प्रत्येक पुरुषाने फॉलो करायलाच हव्यात अशा ८ स्टाईल टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

‘First impression is the last impression’ हे आपण ऐकलंय आणि ‘दिसण्यातल्या सौंदर्यापेक्षा आंतरिक (मनाचं) सौंदर्य महत्वाचं’ हेही आपण जाणतोच. खरं सांगायचं तर आपलं पहिलं impression कितीही नाही म्हटलं तरी महत्वाचं असतंच.

आता आपल्याच आसपास अनेक छान मुलं -मुली असतात, कधी त्यांनी काही छान स्टाईल केली की, आपसूकच आपली नजर त्यांच्याकडे वळते आणि त्याला मुलीही अपवाद नाहीत हो!

आपल्याच कॉलेज मध्ये एखादा मुलगा स्मार्ट outfit मध्ये दिसला की लक्ष तिथे जातंच.

आपण ती स्टाईल कशी कॅरी करतो हेही त्यात आलंच, पण जरा विचार करा. एखाद्या लग्न समारंभात छान धोतर-कुर्ता, पार्टीला टकाटक ब्लेझर -बूट, छानसं घड्याळ, ट्रीपला टी -शर्ट, जीन्स किंवा ट्राउझर वगैरे घातलेला कोणी दिसला तर कोणाच्या मनात – नजरेत भरणार नाही?

 

vicky kaushal 1 inmarathi
orissapost

 

आता तुम्ही म्हणाल सगळं काय ह्यातच असतं का? तर नाही.. सगळं बाह्यरूपात नक्कीच नाहीये. पण आपलं असलेलं रूप आपण छान आणि ट्रेंडी पद्धतीने नक्कीच खुलवू शकतो ना?

छान कॉम्प्लिमेंट मिळालेली कोणाला आवडत नाही?

मुलींना बरेच ऑपशन्स असतात अशी समस्त पुरुष वर्गाची तक्रार असते. पण मित्रांनो आपणही काही कमी नाही बरं का. आपणही थोडंसं मनावर घेत लक्ष देऊन आपल्याला शोभतील आणि उठून दिसतील असे कपडे आणि style कॅरी केली तर नक्कीच आपण प्रेसेंटेबल दिसू .

चला तर मग बघूयात मुलांसाठीच्या काही खास स्टाईल टिप्स.

१. ‘be a man’ :

 

ranveer singh 1 inmarathi
filmibeat

 

तुम्ही काय घालता ह्यावरूनही अनेकजण तुमची परीक्षा करत असतात. त्यामुळे लहान मुलांसारखे कपडे घालणं टाळा. थोडा क्लासी लूक असेल असे कपडे निवडा.

तुम्ही वापरत असलेले टी -शर्ट शक्यतो साधे ठेवा. त्यावर कोणतीही ग्राफिक्स , कार्टूनची चित्रं, काही ओळी वगैरे थोडं बालिशपणासारखं वाटतं आणि तुमची ‘फॅशन’ फ्लॉप ठरते.

त्या quotes चा ही ट्रेंड निघून जातो आणि मग ते tshirt बोरिंग वाटतात. त्यापेक्षा गडद किंवा फ्रेश रंगांचे प्लेन t-shirt तुम्ही निवडूच शकता. त्यात तुम्ही हाफ -लॉन्ग स्लीव्हची फॅशन करू शकता.

 

ranveer singh 1 inmarathi 2
filmibeat

 

गोल किंवा ‘ v’ असा नेक पॅटर्नही निवडू शकता.

स्ट्राइप असलेलेही tshirt आजकाल छान वाटतात. पेस्टल शेडमधेही तुम्ही प्रयोग करू शकता. आपल्यावर तो रंग कसा दिसेल ह्याचा विचार करून खरेदी करा.

 

२. प्रॉपर फिट :

hrithik-roshan-inmarathi
clorot.com

 

अंगापेक्षा बोंगा जास्त वाटेल असे कपडे घालू नका. ढगळपघळ, अंगावरून घसरणारे कपडे वापरणं टाळा नाहीतर तुमच्यात आणि बुजगावण्यात तिळमात्र फरक राहणार नाही.

अंगाला अतिशय घट्ट दिसतील असे कपडे घातल्यावर ते विचित्र दिसतं. त्यामुळॆ व्यवस्थित हालचाल करता येईल आणि गरजेपुरतेच सैल असतील असे कपडे वापरा.

 

३. कपड्याचा पोत :

‘quality is better than quantity ‘ ; म्हणूनच तुमच्याकडे किती कपडे आहेत त्यापेक्षा कसे कपडे आहेत हे महत्वाचं आहे. त्यासाठी थोडा खर्च करावा लागतो हे खरंय, पण ते गरजेचंही आहेच ना!

 

extra piece of cloth-inmarathi01
ties.com

 

धुतल्यावर गोळे येतील, रंग फिका पडेल, दोरे निघतील असे कपडे घेऊन काय उपयोग ? त्यामुळे फक्त एखादी वस्तू आवडली म्हणून न घेता ती नीट पारखून घेणं गरजेचं आहे.

 

४. योग्य पेहेराव :

‘काय घालून जाऊ ?’ हा प्रश्न फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही भेडसावतो. त्यामुळे कारण बघून कपडे निवडावेत. जसं रोजच्या रुटीन मध्ये भरजरी कपडे (कितीही छान दिसले तरी) आपण वापरत नाही तसंच एखाद्या समारंभाला, सणाला साध्या रोजच्या कपड्यात जाणं उचित नाही.

 

virat kohli inmarathi
boldsky.com

 

कारण काहीही असलं, तरी भपकेदार कपडे घालणं नक्कीच टाळा आणि ट्रॅडिशनल वेअरला प्राधान्य द्या. समारंभास आवडीनुसार कुर्ता-पायजमा, आवड असेल तर धोतर किंवा कार्यक्रमाचं स्वरूप पाहून जीन्स देखील घालायला हरकत नाही.

मात्र त्यावर बुटांऐवजी छानशी मोजडी किंवा कोल्हापुरी मिरवा. भीकबाळीची हौस असेल तर मग काही बघायलाच नको.

 

५. कपड्यातली प्रयोगशीलता :

 

गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे काहीतरी वेगळं आणि छान घालण्याच्या गरजेमुळे रोजच्या त्याच त्या कपड्यात आपण बदल करू शकतो. आपल्या नेहमीच्या जीन्स मध्ये आपण वेगळे रंग ट्राय करू शकतो.

 

jeans 1 inmarathi

 

शक्यतो, जीन्स फाटकी, भोकं पडलेली, मोठे पॅच असलेली नसावी. प्लेन किंवा हलका वॉश असलेली जीन्स पसंतीस उतरायला हरकत नाही.

ऑफिसला जायला छान फॉर्मल पॅन्ट वा ट्राउझर तुम्ही वापरू शकता आणि शर्ट नुसार रंगांमध्येही प्रयोग करू शकता. हल्ली स्मार्ट लुक देणारी चिनोज पॅन्टही मस्त वाटते.

फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारात ती छान मॅच करता येते. त्यातसुद्धा बरेच छानसे रंग उपलब्ध आहेत ज्यांचा प्रयोग नक्कीच करता येईल.

 

६. लेअरिंग्ज :

 

aayushman khurana 1 inmarathi
livemint

 

नेहमी फक्त tshirt -शर्ट घालण्यापेक्षा त्यावर तुम्ही एखादं जाकीट किंवा स्वेटर चढवू शकता. ट्रॅडिशनल कपडे असल्यास त्यावर एखादं छानसं मोदी जाकिटही तुमचा लूक पूर्ण करेल.

टर्टलनेकचे tshirt आणि एखादं काँट्रास जॅकेटही छान उठून दिसेल.

 

७. अॅक्सेसरी :

 

shahid kapoor 3 inmarathi
toi

 

यात  सर्वात महत्वाच्या अशा २ गोष्टी म्हणजे स्टेटस सिम्बॉल असणारं घड्याळ आणि बूट.

त्यामुळे एखादं ब्रँडेड घड्याळ आणि पायात छानसे बूट असणं आवश्यक आहे. ऑफिसला किंवा फॉर्मल ऑउटफिट असल्यास छान लेदरचे बूट, कधी स्निकर तर कधी स्पोर्ट शूजचा वापर करावा.

आणि कदापिही फाटके-विटलेले बूट घालू नयेत. हातात आवड असल्यास एखादं कडं व ब्रेसलेट घालायला हरकत नाही.

 

८. केशरचना :

 

amir-khan-inmarathi01
imgpic.or

 

टापटीप, स्टायलिश आणि सोबर ही आजच्या नव्या ‘स्मार्ट’ची व्याख्या बनलीय. त्यामुळे आईच्या भाषेतल्या ‘झिपऱ्या’ वाढवणं टाळा. फेड हेअरकट आजकाल तरुणाईत प्रिय असल्याचं दिसून येतं, ज्यात वरून खालपर्यंत केसांचं प्रमाण विरळ होत जातं.

फक्त केसच नाही तर दाढी आणि मिशीही तुम्ही नीट मेंटेन करून स्वतःला ग्रूम करू शकता. फ्रेंच बिअर्ड, लॉन्ग बिअर्ड, लाईट किंवा नॅचरल बिअर्डही छान वाटेल.

आपल्या बजेट प्रमाणं तुम्ही उत्तम असा वॉर्डरोब क्रिएट करू शकताच. पण ह्या सर्व टिप्स व्यतिरिक्त सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. त्यामुळे पुरेशा आत्मविश्वासाने पेहराव कॅरी करा.

ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील पण जसं बाहेरील रूप कपड्यांनी खुलेल तसंच तुमचं व्यक्तिमत्व कसं विकसित होईल ह्याकडेही नक्की लक्ष द्या.

ब्युटी अँड ब्रेन कोणाला घायाळ करणार नाही?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?