चमत्कारिक : या अद्भुत मंदिरात गेली ९ वर्ष फक्त पाण्याने दिवा लावला जातोय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार ।
तिळाचं तेल कापसाची वात, दिव्याला पाहून नमस्कार ।।
हे स्तोत्र ऐकत, म्हणत आपण लहानाचे मोठे झालो आणि आजही संध्याकाळी देवापाशी दिवा लावताना आवर्जून हे स्तोत्र घराघरात म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे.
कारण दिवा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे होणारी वाटचाल. म्हणून सूर्याच्या प्रभेची प्रतिमा असलेल्या दिव्याला आपण वंदन करतो. दिव्याच्या ओवाळणीने आपण देव देवतांना प्रसन्न करीत असतो, अशी आपली श्रद्धा आहे.
दिव्याचं वर्णन करताना ह्या स्तोत्रात म्हटले आहे ‘तिळाचे तेल कापसाची वात’, म्हणजेच थोडक्यात, दिवा तेवण्यासाठी इंधन आणि वात ह्या दोन्ही गोष्टी हव्यातच. परंतु इंधनाशिवाय दिवा तेवत असला तर?

असं झालं तर हा चमत्कारच म्हणायला हवा. कारण अजूनही जगभरातले शास्त्रज्ञ इंधनाला योग्य पर्याय शोधत आहेत.
आपल्या भारत देशात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत अनेक प्राचीन, प्रसिद्ध आणि भव्य मंदिरे आहेत. त्यांच्याशी निगडित विविध आख्यायिका आपण नेहमी ऐकत असतो.
आज मात्र आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा गावातल्या देवीच्या देवळाबद्दल. हे गाव आहे मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात. त्याच नाव आहे गाडिया गाव.
ह्या गावात कालीसिंध नदीच्या काठावरील हे देवीचे मंदिर ओळखलं जातं ‘गाडिया घाट वाली माता का मंदिर’ या नावाने.
तसं पाहिलं तर, इतर सगळ्याच देवीच्या मंदिरांसारखं हे सुद्धा गावातील एक छोटंसं मंदिर. ह्यात काय अस नावीन्य असणार,परंतु साधारण ९ वर्षांपूर्वी इथे एक अकल्पित घटना घडली.

मंदिरात कायम तेल किंवा तुपाचे दिवे तेवत असतात हे आपल्याला माहीतच आहे. इथे मात्र दिवा तेवत आहे पाण्याने. हा नक्की काय प्रकार आहे? ही अंधश्रद्धा आहे की दैवी चमत्कार?
चला जाणून घेऊया.
तर घडले असे की, एके दिवशी इथले पुजारी श्री सिद्धू सिंह यांनी रोजच्यासारखे दिवे लावले. त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात देवीने दर्शन दिले आणि सिद्धू सिंह यांना सांगितले की,
उद्यापासून दिवा लावताना तेल नाही तर कालीसिंध नदीचे पाणी घालावे. साहजिकच त्यांना प्रश्न पडला की, पाण्याने दिवा प्रज्वलित कसा होणार? त्यासाठी तर तेल किंवा तूपच हवे.
परंतु त्यांनी सकाळी उठल्यावर दिवा लावण्यासाठी तेल न वापरता नदीचे पाणी वापरले आणि काय आश्चर्य खरोखरच दीप प्रज्वलित झाला.
खरं तर देवावर कितीही श्रद्धा असली तरी अशा अकल्पित घटनेवर विश्वास ठेवायला मन धजावणार कसे? त्या प्रमाणे खरेतर सिंधु सिंह देखील थोडेसे घाबरले. परंतु तरीही त्यानी गावकऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली. गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता.

मात्र जेव्हा त्यांनी स्वतः पाण्याने दिवा प्रज्वलित होताना पाहिला तेव्हा त्यांचा ही विश्वास बसला. संपूर्ण गावात ह्या चमत्काराचीच चर्चा सुरु झाली आणि हळू हळू हे मंदिर प्रसिद्ध झाले.
ह्या घटनेनंतर कालीसिंध नदीच्या पाण्यानेच इथे दीप लावला जाऊ लागला आणि ही परंपरा आजही कायम आहे. नदीचे पाणी दिव्यात घालताच ते तेलकट तरल पदार्थ सारखे दिसू लागते आणि वात पेटवल्यास लगेच दिवा प्रज्वलित होतो.
पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढते की, हे मंदिर पाण्याखाली जाते. पावसाळा संपल्या नंतर, शारदीय नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी पुन्हा मंदिर उघडते आणि दिवा लावला जातो.

पुन्हा पुढच्या पावसाळ्यापर्यंत दररोज मंदिरात पूजा अर्चना होते.
हा चमत्कार पाहण्यासाठी इथे आजूबाजूच्या गावातीलच नव्हे तर दूर वरून ही भाविक येत असतात. खासकरून नवरात्रात तर येथे दर्शनासाठी तुडुंब गर्दी असते.
केवळ अंधश्रद्धा म्हणावी तर आजही दिवा पाण्याने कसा प्रज्वलित होतो ह्याची कारण मीमांसा झालेली नाही. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही इथे येणाऱ्या भाविकांचा ओघ कायम आहे, किंबहुना वाढतो आहे.
शिवाय ह्या देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

श्रद्धा आहे म्हणून अशा चमत्कारावर माणूस विश्वास ठेवतो की, चमत्कार पाहूनच श्रद्धा वाढीस लागते हे खर तर एक कोडे आहे. परंतु एकविसाव्या शतकात अशा अद्भुत घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात.
त्यातूनच कुठे तरी दैवी शक्तीचे अस्तित्व मानायला मन उद्युक्त होते.
काही दशकांपूर्वी गणपती दूध पितायेत असं आढळून आले, मुंबई सारख्या शहरातसुद्धा गणपतीच्या देवळाबाहेर दूध पाजण्यासाठी लांब लांब रांग लागत होत्या. लगेचच शास्त्रज्ञांनी त्यामागचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले आणि हळू हळू ही अफवा आहे हे लोकांच्या लक्षात आले.
इथे मात्र अजून, घडणाऱ्या घटनेचे शास्त्रीय विश्लेषण झाले नसावे. असे होत नाही तोपर्यंत तरी हा एक चमत्कारच मानला जाईल.
आज देशात आणि जगात इंधनाची समस्या भेडसावत आहे. कालीसिंध नदीच्या पाण्यात असे कोणते घटक आहेत जे इंधनाचे काम करतात ह्यावर जर संशोधन झाले तर एका मोठ्या मानवी समस्येचे उत्तर आपल्याला मिळू शकते.

भोपाळ शहरापासून जवळ पास दोनशे किमी वरील नालखेडा तालुक्यात गाडिया नावाचे हे गाव वसले आहे आणि ह्या गावातून कालीसिंध नदी वाहते जिच्या घाटावर आहे हे चमत्कारी गाडियाघाट माता मंदिर.
पाण्याने प्रज्वलित होणार हा दिवा स्वतः पाहून खात्री करायची असल्यास ह्या ‘गाडिया घाट वाली माता का मंदिर’ येथे अवश्य दर्शनाला जा.
===
वरील घटनेला पाठिंबा देण्याचा किंवा अंधश्रद्धा पसारवण्याचा आमचा कोणताही हेतु नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.