' प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत

प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

स्त्री ही प्रत्येक घरातला केंद्रबिंदू असते असं म्हणायला हरकत नाही. घरातील लोकांच्या सगळ्या कामांची जबाबदारी बऱ्याचदा घरातल्या स्त्री वर असते. अगदी जरी नोकरी करणारी स्त्री असेल तरी ती आपले काम घरातील जबाबदारी सांभाळूनच करत असते.

स्त्री मुळे घरातील सर्वांचे जीवन सुखकर होत असले तरी बऱ्याचदा ती दुर्लक्षित भाग राहते.

सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून, आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळूनच परत घरातील कामे करणे यात ती पूर्ण थकून जाते. त्यात भर म्हणून घरात कोणी आजारी असेल तर त्याची देखभालही तिलाच करावी लागते.

मात्र या सगळ्यात स्त्री च्या आरोग्याची किती हेळसांड होत असेल याचा फारसा विचार केला जात नाही.

 

health test inmarathi 1

 

यामध्ये भारतीय स्त्री चा क्रमांक सगळ्यात वरचढ लागतो. एका सर्व्हेनुसार, भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात फार वरचा क्रमांक लावतात. बरेच आजार अंगावर काढले जातात आणि मग एकदम मोठे आजारपण उद्भवते.

यासाठीच एका ठराविक वयानंतर प्रत्येक स्त्री ने काही चाचण्या करून घेणे गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

निसर्गतःच स्त्री ला वयात आल्यापासून बाळाला जन्मदेईपर्यंत अनेक दिव्य गोष्टींना सामोरे जावे लागते. काही वेळा त्या वेळी योग्य ती काळजी न घेतल्याने अनेक आजार उद्भवू शकतात.

म्हणूनच ‘उपायापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला’ या नात्याने खालील काही चाचण्या प्रत्येक महिलेने करायला हव्याच.

१. अॅनिमिया

 

anemia -inmarathi
wellnesspathcare.com

 

शरीरात रक्ताची कमी असणे याला अॅनिमिया असे म्हणतात. मासिक पाळीमुळे स्त्रियांमध्ये लोहाचे प्रमाण थोडे कमीच असते. म्हणूनच हा रोग होण्याचा धोका जास्त संभवतो.

जर स्त्री खूप अशक्त असेल तर बऱ्याच वेळा त्यांच्यात रक्ताची कमी असते. आजच्या काळात यावर उपाय सुद्धा उपलब्ध आहेत फक्त रोगाचे निदान वेळेवर होणे गरजेचे आहे.

यासाठी सरकार सुद्धा अनेक योजना राबवत आहे. तरीही अजून ४०% महिलांनाही या आजाराची फारशी माहिती नाही. एका रक्ताच्या तपासणीने या रोगाचे निदान केले जाते.

या मध्ये रक्तातील लाल पेशींचे प्रमाण तपासले जाते ज्या शरीराला ऑक्सिजन पुरवतात.

सरकारी रुग्णालयात ही चाचणी खूप कमी रकमेत करून मिळते.

 

२. डायबेटिस

 

diabetes-inmarathi02
jadipani.com

 

डायबेटिस हा जवळजवळ प्रत्येकाला होणारा आजार आहे आणि भारत या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र महिलांना बाळंतपणाच्या काळात हा आजार होऊ शकतो. किंवा त्यानंतर सुद्धा होऊ शकतो.

ज्यात रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते. योग्य त्या काळजीने यावर नियंत्रण आणता येते आणि म्हणूनच प्रत्येक महिलेने ६ महिन्यातून एकदा ही चाचणी केलीच पाहिजे. या मध्ये लघवी व रक्त यातील साखरेचे प्रमाण तपासले जाते.

३. व्हिटॅमिन डी चाचणी

 

vitamene d test inmarathi
thehealthsite.com

 

महिलांच्या वाढत्या वयाप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी होण्याची शक्यता जास्त असते. यात प्रामुख्याने थकवा येणे, वजन वाढणे, वंध्यत्व येणे अशा अनेक समस्या येतात.आणि हाडे कमजोर होण्याचा धोका सुद्धा वाढतो.

म्हणूनच ही चाचणी ३० वर्षांवरील प्रत्येक महिलेने केली पाहिजे. यात रक्तातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण तपासले जाते.

 

४. कॅल्शिअम चाचणी

 

calcium test inmarathi

 

वयोमानाप्रमाणे, महिलांच्या हाडांची झीज होऊ लागते आणि म्हणूनच प्रत्येक महिलेने कॅल्शिअमची चाचणी करणे गरजेचे आहे.

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊन तुटण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये कॅल्शिअमचे रक्तातील प्रमाण ८mg/ml एवढे असणे गरजेचे आहे.

 

५. स्तनांचा कर्करोग

 

breast cancer inmarathi
medical news today

 

स्तनांचा कर्करोग ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. म्हणूनच त्यासाठी मेमोग्राम सारखी चाचणी व डॉक्टरांचे निदान या गोष्टी वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं आहे.

कारण जर वेळेत निदान झालं तर या रोगातून पूर्णतः बरं होता येतं. २०-४० वर्षे या वयोगटातील प्रत्येक स्त्री ने ही चाचणी करणे गरजेचे आहे.

 

६. पॅप स्मीयर टेस्ट

 

pap smear test inmarathi
mayo clinic news network

 

ही एक अशी चाचणी आहे की, ज्याद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करता येते. लग्न झालेल्या सर्व स्त्रिया किंवा ज्या २१ वर्षांवरील मुली ज्या शारीरिक संबंध ठेवतात त्या सर्वांनी ही चाचणी करणे गरजेचे आहे.

 

६. एड्स चाचणी

 

hiv inmarathi
tehran times

 

एड्स हा बऱ्याचदा शारीरिक संबंधांद्वारे पसरणारा रोग आहे.त्यामुळे आई ला झालेला रोग मुलाला होऊ नये म्हणून ही चाचणी करावी.तसेच लग्न होऊ घातलेल्या सर्व जोडप्यांनी सुद्धा ही चाचणी करावी.

७. सोनोग्राफी

 

sonography inmarathi
thehealthline.com

 

काही रोगांचे निदान याद्वारे होऊ शकते. यामध्ये नक्की कोणत्या अवयवाला काय त्रास आहे हे पूर्णतः कळू शकतं. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी ठराविक दिवसांनी सोनोग्राफी केली पाहिजे.

वरील चाचण्या या खूप साध्या आहेत ज्या प्रत्येक स्त्री ने केल्याचं पाहिजेत. याशिवाय इतर अनेक चाचण्या आहेत ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येऊ शकतात. मात्र यासोबतच प्रत्येक स्त्री ने आपला आहार, व्यायाम तसेच मानसिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित ठेवले पाहिजे.

आणि कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेतले पाहिजेत.

 

health test inmarathi

 

वर सांगितल्याप्रमाणे, स्त्रिया कायमच आपला त्रास लपवत आलेल्या आहेत. शहरात निदान आपल्या आरोग्याबद्दल स्त्रिया सजग असतात, पण ग्रामीण किंवा आदिवासी भागांमध्ये या आरोग्यविषयक सुविधा अजून पोहोचल्या नाहीयेत.

तिथल्या स्त्रिया आजही आरोग्यविषयक समस्यांशी झगडत आहेत. त्यामुळे,अशा स्त्रियांसाठी जास्त प्रयत्न व्हायला हवेत.

आज सरकार स्त्रियांच्या आरोग्यासाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहे. त्याचाही लाभ आपण घेतला पाहिजे. तसेच स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे कारण स्त्री जर आरोग्यपूर्ण असेल तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित असते.

त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाने सुद्धा स्त्रीचा सन्मान करून तिच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

तरच भारत खऱ्या अर्थाने ‘सशक्त भारत’ होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?