तो आनंद लाखमोलाचा असतो.

जसं एखादा पिवळाधम्मक आंबा त्याच्या सुवासाने आणि चवीतील माधुर्याने आपल्याला मोहवून टाकतो.

 

७. योगायोगांकडे दुर्लक्ष करू नका :

 

mumbai pune mumbai InMarathi

 

एखादी गोष्ट जर वारंवार घडत असेल तर त्याकडे योगायोग म्हणून न पाहता त्यात दडलेला सृष्टीचा संकेत जाणून घ्यावा.

अनेकदा आपल्यासाठी उत्तम अशी परिस्थिती आपल्या भोवताली तयार होत असते आणि आपल्याला वेळोवेळी तसे संकेतही मिळत असतात.

योग्य निरीक्षणाने आपण त्या संकेतांना हेरून नवा आनंद प्राप्त करून घेऊ शकतो.

 

८. प्रत्येक क्षण जगा :

 

alia bhatt 3 inmarathi

 

एखाद्या गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी काहीतरी औचित्य शोधू नका. आलेला प्रत्येक क्षण हा विशेष औचित्य असल्याप्रमाणे आनंदात साजरा करा.

तसं केल्यास रोजच एखादा समारंभ असल्यागत आपल्याला जाणवेल.

 

९. बदल घडवा :

 

dangal inmarathi

 

एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसली तर त्यात जाणीवपूर्वक बदल घडवा. आपल्याकडे स्वतःला पुन्हा पुन्हा बदलायची आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असते.

तिचा वापर नक्कीच आपल्या आयुष्यातील गेलेली चव परत येऊ शकेल.

 

१०. प्रयास करा :

 

saina nehval inmarathi

 

सरावाने कुठलीही गोष्ट उत्कृष्ट जमू शकते आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट नीट जमेपर्यंत सातत्याने आणि नेमाने करून त्याच गोष्टीचा अभूतपूर्व असा परिणाम अनुभवा.

एखादी गोष्ट पहिल्यांदा केल्यावर आणि सरावाने, कौशल्यपूर्वक केल्यावर जाणवणारा फरक तर आपल्याला परिचित आहेच.

मित्रांनो, आयुष्य हे एकच असतं पण त्याला विविधांगांनी आपणच समृद्ध करू शकतो. सुख हे मानण्यावर आहे. त्यामुळे विविध अनुभवातून कसा आनंद लुटता येईल ह्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे.

आपले छंद जोपासले पाहिजेत, क्षमता ताणून क्षमता संवर्धन केलं पाहिजे. जसं जेवणातील चटपटीत पदार्थ जेवणाची मजा वाढवतात अगदी तसेच हे दुर्मिळ, वेगळे अनुभव आपल्या जगण्यातली मजा वृद्धिंगत करतात.

आपण स्वतः आनंदी असलो तर आपल्या आसपासही तसंच वातावरण निर्माण होऊ लागतं. काय मग करणार ना ही १० तंत्र फॉलो ? लक्षात असू द्या, ‘you only live once’ !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?