' रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे – InMarathi

रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

क्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉल मधील एक मोठ्ठं नाव. त्याचे हजारो चाहते जगभर पसरले आहेत. वयाच्या अठराव्या वर्षी फुटबॉल टीम मध्ये हा खेळाडू समाविष्ट झाला आणि अल्पावधीतच आपल्या झुंजार खेळीने लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला.

बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला आणि मग मोठंमोठ्या नावाजलेल्या कंपन्या त्याला आपल्या ब्रँडचा ब्रँड अँबेसिडर करण्यासाठी धडपडू लागल्या आणि तो झालाही.

खेळ आणि जाहिरातीतून त्याने अमाप पैसा मिळवला. आज तो ३५ वर्षांचा आहे. सध्या त्याची संपत्ती पाहिली तर त्याच्या पुढच्या अनेक पिढ्या बसून खातील.

 

ronaldo inmarathi
UEFA.com

 

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने एक मुलाखत दिली होती. त्यात तो म्हणाला की,

“आता फार वर्षे मी फुटबॉल खेळू शकणार नाही. फार फार तर अजून दहा वर्ष फुटबॉल खेळेन. पण त्यानंतरच आयुष्य कसं असेल? फुटबॉल व्यतिरिक्त दुसरं काही तरी करावं लागेल आणि ते काय करावं यावर मी विचार केलेला आहे.

आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणार आहे.

“फुटबॉल प्रमाणेच बिझनेस हे माझं पॅशन आहे. फुटबॉल सारखंच नाव मला बिजनेस मध्ये कमवायचं आहे. अर्थात ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण फुटबॉल मध्ये काय करायचे आहे याची मला पूर्ण कल्पना असते, पण बिझनेसचं तसं नसतं.

त्यात तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असता पण आता माझी टीम चांगली आहे आणि मला ते जमेल.” एक उत्तम सीईओ होणं हे त्याचं स्वप्न आहे.

 

ronaldo inmarathi 1

 

पोर्तुगालमध्ये जन्मलेला हा फुटबॉलपटू आज जगातील सगळ्यात श्रीमंत खेळाडू आहे. पोर्तुगालच्या रियल माद्रिद कडून खेळणाऱ्या हा खेळाडूकडे ४५० दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, त्याच्या संपत्तीत २०१६ यावर्षी त्याने १०८ दशलक्ष डॉलर कमावले.

त्यापैकी ६१ दशलक्ष डॉलर हे त्याच्या पगार, बोनस आणि जिंकलेल्या मॅचेस पैकी होते तर उर्वरित ४७ दशलक्ष डॉलर्स ही रक्कम त्याच्या जाहिराती आणि बिझनेस यामधून आली.

वयाच्या अठराव्या वर्षी त्याने इंग्लंडमधल्या मॅन्चेस्टर युनायटेड क्लब कडून खेळायला सुरुवात केली. आता तो रियल मद्रिदचा स्टार फुटबॉलपटू आहे.

त्याच्या फुटबॉलच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने ६९७ गोल केलेले आहेत आणि ३१ अवॉर्ड्स  मिळवले  आहेत. त्याच्या पायाचा विमा देखील १४४ दशलक्ष डॉलर इतका आहे.

 

ronaldo inmarathi 2
youtube

 

टायगर वूड्स, लेब्रान जेम्स, रॉजर फेडरर यासारख्या खेळाडूंसारखंच त्यालाही आपला खेळ आणि बिजनेस याचा ताळमेळ बसवायचा आहे.

रोनाल्डो हा कदाचित फुटबॉल मधील सगळ्यात महागडा खेळाडू नसेल, मात्र स्वतःची ब्रँड पॉवर सोशल मीडियाद्वारे कशी वापरायची हे मात्र त्याला चांगलेच जमले आहे. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडियावर तो सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे.

हुकिटच्या म्हणण्यानुसार, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर मिळून त्याचे ३२४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. एकट्या इंस्टाग्राम वर त्याचे १२७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. म्हणूनच, स्पॉन्सर्स त्याच्या या प्रसिद्धीचा वापर आपली उत्पादनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतात.

त्याच्या एका पोस्टला जवळजवळ २.३ दशलक्ष मिळतात. रोनाल्डोने ‘नाइकी’ सारख्या ब्रँड ची एखादी पोस्ट जर इंस्टाग्राम वर टाकली तर त्यातून त्या ब्रँडची १.८ लक्ष डॉलर कमाई होते.

 

ronaldo inmarathi 3
TMZ.com

 

२०१८ साली एका पोस्ट मधून रोनाल्डोला चार लाख डॉलर्सची कमाई होत होती. नाइकी ने रोनाल्डोसोबत तो फुटबॉल खेळेपर्यंत (फुटबॉलमधून निवृत्त होइपर्यंत) जो लाइफ टाइम करार केलेला आहे, तो एक अब्ज डॉलर्सचा आहे.

रोनाल्डोने आपल्या ब्रँडची जाहिरात करावी म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांच्या त्याच्याकडे रांगा लागतात. मग त्यात घड्याळासाठी जगप्रसिद्ध असलेल्या जेकब अँड कंपनी असेल किंवा स्वीस वॉच कंपनी टॅग ह्युअर असेल.

प्रत्येक जण त्याने आपल्या प्रोडक्टची जाहिरात करावी यासाठी अधीर असतो. त्याने अरमानी ब्रँडच्या अंडरवेअर लाईन साठी मॉडेलिंग केलं. एक यशस्वी फुटबॉलपटू असूनही त्याने सूटच्या जाहिरातीसाठी पण मॉडेलिंग केलं आहे.

 

ronaldo inmarathi 4
don balon rosa

 

आत्तापर्यंत हर्बालाईफ, सॅमसंग, केएफसी, कॅस्ट्रॉल एमिरात एअर लाइन्स या कंपन्यांसाठी जाहिरातही केली आहे. इजिप्तच्या एका स्टील कंपनीसाठी ही त्याने जाहिरात केली आहे.

रोनाल्डोला फॅशन जगताबद्दल भारी प्रेम आणि आकर्षण आहे आणि त्याला पाहिल्यावर त्याचा फॅशन सेन्स लक्षात येतो. अर्थातच व्यवसाय करण्यासाठी त्याचं लक्ष इकडे गेलं नसतं तरच नवल होतं.

रोनाल्डोने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू ओळखली आणि स्वतःचाच एक ब्रँड तयार केला त्याचं नाव CR7 असं ठेवलं. अगदी केसप्रत्यारोपणापासून, कपडे, परफ्यूमस्,  शूज सगळ्यांमध्ये त्याच्या CR7 ची गुंतवणूक आहे.

 

ronaldo inmarathi 5
pinterest

 

पोर्तुगालमधील केशप्रत्यारोपणासाठी प्रसिद्ध, ‘Inspiera Hair Treatment’ मध्ये CR7ची 50 %हिस्सेदारी आहे. CR7 अंडरविअर लाईन, CR7 denim हे कपडे उद्योगातील प्रॉडक्ट आहेत.

CR7 ब्लॅंकेट हे ‘देनाली ‘ या नावाने ओळखले जाते.

हॉटेल्स : 

लहानपणापासूनच रोनाल्डोला स्वतःच्या मालकीचं हॉटेल असावं असं वाटत होतं. पोर्तुगीज मधील पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध हॉटेल चेन, ‘पेस्तेना हॉटेल ग्रुप’ बरोबर रोनाल्डोने भागीदारी केली आहे.

पेस्तेना CR7 च्या नावाने त्याचं गाव मदियरा आणि पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे दोन हॉटेल सुरू केले आहेत.आता त्याला पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये हॉटेल सुरू करायचे आहे जे कदाचित याच वर्षी ओपन होतील.

 

ronaldo inmarathi 6
booking.com

 

स्पेनमध्ये हॉटेल सुरू करण्यावरून बोलणी सुरू आहेत जिथे रोनाल्डो आणि फॅमीली साठी एक शानदार स्वीट राखून ठेवण्यात येईल.

त्याच्या मूळ गावी फंचल मध्ये त्याचा एक भव्य पुतळा उभारलेला आहे, त्याचं उद्घाटन त्याच्याचं हस्ते झालं. त्याने तिकडे एक म्युझियम तयार केलं आहे त्याचं नाव, ‘म्युझु CR7’ असं आहे.

ज्यामध्ये त्याला मिळालेल्या ट्रॉफीज, मेडल्स, त्याचे शूज त्याने मॅचेसमध्ये वापरलेले ड्रेसेस पहायला मिळतात.

 

ronaldo inmarathi 7
youtube

 

आता खेळाडू म्हटल्यावर फिटनेस फंडा आलाच. रोनाल्डोने २०१६ मध्ये ‘क्रंच फिटनेस’ बरोबर एक करार केलेला आहे. त्यानुसार, त्याला जगभर शंभर ते दीडशे फिटनेस सेंटर चालू करायचे आहेत.

माद्रिद मध्ये त्याचे २ फिटनेस सेंटर्स सुरू पण झाले आहेत.

तो खेळाडू असल्यामुळे मोबाईल ॲप मध्ये त्याने गेम लॉन्च केला आहे याचं नाव, ‘रोनाल्डो किक अँड रन’.

रोनाल्डोचे राहणीमान:

रोनाल्डोच्या अफाट संपत्तीप्रमाणेच त्याचे राहणीमानही एकदम उच्च दर्जाचं आहे. माद्रिद मध्ये त्याचा जो व्हिला आहे त्याची किंमत साधारणपणे ७.१ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

तर अमेरिकेतील मॅनहटन इथल्या ट्रम्प टॉवर मध्ये १८.५ दशलक्ष डॉलरचे अपार्टमेंट आहे. महागड्या कार्सचा शौकिन असलेल्या रोनाल्डोच्या ताफ्यात लिंबॉर्गिनी, फेरारी, बुगाती शिरोन, बेंटली, पोर्श , मर्सिडीज अशा गाड्यांचा समावेश आहे.

 

ronaldo inmarathi 8

 

त्याच्या स्वतःच्या मालकीचं एक जेट विमानही आहे, त्याची किंमत १७ दशलक्ष डॉलर असून त्यावरही CR7 चा लोगो आहे आणि हे जेट ही त्याला कमाई करून देते.

जेव्हा तो हे जेट वापरत नाही त्यावेळेस एका तासासाठी ३००० युरोने भाड्याने देण्यात येते.

 

ronaldo inmarathi 9
youtube

 

तसे रोनाल्डोने  १६,५००० डॉलर्सच्या देणग्या दिल्या आहेत पोर्तुगाल मधल्या कॅन्सर पीडितांसाठी त्याने ८३००० डॉलर्स देणगी म्हणून दिले आहेत.

क्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव फक्त पृथ्वीवरच नाही तर आता अवकाशातही राहणार आहे.

२०१५ साली अंतराळ शास्त्रज्ञांना अवकाशात एक नवीन आकाशगंगा सापडली तिचं नामकरण त्यांनी CR7 (cosmos redshift 7) असं केलं.  म्हटलं की, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला ही मानवंदना आहे.

रोनाल्डो हा श्रीमंत आणि प्रसिद्ध खेळाडू असल्यामुळे अर्थातच त्याच्याकडे सगळ्या मीडियाचं लक्ष असतं. तो राहतो कसा?, तो काय वापरतो?, त्याच्या आयुष्यात कोण आहे? याचा मागोवा मीडिया घेत असते.

ronaldo inmarathi 10
edigital agency

खेळातली मेहनत, जिद्द आणि जिंकायचंच हे स्पिरीट घेऊन मैदानात उतरणारा रोनाल्डो आपण फुटबॉलच्या मैदानावर पाहतोच, पण प्रत्यक्ष जीवनातही त्याची हीच टशन एक खेळाडू असल्यामुळे त्याच्या कामी येते.

त्याचे दोन्हीकडचे गोल ठरलेले आहेत. म्हणूनच यशस्वी झाल्यावरही आणखीन काय करता येईल, यासाठी प्रयत्न करणारा रोनाल्डो प्रेरणादायी ठरतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?