' हे ७ प्रश्न तुमचं उभं आयुष्य बदलून टाकतील, फक्त एकदा स्वतःला विचारून बघा…! – InMarathi

हे ७ प्रश्न तुमचं उभं आयुष्य बदलून टाकतील, फक्त एकदा स्वतःला विचारून बघा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

‘Change is the only constant thing in our life’ अशी अनेक वाक्य आपण ऐकतो आणि सोडून देतो. काही जण ती अंमलात आणतात सुद्धा, मात्र काही लोकांनी ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या उक्तीनुसार वागायचे ठरवलेले असतेच.

आणि त्यानुसार जसं आयुष्य चालू आहे तसे ते चालत राहतात. मात्र ज्याअर्थी आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत त्याअर्थी आपले आयुष्य हे इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळे असले पाहिजे. नाहीतर ते प्राणी आणि आपण यात फरक काय उरला.

आज जगात अनेक लोकांनी त्यांचे आदर्श आपल्या पुढे ठेवले आहेत. ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या आयुष्यात आणि पर्यायाने समाजात बदल घडवून आणले आणि आपले स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले.

 

bill-gates-inmarathi

 

प्रत्येक सामान्य माणूस हा असामान्य होईल असे नाही मात्र आपण जे आयुष्य जगत आहोत त्यात काहीतरी बदल करून आपणच आपले आयुष्य अधिक चांगले करू शकतो.

यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्व परीक्षण. आपण आज कुठे आहोत? आणि आपल्या आयुष्यात बदल घडवून आपल्याला कुठे जायचे आहे? हे प्रत्येक माणसाने स्वतःसाठी ठरवले पाहिजे.

म्हणूनच, खालील प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला एकदातरी विचारले पाहिजेत जे आपले आयुष्य बदलण्यात नक्कीच मदत करतील.

१. माझ्या क्षमता काय आहेत?

 

know yourself inmarathi
industry leaders magzine

 

प्रत्येक माणूस हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो म्हणूनच प्रत्येकाचे गुणही वेगळे असतात.

यासाठीच दोन माणसांमध्ये तुलना न करता माझ्या क्षमता काय आहेत, कोणत्या गोष्टी मी विनाअडथळा, कुठपर्यंत करू शकतो हे प्रत्येक माणसाला माहीत असणं गरजेचं आहे.

 

२.बलस्थाने आणि कमकुवतपणा

 

weakness inmarathi
novoresume

 

कोणताही माणूस हा सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकाची काही ना काही बलस्थाने आणि कमकुवत जागा या असतातच. जर या गोष्टी स्वतः ला माहीत असतील तर आपण पुढे काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

थोडक्यात, स्वतः चा SWOT analysis करणे गरजेचे आहे. (S-Stength,W-Weakness,O-opportunity,T-Threat)

 

३. भविष्यात मी स्वतः ला कुठे पाहतो?

 

future goals inmarathi

 

प्रत्येक माणसाची स्वतःची अशी काही स्वप्ने असतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो माणूस धावत असतो.

म्हणूनच मी आज कुठे आहे आणि आणखी ५-१० वर्षांनंतर मी कुठे असणार आहे? किंवा मला कुठे असायला हवे आहे? हे स्वतः ला समजणे जास्त गरजेचे आहे.

यासाठीच भविष्याचे नियोजन असणे गरजेचे आहे.

 

४. माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का? नेमका कोणता?

 

ranbir kapoor 2 inmarathi
bhmpics.com

 

आयुष्य हे निरस असू नये. प्रत्येक माणसाच्या जगण्याला काही ना काही अर्थ हवा. माणसाने आयुष्यात नवीन गोष्टी आजमावून पाहायला हव्यात. त्यामुळेच जगण्याला नवीन अर्थ प्राप्त होतो.

आणि मुख्य म्हणजे ते माणूस असण्याचे लक्षण आहे. नाहीतर किडे मुंग्या सुद्धा आयुष्य जगतातच मात्र त्याला फारसा अर्थ असतो अस नाही.

 

५. माझी स्वतः ची काय तत्त्वे आहेत आणि त्याप्रमाणे मी वागतो का?

 

future goals inmarathi 1

 

सामान्यतः माणसाला स्वतःची अशी काही तत्त्व असतात आणि त्यांना धरूनच तो आयुष्य जगत असतो. म्हणूनच मी माझ्या तत्वांना जागतो का? हे प्रत्येक माणसाने स्वतः ला विचारणे महत्त्वाचे आहे.

जर याचे उत्तर नाही असे आले तर स्वतः मध्ये वेळीच योग्य तो बदल करणे सुद्धा गरजेचे आहे.

म्हणूनच आज प्रत्येक अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

६. आज जर माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर मी काय करेन?

 

dear zindagi 1 inmarathi

 

खरं तर आपला शेवटचा दिवस कोणता आहे हे कोणालाच माहीत नसतं. मात्र आज जर माझा शेवटचा दिवस असेल तर मी ज्या गोष्टींना प्राधान्य देईन त्या गोष्टी आपल्या आयुष्यातील फार महत्वाच्या गोष्टी आहेत असे समजून जावे.

एखादा माणूस आपल्या कुटुंबासोबत, आवडत्या माणसांसोबत वेळ घालवू शकेल, आवडत्या गोष्टी करू शकेल.

मात्र जी गोष्ट तुम्हाला एवढी आवडते त्या गोष्टी साठी जर तुम्ही आपले जीवन घालवलं तर खरच माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो.

७. माझी जीवनशैली काय आहे आणि ती माझ्या ध्येयाला अनुसरून आहे का?

 

women empowerment 3 inmarathi
bollywoodcat

 

प्रत्येक माणूस वेगवेगळी जीवनशैली जगत असतो. मात्र त्यामुळे आपल्या ध्येयात ती जीवनशैली अडथळा बनत नाही ना? हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरेल. त्यानुसार योग्य ते बदल आपल्या आयुष्यात करणे सुद्धा तेवढेच गरजेचे ठरेल.

हे काही मूलभूत प्रश्न आहेत जे माणसाने स्वतः ला विचारले तर तो आपले आत्मपरीक्षण करून योग्य त्या वेळी स्वतः ला बदलू शकतो. याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा विचार करून माणूस स्वतः ला एका वेगळ्या स्थानी नेऊ शकतो.

या गोष्टींमध्ये आपल्याभोवती असलेली माणसे, त्यांचे विचार आणि त्याचा आपल्यावर पडणारा प्रभाव, आपली समजाप्रतीची जबाबदारी याची जाणीव असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

मात्र या सगळ्या आधी गरजेचे आहे ते स्वतः ला आपण आहोत तसे स्वीकारणे. कारण जर माणसाने स्वतः ला स्वीकारले तर आणि तरच माणूस आत्मपरीक्षण करून योग्य ते बदल करून आपले ध्येय गाठू शकतो.

 

sundar pichai inmarathi

 

एकदा का आपल्याला काय करायचंय आणि कोणत्या मार्गाने जायचं आहे हे समजले आणि त्याला तीव्र इच्छाशक्तीची जोड मिळाली तर काहीच अशक्य राहत नाही.

मात्र गरज आहे ती स्वतः मध्ये योग्य वेळेत योग्य बदल करण्याची…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?