' अचानक नोकरी गेली तर? त्या कठीण दिवसांतून बाहेर पडण्यासाठी 'या' गोष्टी करा

अचानक नोकरी गेली तर? त्या कठीण दिवसांतून बाहेर पडण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

कोणाच्या जाण्याचा जर आयुष्यात, जीवनात खरंच फरक पडत असेल तर ती म्हणजे ‘नोकरी’. आपली सबंध मानसिकता, बिघडून जाते. नोकरी गमावणे ही काही साधी गोष्ट नाही.

मानसिकता बिघडली की आरोग्याचे बारा वाजतात, हे वेगळं सांगायला नको, पण आपण जसं म्हणतो, की हरवलेली गोष्ट परत मिळते किंवा त्यासाठी आपण स्वतः पर्याय जनरेट करतो. तीच बाब नोकरीच्या बाबतीतही लागू होते.

नोकरी जाणे पचवायला कठीण गोष्ट आहे, पण एक नोकरी गेली याचा अर्थ आपल्याला कुठेचं काम मिळणार नाही असं तर होत नाही ना?

 

corporate job pressure Inmarathi

 

पण नोकरी गेली, आता पुढे काय? हा प्रश्न असतोच. आपण शिक्षित आहोत,आपल्याकडे काही तरी स्किलसेट आहेत म्हणून आपली त्या पोजिशनवर नेमणूक झाली होती  बस्स एवढं लक्षात ठेवा आणि आपण कशात कमी पडतोय याचा शोध घ्यायला सुरुवात करा.

त्या प्रमाणे आपलं दिवसाचं शेड्युल तयार झालं पाहिजे.

कमीत कमी वेळ वाया घालवून आपली नोकरी का गेली? या भूतकाळात घडलेल्या घटनेत डोकं वाया घालवण्यापेक्षा नवीन नोकरी मिळवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? याचा विचार केला पाहिजे.

पुढे काही मुद्दे लिहिले आहेत, त्यानुसार आपला दैनंदिन रुटीन ठरवून आपण नवीन नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो.

 

• सकाळी लवकर उठा. व्यायाम करा-जॉगिंग करा. योग करा.

 

exercises Inmarathi
GoMama247

 

दिवसाची सुरुवात करायला या व्यतिरिक्त चांगला मार्ग नाही. डिप्रेशन मधून बाहेर यायला हे करायचं म्हणजे करायचंच.

यामुळे सगळी नकारात्मकता निघून जाईल. जर दिवसाची सुरवातच सकारात्मक ऊर्जेने झाली तर अफकोर्स दिवस मस्त जाण्यात काहीच अवघड नाही.

 

• सकाळच्या नेहमीच्या गोष्टी आवरून चिंतन करा

 

change the way of thinking Inmarathi
Life Palette

 

दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे याचं साधं छोटेखानी वेळापत्रक तयार करायला शिका. काय करायचं, काय करायचं नाही हे आपण इथे ठरवू शकतो.

 

• स्वतःचा रिझ्युम डेव्हलप करा

 

resume inmarathi 1

 

फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यूर आपल्याला आपल्या रिझ्युमच्या बेस वर जज करतो.

पोझिशन साठी परफेक्ट स्किलसेट, वर्क एक्सपिरियन्स या गोष्टी योग्य पद्धतीने मांडण महत्वाचं असतं. त्यावर तुमच्या पुढच्या गोष्टी ठरत असतात. म्हणूनच,

रिझ्युम अपडेट करा. तुम्हाला नवीन काय येतं ते लिहा. इम्प्रेसिव्ह रिझ्युम तयार करायला सुरवात करा.

 

• जॉब पोर्टलवर नोकऱ्या शोधून अप्लाय करायला सुरुवात करा

 

linked in inmarathi
lynda.com

 

आता पासून हेच तुमचं काम. नोकरी, लिंकडीन सारख्या जॉब पोर्टल वर प्रोफाइल क्रिएट करून रिलेव्हेंट जॉब सर्च करायला सुरुवात करा. यावर काय करावं ते वेगळं सांगायला नको.

या प्रोफाइल पण आकर्षित ठेवा. पगार संबंधी, जॉब प्रोफाइल संबंधी गोष्टी क्लीयर ठेवा.

लिंकडीन सारख्या पोर्टल वर एचआर/मॅनेजर यांच्याशी थेट संपर्क येतो. त्यांच्या पोस्ट लाईक करणं, त्यावर कमेंट करणं यासारख्या लहान लहान गोष्टींनी आपलं नेटवर्क तयार करणं सोपं जातं.

जॉब शोधायला हेच नेटवर्क नंतर उपयोगी पडेल.

 

• दुपारी थोडी विश्रांती घेऊन आपला स्किल सेट इंप्रुव्ह करा. नवीन स्किल शिका.

 

hrithik roshan dhoom 2 inmarathi

 

आयटी मध्ये असाल तर आता एक लँग्वेज येऊन फायदा नाही. मल्टिपल लँग्वेज सोबत विविध टूल्स येणं आता काळाची गरज आहे.

डेटा सायन्स, डेटा मायनिंग, मशीन लर्निंग सारख्या नवीन टेक्नॉलॉजी आता मार्केट मध्ये आल्या आहेत. त्याला उपयोगी अशा आपल्या स्किल्स तयार करणं आता गरजेचं आहे.

कोअर हार्डवेअर मध्ये असाल तर आता रोबोटिक्स, ऑटोमेशन हे सुद्धा आता प्रगत होत चाललं आहे. पायथन, रास्पबेरीपाय सारख्या गोष्टीवर आता हार्डवेअर डेव्हलप होत आहेत.

मार्केटला असलेली गरज, आपला असलेला अनुभव त्यानुसार आपले स्किलसेट डेव्हलप करायला सुरुवात करा. ऑनलाइन कोर्सेस घ्या. कोर्सेरा सारख्या साईट वर तर भरपूर कोर्सेस उपलब्ध आहेत.

यामुळे फायदा तर नक्कीच होणार आणि तो देखील भरपूर.

 

• संध्याकाळी पुन्हा चालायला जा

 

Indian Family Walking In Countryside

 

दिवसभर घरी बसून नको ते विचार करण्यापेक्षा संध्याकाळी जरा बाहेर जा. जवळपास एखादी टेकडी असेल ते तिथे फिरायला जा. मुलांबरोबर वेळ घालवा.

यामुळे नकारात्मक विचार दूर राहतील आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

 

• थोडं वाचन करा

 

Reading-inmarathi
pexels.com

 

आता मोबाईल, संगणक, टीव्ही सारखे असंख्य पर्याय असताना वाचन कोण करतं? कोणी करत नाही म्हणून तुम्ही करा. याने तुमचं मन रमेल.

टेक्नॉलॉजी पासून थोडी फारकत घेऊन वाचन करा. खूप फरक पडतो.

 

• स्वतःचा विरंगुळा जपा. कुटुंबासोबत वेळ घालवा

 

family inmarathi
childandfamilymentalhealth.com

 

नोकरी नाही याचा अर्थ सगळं संपलं असा होत नाही. आयुष्यात आलेला हा एक बॅड पॅच असतो आणि तो पॅच घालवायला तुम्ही सध्या कार्यरत आहात हे लक्षात ठेवा. डोक्याला हात लावून आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचा मूड स्पॉईल करण्यात काहीच अर्थ नाही.

आनंदी वातावरण ठेवायचा प्रयत्न करा. स्वतःलाच याचा खूप फायदा होईल. तुमच्याकडे नोकरी नाहीये, पण त्यासाठी तुम्ही आता रोज काम करणार आहात.

नोकरी शोधणे/काम शोधणे हे देखील कामच आहे. हे काम जर परफेक्ट जमलं तर अफकोर्स नोकरी मिळाल्यानंतर पण तुम्ही तुमचं काम परफेक्ट करू शकता.

वर लिहिल्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं शेड्युल तयार केलं तर, काही तरी कामानिमित्त आपण मेहनत केली याच समाधान मिळेल. ती मेहनत वाया जाणार नाही.

 

ranbir kapoor 1 inmarathi
yash raj films

 

यामुळे एक तर नोकरी गेल्याच्या डिप्रेशन मधून तुम्हाला बाहेर येता येईल. सोबतच तुम्ही मोटिव्हटेड रहाल. शिवाय तुम्ही तुमचा फोकस सुद्धा इम्प्रुव्ह करू शकाल.

नोकरी गेली, आता काय करू? असं म्हणून रडत राहण्यापेक्षा, जो वेळ मिळालाय त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. आतापर्यंत नोकरीमुळे तुम्हाला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या सगळ्या करा.

शेवटी, प्रयत्न करणं हीच गोष्ट आपल्या हातात आहे. जी व्यक्ति मनापासून प्रयत्न करते तिला यश नक्कीच मिळतं.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?