या सिनेस्टार्सनी खुलेआम सांगितलेत त्यांच्या खाजगी जीवनातील धक्कादायक किस्से

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

मायानगरी हे नाव मुंबईला का पडलं असेल असं तुम्हाला वाटतं? मुंबईला लाभलेलं बॉलीवूडचं वरदानच त्याला कारणीभूत आहे. चित्रपट हा घराघरात पोहोचला आणि त्या बरोबरच सिने-तारे आणि तारकाही.

अहो हे फक्त घरातच नाही पोहोचले तर ह्या ताऱ्यांना सर्वांनीच मनात घर करू दिलं आणि क्षणार्धात आपलंसं केलं. सिनेस्टार जणू आपल्या हक्काचे, जिवाभावाचेच आहेत असं ते मानायला लागले.

चित्रपटातल्या अभिनेत्यांची स्टाईल, लकब, एखादा डायलॉग सगळंच सर्वत्र आत्मसात केलं जाऊ लागलं. त्या वेळी मनोरंजनाचं हे एक नवीन आणि रंजक साधन होतं.

चित्रपटसृष्टीतलं चकाकणारं आयुष्य अनेकांना खुणावू लागलं आणि आपणही आपलं नशीब आजमावून बघायला हवं ह्या हेतूने मुंबईकडचा प्रवास सुरु झाला.

 

om shanti om inmarathi
netflix

 

कधी आपल्या लाडक्या सिनेस्टार्सला भेटायला तर कधी त्या विश्वात सामावून जायला मुंबईच सर्वांना योग्य वाटू लागली आणि मुंबईप्रतीचं लोकांचं आकर्षण दिवसागणिक वाढू लागलं.

अनेकजणं ह्या वेडापायी मुंबईकडे खेचले जाऊ लागले आणि म्हणूनच की काय पण आपल्या जाळ्यात इतरांना खेचणाऱ्या मुंबईला ‘मायानगरी’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं.

तर मुद्दा असा की काळ कोणताही असो, सिनेसृष्टी आणि आपले स्टार्स ह्याबद्दल अजूनही आपल्या सर्वांना कुतूहल हे असतंच आणि त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे ह्याची खडान् खडा माहिती जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो.

आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या ताऱ्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कोणत्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे.

 

१. दिलीप कुमार :

 

dilipkumar-inmarathi
news18.com

 

नया दौर, मुग़ल-ए-आज़म ह्या व अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात आपल्या लाडक्या दिलीप कुमार ह्यांनी काम केलं आहे. दिलीप कुमार हे नाव मधुबालाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे आणि त्याला कारणही तसंच आहे बरं का!

मधुबाला आणि दिलीप कुमार ह्यांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं हे आपल्याला माहित आहेच. पण काही कारणांमुळे त्यांची ही प्रेमकहाणी मात्र अपूर्णच राहिली.

दिलीप कुमार ह्यांच्या “The Substance And The Shadow” ह्या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या व मधुबालाच्या प्रेमकहाणीबद्दल खुलासा केला आहे.

 

dilip kumar and madhubala inmarathi
mygoodtimes

 

मुग़ल-ए-आज़म ह्या चित्रपटादरम्यान त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोन जीव मात्र एकत्र येऊ शकले नाहीत.

जसं ‘लव्ह स्टोरी’ मध्ये व्हिलन असतो तसं ह्यांच्या प्रेमाचं मधुबालाच्या पित्यांना कळल्यावर त्यांनी विरोध दर्शवून जणू ह्या कहाणीत व्हिलनचं स्थान मिळवलं.

बहरू लागलेल्या प्रेमाला नजर लागल्याप्रमाणे ते कोमेजून गेलं.

 

२. शत्रुघ्न सिन्हा :

 

shatrughna sinha inmarathi
india today

 

आपल्या दबंग गर्लचे पिताश्री म्हणजेच आपले सिन्हा साहेब. आपल्या हाताची स्टाईल आणि ‘खामोश!’ हा त्यांचा डायलॉग सुप्रसिद्ध आहे. आपले बॉलिवूडचे बादशाह अमिताभ आणि सिन्हा साहेबांमध्ये तेढ होती.

आणि ही बाब त्यांच्या “Anything but Khamosh” ह्या आत्मचरित्रात त्यांनी उलगडली आहे. माणूस म्हटलं की वाद आणि हेवे दावे असणं स्वाभाविक आहेच.

सिन्हाजींच्या म्हणण्यानुसार, आपल्या बिग बींचे आणि त्यांचे संबंध सलोख्याचे नव्हते आणि अमिताभजी त्यांच्यावर जळायचे.

चित्रीकरणादरम्यान एखादा मारामारीचा सीन असेल तर अमिताभ जी खरोखरच सिन्हाना बेदम ठोकायचे की शेवटी क्रू मेंबर्सला मध्यस्ती करायची वेळ यायची.

इतके वर्ष एकत्र काम करूनसुद्धा ह्या दोघांनी कधी साधी छत्री किंवा प्रवासादरम्यान एक गाडी शेअर केल्याचीही गोष्ट घडली नसल्याचे ते पुढे लिहितात.

३. नसरुद्दीन शाह :

 

nasiruddin shah inmarathi
india today

 

‘a wednesday’, ‘iqbal ‘ अशा अनेक वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून नसरुद्दीनजींनी काम केलंय. अत्यंत तयारीचा आणि अतिशय परिपक्व असा हा नट स्वतःच्याच मुलीला तब्बल १२ वर्ष भेटला नव्हता ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

“And Then One Day” ह्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी ह्याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी १९व्या वर्षी ३९ वर्षे वयाच्या परवीनशी पाकिस्तानात लग्न केलं आणि लगेचंच ‘national school of drama’ नवी दिल्ली येथे अभिनय शिक्षणासाठी रवाना झाले.

दरम्यान परवीननी एका मुलीला जन्म दिला पण कार्यमग्न असल्याने नसरुद्दीननी कधीच त्यांच्या भेटची तसदी घेतली नाही.

पुढे त्या दोघी लंडनला निघून गेल्या आणि मग म्हणूनच १२ वर्ष ते स्वतःच्याच मुलीला भेटू शकले नाहीत.

 

४. देव आनंद :

 

dev-aanand-marathipiza02

 

आपल्या नृत्य आणि अभिनय शैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत. “Romancing With Life” ह्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ‘झीनत अमान’ ह्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे.

त्यांच्यावरील आपल्या प्रेमाची कबुली त्यांनी ह्या आत्मचरित्रात दिली आहे. राज कपूर आणि झीनत अमान ह्यांच्यातली वाढती जवळीक पाहता त्यांनी आपलं प्रेम व्यक्त न करणंच उचित समजलं.

मात्र जिच्यासोबत आयुष्य काढता येईल अशी हि एकमेवच मुलगी त्यांना भावली होती.

 

५. प्रेम चोप्रा :

 

prem chopra inmarathi
daily mail

 

आपल्या नेगेटिव्ह आणि व्हिलनच्या भूमिकांमधून त्यांनी सर्वांची मनं जिंकत आपली एक वेगळीच छाप पाडली. “Prem Naam Hai Mera’ ह्या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या व अमिताभजींच्या घट्ट मैत्रीबद्दल लिहिलं आहे.

अगदी मारामारीच्या सीन नंतर दोघेही एकमेकांकडे जाऊन कोणाला लागलं तर नाही ना ह्याची विचारपूस करत ख्याली खुशाली जाणून घेत. निर्मळ मैत्रीचं हे छान उदाहरण आहे.

 

६. शशी कपूर :

 

shashi kapoor inmarathi
BFI

 

“The Housholder, The Star” ह्या पुस्तकातून शशी कपूर हे किती नम्र स्वभावाचे होते हे दिसून येतं. आपला लाडका सैफ अली खान शशी कपूर ह्याच्या जवळचा होता.

आणि म्हणूनच लहानगा सैफ २ वर्षाचा असताना सेट वर शशी कपूर ह्यांना कोणी मारत असल्यास ते खरं मानून त्यांना खरंच लागलंय असं समजायचा.

७. वहिदा रेहमान :

 

vahida rahman inmarathi

 

“Conversations With Waheeda Rehman” हे त्यांचं आत्मचरित्र जणू प्रश्नोत्तरासारखं आहे. त्यात त्यांनी सत्यजित राय हे ‘अभिजान’ चित्रपट घेऊन त्यांच्याकडे आले असल्याचं म्हटलं आहे.

परंतु चित्रपटाचं बजेट कमी असल्यानं ते वहिदा ह्यांना मुख्य भूमिकेत घेऊ शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असलेल्या वहिदा नाराज झाल्या.

पण मित्रांनो, आपण ह्या गोष्टी जाणून घेताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे जशी अपल्याला आपली प्रायव्हसी महत्वाची असते तशी ह्या सिनेस्टार्सला सुद्धा.

आणि म्हणूनच सतत त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणं टाळलं पाहिजे. आपल्याला प्रिय व्यक्तींना आपल्यामुळेच त्रास व्हावा असं आपल्याला नक्कीच वाटत नाही.

म्हणूनच थोडा त्यांचाही विचार करून त्यांच्या आयुष्यात सतत डोकावू नये. एक उत्तम चाहता कसा असतो ह्याचं आपण आदर्श उदाहरण बनायला काय हरकत आहे?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. या बॉलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्याआत्मचरित्रात केले त्यांच्या खासगी जीवनाशी निगडित धक्कादायक खुलासे/कन्फेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?