'"धंदा यशस्वी कसा करावा?"- पतंजलिकडून शिका यशाचे "हे" सिक्रेट्स

“धंदा यशस्वी कसा करावा?”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

रामदेव बाबांच्या आणि त्यांचे  सहकारी आचार्य बालकृष्ण ह्यांच्या पतंजलीचं यश सगळ्यांनीच पाहिलं. कर्ज घ्यायला गेले पण बँकेत खातं नाही! कुणीतरी खोडी काढायची म्हणून कोर्टात केस दाखल करतंय, त्यात ११ लाखांचा फटका! नूडल्स साठी फेक लायसन्स वापरल्याचा दावा एकीकडे तर एकीकडे तामिळनाडूत पतंजली विरोधात काढलेला फतवा. पण पतंजली ह्या सगळ्या गोष्टींना पार करून वर आलं.

 

Patanjali

 

आणि म्हणूनच फक्त MBA च्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर नवउद्योजकांना सुद्धा हा एक आदर्श आणि शिकवणारा प्रोजेक्ट ठरला आहे. ह्यातून काय घ्यायचं?

 

यश एवढं सोप्पं नाही!

‘एका रात्रीतून मिळत नसतं’  हे बऱ्याचदा ऐकून झालं असेल तुमचं. खरं  तर रामदेव बाबा २००८ पासून हे स्वप्न बाळगून त्यावर काम करत होते. जगापासून लपवून त्यांनी मेहनत घेतली. तेव्हापासून पतंजली अजूनही वाढते आहे. यशाला कुठेही चोररस्ता नसतो. पतंजली कठोर परिश्रम घेऊन झगडण्याची तयारी ठेवा असं सांगते.

 

तुमची मुल्ये महत्वाची!

सुरुवातीपासूनच रामदेव बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तत्व आणि ध्येय एकच होतं. ते म्हणजे आयुर्वेदाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. ह्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अश्याने त्यांना एक जबाबदार ग्राहकवर्ग मिळाला. जसजसं पतंजली कंपनी मार्केट मध्ये उतरत होती तसतशी डोळ्यात खुपत होती. म्हणूनच जारी परवान्यांचा दावा, तुपात बुरशी सापडल्याचा दावा अश्या अनेक तक्रारींनी पतंजलीचं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचा परिणाम कमी पडला.

 

घाबरू नका – प्रयोगशील राहा!

“प्रयोग” हा एक उद्योगाला चालना आणि वाढवणारा जादुई शब्द आहे. नेहमी काहीतरी नवीन करत राहा. जेव्हा पतंजली मार्केट मध्ये येत होती तेव्हा मोठमोठ्या Fast-moving consumer goods (FMCG) कंपन्यांनी बाजार व्यापलेला होता. ह्याला न भीता पतंजलीने डौलात पहिलं पाऊल टाकलं आणि आज FMCG कंपन्यांच्या यादीत पहिलं नाव पतंजली आहे.

Patanjali-products-list-1024x385

 

नेहमी काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करा!

व्यवसायात टिकून राहायचं असेल तर नुसतं कल्पना चांगली असून चालत नाही. सतत सुधारणा आणि नवनवीन गोष्टींना आत्मसात करावं लागतं. जसं पतंजली एका उत्पादनावर थांबली नाही. खाद्यपदार्थ, साबण, शॅम्पु, कॉस्मेटिक्स आणि बरेच उत्पादनांत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

 

श्रेय लाटण्यापेक्षा वाटा!

श्रेय हा प्रगतीच्या वाटेवर एक मोठा अडसर आहे. प्रत्येक जण श्रेय मिळावं म्हणून हावरटासारखं वागतो. रामदेव बाबा जेव्हा मुलाखत देत असतात तेव्हा पतंजलीच्या हरिद्वार आणि नेपाळयेथील युनिट्स ला श्रेय देतात.

acharya-balakrishna-patanjali-swami-ramdev-baba-marathipizza
आचार्य बाळकृष्ण – पतंजली चे CEO

ह्या युनिट्स च्या कामाचं ते नेहमी कौतुकी करतात. अश्याने कर्मचाऱ्यांना काम करायला हुरूप येतो.

बाजारपेठेची नस ओळखा!

“प्रत्येक गर्दीत एक बाजारपेठ असते.” व्यवसाय करायचा म्हणजे सगळ्यात आधी हा मंत्र माहित असावा. रामदेवबाबांनी सामान्यांची अडचण ओळखली आणि उत्पादनाची पत उत्कृष्ट ठेवण्यावर भर दिला. MBA लोकांना भरती करून घेण्यापेक्षा त्यांनी त्या त्या क्षेत्रातील पारंगत लोकांना घेतलं. याचा  फायदा असा झाला की पतंजलीचा प्रसार आणि मार्केटिंग वर होणारा पैसे वाचवला.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा!

 

kishorebiyanibabaramdev-ktvD--621x414@LiveMint

Source

पतंजलीच्या सगळ्यात चांगलं आणि एक बुस्टर देणारं पाऊल ठरलं ते म्हणजे २००९ मध्ये पित्ती ग्रुप आणि बियाणी ग्रुप शी झालेलं मर्जर. पतंजलीची उत्पादने एकाच वेळी देशभरात ४७०० रिटेल स्टोअर्स मध्ये उपलब्ध होते. सोबतच हायपर सिटी, स्टार बझार आणि रिलायन्स च्या अनेक स्टोअर्स मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपलं उत्पादन लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होईल ह्याची काळजी घ्यायची.

source : , , 3

तर ह्या गोष्टींमधून बोध घ्या आणि आपला व्यवसाय वाढवा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 49 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?