' ‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रपोज करणं खरंच फायद्याचं असतं की तोट्याचं? – InMarathi

‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रपोज करणं खरंच फायद्याचं असतं की तोट्याचं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!’ आणि म्हणूनच आम्हाला पडलेला हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असणार.

जसं पावसाच्या चाहूलीने मोर नाचू लागतो तसंच फेब्रुवारी महिना विशेषतः १४ तारीख जवळ येऊ लागली की हळूहळू आपल्यात दडलेला प्रेमी, दडलेल्या प्रेमभावना फेर धरत नाचू लागतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंतर प्रेमावरच प्रेम करणारी अनेकजणं आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात आणि त्यामुळे ह्या प्रेमदिनाची हवा आसमंतात पसरलेली दिसून येते व आपसूकच रोमँटिक वाटू लागतं.

 

propose-tips-marathipizza00

हे ही वाचा – प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो हे ह्या ८ जोडप्यांकडे बघून समजतं!

थंडीही म्हणावी तशी ओसरलेली नसते त्यामुळेच वातावरणदेखील अल्हाददायक असतं आणि म्हणूनच प्रेमाची उबदार भावना सर्वांनाच हवीहवीशी वाटू लागते. रोजच्या आयुष्यातल्या सध्या गोष्टीही रोमँटिक भासू लागतात.

एखादा कॉफीचा मग असो किंवा लाल रंगाची एखादी वस्तू. खरंच काय जादू आहे नाही प्रेमात! फक्त प्रेमातच नाही तर ह्या प्रेमदिनाचीही मजा काही औरच आहे.

सगळी दुकानं लाल रंगात न्हाऊन निघालेली असतात. प्रेमी युगुलांसाठी वेगवेगळ्या भेटी, क्रिएटिव्ह संकल्पना, ग्रीटिंग्स अशा अनेक गोष्टींनी बाजार, ऑनलाईन वेबसाईट नटलेल्या असतात आणि आपल्याही नकळत आपण त्यांच्या प्रेमात पडतो.

अनेक हॉटेल्स, कॅफे अशा ठिकाणी त्या दिवसासाठी छानपैकी सवलत जाहीर केली जाते आणि सेलिब्रेशनची जैय्यत तयारी म्हणून उत्तम सजावटही.

 

dinner date inmarathi

 

त्यामुळे हे सगळं बघून साहजिकच ते एन्जॉय करणाऱ्यांचा हेवा वाटतो आणि आपण आपल्या कल्पना विश्वात रममाण होतो.

आपल्या रोजच्या रस्त्यावर दिसणारे लाल बदामी आकाराचे फुगे, नेहमीच्या फुलवाल्यांकडे दिसणारे लाल टपोरे गुलाब बघताना नकळत आपल्या चेहेऱ्यावर एक छानसं स्माईल तरळून जातं आणि मन आपसूकच आनंदून जातं.

 

rose inmarathi

 

 

तर, असा हा प्रेमदिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ आला की, मनात फुलपाखरं बागडू लागतात व प्रेमवेड्या संकल्पनांनी मन भरून जातं.

आपला जोडीदार असेल तर त्याला खुश करून नातं वृद्धिंगत करण्यासाठी आणि नसेल तर मग आपल्या प्रिय व्यक्तीला जोडीदार बनवण्यासाठीची सगळी तयारी सुरु होते.

मग कसं बरं प्रपोज करता येईल, कुठे करता येईल, करावं की करू नये अशा एक ना अनेक गोष्टी डोक्यात फिरू लागतात. आपल्याला कॉन्फिडन्स नसेल तर मित्रमंडळींची साथ सुद्धा मिळते.

‘आपण इतके बेस्ट आहोत की आपल्याला होकारच येईल’ ह्या दर्जाच्या आत्मविश्वासापर्यंत ते आपल्याला पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. ह्यातही एक वेगळीच गंमत असते!

 

hardik pandya proposal inmarathi

 

‘व्हॅलेंटाईन डे’ हा पाश्चात्य ट्रेंड आपल्याकडे अगदी आपल्याच संस्कृतीसारखा रुजलाय आणि त्यात काहीच वावगं नाहीये.

एखादी छान गोष्ट आपल्यात सामावून घ्यायला काय हरकत आहे? फक्त ‘आपला नाही ‘म्हणून त्यास विरोध करणंही गैरच नाही का? शेवटी आनंद हा मानण्यावर असतो आणि कोणाचाही आनंद हिरावून घेण्यापेक्षा त्यात सहभागी होणं कधीही इष्टच .

तर मंडळी व्हॅलेंटाईनला प्रपोज करणं खरंच फायदेशीर असतं का?

 

 

आता ह्यावर अनेक मतं -मतांतरं पाहायला मिळतील. नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसंच ह्यालाही दोन बाजू आहेत. म्हटलं तर ते फायदेशीरही ठरू शकतं आणि कधीकधी तोट्याचं सुद्धा.

 

१. प्रेमाचा पाढा :

व्हॅलेंटाईन्स डे ला प्रेमाची हवा इतकी जोरदार वाहत असते की, त्यात आपण नकळत ओढले जातो आणि मग इतर वेळी ओठांवर न येणाऱ्या गोष्टी व्यक्त करणं सोपं होऊन जातं.

प्रेम व्यक्त करायला जणू हा ऑफिशिअल दिवसच असतो म्हणा ना. जसं चर्च मध्ये फादर समोर आपल्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला जातो तसं आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर जणू ही प्रेमाची गोड कबुलीच असते.

 

Couple-Talking Inmarathi

 

म्हणूनच समोरची व्यक्ती दुखावण्याचं प्रमाण थोडंसं कमीही असू शकतं कारण शेवटी प्रेमाचा दिवस म्हटला की सगळेच थोडेसे त्यात बुडालेले असतात.

म्हणूनच ह्या दिवसाची निवड करणं फायदेशीर म्हणता येईल.

२. तारीख :

दुसरा मुद्दा असा की, कोणत्याही गोष्टीचा ‘लॉन्ग टर्म’ फायदा आपण लक्षात घायला हवा. १४ फेब्रुवारीला प्रोपोज केलं तर आयुष्यभर तारीख विसरण्याची शक्यताच नाही.

 

Angry Indian couple Inmarathi

 

तारीख विसरल्याने होणारे वाद, उद्भवणारे रुसवे फुगवे आपसूकच नाहीसे होतील. (कधी चुकून होम मिनिस्टर मध्ये भाग घेतलात आणि तारीख विचारली गेली तर १०० रुपयांचं बक्षिसही तुमचंच बरं का!)

त्यामुळे ह्या दिवसाची स्पेशल आठवण तुम्ही विनापरिश्रम लक्षात ठेऊ शकाल.

हे ही वाचा – परीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी

३. टीम वर्क :

‘तुमचं प्रपोजल’ हे जणू सगळ्यांसाठीच महत्वाचा मुद्दा असल्याप्रमाणे सगळीकडे जय्यत तयारी दिसून येते. वाहत्या गंगेत हात धुवावेत तसं आधीच छान सजवलेल्या एखाद्या मस्त ठिकाणी तुम्ही प्रपोज करू शकता.

 

 

things-happy-couples-talk-InMarathi

 

तो माहोल तयार करायची वेगळी जबाबदारी नक्कीच घ्यावी लागत नाही. इतरवेळी अशी तयारी करून ‘सेन्टर ऑफ अट्रॅक्शन’ बनून अवघडलेपणा जाणवण्याची आणि नकारांती ती मेहनत फुकट जाण्याचीही शक्यता नाही.

आहे की नाही व्हॅलेंटाईन्स डेला प्रपोज करणं पॉकेट फ्रेंडली?

४. अविस्मरणीयता :

आयुष्यात आपला व्हॅलेंटाईन डे कधीतरी यावा आणि तो मस्त सेलीब्रेट व्हावा अशी व्यक्त -अव्यक्त भावना प्रत्येकाच्या मनी असतेच.

म्हणूनच ह्या दिवसाची निवड करून तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात तो आनंद फुलवू शकता आणि त्यांच्यासाठी कायम आठवणीत राहील असं छानसं प्रोपोजल त्यांच्यापुढे ठेऊ शकता.

 

proposal 1 inmarathi

 

पण दोस्तांनो प्रेम असेल तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच असतो. कदाचित हा विचार तुम्हाला जरा फिलॉसॉफिकल वाटू शकतो पण हेही एक सत्य आहे.

त्यामुळे व्हॅलेन्टाईन्स डे आलाय म्हणून घाईत प्रपोज करणं किंवा प्रपोज करायला तो दिवस यायची वाट बघणं दोन्हीही गुंतागुंतीचं होऊ शकतं.

नातं रुजायला, एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे घाई घाईत मुहूर्त गाठल्यासारखं प्रपोज केलं तर सुंदर मैत्रीला तडा जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

 

amir khan inmarathi

 

फक्त तारखेची वाट बघण्यात वेळ घालवला तर कदाचित ती संधी कायमची हातातून निसटून जाण्याचाही धोका संभवतो .

एखाद्या वेगळ्या दिवशी काहीतरी छान, स्पेशल करून आपल्या लाडक्या व्यक्तीला आपलंस करण्याचा प्रयत्न केलात तर ते नक्कीच वेगळं ठरू शकतं.

चाकोरी बाहेरील प्रयत्न आपल्या भावना उत्तम पोहोचवू शकतात. हेच व्हॅलेंटाईन्स डे ला केल्यास त्यातली ‘नसलेल्या’ दिवसाला स्पेशल करायची मजा तुम्ही घालवून बसाल .

शेवटी प्रपोज कधी आणि कसं करावं हे तुमचं परस्परांमधलं नातं कसं आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला नक्की काय आवडेल ह्याचा विचार करून ठरवणं कधीही चांगलं.

कारण प्रेम असेल तर त्याला प्रेमाचे अगदी मोजके शब्दही पुरतात आणि तेच लाखमोलाचेही वाटतात.

एक पाऊल पुढे टाकत त्याची मजा तुम्ही नक्कीच वाढवू शकता आणि मुलींनीही ह्यात पुढाकार घ्यायला नक्कीच हरकत नाही.

काय मग ह्या व्हॅलेंटाईन्स डे चा प्लॅन ठरला का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?