सिंधी लोकांच्या आडनावामागे “आनी” का असतं? हा रंजक प्राचीन इतिहास नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

माणसाची ओळख ही त्याच्या नावाप्रमाणेच आडनावाने ही होते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळे इथली आडनावही विविध आहेत. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण पाहतो तर बरीच आडनावं ही शेवटी “कर”, लावून संपतात. उदा, सचिन तेंडुलकर

 

sachin tendulkar

 

“कर”च्या आधी त्यांच्या गावाचं नाव असतं, म्हणजे त्या गावचे रहिवासी. (उदा. सातारकर) कधीकधी काही आडनावे खूप मजेशीर असतात जे वाचून आपल्यालाही हसू येतं.

काही उत्तर भारतीय आडनावांमध्ये वेदांचा समावेश आहे. असं वाटतं जसं की, दिवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी ह्या लोकांना वेद येतात.

 

ganga ghat inmarathi
culture trip

 

बंगाली आडनावं मुख्यतः बॅनर्जी, चॅटर्जी, मुखर्जी, बंदोपाध्याय, उपाध्याय अशी असतात. तर दक्षिण भारतीय लोकांची नावे पाहिली तर नाव कोणतं अन् आडनाव कोणतं तेच कळत नाही!!

तसंच पारशी आडनावही आपली ओळख राखून आहेत. त्यांचे आडनाव ही साधारणपणे ‘वाला’ लावून संपतात. (उदाहरणार्थ बाटलीवाला.)

भारतात अजून एक समाज राहतो आणि तो म्हणजे सिंधी. यांची आडनाव जर आपण पाहिली तर त्यांच्या आडनावांचा शेवट “आनी / आणी” किंवा “जा” अक्षराने होतो. आडवाणी, गिडवाणी,  होतवाणी, वासवानी आणि जुनेजा, बथेजा.

यांच्या आडनावांचा एक इतिहास आहे जाणून घेऊया तोच इतिहास…

 

kiara advani Inmarathi

 

या आडनावांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न, सुंदर अय्यर आणि डॉ. बलदेव मतलानी यांनी केला. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून जे काही मांडलं ते पटण्यासारखे आहे.

हिंदू धर्मात जसं गोत्र सांगतात तसं सिंधी लोक त्याला नुखं म्हणतात. वैदिक काळातील कुटुंब ही त्या घरातील आजोबांच्या नावाने ओळखली जायची.

म्हणजे गर्ग ऋषींची मुलं ही गर्गीन, तर दक्ष ऋषींची मुलं ही दक्षायान किंवा दक्षायानी. संस्कृत भाषेनुसार “यान” आणि “यानी” म्हणजे त्यांचे उत्तराधिकारी. म्हणजे दक्षाचे उत्तराधिकारी.

याच ‘यानी’ चं सिंधी भाषेत झालं “अानी”. या ‘यानी’चं अजून एक स्पष्टीकरण दिलं जातं, ते म्हणजे संस्कृत मध्ये अंश. म्हणजे मूळ व्यक्तीचा, पुढच्या पिढीमध्ये आलेला अंश.

म्हणून मग सिंधी लोकांनी काय केलं तर आपल्या आजोबांच्या नावापुढेच “अानी” लावायला सुरुवात केली. म्हणजे तोलारामचे वंशज तोलवानी. अशाच पद्धतीने सिंधी आडनावं तयार होत गेली.

 

sindhi people inmarathi 1
scroll.in

 

गिडवाणी आडनावाचा पण एक छान किस्सा आहे. श्री बेरूमल मेहरचंद अडवाणी यांनी लिहिलेल्या पुस्तकात तो सांगण्यात आला आहे. गिडवानी हे आडनाव दिवान गिडूमल यांच्या नावावरून आले आहे.

 

deewan gidumal inmarathi
dawn

 

दीवान आदियोमल यांचा मुलगा दिवान चोतिराम, चोतिरामांचा मुलगा दिवान बेलामल, बेलामलांचा मुलगा म्हणजे दिवान गिडुमल. दिवान गिडूमलांना स्वतः चे संतान नव्हते.

पण त्याकाळी दिवान गिडुमल या नावाचं समाजामध्ये खूप मोठं प्रस्थं होतं म्हणून त्यांच्या पुतण्यांनी म्हणजेच त्यांच्या भावाच्या मुलांनी त्यांचं नाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली.

म्हणजे आम्ही दीवान गिडूमल यांचे वारसदार. पुढे त्यांच्या मुलांनी तेच आडनाव कायम ठेवलं. म्हणजे गिडवानी हे गिडुमलांचे वारसदार ठरले.

तसंच अडवाणी हे आडनाव पण दीवान आडूमलांच्या नावावरून पुढे आले आहे. सिंधी मधील रामचंदानी हे आडनाव म्हणजे रामचंदांचे वंशज. तसचं शेवाक्रमाणी म्हणजे शेवाक्रमांचे वंशज.

ही अशीच मोठी यादी आहे. परंतु बेरूमल मेहरचंद यांनी एक निरीक्षण नोंदवले की अजवानी, भवनानी, जगतियानी, करणामलानी, आणि मोतीवानी हे सगळे एकाच घरातून आलेले आहेत.

परंतु त्याचं नीटस् स्पष्टीकरण मात्र त्यांनी दिलं नाही.

बलदेव मतलानी यांनी एक पुस्तक लिहिले, त्यानुसार सिंधी लोक पुरातन काळापासून आहेत. इसवी सन पूर्व ७१२ पासून त्यांचा उल्लेख आहे. सिंधू संस्कृती ही त्यांचीच. सिंध प्रांतात ते राहायचे म्हणून त्यांना सिंधी म्हटलं गेलं.

 

ranveer-inmarathi

 

तिथे हे लोक राहत असताना जेव्हा इस्लामिक आक्रमणे झाली. त्यानंतर काही सिंधी लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला,कारण बिगर मुस्लिम लोकांना खूप जास्त कर आकारणी केली जायची आणि हे लोक मुळातच व्यापारी.

काही सिंधी लोकांनी आपला धर्म वाचवण्याकरिता देश सोडला व अरोर, पंजाब प्रांतात ते राहायला आले. परंतु आपला हिंदू सिंधू धर्म त्यांनी सोडला नाही.

पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, ज्या सिंधू लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांनी पण आडनाव घेण्याची परंपरा मात्र सिंधू संस्कृतीत जशी होती तशी कायम ठेवली, जसं की लखानी, शहानी (म्हणजे मोहम्मद शहाचे वंशज).

अजून एक प्रकार सिंधी आडनावात पाहायला मिळतो तो म्हणजे आडनावाच्या शेवटी “जा “असतं. जसं की, अहुजा, रहेजा, हिंदुजा, बथेजा. सिंधी मध्ये “जा” म्हणजे चे (off) किंवा (belongs to).

एखादी व्यक्ती ‘जूने’ या गावातून आली असेल तर त्या व्यक्तीच्या आडनावापुढे जूनेजा.

मोहम्मद गजनीच्या कालखंडानंतर बऱ्याच सिंधू लोकांनी स्थलांतर केलं किंवा त्यांना करावं लागलं. काहीजण भारतातील पंजाब, गुजरात मध्ये आले, काहीजण युरोपात गेले , काही चीनमध्ये गेले.

 

Sindhi famous people

 

भारतात काही भागात त्यांना बंजारा असं म्हटलं गेलं. युरोप मध्ये त्यांना सिंट्टी म्हटलं गेलं, तर मंगोलिया चीन मध्ये त्यांना सिंटोवी म्हटलं गेलं.

हे सगळे बाहेर गेलेले सिंधी लोक गजनीच्या अस्ताची वाट बघत होते की, जेणेकरून आपल्याला परत आपल्या प्रदेशात जाता येईल. त्यापैकी काहीजण परत आले तर काहीजण युरोपातच अजून पश्चिमेकडे गेले.

जे परत आले त्या लोकांना आर्यन म्हटलं गेलं. आर्यन हे संस्कृत मधले आर्य नाहीत तर सिंधी मध्ये आर्य म्हणजे परत येणारे. जे सिंधी लोक इराण कडे गेले त्यांना इंडो-इराणी असं म्हटलं गेलं.

तिकडे अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित केलं. शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित केलं. तर अर्मेनिया, टर्की आणि ईजिप्त इकडे गेलेले जे सिंधी होते त्यांनी तिकडून व्यापाराचं तंत्र शिकले.

 

sindhi people inmarathi
daily times

 

आणि ते तंत्र त्यांनी भारतात आल्यावर वापरले. परत आल्यावर आपली ओळख सांगायला त्यांना त्यांच्या आडनावांचा उपयोग झाला. आणि आपण कोणाचे वंशज आहोत हे त्यांनी त्यावरून सांगितलं.

सुरुवातीपासूनची वेगवेगळी स्थलांतरं, निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी केलेला व्यवहार या सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्यांच्या संस्कृतीत आता प्रचंड बदल झाला आहे.

अगदी त्यांच्या पेहरावा पासून त्यांच्या खानपानाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यांची संस्कृती, त्यांचे संगीत यांच्यामध्ये पण बदल झाला आहे.

नवीन काळानुसार लग्नाची परंपरा चेंज होत आहे आता इंटरकास्ट, इंटर रीलिजन लग्नं होत आहे आणि अजून त्यांची संस्कृती बदलत आहे, बहरत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?