' आयुष्यात हे ७ नियम पाळलेत, तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही… – InMarathi

आयुष्यात हे ७ नियम पाळलेत, तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आत्ताच्या युगात सगळ्यांनाच यशस्वी व्हावसं वाटतं. पण, यशाचा मार्ग सोपा आहे का? हा प्रश्न जर यशस्वी व्यक्तीला विचारला तर त्याचे उत्तर “नाही” असंच मिळेल.

 

 

मग कसं मिळेल हे यश? त्यासाठी काही नियम आहेत थोडे किचकट वाटतील सुरुवातीला पण एकदा का सवय लागली की आपोआप त्यांचं पालन होईल.

ह्यासाठी काही पायाभूत तत्त्वे आहेत जी ते नियम उत्कृष्ट रितीने पाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात – त्या तत्त्वांमुळे ते नियम अर्थपूर्ण ठरतात. पण असे नियम मुख्यत्त्वे करून सामान्य माणसांसाठी गैरसोयीचे, त्रासाचे ठरतात,

तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही नियमांंचं पालन करत असाल. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींच्या आवडीनिवडी, सवयी वेगळ्या असतात, त्याप्रमाणे त्यांचे नियमही वेगळे असतात.

कोणते नियम कुठे चपखलपणे लागू होतात हे समजून घेणं जास्त क्लिष्ट असतं. त्यामुळे कुठले नियम कुठे योग्य आहेत हे समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे.

बऱ्याचश्या लोकांना ते नियम शिकणं, समजून घेणं अवघड जातं. ती लोकं एकच गोष्ट पुनः पुनः करतात आणि अपेक्षा मात्र वेगवेगळ्या परिणामांची करतात. एकदा का ते नियम,

त्यांची पायाभूत तत्त्वे नीट समजली की आयुष्यातील कितीही कठिण स्पर्धा आपण सहज जिंकू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – हुशार असणारे लोकही अयशस्वी होतात, कारण या ८ गोष्टी त्यांना सतत मागे खेचतात..!

===

व्यवहारात अंमलात आणावयाचे ते नियम कोणते आहेत ते आपण आता पाहूया.

१) आयुष्य ही एक स्पर्धा आहे

आपण सगळे आयुष्याच्या खेळाचे असे खेळाडू आहोत जे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ही गुंतागुंतीची शर्यत जिंकण्यासाठी आपापला मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत असतो.

पैसा, मान मरातब, प्रतिष्ठा, ओळख, पुढील गोष्ट उत्तम, उत्कृष्ठ व्हावी ह्यासाठी तळमळ ह्या आणि ह्यासारख्या अनेक गोष्टींसाठी मनुष्य सतत झगडत असतो.

खरं तर, आपली स्पर्धा स्वतःशीच असली पाहिजे – यशस्वी होण्यासाठी किंवा स्वत:ची उत्कृष्ट आवृत्ती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

 

 

स्वत:शी स्पर्धा असणं ही आपल्यासाठीच आरोग्यदायी गोष्ट आहे. जिंकण्यासाठी आपल्याला कुणालाही गमावण्याची गरज नाही.

स्वत: साठी मानदंड तयार करा. आपल्या स्वत: च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली स्पर्धात्मक ऊर्जा तयार करा. आपल्या यशाच्या प्रवासाचे आपणच योग्य मार्गदर्शक बना.

आत्ताच्या युगात निराशा, अपयश ह्यांसारख्या गोष्टींचे प्रमाण जास्त असले तरी त्यावर मात करण्यासाठीही अनेक उपाय आहेत.

त्यातलाच एक प्रभावशाली उपाय म्हणजे स्वतःशीच स्पर्धा! आधीपेक्षा चांगले कसे देऊ शकू यासाठी केलेला प्रयत्न नेहेमीच यशस्वी होतो.

२. यशस्वी होण्यासाठी आधुनिकतेचा वापर

एखादे पुस्तक नुसतेच लिहले, ते प्रकाशित केले नाही, तर कोणालाच पुस्तकाबाबात काहीच कळणार नाही. तेच जर ते पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं तर लोकांना त्या पुस्तकाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागेल.

म्हणजेच आपण हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेलं तरच त्या कामाची सुफळ समाप्ती झाली असे म्हणता येईल. आत्ताच्या आधुनिक युगात आपण आधुनिक माध्यमांच्या आधारे यशस्वी होऊ शकतो.

 

 

आपण स्वतंत्ररित्या काम करणारे असल्यास, व्यावसायिक असाल तर आत्ताच्या युगात जर आपण ऑनलाइन व्यवसाय चालविला तर अधिक यशस्वी होऊ शकता.

३) जीवनात यशस्वी होणारे विजेते अनेक कौशल्यांचा उपयोग करतात

आपण कोणतीही कौशल्ये आत्मसात केली तरीही ती आजीवन उपयोगी पडतात. आपण आज शिकत असलेली संबंधित कौशल्ये केवळ उद्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी वापरली जाऊ शकतात.

सध्याच्या काळात अनेक कौशल्य आत्मसात करणं अर्थात मल्टिटास्किंग खुप गरजेचं आहे.

स्वत:ला अधिक कार्यक्षम किंवा उत्कृष्ट बनवावं यासाठी नवीन कौशल्यं, एकमेकांशी संबंधित नसली तरी, आत्मसात करून घ्यावीत. मग त्यांची परस्परांशी सांगड घालून स्वतःला अधिक सक्षम आणि अष्टपैलू बनवावे.

 

 

आपल्या आवडीची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी थोडा वेळ आणि थोडेसे पैसे खर्च केले तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या लढाईला, संघर्षाला तोंड देण्यास नक्कीच मदत करेल.

===

हे ही वाचा – ‘टिपिकल मिडलक्लास’ माणसासाठी या १३ टिप्स जीवन-मरणाचा फरक ठरू शकतात!

===

४) आयुष्याच्या लढाईत तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवा

थ्री इडियट्स मधले प्रोफेसर विरु सहस्रबुद्धे आठवतोय?

 

 

लाईफ इज रेस हे त्यांचंं वाक्य अमिर खानसह सगळ्यांनी गिरवलं, तेव्हा विनोद म्हणून वापरलं जाणारा हा संवाद सध्या काही अंशी खरा ठरला आहे.

आयुष्यातील स्पर्धा अमर्याद! आपल्या दैनंदिन निवड आणि गरजा प्रत्येक क्षणी बदलत आहेत.

कधी आपण आनंदी असतो तर कधी असमाधानी! कधी आपण परिपूर्ण असतो तर कधी कोणतीतरी गोष्ट अपूर्णच राहते. मग ती निराशा, अपूर्णता दूर करण्यासाठी आपण एखादे कौशल्य वापरू शकतो. म्हणजेच आपल्याला आवडती गोष्ट शिकण्याचा आपण प्रयत्न करा.

आपल्यापैकी बहुतेकजण आयुष्यात साचेबद्ध चाकोरीत जगत आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्यासाठी सर्वोत्तम भाग निवडला पाहिजे.

काम, जबाबदारी हे सगळं पेलताना तुम्हाला आवडणारा छंद, एखादी सहल किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तींबरोबर घालविलेला वेळ या गोष्टी पुढील अनेक दिवसांसाठी पॉझिटिव्ह शक्ती देऊन जातात.

५) आपला आनंद आपल्यावरच अवलंबून आहे

दुसऱ्यांनी तुम्हाला आनंदी करावे अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतःच स्वतःला आनंदी ठेवले तर कधीच अपेक्षाभंग होणार नाही.

 

 

दुसरा कोणी येईल आणि आपल्याला आनंदी करेल ही अपेक्षाच चुकीची आहे. मूळात आपल्याला कशामुळे आनंद मिळतो हे दुसरा का ठरवेल?

दुसऱ्यापेक्षा आपण स्वतःच आपला आनंद कशात आहे हे जास्त समजू शकतो त्यामुळे आपणच आपल्या आनंदाचे मार्ग शोधले पाहिजेत.

६) आनंद कसा अनुभवायचा?

आता आपला आनंद आपणच शोधायचा, आपणच आपल्याला खूश करायचं हे सगळं ठीक आहे पण, हा आनंद नेमका कशात आहे हे समजणंही गरजेचं आहे,

हो ना?  मग हा आनंद म्हणजे नुसतेच आऊटिंग किंवा बोनस ह्यापुरता मर्यादित आहे का? साहजिकच ह्याचे उत्तर “नाही” असेच येईल.

आपल्याला एखाद्या गोष्टीचा छंद आहे जसे; एखाद्याला संगीत खूप आवडतं आणि तो जर तणावाखाली असेल तेव्हा त्याने जर सुगम संगीत ऐकलं तर त्याचा तणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते.

 

 

छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा शोधायचा हे ज्याला कळले तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल.

७) संकटाला धीराने तोंड देणं

आयुष्य म्हटलं की त्यात संकटं येणार हे आपण गृहितच धरून चालायचं. ह्या संकटांना धीराने तोंड देणं हेही एक कौशल्य आहे. त्यामुळेच यशाचा मार्ग जर सोपा बनवायचा असेल तर मार्गात येणारे अडथळे दूर करणं गरजेचं आहे.

 

 

जर आयुष्यात एखादे संकट आले तर डगमगून न जाता, धीर न सोडता त्यावर मात करायला शिकले पाहिजे. सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून, जीवन जगताना उमेद बाळगणे आणि प्रयत्न न सोडणे हेही एक मोठे कौशल्य आहे.

हे ७ नियम तसे पाहिले तर कठीण, क्लिष्ट, गुंतागुंतीचे आहेत पण एकदा का त्यांच्या पालनाची सवय झाली तर आयुष्यात यश हमखास मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?