हे देश स्वतंत्र आहेत, पण येथील महिला अजूनही पारतंत्र्यात आहेत

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपण नेहमी स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गात असतो. स्त्रिया कश्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी पार पाडत आहेत याचे दाखले देतो. पण खरंच असं आहे का? आजही महिलांवर भर दिवसा बलात्कार, अत्याचार होतात त्यांची विटंबना केली जाते. पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. अश्या समाजात स्त्री-पुरुष समानता नांदते असे विधान करणे म्हणजे दिसत असूनही आंधळ्यासारखे वागणे झाले. काही जण म्हणतात की इतर जगाकडे बघा. इतर देशांमध्ये स्त्रियांना किती सन्मानाने वागवले जाते. असं म्हणणाऱ्या लोकांना जणू सत्यस्थितीची कल्पना नाहीये. युरोप, आफ्रिका, आखाती देश सगळीकडे एकच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आहे आणि त्यामुळे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, या २१ व्या शतकातही स्त्रिया अजूनही बंदिवासात जगत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

येमेन एक स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र आहे, त्यामुळे या देशात आजही शरियत कायद्याचे पालन केले जाते. येथील न्यायालयांमध्ये आजही महिलांना पूर्णत: स्वतंत्र व्यक्ति म्हणून मान्यता प्राप्त नाही.

law-against-women-marathipizza01

स्त्रोत

इटली सारख्या विकसित देशामध्ये जर एखादी महिला आजारी असेल किंवा ती दिसायला सुंदर नसेल तर तिला चीज फॅक्टरीमध्ये येण्यास मनाई केली जाते.

law-against-women-marathipizza02

स्त्रोत

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे पण येथील महिलांना अजूनही वाहन चालवण्याची परवानगी नाही.

law-against-women-marathipizza03

स्त्रोत

इराणमध्ये तर महिलांना एखादा खेळाचा सामना पाहण्यास देखील आडकाठी केली जाते.

law-against-women-marathipizza04

स्त्रोत

नॉर्थ कॅरोलीनाच्या शेर्लोट प्रदेशमध्ये तर महिलांना संपूर्ण दिवस अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालून राहणे भाग आहे.

law-against-women-marathipizza05

स्त्रोत

ख्रिश्चन धर्माचे महत्त्वाचे शहर असलेल्या व्हेटीकन सारख्या धार्मिक देशात तर महिलांना आजही मतदानाचा अधिकार नाही.

law-against-women-marathipizza06

स्त्रोत

वेर्मोंतमध्ये एखाद्या महिलेला नकली दात जर बसवायचे असतील तर आपल्या पतीची परवानगी घ्यावी लागते.

law-against-women-marathipizza07

स्त्रोत

डेलोवरमध्ये मुली स्वत:च्या इच्छेने आपला पती निवडू शकत नाहीत. तसेच त्यांना एखाद्याच्या प्रेमात पडण्याचीही परवानगी नाही.

law-against-women-marathipizza08

स्त्रोत

हे कायदे म्हणजे महिलांच्या मूलभूत हक्कावर जणू घालाच आहेत. अश्या कायद्यांनी युक्त समाजाला जर आपण पुरोगामी समजत असू तर तो सर्वात मोठा मूर्खपणा ठरेल.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?