' ‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास! – InMarathi

‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गुलज़ार यांचा जन्म भारतातल्या झेलम जिल्ह्यातील दीना ह्या गावी झाला जे आत्ता पाकिस्तानात आहे. फाळणीच्या वेळी त्यांचा परिवार अमृतसर येथे स्थायिक झाला.

१८ ऑगस्ट १९३६ रोजी जन्मलेल्या गुलज़ार ह्यांचे मूळ नाव सम्पूर्ण सिंह कालरा असे आहे.

इतर अनेक लोकांप्रमाणेच आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुम्बई मध्ये दाखल झाले. वरळीच्या एका गॅरेज मधे मेकॅनिक म्हणून ते काम करू लागले आणि फावल्या वेळात कविता करण्याचा छंद त्यांनी जोपासला.

 

old gulzar inmarathi
bollywoodirect

 

खरं तर कविता लिहिण्याचा त्यांचा छन्द त्यांच्या वडिलांना आणि भावाला मुळीच आवडत नसे.

गुलज़ार ह्यांची ते सतत ‘वेळ वाया घालवतो’ अशी निर्भत्सना करीत असत. अखेर गुलज़ार दीनवी या टोपण नावाने लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. नंतर केवळ गुलज़ार ह्या छोट्याशा, सुटसुटीत आणि चपखल नावाने काव्ये करण्यास सुरुवात केली.

गुलज़ार ह्यांचे व्यक्तिमत्त्व एकदम साधे! चेहेर्यावर कायम प्रसन्न स्मित, त्यांचे स्मितहास्य पाहून बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटते. साधा, स्वच्छ झब्बा लेंगा त्यांचा साधेपणाच दर्शवतो!

 

gulzar mic inmarathi
dumkhum

 

अनेक वर्षांनंतर १९६३ मध्ये त्यांना ‘बंदिनी’ ह्या चित्रपटामध्ये गीतकार म्हणून संधी मिळाली. पहिलाच चित्रपट आणि संगीतकार एस्.डी.बर्मन!

अर्थात् ह्या पहिल्याच चित्रपटातून गीतकार म्हणून गुलज़ार नावारूपाला आले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही! गुलज़ार ह्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली.

 

bandini inmarathi
YouTube

 

हिन्दी चित्रपटसृष्टीला एक नवा तारा मिळला.आर.डी.बर्मन, सलिल चौधरी, विशाल भारद्वाज आणि ए.आर. रेहेमान ह्या संगीतकारांसोबतची  त्यांची गीते विशेषकरून गाजली.

खरं तर हिन्दी चित्रपटांचे गीतकार एवढीच त्यांची ओळख नाही! कवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्देशक आणि नाटककार असं हे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व!

त्यांच्या हिन्दी आणि ऊर्दु रचना प्रसिद्ध आहेत, पण ब्रज भाषा, खडी बोली, मारवाडी आणि हरयाणी भाषेतही त्यांच्या रचना आहेत. इतकेच नाही तर ‘त्रिवेणी’ ह्या छन्दाची त्यांनी व्युत्पत्ती केली.

 

trveni inmarathi
petry hub saavan

 

चित्रपट निर्माता ही भूमिकादेखील त्यांनी सहजतया पेलली.

परिचय (१९७२), कोशिश (१९७२), अचानक (१९७३), ऑंधी (१९७५), खुशबू (१९७५), मौसम (१९७५), अंगूर (१९७५), लिबास (१९८८),माचिस (१९९६) आणि हुतुतु (१९९९) ह्या चित्रपटांच्या निर्मितीची धुरा गुलज़ार साहेबांनी सांभाळली होती.

त्यांनी अनेक दूरदर्शन मालिकांसाठी गीते आणि संवाद लेखन केले. जंगल बुक, ऍलिस इन वंडरलॅंड, हॅलो ज़िंदगी, गुच्छे और पोटली ह्यासारख्या मालिकांसाठी त्यांनी लेखन केले.

 

gulzar movies inmarathi
boloji.com

 

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या ‘मिर्झा गालिब’ ह्या मालिकेचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ह्याशिवाय ‘ताहिर मुन्शी प्रेमचन्द की’ ह्या मालिकेचेही त्यांनी दिगदर्शन केले.

इ.स. १९७१ मध्ये त्यांनी ‘गुड्डी’ ह्या चित्रपटासाठी गीते लिहिली. त्यातील ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना आजही म्हटली जाते.

गुलज़ार ह्यांची काव्ये केवळ लोकप्रियच नाहीत तर अजरामर आहेत. त्यामागे त्यांची लेखनशैली आहे. केवळ सोप्या रचनाच नाही तर सोप्या शब्दातून हॄदयस्पर्शी भाव निर्माण केल्यामूळे सर्वसामान्य लोकांना ते आपलेच काव्य वाटते.

 

guddi inmarathi
Youtube

 

त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. सुरूवातीला ते गुप्तहेरकथा वाचत. जिथून ते पुस्तके घेत असत तिकडे त्यांना एक दिवस असे पुस्तक मिळाले ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

असा उल्लेख त्यांनी स्वतः केला आहे आणि ते पुस्तक म्हणजेच गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर ह्यांचे ‘The Gardner’!

 

the gardener inmarathi
amazon.in

 

१९७३ मध्ये आलेल्या ‘कोशीश’ ह्या चित्रपटाची कथा एका मूक-बधीर जोडप्यावर आधारित होती. चित्रपटाला न्याय देण्यासाठी गुलज़ार साहेब मूकबधीरांची सांकेतिक भाषा स्वतः शिकले.

त्यांनी मूकबधीरांच्या व्यथा जाणल्या आणि तेव्हापासून ते मूकबधीर मुलांसाठी काम करू लागले. ‘कोशीश’ साठी त्यांना उत्कृष्ठ पटकथा पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.

 

koshish inmarathi
amazon.com

 

गुलज़ारांनी बिमल राय आणि हृषिकेश मुखर्जी ह्यांच्या बरोबर अनेक चित्रपटांसाठी काम केले. गुलज़ार साहेब त्या दोघांना गुरुस्थानी मानत.

साहजिकच बंगाली रितीरिवाजांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. बंगाली लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम, जिव्हाळा सतत दिसून येई. त्यांनी विवाह केला तोही ‘राखी’ ह्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीशी!

ह्या दांपत्याला एक मुलगी – मेघना गुलज़ार! आई-वडीलांबरोबर आनंदात बालपण घालवल्यावर मेघना फिल्ममेकिंग मधे पदवी प्राप्त करण्यासाठी न्यु यॉर्क मधे गेली.

 

gulzar family inmarathi
topyaps

 

पदवीधर झाल्यावर पुन्हा भारतात येवून तिने चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. फिलहाल, जस्ट मॅरिड्, दस कहानियॉं, तलवार, राज़ी, छपाक् ह्यासारखे दर्जेदार चित्रपट तिने दिग्दर्शित केले. ह्यांतील ‘छपाक्’ साठी स्वतः गुलज़ार ह्यांनी गीते लिहिली.

 

raazi inmarathi
hindi news

 

गुलज़ार साहेबांची निर्मिती असलेल्या ‘हुतुतु’ सारख्या उत्कृष्ठ कलाकृतीला प्रेक्षकांनी नाकारले. चित्रपटाला अजिबातच यश मिळाले नाही.

गुलज़ार साहेबांसाठी ही गोष्ट एकदमच अनपेक्षित होती. त्यांना तो धक्का सहन झाला नाही. त्यांना नैराश्याने घेरले. ह्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना मदत केली ती त्यांच्या मुलीने – मेघना गुलज़ारने!

 

hututu inmarathi
YouTube

 

खरं तर एखाद्या कवीच्या कवितांमधे कोणती कविता सर्वश्रेष्ठ आहे हे ठरविणे अयोग्यच! एखादी विस्मृतीत गेलेली कविता किंवा गीत त्या कवीच्या दृष्टीकोनातून त्याची सर्वश्रेष्ठ रचना असू शकते.

त्यामुळे गुलज़ार साहेबांचेही सर्वोत्कृष्ठ काव्य ठरविणे अयोग्यच!

इ.स. १९७१ ते आजतागायत गुलज़ार साहेबांची गीते तेव्हा जेव्हढी लोकप्रिय होती तशीच आजचीही गीते लोकप्रिय आहेत, म्हणजेच त्यांची काव्ये केवळ कालातीतच नाहीत तर काळाबरोबरचीही आहेत.

कवी गुलज़ारांच्या सहज, सोप्या शब्दांना विशाल भारद्वाज यांनी दिलेल्या तितक्याच सहज, सोप्या संगीताने अजरामर झालेले एक गीत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर अजुनही आहे!

ते कुठेही, कधीही लागले तरीही डोलावेसे वाटते असे गीत म्हणजे ‘चड्डी पेहेनके फूल खिला है’ हे जंगल बुक चे शीर्षक गीत! ते विस्मृतीत जाणे केवळ अशक्यच!

 

jungle book inmarathi
the other side

 

अनेक पुरस्कार मिळालेल्या गुलज़ार ह्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो डॅनी बोयल दिग्दर्शित, ए.आर.रेहेमान ने संगीत दिलेल्या २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘slumdog millionaire’ या चित्रपटाने!

ह्या चित्रपटातील ‘जय हो’ ह्या गाण्यासाठी ‘ best original song’ Oscar award आणि Grammy award ह्यामुळे!

याशिवाय २००२ मधे साहित्य अकादमी, २००४ मधे पद्मभूषण, २०१३ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार हे त्यांच्या कलेचा गौरव करणारेच पुरस्कार ठरले.

 

gulzar inmarathi
the national

 

मनातल्या भावनांच्या कल्लोळांना शब्दरूप देणारे गुलज़ार! ह्यांच्या काव्याची धाटणीच वेगळी आहे. ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी’ ह्या गाण्याची गम्भीरता, औदासिन्य अन्तर्मनाला ढवळून टाकते तर ‘जंगल जंगल बात चली है’ हे गीत हलकेच स्मित उमटविते!

तर हळुवारपणे मनातल्या तरल प्रेम भावना दर्शविणारे ‘मोरा गोरा अंग लै ले’ हे प्रणयगीत! सर्व प्रकारच्या छटा असणार्या त्यांच्या काव्यातून त्यांची प्रतिभाशक्ति, शब्दांवरची पकड ठळकपणे दिसून येते.

म्हणजेच अफाट शब्दसंपत्ती त्याबरोबरच भावनांची योग्य सांगड ह्यांच्या दैवी देणगीमुळे गुलज़ार ह्यांनी आपल्या काव्यातून प्रत्येक भाव उमटविले!

 

gulzar happy inmarathi
bollywoodirect

 

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त करण्याचे काव्य हे माध्यम तितकेसे सोपे नाही तरीही गुलज़ार ह्यांची काव्यवैविध्य प्रत्येक वेळी दिसून येते.

विरह गीते, प्रणय गीते, बालगीते ह्यांसारखे भाव असणारे काव्य त्यांच्या लेखणीतून उमटले आणि तेच काव्य रसिकांच्या मनावर जादू करणारे ठरले.

कवी गुलज़ार ह्यांनी शब्द नाही तर भावना लिहिल्या. त्यांच्या काव्यातून सर्वसामान्य लोकांना सहजपणे व्यक्त करता येत नाहीत त्या भावना प्रकट होतात. त्यामुळेच त्यांचे काव्य लोकप्रिय ठरते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?