' भारत दौऱ्यावर येणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारची ११ वैशिष्ट्यं बघाच! – InMarathi

भारत दौऱ्यावर येणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारची ११ वैशिष्ट्यं बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी पासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत.राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.त्यांच्या सोबत पत्नी मेलनिया ट्रम्प सुद्धा असतील.

गुजरातला भेट देणारे ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत.

 

donald trump inmarathi
hindustan

अहमदाबादला विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच स्वागत करतील. त्यानंतर अहमदाबादेतल्या रस्त्यावरून भव्य रोड शो करत दोन्ही नेत्यांचा काफीला साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली देण्यासाठी थांबेल.

 

sabarmati inmarathi
traveltriangle

 

आश्रमात ट्रम्प ह्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तके, एक चरखा आणि चित्रे भेट देण्यात येणार आहेत.

त्यानंतर ते अहमदाबाद जवळील मोटेरा मधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उदघाटन करतील. ह्या स्टेडियम पुनर्निर्मिती चे कार्य २०१५ ला सुरू झालं पूर्वी ५०००० च्या जवळपास आसन क्षमता असणाऱ्या ह्या मैदानावर आता ११०००० प्रेक्षक सामावू शकतील.

जवळ पास ७५० करोड रुपये खर्च करून स्टेडियम ला अत्याधुनिक बनवण्यात आलं आहे.

 

motera stedium inmarathi
the economic times

 

पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर असताना Howdy Modi! नावाचा कार्यक्रम केला गेला होता त्याच धर्तीवर मोटेरा मधील सरदार पटेल स्टेडियम वर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

ह्यात सांस्कृतिक तसेच बॉलिवूड कलाकारांचे काही शो होतील. ह्या कार्यक्रमासाठी नवीन मैदान संपूर्ण भरण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे.

 

howdy modi inmarathi
the financial express

 

दुपारच्या खास भोजनानंतर दिल्लीस जाण्यापूर्वी प्रेसिडेंट आगऱ्याच्या ताज महाल ला भेट देतील. ट्रम्प दाम्पत्य जवळपास ४५ मिनिटे ताज मधे असतील. संध्याकाळी ते दिल्ली साठी रवाना होतील.

ट्रम्प यांच्या सुरक्षा टीम ने सोमवारीच आग्र्यात येऊन सुरक्षेचा आढावा घेतला.

२५ फेब्रुवारी मंगळवारी ,राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी राष्ट्रपती भवनला भेट देतील. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नीक त्यांचं स्वागत करणार आहेत.

 

ramnath kovind inmarathi
patrika

 

त्या नंतर प्रेसिडेंट राज घाट वर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना नमन करतील.

दुपारी हैद्राबाद हाऊस येथे मोदी आणि ट्रम्प ह्यांच्या मधे बातचीत होईल. दोन्ही देशांचे मंत्री गण आणि अधिकारी ह्यांची बैठक नियोजित आहे.

त्याच प्रमाणे देशातील बड्या कंपन्यांचे प्रमुख ,ट्रम्प आणि त्यांच्या शिष्टमंडळाला अमेरिकन एम्बस्सीत भेटतील. ह्याच दरम्यान फर्स्ट लेडी मेलनिया ट्रम्प दिल्लीतल्या शाळेस भेट देउन तिथली शैक्षणिक पद्धत जाणून घेतील.

 

meliana trump inmarathi
snopes.com

 

रात्री ८ च्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या करता राष्ट्रपती कोविंद यांनी आयोजलेल्या खास भोजन समारंभात शामिल होतील.
त्या नंतर रात्री १० च्या दरम्यान प्रेसिडेंट शिष्टमंडळासह अमेरिकेकरिता रवाना होतील.

ट्रम्प यांच्या ह्या भारत दौऱ्यात ते बरेचदा रस्त्याने प्रवास करणार आहेत. जगातील सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्षाच्या सारथ्य करत असेल ती त्यांचीच कार म्हणजे – The Beast!

बाहेरील देशात रस्ते प्रवासासाठी ट्रम्प ह्यांच्या दिमतीला हीच कार असते.

२४ सप्टेंबर २०१८ ला ह्या कारचं उदघाटन झालं होतं आणि तेव्हापासूनच ही ट्रम्प ह्यांच्या ताफ्यात दाखल झाली.

 

limo beast inmarathi
lallantop.com

 

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाहेरील राष्ट्रात रस्त्याने प्रवास करताना त्यांच्या खास सुरक्षेसाठी ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास डझनभर सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. ट्रम्प येण्यापूर्वीच त्यांची ही कार भारतात दाखल पण झालीये!

चला तर मग जाणून घेऊ हिची वैशिष्ट्ये,

मॉडेल:-लिमोझीन
कंपनी:- कॅडिलिक, जनरल मोटर्स
किंमत:- जवळपास, १०.७ करोड

१) ह्या कारच्या आठ इंच जाडीच्या भिंती ह्या मिलिटरी ग्रेड आर्मर च्या बनलेल्या आहेत.कार च गेट हे बोइंग ७५७ जेट (विमानाच्या)कॅबिन च्या गेट एवढं जड आहे!

२)खिडकीचं आवरण सुद्धा ५ प्रकारच्या स्तरांचं बनलंय.ज्यात काच आणि पॉलिकार्बोनेट चा वापर केलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे The Beast च्या खिडक्या बुलेट प्रूफ आहेत.

 

trump inmarathi
history garage

 

३)ट्रम्प ,ह्या कारच्या मागच्या भागातल्या कंपार्टमेंट मध्ये बसतात. हा भाग चालकाच्या भागापासून काचेच्या दरवाजाने बंद केला आहे आणि ह्या काचेला खाली करण्याचं स्वीच केवळ राष्ट्राध्यक्षांकडेच आहे.

 

the beast inmarathi
the hardware zone

 

४)ट्रम्प यांच्या आसनाजवळच एक सॅटेलाईट फोन आहे. हा फोन अमेरिकन उपराष्ट्रपती आणि संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंट्यागॉन सोबत प्रत्यक्ष जोडला गेलाय.

५)The Beast अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त आहे जसे की, शॉटगन,अश्रू धुराचे बॉम्ब. कारच्या हेडलाइट च्या खालील बाजूस तर अश्रू धुराचे ग्रेनेड लाँचर सुद्धा आहे!

६)राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाचं रक्त पण कार मधे उपलब्ध असतं. आणीबाणी च्या परिस्थितीत कार च्या आत प्राणवायू(ऑक्सिजन) चा पुरवठा करण्याची ही सुविधा आहे.

७)कारचे दरवाजे इतके मजबूत आहेत की रासायनिक हल्ला जरी झाला तरी आत बसलेल्या व्यक्तीच्या नखाला सुद्धा धक्का पोचणार नाही.

८)कारची खिडकी केवळ चालक (ड्रायव्हर) उघडू शकतो आणि ती पण केवळ तीन इंच! कार वर कुठल्याच बॉम्ब हल्ल्याचा परिणाम होत नाही तसेच हिचे टायर्स सुद्धा कधीच पंक्चर होत नाहीत.

 

beast test inmarathi
GTA5-mods.com

 

९)ट्रम्प च्या ह्या लाडक्या The beast मधे पुढल्या बाजूस कॅमेरे लावले आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात सुद्धा हे काम करतात.

१०)चाकांना स्टील ची रिम लावण्यात आलीये जेणेकरून टायर कितीही नुकसान झालं तरी कार सुरक्षित चालू शकेल!

११) The Beast च्या चालकाला अमेरिकेची सिक्रेट सर्विस प्रशिक्षण देते. प्रतिकूल परिस्थितीत कार चालवणे,हल्ल्याच्या स्थिती मधे सुद्धा गाडी ला सुरक्षित घेऊन जाण्याचं विशेष ट्रेंनिग असतं.

१२)डिझेल इंजिन असलेल्या ह्या कार चा मायलेज मात्र ३ किमी प्रति लिटर इतकाच आहे. ह्याच प्रमुख कारण म्हणजे कारचं असलेलं वजन आणि आकार.

हवाई यात्रेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष एअर फोर्स वन चा वापर करतात.हे एक प्रकारचं हवेत उडणार ‘व्हाइट हाऊस’ च जणू!

Air force one अण्वस्त्र हल्ल्यांना सुद्धा तोंड देऊ शकतो! ह्या विमानावर हॉलीवूड ने एक चित्रपट सुद्धा काढला होता.

 

airforce one inmarathi
quartz

 

The Beast आणि Air Force One व्यतिरिक्त अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच एक अधिकृत हेलिकॉप्टर सुद्धा आहे त्याच नाव आहे Marine One.
ट्रम्प यांचं osprey MV-22 नावाचं एक एस्कॉर्ट एअर क्राफ्ट पण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?