' तुमच्या आवडत्या क्षेत्रात जॉब करता आला तर? जाणून घ्या, “ड्रीम जॉब” मिळवण्याच्या पंधरा ट्रिक्स! – InMarathi

तुमच्या आवडत्या क्षेत्रात जॉब करता आला तर? जाणून घ्या, “ड्रीम जॉब” मिळवण्याच्या पंधरा ट्रिक्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हातात पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे नोकरी मिळवणे. कारण त्यावरच पुढचं आयुष्य कसं जाणार आहे हे अवलंबून असतं. पण बऱ्याच लोकांच असं असतं की, मला मनासारखा जॉब मिळालेला नाही, माझी आवड यामध्ये नाही.

काहीजणांचं असं असतं की, नक्की कशात जॉब करावा हे काही ठरलेलं नसतं आणि मग ते आपल्या कामाला, नोकरीला पूर्ण न्याय देऊ शकत नाही.

 जर आपल्याला अत्यंत आवडणार्‍या गोष्टीचा जर जॉब मिळाला तर? काय बहार येईल!! आपली आवड आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन जर एक झालं तर त्याच्या इतकं उत्तम काही नसेल.

ड्रीम जॉब मिळवण्यासाठी जाणून घेऊयात अशाच काही ट्रिक्स.

१. फोकस ठरवा.

 

goals inmarathi
Inc.com

 

काय करायचं आहे याची एकदा नीट माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्ही जर विज्ञान क्षेत्रात असाल तर तिकडे तुम्हाला संशोधन करायचे आहे की विज्ञान मुलांना शाळेत, कॉलेजमध्ये शिकवायचे आहे हे ठरवावे लागेल.

किंवा जर मास कम्युनिकेशन करत असाल तर प्रिंट मीडिया की डीजीटल मिडीया?

त्यातही न्युज रिपोर्टर की न्यूज रीडर, यापैकी काय करायचं आहे हे ठरवलं की आपला फोकस नीट ठेवता येतो.

तेच इंजिनिअरिंगच्या बाबतीतही म्हणता येईल. बऱ्याचदा हा फोकस विद्यार्थ्यांना माहीत नसतो. सरधोपटपणे एक पदवी मिळवायच्या मागे विद्यार्थी लागलेले दिसतात.

 

२. सखोल अभ्यास करा

सध्याच्या शैक्षणिक स्थितीत तुम्ही जी पदवी मिळवली आहे ती प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडेलचं असे नाही. त्यासाठी तुम्हाला आवडत्या विषयातील जास्त माहिती करून घ्यावी लागेल.

 

 

जर तुम्हाला शिकवण्यात रुची असेल तर एखादा विषय घेऊन त्याविषयीची नवनवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून ते मुलांना कशा पद्धतीने समजवता येईल हे पहावे लागेल.

कारण समजावून देता येणं पण एक स्कील आहे.

 

३. कामाचा अनुभव घेताना बिनधास्तपणा ठेवा

आपण बऱ्याचदा पाहतो की, ज्या नोकरीच्या जाहिराती येतात त्या मध्ये तुम्हाला कामाचा अनुभव किती आहे हे विचारलेल असतं.

तसंच कधीकधी एखाद्या कामासाठी दोन वर्षाचा, तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असतो.

आता हा अनुभव आपल्याला काही लगेच मिळत नाही, मग यासाठी काय करता येईल तर कॉलेजमध्ये असतानाच कुठे इंटर्नशिप करता येते का हे पाहून काम करायला करायला लागेल.

 

internship inmarathi
telegraph india

 

तिथे ज्या प्रकारची कामं चालतात ती पाहून घेणे आणि त्यात सामील होणे फायद्याचं ठरतं.

शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असाल तर तुमच्या आवडत्या विषयावर एखादा ब्लॉग चालू करणे आणि तो सोशल मीडियावर, आपल्या मित्रपरिवारात शेअर करून त्याबद्दल माहिती देणे हे पण उपयोगी आहे.

 

४. आत्मविश्वास वाढवा

आपल्याला शिक्षण आणि अनुभव जसे उपयोगाचे आहेत तसेच तुमचा आत्मविश्वास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.

तुम्ही आत्तापर्यंत जे शिकला आहात, जो अनुभव घेतलाय, ते तुम्ही किती आत्मविश्वासाने दुसऱ्यांना सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला तो जॉब सहज मिळेल.

 

interview-inmarathi
mpgi.edu.in

 

त्या विषयाची तुमची आवड सुद्धा समोरच्या व्यक्तीला कळली पाहिजे, दिसली पाहिजे.

तुम्ही हे काम करण्यासाठी किती उत्सुक आहात हे जर समोरच्याला कळलं तर तुमच्या आवडीचं काम तुम्हाला नक्कीच करता येईल.

 

५. रिझ्युम आकर्षक करा

 

resume inmarathi 1

 

जॉब साठी तुमचा रिझ्युम तुम्ही कसा लिहिताय, कसा प्रेझेंट करताय हे पण महत्त्वाचं आहे.

तुम्ही शिकलेले सगळे स्किल्स, घेतलेला अनुभव ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्युम मध्ये असायला हव्यात.

रिझ्युम सतत अपडेट करायला हवा.

 

६. प्रेझेंटेबल रहा

interview-marthipizza
avservices.co.in

 

नोकरीसाठी किंवा जॉबसाठी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस एक प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही तिकडे गेले पाहिजे.

प्रेझेंटेबल म्हणजे उगीचच काहीतरी भडक कपडे न घालता फॉर्मल आणि स्वच्छ कपडे घालून इंटरव्ह्यूला जायला हवं. चेहरा हसतमुख असायला हवा.

तुमचा नर्वसनेस तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. इंटरव्ह्यू देताना हाताची घडी घालून बसू नका.

मुलाखत घेणाऱ्यालाच उलट प्रश्न विचारू नका. कामाप्रती तुमची असलेली आवड इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कळली पाहिजे. तुम्हाला हा जॉब का हवाय हे पटवून देता यायला हवं. 

 

७. जे कराल ते मनापासून करा

 

office 1 inmarathi
livemint

 

सर्वसाधारणपणे नोकरी करताना असं समजलं जातं की, मला नोकरीची गरज आहे म्हणून मी नोकरी करतो किंवा करते.

तसंच कंपनीलाही ते काम होण्याची गरज आहे म्हणून त्यांनी मला घेतले आणि त्याचे पैसे मला मिळतात हाही विचार करावा.

हा फक्त इतकाच विचार न करता जर तुम्ही त्या नोकरीत काही प्रॉब्लेम आले तर तो स्वतःचा प्रॉब्लेम आहे समजून सोडवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही त्या कंपनीतील बेस्ट माणूस ठराल.

 

८. शांतपणे विचार करा

कायम लक्षात ठेवायला हवं की, कोणताही माणूस किंवा कोणतीही नोकरी ही अगदीच परफेक्ट नसते.

 

raju 3 idiots rastogi interview file closing inmarathi

 

छोट्या छोट्या गोष्टींनी जर ताण घेतला तर त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो. म्हणून शांतपणे प्रत्येक समस्येचा सामना करून नोकरी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

आपलं असलेलं काम प्रामाणिकपणे करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची एक इमेज नोकरीच्या ठिकाणी तयार होते आणि वातावरण हसत खेळत आणि हेल्दी राहायला मदत होते.

 

९. जिकडे काम करणार आहात त्या कंपनीची माहिती घ्या

आपण जॉबसाठी इंटरव्यू देतो त्यावेळेस कंपनी आपल्याला पारखून घेते. हा माणूस कंपनीसाठी योग्य आहे की नाही याची चाचणी केली जाते.

 

office inmarathi

 

तशी चाचणी आपणही केली पाहिजे, म्हणजे कंपनीचा इतिहास काय आहे? कंपनीचं बाजारातील रेप्यूटेशन काय आहे? याची माहिती घेतली पाहिजे.

कंपनीत काम करणारे लोक कसे आहेत, याची सर्वसाधारण माहिती आता आजकाल आपल्याला मिळू शकते.

 

१०. जॉब सर्च चालूच ठेवा

जॉब मिळेपर्यंत जॉब सर्च करणं हाच एक मोठा जॉब असतो. त्यासाठी रिझ्युम देणे, वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहणे, नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईटवरती आपले रिझ्यूम अपलोड करणे इ.

 

the social network inmarathi
npr.org

 

 

कधी कधी स्वतःच्या मित्रांच्या संपर्कातून आपल्या आवडीचं काम मिळतंय का याचा सतत शोध घेणे उपयोगी पडते.

 

११. लोकसंपर्क वाढवा

आपण काय सर्च करतोय हे लोकांना माहीत असलं पाहिजे. LinkedIn, Facebook सारख्या वेबसाईटवर लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे.

 

community facebook inmarathi
socialboard

 

तुमच्या आवडत्या विषयावर तुमचे विचार कळण्यासाठी एखादा ब्लॉग लिहिलात आणि तो शेअर केलात तर त्यातूनही लोकांच्या संपर्कात राहता येतं.

सोशल मीडियावर आपल्या आवडीच्या विषयाचे ग्रुप जॉईन करूनही आपलं म्हणणं सांगता येतं.

 

१२. सौजन्य दाखवा

इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर ती नोकरी मिळतेय का नाही, ह्याचा फॉलोअप ठेवणे जितके गरजेचे आहे, तितकेच इंटरव्ह्यूला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानणे सुद्धा महत्वाचे आहे.

job interview featured
Sage SkillsMap

 

त्यावेळेस एखादं thankyou लेटर मेल करायचं. कारण मिळालेला अनुभव कधीही उपयोगी पडू शकतो.

पुढे जेव्हा त्यांना नवीन नोकर भरती करायची असते तेव्हा रिझ्यूमचा विचार होऊ शकतो.

 

१३. सकारात्मक रहा, प्रयत्न करा

preparations for interview inmarathi
pintrest.com

जॉब मिळवण्यासाठी नेहमी सकारात्मक रहा. एखाद्या ठिकाणी जॉब मिळाला नाही तरी नाउमेद होऊ नका. दुसऱ्या ठिकाणी आणखीन प्रयत्न करा.

 

१४. जॉब सर्च शिस्तबद्ध ठेवा

 

internship 1 inmarathi

 

जॉब सर्च करण्यासाठी एखादा जॉब कन्सल्टंट पाहणे, नोकरीच्या मेळाव्यांना हजेरी लावणे  यामुळे जॉब सर्च सोपे आणि शिस्तबद्ध होते.

 

१५. जॉब मिळवताना पूर्ण विचार करा

जॉब कशामध्ये करायचा आहे हे ठरवल्यावर तो कुठे कुठे मिळू शकतो याची चाचपणी पण करणे गरजेचे असते.

म्हणजे बाहेरगावी, परराज्यात, परदेशात जॉब मिळत असेल तर तिकडे जायची तयारी आहे का? आणि तिकडे मिळणाऱ्या पगारात आपले भागेल का याचा विचार पण जॉब शोधताना करावा.

 

women-inmarathi
officechai.com

 

जॉब मिळवणं हे एक आनंददायी काम आहे असे समजून त्याचा शोध घ्यावा. वयाच्या वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला समजून जातं की, आपलं करिअर कशात होऊ शकतं.

तोपर्यंत घरातील फारशी जबाबदारी ही नसते. पण हे एकदा कळल्यावर आणि तिकडे जॉब करताना, ते मात्र मन लावून करायला हवं आणि त्यातून आपली प्रगती करत राहावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?