' चित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच

चित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मानवी जीवनात कला, संगीत, शास्त्र ह्यांना खूप महत्व आहे. ह्याच्या शिवाय मानवी जीवन आपण कल्पनाच करू शकत नाही. प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असतेच कोणाला संगीत आवडते, कोणाला नृत्य, तर कोणाला गायन आवडते.

मला चित्रपट पाहणे आवडते. कुठले चित्रपट बघावे आणि कुठले नकोत असं काही मी ठरवत नाही. “चित्रपट पाहणे” अशी माझी आनंदाची अजून एक व्याख्या आहे. 😀

सहसा बरेच चित्रपट हे “लार्जर दॅन लाईफ” दाखवले जातात – म्हणून बरेच जण असं म्हणतात कि चित्रपटाचा समाजावर प्रभाव राहतो. तर बरेच लोक याच्या विरुद्ध, म्हणजे चित्रपटाने समाजावर प्रभाव पडत नाही असं हि मानतात. अलीकडेच सैराट या चित्रपटाच्या निमित्ताने ही चर्चा जास्ती रंगलेली होती.

सलमान ने कपडे उतरवून बॉडी दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्या लोकांनी त्याची बॉडी बिल्ड पाहून जिम लावून तशी बॉडी बिल्ड केलेली आम्ही पाहिली आहे. तसेच संजय दत्त चे मोठे केस असोत किंवा शाहरुख चे सिगारेट पिण्याची स्टाईल असो किंवा तेरेनाम चा हेअर कट असो – लोकांनी ह्या सर्वातून प्रेरणा घेतलीच! लोकांनी अगदी “डर” मधील शाहरुखच्या व्यक्तिरेखेला सुद्धा फॉलो केले आहे. तर ह्याच्या विरुद्ध स्वदेश शहीद भगतसिंह, सरफरोश, सिंघम, रंग दे बसंती पाहून प्रभावित झालेले तरुण सुद्धा आम्ही पाहिले आहेत.

खरंतर हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. माणसाची वृत्ती जशी असेल, त्याला साजेश्या गोष्टी तो चित्रपटांतून (किंवा पुस्तक-नाटक इ मधून) तो उचलतो आणि तशी कृती करतो.

कधीकधी चित्रपट पाहून – तुम्ही दुःखी व्हाल, आनंदी व्हाल, विचार कराल, थकून जाल, भावनिक होऊन रडाल सुद्धा…!

 

असं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही त्या चित्रपटातल्या भूमिकेत स्वतःला पाहता…त्याशी एकरूप होता…!

असं जेव्हा जेव्हा होतं – तेव्हा समजून जा कि चित्रपट यशस्वी झालेला आहे…!

बऱ्याचदा चित्रपटांचा आपल्यावर पडणारा प्रभाव अश्या काही गोष्टींवर ठरतो जो त्या चित्रपट निर्मितीशी निगडित नसून, आपल्यावर अवलंबून असतो. त्या गोष्टींची आपण काळजी घेतली, तर आपण चित्रपट एन्जॉय करू शकतो.

चित्रपट बघायचा निखळ आनंद घेण्यासाठी खालील काही गोष्टी करणे आवशक्य आहे –

१) चित्रपट रिव्ह्यू वाचून किंवा ऐकून बघू नका, चित्रपट बघून स्वतःच मत ठरवा. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. मुळात चित्रपटाला रिव्ह्यू , स्टार रेटिंग हे मला पटत नाही, ते खरंच जेन्युअन असतं कि पेड असतं हाच मोठा प्रश्न आहे.

२) चित्रपट नेहमी चांगल्या क्वालिटी प्रिंट मध्ये बघा — तरच तुम्ही अंतर्मुख व्हाल…!

3) काही चित्रपट हे फक्त टॉकीज (मोठी स्क्रीन) मध्ये बघण्यासाठी असतात. उदाहरणार्थ युद्धपट, 3D चित्रपट, ऍनिमेशन. असे चित्रपट टीव्ही/लॅपटॉप/मोबाईलवर बघण्याची चूक करू नका!

"अवतार" चित्रपटातील एक प्रसंग
“अवतार” चित्रपटातील एक प्रसंग

४) चित्रपट ब्रेक घेत बघू नका, एका दमात बघा, लिंक तुटली कि मजा जाते

५) हॉलिवूड, टॉलिवूड चे चित्रपट शक्यतो मूळ भाषेत सब-टायटल वापरून बघा, डबिंग ऐकणे टाळा (डबिंग हा खूपच फनी प्रकार असतो) डबिंग मध्ये अनेकदा विषयाचे गाम्भीर्य जाते.

६) जमल्यास चित्रपट हेडफोन लावून बघा, भारी फील येतो…!

७) चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपट चांगला किंवा वाईट ठरवता येत नाही, काही अंदाज चुकतात.

८) एक प्रेक्षक म्हणून स्वतःला चित्रपटाच्या कॅटेगरी मध्ये बांधून ठेऊ नका. शक्यतो सर्व प्रकारचे (ऐतिसाहिक, युद्धपट, ऍक्शन, प्रेम कथा, कॉमेडी, साय-फाय, ऍनिमेशन, माहितीपट) चित्रपट बघायचा आनंद घ्या. प्रत्येक चित्रपट वेगळ्या प्रकारे मांडलेला, सादर केलेला असतो. प्रत्येकातून संदेश मिळेलच असं नसतं – पण निरनिराळे विषय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे enrich, संपन्न करतात.

९) अमेरिकन, कोरियन, जापनीज, चिनी चित्रपट विशेष असतात. हे लोक खूप वेगवेगळे विषय हाताळतात. YouTube वर असे चित्रपट आढळतात.

तर…वरील गोष्टी करून बघा…तुमच्या चित्रपट आस्वादाचा स्तर नक्कीच उंचावलेला तुम्हाला जाणवेल…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “चित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच

  • July 23, 2019 at 12:05 pm
    Permalink

    मोठ्या पडद्या वर हेडफोन लावून कसा चित्रपट बघता येईल ? किंवा हेडफोन बर्यापैकी होम थेटर पेक्षा बरा वाजेल का ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?