'गुंतवणूकीबाबत शंका आहेत? मग सुनिल शेट्टीचं साम्राज्य तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल

गुंतवणूकीबाबत शंका आहेत? मग सुनिल शेट्टीचं साम्राज्य तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

सुनील शेट्टी म्हणजे बॉलिवूडचा अण्णा. त्याच नाव घेतलं की, डोळ्यासमोर येतो तो हेराफेरी मधला श्याम, धडकन मधला देव, बॉर्डर मधला भैरव सिंग आणि बरंच काही…

त्याची उत्कृष्ट शरीरयष्टी ही मोहरा मध्ये दिसलेलीच. अंग-काठी आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर सिनेसृष्टी मध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण करणारा सुनील शेट्टी    कोणाला आवडणार नाही असं होणार नाही.

हल्ली क्वचित एखाद-दुसऱ्या गाण्यात किंवा सिनेमात कॅमिओ याव्यतिरिक्त सुनील शेट्टी आपल्याला जास्त दिसत नाही.

आपल्या मुला-मुलीला सध्या लॉन्च करून बॉलिवूडमध्ये सेटल करण्याच्या भानगडीत तो आता धडपड करताना दिसत आहे.

 

sunil shetty inmarathi 6

 

पण एखाद दुसरा सिनेमा करून एवढं छान आयुष्य जगता येतं का?, मग नेमकं सुनील शेट्टी करतो तरी काय?

जसं आपल्याला माहीत आहे,

बरेच असे सेलिब्रिटी असे आहेत जे मूळ सिनेसृष्टीत काम करत असतातच, सोबत स्वतंत्र व्यवसाय पण करत असतात.

उदाहरण द्यायचं म्हणजे, महेंद्रसिंग धोनीच ‘सेव्हन’ हे स्पोर्ट्स ब्रँड, विराट कोहलीचं नुएवा रेस्टॉरंट, शिल्पा शेट्टीची राजस्थान रॉयल आयपीएल टीम, शाहरुख खानची रेड चिली प्रोडक्शन हाऊस आणि कोलकाता नाईट रायडर्स टीम.

 

sunil shetty inmarathi 9

 

लिस्ट बरीच मोठी आहे. तर,

चित्रपट करण्यासोबतच सुनील शेट्टी पण अशा बऱ्याच व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे, हेच त्याचं चित्रपट क्षेत्रात कमी होण्याचं सुद्धा एक कारण आहे.

बांधकाम, हॉटेल-रेस्टॉरंट, क्लब-पब आणि चित्रपट प्रोडक्शन हाऊस यासारख्या असंख्य बिझनेस मध्ये त्याने आपला पैसा गुंतवला आहे.

सुनील शेट्टी मूळ कर्नाटकचा आणि त्याच शिक्षण हे हॉटेल मॅनेजमेंटचं. कर्नाटकी म्हटल्यावर हॉटेल नाही असं होणार तर नाही. वडिलांचं उडीपी रेस्टॉरंट.

आपण जे शिक्षण घेतलं आहे ते आणि वडिलांचा बिझनेस याच्याशी रिलेटेड काही तरी म्हणून सुनील हॉटेल व्यवसायामध्ये शिरला. सिनेमे करता-करता हे विशेष.

मिशचीफ रेस्टॉरंट आणि एचटूओ हा क्लब. हे सुनील शेट्टीच्या मालकीचे मुंबई बेस बिझनेस. दोन्ही व्यवसाय जोरात आहेत.

 

sunil shetty inmarathi

 

२०१० ला मिशचीफ रेस्टॉरंट बंद करून आपली स्वतःची इटालियन हॉटेल चेन त्याने सुरू केली. नव्या मुंबईतील, बेलापूर मधला बार पण नाईट लाईफ जगणाऱ्यांमध्ये बराच प्रसिद्ध आहे.

हॉटेल-रेस्टॉरंट साठी जागा शोधणं, त्याचं बांधकाम आणि बांधकाम पूर्ण झाल्या नंतरच इंटेरियर यामुळे आपसूक त्याची कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये चांगली ओळख झालेली. त्याचाच वापर करत सुनील शेट्टी बांधकाम व्यवसायात उतरला.

हाय रेटेड क्वालिटी घर बांधून देण्यासाठी तत्पर, क्वालिटीशी तडजोड न करण्याच्या त्याच्या बाण्यामुळे त्याच्या घरांच्या किमती या जरा चढचं असतात.

जेव्हा त्याच्या या बिझनेसबद्दल त्याला विचारलं गेलं तेव्हा सुनील म्हणाला,

“कन्स्ट्रक्शन बिझनेस तेव्हा बराच मंदी मध्ये होता आणि त्याच काळात पैसा गुंतवला तर उभारणीच्या काळात रिटर्न चांगले मिळतात.”

 

sunil shetty inmarathi 1

 

रिसेशनच्या काळात २०१२ साली सुनील शेट्टीने स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली. एस टू रिऍलिटी.

आज खंडाळा-लोणावळा मध्ये बरेच राजकारणी, क्रिकेटर्स, फिल्म स्टार्स यांचे प्रायव्हेट फार्म हाऊस आहेत आणि त्यात जवळपास अर्ध्या पेक्षा जास्त फार्म हाऊस हे सुनील शेट्टीच्या कंपनीने बांधले आहेत.

नुकतंच रोहित शर्माने लोणावळ्यात सुनील शेट्टीच्या मार्गदर्शनाखाली बंगला घेतल्याची बातमी होती. मंगलोर मध्ये नुकतंच सामान्यांसाठी एक हौसिंग प्रोजेक्ट त्याने सुरू केला आहे.

 

sunil shetty inmarathi 2

 

आता फिल्म स्टार आहे त्याने डायरेक्शन, प्रोडक्शन, म्युझिक मध्ये हात घातला नाही असं होईल का?

सुनील शेट्टीची स्वतः ची, चित्रपट निर्मितीसाठी, प्रोडक्शन हाऊस कंपनी आहे. पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स नावाची.

अक्षय कुमार, परेश रावल, गोविंदा स्टारर ‘भागम-भाग’ हा त्याच्याच प्रोडक्शन हाऊस मध्ये तयार झालेला.

 

sunil shetty inmarathi 3

 

आता स्वतः सुनील शेट्टीची शरीरयष्टी आपण पाहिली आहे. वयाच्या ५७ वर्षात त्याचं जे फिजिक आहे ते तरुणाला पण लाजवेल अस आहे. त्याचं जिम वरच प्रेम पाहता तो जिम पासून लांब असेल असं वाटत नाही.

म्हणूनच, त्याची जिम मध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे. अँनिटाईम फिटनेस नावाची जिम चेन ही त्याचीच. सध्या पुणे, नागपूर मध्ये याचं जाळ विणण्याचे काम सुनीलचे चालू आहे.

फिटर नावाच्या जिम आणि जिम्नॅशियमशी संबंधित पुणे बेस स्टार्टअप मध्ये पण त्याने आपला पैसा गुंतवला आहे.

 

sunil shetty inmarathi 4

 

लहान लहान गुंतवणूक करून रिस्क कमी करणे हा कोणत्याही चपखल बिझनेसमन चा पायदंडा असतो. नुकसान जरी झाले तरी ते सहन करता आला पाहिजे.

या तत्वानुसार, सुनील शेट्टी स्टार्ट अप मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो.

हकीम आलीम नावाच्या सलून मध्ये त्याची जवळपास ५०% भागीदारी आहे. आपल्या पत्नी सोबत त्याच आर-वर्ल्ड नावाचं एक बुटीक आहे. खास इंटेरियर साठी.

मुंबईच्या वरळीमध्ये स्थित या शो-रूम मध्ये नव्या कोऱ्या खोलीला सजवण्यासाठी लागणार सर्व साहित्य आहे. पडद्यापासून ते फर्निचर पर्यंत.

 

sunil shetty inmarathi 8

 

वरळी सारखा पॉश एरिया म्हटल्यावर त्याचे कस्टमर सुद्धा त्या कमर्शिअलचे किंमत अफोर्ड करू शकतील असेच ‘पॉश’ असतात.

त्याच सोबत पार्टी वेअर्स आणि ऑफिस वेअर्स साठी उत्तम असे टेक्सटाईल मटेरीयल सुद्धा उपलब्ध आहे.

हॉटेल व्यवसायासोबत सुनील शेट्टीने कपडे उद्योगात पण आपले हात आजमावले होते. त्याचाच परिणाम म्हणजे आर वर्ल्ड मध्ये कपडे सुद्धा विकायला असतात.

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गोव्या सारखे वॉटरस्पोर्ट्स उपलब्ध आहे. ते सुद्धा सुनील शेट्टीचचं आहे. एचटूओ नावाची त्याची वॉटर स्पोर्ट्स कंपनी या वॉटर स्पोर्ट्स चे आयोजन करते.

 

sunil shetty inmarathi 5

 

या सर्व मार्गाने मिळणारं त्याच वार्षिक उत्पन्न हे १०० करोड च्या घरात आहे. यात त्याची चित्रपटांची फी वेगळी आहे.

एकूणच चित्रपट विश्वात अभिनया व्यतिरिक्त सुनील शेट्टीची वेगळी अशी भरपूर ओळख आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, हॉटेल व्यावसायिक, फिटनेस फ्रिक, चित्रपट निर्माता आणि असंख्य उद्योगा संबंधित विशेषणे त्याला लागू आहेत. 

एक यशस्वी उद्योजक म्हणून वेगळी ओळख त्याने आपल्या चाहत्यांसहित पूर्ण दुनियेसमोर निर्माण केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?