'भारतातील या गावात स्त्रिया चक्क ५ दिवस निर्वस्त्र राहतात

भारतातील या गावात स्त्रिया चक्क ५ दिवस निर्वस्त्र राहतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

“जसा देश तसा वेश” हे आपण आजवर अनेकदा ऐकलं आहे. खरंतर आपल्याच देशात इतकं वैविध्य आहे की, प्रत्येक राज्याचं आपलं असं वेगळेपण आपल्याला दिसून येतं. आता देश, संस्कृती म्हटलं की परंपरा ह्या आल्याच आणि त्या मनोभावे पाळणाऱ्या व्यक्तीही!

संपूर्ण जगभरात आपल्याला आश्चर्यकारक वाटतील अशा गोष्टी आहेतच, पण आपल्या देशातही अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. संस्कृती, त्यामागची गोष्ट आणि श्रद्धा अशा अनेक गोष्टीचं मिश्रण त्या प्रथा जोपासण्यामागे असतं.

‘zindagi na milegi dobara’ ह्या चित्रपटात उधळलेल्या बैलांसमोर धावण्याची परंपरा किंवा खेळ आपण बघितला. अगदी तसंच pk ह्या चित्रपटसुद्धा अनेक भारतीय प्रथा दिसून आल्या.

 

ZNMD 2 inmarathi
culturetrip.com

 

देवाच्या गाभाऱ्यापर्यंत लोळण घालत जाणारी माणसं देखील पहिली. इतकंच काय तर ‘अगंबाई अरेच्या’ ह्या मराठी चित्रपटात गावच्या जत्रेत वगडाला लटकण्याची पद्धतही दिसून आली.

आता खरंच ह्या गोष्टी होतात का? तर हो, असं बरंच काही आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. काहींवर विश्वास बसणं कठीण असतं पण श्रद्धेपुढे सगळं नगण्य आहे असंच म्हणायला हवं.

आपल्याकडे पाऊस हा महत्वपूर्ण मानला जातो आणि म्हणूनच चांगला पाऊस पडावा ह्यासाठी चक्क बेडूक आणि बेडकीचा विवाह केला जातो. मुलींचा देवाशी लावला जाणारा विवाह तर आपल्या सर्वांना परिचित किंवा ऐकीवात असेलच.

 

indian superstitions inmarathi 1

 

इतकंच काय तर गाढवाचं किंवा कुत्र्याचंही लग्न लावण्याची प्रथा आहे म्हणे.

काही ठिकाणी आपल्याला अघोरी वाटतील अशाही प्रथा पाहायला मिळतात. कडकलक्ष्मी हे नाव जरी ऐकलं तरी पाठीवरच्या फटक्यांचा आवाज कानात घुमतो. अगदी असंच पाठीतून अगदी रक्त येईपर्यंत साखळीला ब्लेड लावून स्वतःला फटके मारण्याची पद्धतही आपल्याकडे आहे.

 

indian superstitions inmarathi
wonderslist

 

महाभारतातील द्रौपदी अंगाऱ्यांवर चालली होती असं म्हणतात आणि म्हणून पेटत्या निखाऱ्यांवरही चालणारी मंडळी दिसून येतात. काठ्यांचे वार किंवा पेटत्या मशालींनी एकमेकांना इजा पोहोचवण्याचीही प्रथा अनेकजण मनापासून पाळतात.

जातीयवादाच्या विळख्यात अडकून ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळ्यांवर लोळण घालणारीही काही माणसं आहेत. बैलपोळ्याला जसं बैलांना सजवतात, तसं गायींना सजवून, रंगवून स्वतः जमिनीवर लोळून गाईंकडून तुडवून घेणारेही महाभागही आहेत.

दक्षिणेकडे, वरुणयज्ञासाठी स्वतःला पाण्याच्या पिंपात गळ्यापर्यंतच्या पाण्यात बुडवून घेणारेही पुजारी दिसून येतात. मनाला पटत नसलं तरी कुतूहल म्हणून नक्कीच आपण त्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतो. बरोबर ना?

तर आपणही आपल्या देशातील अशीच एक अनोखी प्रथा आज जाणून घेऊया.

आपल्याकडील हिमाचल प्रदेशात मणिकर्ण ह्या भागात विवाहित स्त्रिया तब्बल पाच दिवस विवस्त्र राहतात. हे वाचून अनेकांच्या भुवया विस्फारल्या गेल्या असतील हे नक्की.

 

manikarna inmarathi
youtube

 

का बरं करत असतील असं ? हो, हा प्रश्न तुम्हाला भेडसावल्याशिवाय राहणार नाही.

गेली अनेक वर्ष मणिकर्ण मधील पीणी गावात ही प्रथा मनोभावे पाळली जातेय. विशेष बाब म्हणजे, ह्या काळात त्या कोणत्याही पुरुषाच्या समोर येत नाहीत.

का पाळली जाते ही प्रथा :

आपल्या घराचं भलं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घरची स्त्री आपल्याला जमेल ते सगळं काही सर्वांच्या भल्यासाठी करत असतेच. तर ही प्रथा न पाळल्यास त्या घरात काहीतरी अशुभ होतं असं म्हटलं जातं.

त्यामुळे असं काही होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रामाणिकपणे आणि भक्तिभावे ५ दिवस असं केलं जातं.

 

manikarnika 3 inmarathi
gujjubaba.com

 

कुठून आली अशी प्रथा :

आपल्याकडे पुराणातल्या अनेक कथा आहेत. त्यातलं तथ्य नेहमीच तपासून पाहता येणं शक्य नसतं, पण अनेकांचा त्यावर विश्वास असतो. कथा ह्या काल्पनिक असल्या तरी त्यातून मिळणारा बोध मोलाचा असतो.

आणि कैकदा अशा पौराणिक किंवा दंतकथांमधून जन्माला येते ती म्हणजे प्रथा किंवा परंपरा. असं म्हणतात की,

ह्या गावात काही वर्षांपूर्वी एक दानव सुंदर दिसणाऱ्या आणि छान कपडे घातलेल्या स्त्रियांना पळवून नेत असे. ज्याचा अंत ह्या गावातील देवतांनी केला. म्हणूनच पावसाळ्यात ५ दिवस विवाहितेने विवस्त्र रहाण्याची पद्धत सुरु झाली.

कशी पाळली जाते :

५ दिवस निर्वस्त्र राहणाऱ्या ह्या स्त्रिया कोणाच्याही, विशेषतः पुरुषांच्या समोर येत नाहीत. त्या संसारिक जीवनापासूनही दूर असतात. फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांनाही काही नियमांच पालन करावं लागतं.

 

manikarna inmarathi 1
amarujala

 

या संपूर्ण काळात पुरुषमंडळी मद्य सेवन करू शकत नाहीत आणि गावात मांसाहारही वर्ज असतो. त्याचबरोबर गावातलं वातावरणही गंभीर असतं. कोणीही शक्यतो हसत किंवा खिदळत नाही.

परंतु जशी वर्ष लोटली तसा ह्यात थोडा बदल म्हणजेच थोडं modification होऊ लागलंय. आपल्या सोयीनुसार ह्यात थोडा बदल झालाय.

वडाच्या झाडापर्यंत जायला मिळत नाही अथवा वेळ नसतो म्हणून बाजारातून वडाची फांदी आणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. तसंच पाच दिवस वस्त्रांचा त्याग न करता ५ दिवस त्याच कपड्यात राहण्याचा पर्यायी मार्ग निवडून प्रथापालन केलं जाऊ लागलंय.

परिधान केलेली वस्त्र मात्र पात्तळ वा हलकी असल्याचं समजतं.

 

manikarnika 2 inmarathi
lifestylepost

 

आहे की नाही हे आजच्या काळात आऊट ऑफ द बॉक्स? असं बरंच काही आपल्या आसपास सुरु असतं आणि त्याबद्दल जाणून घेऊ तितकं थोडंच.

एक विरंगुळा म्हणून, न पटल्यास, आपण त्याकडे पाहून सोडूनही देऊ शकतो मात्र जसं परदेशातल्या गोष्टी आपल्याला रंजक वाटतात तसं हेही एक सांस्कृतिक वारसा म्हणून जाणून घ्यायला हरकत नाही. आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्याकडे बघतोय ते महत्वाचं.

मांजर आडवी गेली तर ७ पावलं मागे जाणारे जसे आजही सापडतात अगदी तसंच अशा अनेक प्रथांचं पालन करणारेही. पण थोडं खोलवर गेलं तर ‘कोणतंही अरिष्ट ओढवू नये’ हाच सगळ्यांचा मूळ गाभा आहे हे दिसून येतं.

माणूस हा प्राणी प्रगत असला तरीही संकट तसेच मृत्यू अशा गोष्टींना तो घाबरतो आणि कुठेतरी श्रद्धेपोटी अशा गोष्टी पाळू लागतो. काहींचे मार्ग हे सोपे आणि सुटसुटीत असतात तर काहींचे वेदनादायक आणि अघोरी!

त्यामुळे आपल्याला पटेल, रुचेल अशा गोष्टी करणं कधीही उत्तम. आणि शेवटी म्हणतात ना पेरावे तसे उगवते! त्यामुळे कर्मयोग हा सदैव श्रेष्ठच ठरतो.

===

वरील माहिती ही संशोधनाअंती आलेली असून अशा प्रथांना पाठिंबा देण्याचा आमचा कोणताही हेतु नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?