'"त्याच्या"साठी तिच्या या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक, वाचा आणि त्याला खुश करा...

“त्याच्या”साठी तिच्या या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक, वाचा आणि त्याला खुश करा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

स्त्री आणि पुरुष हे नातं म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर गुंतागुंतीचं असतं. दोन वेगळ्या धाटणीच्या व्यक्ती म्हटल्या की, वेगळेपण हे आलंच आणि म्हणूनच त्यांच्या नैसर्गिक गुण-दोषांसकट त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.

मूलतः स्त्री म्हटलं की ममता, कोमलता आणि पुरुष म्हटलं की खंबीरता हे आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं.

काही प्रमाणात यात तथ्य असलं तरीही पुरुषांचीही कोमल बाजू असते आणि ती समजून घेतली तर नक्कीच आपल्याला आपला जोडीदार समजून घ्यायला मदत होईल.

 

 

 

जशा मुलींच्या काही अपेक्षा असतात तशा स्पष्ट न बोलणाऱ्या मुलांच्याही असतातच की, मुलांनी आपल्याला समजून घ्यावं असं मुलींना वाटतं तसं मुलांना वाटत नसेल?

रोमान्स ही कल्पना फक्त शारीरिक नसून त्यात मानसिक गोष्टींचाही समावेश असतो हे आपण जाणून घ्यायला हवं आणि म्हणूनच आज त्या अनुषंगाने मुलांना मुलींच्या कोणत्या गोष्टी ‘रोमँटिक’ वाटतात हेही जाणून घेऊया.

१. समजूतदारपणा :

गैरसमज हे कोणाला हवे असतात? अर्थाचा अनर्थ झाला की, फिस्कटतो तो म्हणजे सुसंवाद आणि पोसला जातो तो इगो. कोणत्याही नात्यात हे मिठाच्या खड्या सारखंच असतं.

मुलींनी आपल्या वागण्याचा किंवा बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये अशी मुलांची माफक अपेक्षा असते आणि ती पूर्ण झाली की त्यांना बरं वाटतं.

 

Couple-Talking Inmarathi

 

आपल्या जोडीदाराच्या बोलण्याने किंवा कृतीने न दुखावता त्यामागच्या भूमिकेचा विचार करायला हवा अथवा त्याबाबतीत मोकळेपणाने बोलून त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी.

अगदीच टोकाची भूमिका घेतली तर ‘आपल्याला समजून घेतलं जात नाहीए’ अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते आणि आपसूकच नात्यात दुरावा किंवा तणाव जाणवतो.

त्याऐवजी, जर मुलांनी स्वतःभोवती तयार केलेल्या भिंती ओलांडून त्याच्या मागे दडलेलं मन मुलींनी जाणून घेतलं तर ते स्वागतार्ह असतं.

२. सुसंवाद :

 

Couple in Hotel InMarathi
theshrinkonyourcouch.com

 

कोणत्याही नात्यांत सुसंवाद महत्वाचा. मुली या बडबड्या असतात आणि त्या शब्दांतून व्यक्त होत असतात.

मात्र मुलांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच जर कोणी त्यांचं अव्यक्त राहणंही बरोबर हेरलं,(विशेषतः आपल्या जोडीदारीणीने) तर त्यांना ते भावतं!

यासाठी ‘तो ‘काय बोलतोय याकडे लक्ष देणं आणि त्यामागचा गर्भितार्थ जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच कितीही वाद झाला तरी सरतेशेवटी नात्यातला गोडवा टिकवणं महत्वाचं आहे.

आपल्या मनातलं मोकळेपणानं जिच्याशी बोलता येईल अशी ‘ती’ त्याला नक्कीच हवीहवीशी वाटते.

 

३. मोकळीक :

आपल्यावर कोणी अधिराज्य गाजवलेलं कोणत्याही पुरुषाला आवडत नाही. हक्क गाजवण्यातली मजा आणि कंट्रोल करणं यातला फरक आपण समजून घ्यायला हवा. ‘त्याने’ काय करावं हे ‘तिने’ ठरवू नये.

जोडीदार असण्यापूर्वी ‘त्याचं’ही स्वतंत्र अस्तित्त्व आहे हे ‘तिने’ विसरता काम नये आणि म्हणूनच ज्या स्त्रिया पुरुषांना मनासारखं वागू देतात त्या त्यांना मनापासून आवडतात. त्याने सतत आपल्या बरोबरच असावं असा अट्टाहास असू नये.

 

girlfriend 3 inmarathi
Gulflance

 

त्यालाही मित्रवर्ग, नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तितकं तर त्याला नक्कीच करू द्यावं.

इतकंच नाही तर मनातली प्रत्येक गोष्ट जिच्याशी कोणत्याही आड-पडद्याशिवाय शेअर करता येईल इतका मोकळेपणा दोघांमध्ये असेल अशी मुलगी त्याला नक्कीच प्रिय असते.

 

४. विश्वास :

communicate_couple-InMarathi
BondingBees.com

 

कोणत्याही नात्याचा गाभा म्हणजे परस्परांमधील विश्वास. हा नात्याचा पाया जर भक्कम असेल तर मग त्यावरची इमारत ही ब्रिटिशकालीन इमारतींप्रमाणेच वर्षानुवर्षे भक्कम उभी राहील.

‘तिचा ‘माझ्यावर विश्वास आहे, ही भावना त्याला सुखावणारी असते. तिने जर वेळोवेळी आपल्या कृतीतून किंवा बोलून दाखवत तो विश्वास असल्याची जाणीव करून दिली तर ‘तो’ नक्कीच खूष होतो.

आणि तो विश्वास वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो आणि त्याचा नात्यावरील कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. इ

तकंच नव्हे तर त्याच्या स्वप्नांवर आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या त्याच्या क्षमतेवर तिचा विश्वास असल्याची जाणीवही त्याला सदैव पुढे जाण्याची ऊर्जा देत असते.

 

५. आदर :

मुलींना आपला आदर वाटावा असं मुलांना नेहमी वाटतं. त्यामुळे चारचौघातच नव्हे तर एकमेकांसोबत असतानाही त्याला धक्का लागेल असं काही मुलींनी केलं तर ते त्यांना अजिबात आवडत नाही.

 

indian-couple-marathipizza01
ak8.picdn.net

त्यामुळे मुलांच्या या अपेक्षेचा आदर करणारी मुलगी त्यांना अधिक आपलीशी वाटते.

फक्त आदरच नाही तर मुलांना ‘जसंच्या तसं’ आपलंस करून घेईल अशी ‘ती’ त्याला हवी असते. काही चांगले बदल वगळता सतत समोरच्याला बदलायला लावणारी व्यक्ती कोणाला आवडेल?

 

६. उत्स्फूर्तता :

नात्यातील उत्स्फूर्तता मुलांना अतिशय आकर्षित करते. सतत तेचतेच आणि चाकोरीबद्ध आयुष्य हे त्यांना कंटाळवाणं वाटतं.

 

dinner date inmarathi
missmalini

 

एखादी मुलगी जर अचानक काही वेगळं आणि हटके ठरवत असेल किंवा त्या अचानकपणातला आनंद लुटत असेल तर मुलांना त्या नात्यातला स्पार्क इंटरेस्टिंग वाटू लागतो.

एखादा ऐनवेळी ठरलेला डिनर प्लॅनसुद्धा त्यासाठी पुरेसा आहे.

 

७. आत्मविश्वास बाळगा :

मुलींचं सर्वांत शक्तिशाली शस्त्र म्हणजे त्यांचे अश्रू आणि त्यापुढे मुलांचा टिकाव लागणं कठीण. म्हणूनच या शस्त्राचा वापर करून ब्लॅकमेल करणारी किंवा सतत एखादं रडगाणं गाणारी मुलगी मुलांना अजिबात आवडत नाही.

 

virat anushka inmarathi 1
iwmbuzz

 

याउलट स्वतःचं असं वेगळं आणि छान व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने पेलून नेणारी, स्वतःचे विचार असणारी, स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने वाटचाल करणारी, बरोबरीची मुलगी मुलांना हवीहवीशी वाटते.

 

८. आधार :

आयुष्यात अनेक चढ-उतार येणं स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री पुरुषांना जवळची वाटते. मग तो आधार शाब्दिक किंवा कृतीतूनही देता येतो.

 

couple holding hands inmarathi

 

त्यामुळे कठीण प्रसंगातून मार्ग काढत बाहेर पडणं सुसह्य होतं. आपल्या समाजात अगदी लहानपणापासूनच पुरुषांचं रडणं हे ‘पुरुषत्व’विरोधी आणि कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं.

खरंतर रडणं हे माणसाच्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि म्हणूनच वेळप्रसंगी जिच्यासमोर मनमोकळं रडून भावनांचा निचरा करता येईल, तेही कोणत्याही जजमेंटशिवाय अशी ‘ती’ तो नेहमीच शोधत असतो.

 

९. चाकोरी बाहेरील कृती :

आजकाल काहीतरी हटके किंवा आऊट ऑफ द बॉक्स गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे आपल्यासाठी असं काही करणाऱ्या ‘तिच्या’ प्रेमात कोण पडणार नाही?

 

srk-anushka-INMARATHI
financialexpress.com

 

कधीतरी घरीच प्लॅन केलेलं कॅण्डल लाईट डिनर, अचानक ठरवलेली movie नाईट किंवा वाढदिवसाची पार्टी, एखादी रोडट्रिप नक्कीच नातं टवटवीत करतं.

मुलींना सरप्राईज देणं हे जणू मुलींना मुलांचं कर्तव्य वाटतं तसंच कधीतरी मुलींनी मुलांसाठीही अशा स्पेशल गोष्टी केल्या तर मुलांनाही मस्त वाटेल .

 

१०. इंटिमसी :

नात्याचं ट्युनिंग वाढवायला या इंटिमसीबाई नक्कीच मदत करतात. लहानलहान गोष्टींमधून आपलं प्रेम व्यक्त करणं खूप सहज आणि सोपं असतं. नातं जुनं झालं तरी त्यातलं नावीन्य टिकवायला इंटिमसी खूप महत्वाची असते.

 

loving-couple InMarathi

 

कधी दमलेल्या त्याला छान मालिश करून दिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला थोपटलं तर त्यालाही रिलॅक्स वाटतं.

कधी एखादा लाल टपोरा गुलाब त्याला दिला किंवा ऑफिसमध्ये सरप्राईज म्हणून चॉकलेट आणि फुलं पाठवली तर नक्कीच त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

त्याच्याबद्दलच्या भावना त्याच्यासमोर शब्दांत व्यक्त केल्या, एखादा ‘love you’ चा मेसेज अथवा सहज आठवण आली म्हणून कॉल केला तर त्याचा दिवस अविस्मरणीय ठरेल.

आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करावं तितकं थोडं आहे. मग ती मुलगी असो नाहीतर मुलगा.

आपल्या आयुष्यात अशी एखादी सुंदर मुलगी असावी असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे.

तर मुलींनो तुम्हालाही जशा तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर मस्त वाटतं तसं मुलांनाही मस्त रोमँटिक वाटावं यासाठी थोडा प्रयत्न करणार ना? मग बघा तुम्हालाही त्यातून किती आनंद मिळतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?