ज्या एका मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेट कायमचं बदललं – ते संपूर्ण नाट्य चित्रपटाला लाजवेल असं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतीय क्रिकेटचा बट्ट्याबोळ करणारी घटना म्हणजे मॅच फिक्सिंग.!

 

digitalsporty

 

मोहम्मद अझरुद्दीन,अजय जडेजा सारखे स्टायलिश खेळाडू यांचं क्रिकेट करियर उध्वस्त झालंच पण फिक्सर म्हणून कायमचा डाग त्यांच्यावर रेखांकित झाला.

सध्या २००० साली झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका सिरीज च्या मॅच फिक्सिंग कांड मधला मुख्य आरोपी संजीव चावला याला सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी पर्यंत १२ दिवसांची पोलीस कस्टडी मध्ये ठेवलेलं आहे.सो तिहार मध्ये सध्या तो भरती आहे.

अन म्हणूनच सध्या मार्केट मध्ये फिक्सिंग चा विषय पुन्हा चर्चेला आलेला आहे.

 

OBN

 

इम्रान हाश्मीचा जन्नत सिनेमा,विवेक ओबेरॉय-रिचा चड्डा यांचा इन साईड एद्ज ही वेब सिरीज यांच्या माध्यमातून फिक्सिंग म्हणजे नेमकं काय आणि ती कशी केली जाते हे जवळजवळ सगळ्या क्रिकेटप्रेमी ऑर क्रिकेट मध्ये इंटरेस्टड आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल.

पण संजीव चावलाचं मॅच फिक्सिंग आणि दिल्ली पोलिसांनी याचा छडा कसा लावला ऑर त्यांना छडा कसा लागला याची स्टोरी अतिशय रंजक आहे.

भारतात तसं पाहिलं तर बेटिंग,सट्टा या कायद्याने गुन्हा असलेल्या गोष्टी.ज्या पैशांचा मार्ग हा सगळे नियम धाब्यावरून बसून निर्माण होत असतील तर अफकोर्स कायद्यात याला गुन्हा म्हणून कलम आहेत आणि त्याला अनुसरून शिक्षा सुद्धा.

तरी झटपट पैसा कमवायचा म्हणून या मार्गाला बरेच जण येतात.

झालंही तसंच,

मूळ पंजाबी असलेला दिल्ली बेस बिझनेसमॅन संजीव चड्डा. वडिलोपार्जित व्यवसाय असताना पैशाच्या हव्यासापोटी बेटिंग मध्ये शिरला आणि मॅच फिक्स करायला लागला.

 

the news 21

 

भरपूर पैसा,लोकांची पैसा ओतायची असलेली क्षमता. आपोआप तो इथे आकर्षित झाला.

सो बेटिंग करायची म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टी वर पैसा लावला जायचा. उदाहरण द्यायचे म्हणजे फॉर्म मध्ये असलेल्या प्लेयर ची लवकर विकेट, फेव्हरेट टीमचा पराभव वगैरे.

पण त्यासाठी ड्रेसिंग रूमच्या आत काय चालले आहे ते समजणं महत्त्वाचं होतं.

तर, संजीव चावला डायरेक्ट खेळाडूशी संपर्क साधत होता आणि होणाऱ्या ठरावावर तो आपल्या बुकी मित्रांकडून पैसे लावायचा.

 

india.com

 

बुकी खेळाडू विकत घ्यायची म्हणण्यापेक्षा खेळाडू विकून जायला तयार व्हायचे.!

दुसरं नाव कासीम बेंजो.

मूळ भारतीय ओरिजिन असलेला कासीम बेंजो हा जोहान्सबर्ग मधला प्रसिद्ध मिठाईवाला.!

तसेच दक्षिण आफ्रिकेत व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असल्याने याचं दक्षिण आफ्रिकेतल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीसोबत उठणं बसणं होत.

या कासीम बेंजो ने संजीव चावलाची ओळख करून दिली दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए सोबत.!

 

 

youtube

 

अन चावलाने पहिल्याच भेटीत त्याला एक लाख डॉलर दिले.

२००० च्या काळात विचार करा एक लाख डॉलर म्हणजे किती मोठी रक्कम होती.

तर क्रोनिएचं का.?

१९९९ च्या वर्ल्डकप मध्ये बाऊचरच्या एका चुकीमुळे डार्क हॉर्स दक्षिण आफ्रिका खेळाच्या बाहेर पडली,अन जगाच्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात त्यांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता.

आणि क्रोनिए हा ऐशो आरामचं जगणं जगण्यासाठी धडपड करत होता. संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये तो याच गोष्टी साठी कुप्रसिद्ध होता.

त्यामुळे याला बकरा बनवायला चावलाला अजिबात वेळ नाही लागला.

 

pinterest

 

एका फटक्यात हातात एक लाख डॉलर.!

रक्कम कमी जास्त व्हायची पण क्रोनिएला वेळेवर त्याची अमाऊंट पोहोचायची.

हे झालं बेटिंगचं. पण नेमका दिल्ली पोलिसांना याचा सुगावा लागला तरी कसा.?

तर झालं असं,

१९९९ पर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई मधलं अंडरवर्ल्डचं नेटवर्क उद्धवस्त करून टाकलेलं. पण तरी बॉलिवूड मध्ये असलेले अंडरवर्ल्डचे हस्तक अजून कार्यरत होते.

राकेश रोशन वरील सांताक्रूझ मध्ये त्यांच्या ऑफिस मध्ये झालेला हल्ला असो किंवा कॅसेट किंग टी-सिरीजचे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांनी खंडणी साठी झालेली हत्या, हे सगळं जगजाहीर आहे.

 

bollywood dadi

 

खंडणीसाठी धमक्याचे फोन बॉलिवूडकराना जातच होते. गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर टी-सिरीज ची सगळी सूत्र त्यांचा भाऊ क्रिशन कुमार यांच्याकडे आली.

क्रिशन कुमार आणि संजीव चावला हे चांगले मित्र.!

दिल्ली पोलिसांना खबर लागली की खंडणी साठी अंडरवर्ल्ड मधून दिल्लीला कोणाला तरी फोन फिरले जात आहेत.

गुलशन कुमार यांनी खंडणी द्यायला नकार दिला म्हणून त्यांची हत्या झालेली. तिच भीती घालून क्रिशन कुमार यांच्या कडे परत खंडणी साठी फोन येत असतील असा दिल्ली पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.

 

daily moniter

 

आणि अँज युज्वल क्रिशन कुमार यांचा फोन दिल्ली पोलिसांकडून टॅप होऊ लागला.

दोन हफ्ते टॅपिंग करून विशेष अस काही न मिळाल्यामुळे पोलिसांनी आता क्रिशन कुमार यांच्या संपर्कात असलेल्या व्यावसायिकांचे फोन टॅप करायला घेतले.

आणि त्यात संजीव चावलाचा फोन सुद्धा टॅप होऊ लागला.

संजीव चावलाचा फोन टॅप करणाऱ्या कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसांना मे बी क्रिकेट मध्ये तेवढा रस नसावा.

हॅन्सी क्रोनिए आणि संजीव चावला यांचं इंग्रजी मध्ये असलेलं संभाषण त्यांनी ऐकलं पण कॅच सोडली, कॅच पकडली, मिस फिल्ड झाली सारख त्यांच्या डोक्यावरून जायला लागलं.

आणि त्यांनी याची रिपोर्ट आपल्या वरीष्ठ अधिकारी डीसीपी श्रीवास्तव यांना दिली. क्रिकेट रसिकांमधली चर्चा असेल म्हणून त्यांनी नंतर घरी जाऊन रेकॉर्डिंग ऐकेन सांगून कॅसेट घरी घेऊन गेले.

 

labguys world

 

आणि सगळा खेळ उघडा पडला तो इथे.!

आफ्रिकन अँकसेन्ट मध्ये बोलत असलेली व्यक्ती संजीव चावलाला सगळं वृत्त देत होता,सोबत पुढच्या मॅच ला काय होणार काय नाय याची माहिती देत होता.

आणि स्पॉट फिक्सिंगचा खेळ भारतात सुरू असल्याचं डीसीपी श्रीवास्तव यांना कळून चुकलं.

डीसीपी श्रीवास्तव यांना तो आफ्रिकन अँकसेन्ट मध्ये बोलणारी व्यक्ती शोधून काढायला जास्त वेळ लागला नाही.

आज आपण सहज बोलून जातो, की मॅच फिक्स केलेली,खेळाडू ने मुद्दामहुन विकेट टाकली किंवा विकेट सोडली.कॅच सोडली.हे सगळं होतं ते या केसचा खुलासा झाल्या नंतर.

हे फिक्सिंगाचा खेळ ओपन व्हायच्या आधी कोणालाच अशी शंका नव्हती की समोर जो दक्षिण आफ्रिका आणि भारताचा जो खेळ चालू आहे तो फिक्स केलेला आहे.

 

the financial express

 

बक्कळ पुरावा हाती लागल्यामुळे दिल्ली पोलिसांनी थेट हॅन्सी क्रोनिए वर पहिला हात घातला.

नाही नाही म्हणत आधी सगळे आरोप तो फेटाळून लावत होता.जसा दिल्ली पोलिसांनी आपला खाक्या त्याला दाखवला,भरभर त्याने सगळे आरोप कबूल केले.संजीव चावला कडून पैसे घेतल्याचे सुद्धा.! केस रजिस्टर झाली नव्हती.आरोपाची सुई क्रोनिए वर होती संधीचा फायदा घेत चावला ब्रिटन ला फरार झाला.

पण,क्रोनिएच्या माध्यमातून दिल्ली पोलीस हर्षल गिब्ज,मोहम्मद अझरुद्दीन,अजय जडेजा यांच्या पर्यंत पोहोचली. गिब्जने फक्त कर्णधाराने सांगितलं म्हणून केलं सांगून सगळं क्रोनिए वर ढकललं.सो त्याला दंड आणि काही सामन्यांची बंदीची शिक्षा झाली.

अजय जडेजा आणि अजहर ला लाईफ बॅन झाली.जडेजाला क्लीन चिट मिळाली पण तोपर्यंत त्याच करियर एन्ड झालं होतं.

 

ndtv sports

 

क्रोनिएचा विमान अपघातात मृत्यू झाला.त्यामुळे तो यातून सुटला पण जेंटलमेन्स च्या खेळावर मोठा प्रश्नचिन्ह लावून गेला.

दिल्ली पोलीस करत एक होती आणि झालं वेगळं. खंडणीच्या केसचा छडा लावण्यासाठी केलेली सुरुवात मॅच फिक्सिंगच्या कांड पर्यंत घेऊन गेली. या न त्या मार्गाने दिल्ली पोलिसांनी केस सॉल्व्ह केली.पण संजीव चावलाच्या प्रत्यारोपनमुळे याला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?